-
Migraine Aani Dokedukhi
ठळक वैशिष्टया १ पूर्वलक्षणं २ प्रभावशाली उपचार ३ होमिओपॉथीपासून आधुनिक उपचार पद्धतीपर्यंत विविध थेरपीज् ची माहिती ४ योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ ५ डोकेदुखी आणि मायग्रेण टाळण्यासाठी प्रतीबंधक असे साधे, सोपे व्यायाम या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सुचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि काल मर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे, तर डोके दुखी पूर्णपणे बरीही होईल!
-
Heart Attack
बदलेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणारयाचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांनमध्ये हृदयविकाराच्या रूग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टीकोन आणि योग्य जीवनशैली हि 'त्रिसूत्री' अंगिकारल्यास हृदय विकारावर माथही करता येते. हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं. ठळक वैशिष्टय १ हृदयाचं कार्य कसं चालतं? २ हृदय विकाराची कारण कोणती? ३उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी? ४ कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात? ५ अंजायानाशी मुकाबला कसा कराल? ६ हृदय विकाराच्या रूग्णांनी कोणते व्यायाम करावेत? ७ हृदय विकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी? ८ हार्ट अॅटॅक किंवा हृदय विकार कसे टाळाल? ९ हार्ट अॅटॅक आल्यास सामोरे कसे जाल? १० अॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?
-
The Hobbit (द हॉबिट)
"द हॉबिट' ही एक कल्पनारम्य गूढकथा आहे किंवा गूढ अशी कल्पनाकथा आहे. मुलांसाठीच असल्यामुळे तीमध्ये मुलांच्या कल्पनाविश्वात जे जे साहसी, धाडसी, गूढ, कल्पनारम्य, अगम्य असे असेल ते ते सर्व या कादंबरीत आहे. मुलांच्या विश्वातील मनोव्यापाराला तार्किक व तर्कसंगत प्रश्न विचारायचे नसतात किंवा त्या प्रश्नांची उत्तरं कार्यकारणभाव सिद्धान्ताचा वापर करून शोधायची नसतात. कल्पनारम्य मनोव्यापार हीच ती संगती आहे. टॉल्किनने याच सूत्राचा वापर करून "द हॉबिट' लिहिली आहे. पराक्रम, धाडस, जादू, चमत्कार या सर्व गोष्टींची रेलचेल "द हॉबिट'मध्ये असल्याने वाचक त्यात आकंठ बुडून जातो आणि त्यातील ड्वार्फसबरोबर त्याचाही प्रवास सुरू होतो. "द हॉबिट' हाच एक चित्तथरारक प्रवास आहे. कारण टॉल्किनने कादंबरीच्या पर्यायी नावातच त्या प्रवासाचे सूचन केले आहे.