-
Steve Jobs: Ek Zapatlela Tantradnya
स्टीव्ह जॉब्स-तंत्रज्ञानाच्या जगातला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्पयुटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक पलेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
-
Schapelle
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोनेशियात तिला वीस वष| कारावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सार्या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वी न्सलंडमये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सया केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हारता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण सया तरी ती 2024 पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधामागचं सत्य... प्रसारमायमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत... ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या... या सवा|चं अत्यंत वस्तुनिष्ट, संयत वर्णन शॅपेल ह्या पुस्तकात शोध -पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलच्या निर्दोषत्वावर नेहमीच दृढविश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणार्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.
-
Punyashlok Ahilyadevi Holkar.
भारतात निरनिराळ्या स्त्री रत्नांनी जन्म घेतला. कीर्ती अजरामर केले. पुण्यातल्या स्त्रिया सोडल्या तर राजमाता जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मि, गौंड वीरांगना राणी दुर्गावती, राणी चन्नमा, सात वाहन देवी गौतम, देवी वसिष्टी अशी अनेक स्त्री रत्ने होऊन गेली. पण सर्वात देवी अहिल्याबाईंचे स्थान आगळेच आहे. प्रजामाता, राजदेवी, रणचंडी, दीनांची कैवारी आणि प्ररधार्मिक अशा विविध पैलूंनी त्यांचे जीवन उजळून गेले आहे. भारत भराच्या उधवस्त हिंदू धार्मिक स्थानांच्या इतिहासातील हेच अहिल्या देवींचे वैशिष्ट्य आहे.
-
Maharshi Vyas.
जर्नादन ओक यांनी व्यास हे नायक असलेली महर्षी व्यास ही कादंबरी लिहिली आहे. व्यासांनी सामान्य लोकांचे निरीक्षण करून त्यांच्यासाठीही काम केले. सामान्य लोकांचे उपासनासंपद्राय आणि त्यांचे साहित्य व यज्ञ कर[...]