-
Kraantisurya
१९४२च्या धगधगत्या कालखंडात साताNयाच्या भूमीमध्ये "प्रतिसराकार" (पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणा-या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी माक्र्सवादी. त्यांचे लोभस, रांगड व्यक्तिमत्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मुलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेणारी, कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ‘क्रांतिसूर्य’.
-
The Satan Bug
त्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती 600 फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई' इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता. तिथेच एक नवीन लस संशोधित केली होती. ती लस लक्षावधी माणसांचे बळी घेऊ शकत होती. पण ती नवीन संशोधित लस तिथून गायब झाली.... त्या अति गूढ रहस्याचा छडा लागत नव्हता. ते सौतानी विषाणू अखिल मानवजातीचा बळी घेऊ शकत होते. अंगावर काटा आणणारी रहस्यमय कादंबरी श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शौलीत मराठीत अनुवादित केली आहे.
-
The Three Mistakes Of My Life
"फाईव्ह पॉइंट समवन'' आणि "वन नाईट अॅट द कॉल सेंटर'' यानंतरची चेतन भगत यांची ही तिसरी कादंबरी. चेतन भगत यांच्या चित्रदर्शी शैलीतली ही कादंबरी वाचकांना त्या विश्वात नेऊन खिळवून ठेवते. लेखकाच्या खुसखुशीत भाषेमुळं ही कादंबरी अधिक वाचनीय बनली आहे. तीन मित्र... स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं असणारे; वास्तव जीवनाच्या धगीचा सामना करत त्याला तोंड देणारे... सत्य घटनांच्या संदर्भाशी सुरेख मिलाफ साधणारी ही कादंबरी. सध्याची पिढी, त्यांच्यापुढचे प्रश्न, सद्यपरिस्थिती यांचा वेध घेतानाच; बिझनेस, क्रिकेट व धर्म याही विषयांची सुरेख गुंफण करून वाचकांना एक विलक्षण अनुभूती देते.
-
One Night At The Call Centre
लेखकाला रात्रीच्या प्रवासात एक तरुण, देखणी मुलगी सहप्रवासी म्हणून भेटते. वेळ घालवण्यासाठी, ती त्याला एक गोष्ट सांगू इच्छिते, मात्र ती त्याला अट घालते, की त्या गोष्टीवर त्यानं दुसरं पुस्तक लिहायचं. लेखक सुरुवातीला ते मान्य करायला धजत नाही; पण त्याला ती गोष्ट जाणून घ्यायचं औत्सुक्यही असतंच. त्यानंतर ती मुलगी लेखकाला कॉल सेंटरमध्ये काम करणार्या सहा लोकांच्या एका रात्रीची कथा सांगते. "फाईव्ह पॉइंट समवन' नंतर चेतन भगत यांचं हे तितकंच चर्चेत आलेलं पुस्तक वाचकांना निश्चितच निराळ्या अनुभवविश्वाची सफर घडवेल. नर्मविनोदाचा सुखद शिडकावा देणारी ही कादंबरी सद्यस्थितीवर भेदकपणे प्रकाश टाकत वाचकांना नक्कीच अंतर्मुख करेल.