-
Kunya Ekachi Dharangatha (कुण्या एकाची धरणगाथा)
नाशिक जिल्ह्यातला बागलाण तालुक्याचा परिसर हा वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला भाग. इथल्याच गोपाळ मोरे नावाच्या गरीब शेतक-याने हा भाग पाण्यात भिजवण्याची इच्छा मनात धरली आणि तिचा चिवट वृत्तीने पाठपुरावाही केला. या इच्छेपोटी आमदारापासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचा पिच्छा पुरवला...आणि शेवटी आपल्या दुर्दम्य आकांक्षा आणि परिश्रमांनी धरण मिळवलंच. त्याची ही गोष्ट..इतिहासातले तुटक धागेदोरे जुळवत पन्नास वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर काढलेली...
-
Blasfemi (ब्लास्फेमी)
ब्लास्फेमी म्हणजे ईश्वरनिंदा, ईश्वराबद्दल वाईट बोलणारे. कादंबरीचे हे शीर्षक अत्यंत चपखल आहे. धार्मिक सत्तेच्या जोरावर समाजावर अवलंबित अत्याचार करणारे धर्ममार्तंड, त्यांची क्रूरता, ढोंग हे किती पराको[...]
-
Eka Kheliyane ( एका खेळीयाने)
मी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत. ते मिळत गेले . पुस्तकाची प्रूफं चाळताना एकदम वाटून गेलं. हे आपण खरंच इतकं केलं का ? काय नातं आहे या पात्रांशी ? आता वाटतं मी केलं नाही . ते झालं आपोआप आपापली व्यक्तिमत्व, स्वभाव आणि सारी वैशिष्ट्यं घेऊन हि पात्रं उभी राहिली. विविधरंगी , माझ्याशी काही साम्य नसलेली . मनात येतं जमा झाले हे चित्रविचित्र नग माझ्याभोवती , तर सर्जक असूनही मीच त्यांच्यात फार उपरा, अपरिचित , अनोळखी आणि मावळ वाटेन ! ते सगळे आणि मी यांचा परस्पर संबंध आजही मला बऱ्याचदा कोड्यात टाकतो ! ' एका खेळीयाने ' ही पाचवी सुधारित आवृत्ती , नवीन भूमिकांवरील नवीन लेखसंग्रह.