-
Dainandin Sanskar
सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत आपण परमेश्वाराचा विविध पद्धतीने, विविध प्रकारे आठव करीत होतो. 'आठव करीत होतो' असं सांगण्याच कारण हेच की नव्या युगात, नव्या जगात, नव्या पद्धतीत, नव्या चालीरीतीत घातले आहे. शुभं करोती, सायं संध्या पासून श्लोक, स्तोत्र, आरत्या या संस्काराचं विरस्मरण होऊ घातलेल्या येणारया प्रत्येक नव्या पिढीसाठी आवश्यक असलेले असे हे - दैनंदिन संस्कार
-
Ravindrayan
रवींद्र पिंगे यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला चाहता वर्गही मोठा आहे. त्यामुळेच पुस्तक, दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्र अशा विविध माध्यमांतून त्यांनी लेखन केले. आणि त्याला वाचकांनीही दाद दिली. त्यांचे अनेक लेख गाजले. त्यातील काही लेख रविंद्रायन या लेखसंग्रहात वाचायला मिळतात. व्यक्तिचित्र, निसर्ग, साहित्य अहसा विविध विषयांवरील त्यांचे लेख यात आहे. यातून पिंगे यांचे खास लेखनवैशिष्ट्य दिसून येते.
-
Jidnyasapurti
विज्ञानविषयी उत्कृष्ट व रंजक लेखक करणार्यात निरंजन घाटे हे नाव आज आघाडीवर आहे. विज्ञान विषयावर श्री घाटे यांनी अनेक पुस्तके लिहिली असून ती वाचकप्रिय ठरली आहेत. 'जिज्ञासापूर्ती’ हा विषयही सदैव कुतूहल निर्माण करणारा आहे हे ओळखूनच त्यांनी या पुस्तकांची निर्मिती केली असावी. कारण सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षा, दूरचित्रवाणी वाहिन्यावरील प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम या प्रकारामुळे तर हा विषय परवलीचा ठरला आहे. या पुस्तकात एकूण 69 छोटे छोटे लेख समाविष्ट असून अनेक, लेखांना चित्रांचीही जोड दिलेली आहे. पृथ्वीचे वातावरण खरेच तापते आहे का ? रात्रपाळी करण्यामुळे त्रास होतो का ? क्लिओपात्रा खरंच अस्तित्वात होती का ? जाड माणसे अधाशी असतात का ? मंगळावर सजीव आहेत की नाहीत? उडत्या तबकड्यांचे गूढ, पैशाचा जन्म कधी झाला ? स्त्री आणि विज्ञान यांचे का पटत नाही ? चंद्रावर पाणी आहे का ? अशी अनेक प्रश्नांचे कुतूहल आपल्या 69 लेखांतून शमविण्याचा श्री. घाटे यांनी प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील सर्व लेख वाचून, नीट समजावून घेतले तरी वाचकांच्या सामान्यज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना अनेक भौगोलिक प्रश्नोत्तराचे भांडार म्हणून वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करील. यात शंका नाही.
-
No God In Sight
ही एक धीटपणे लिहिलेली अशी पहिलीच कादंबरी आहे, की ज्यात एखाद्या शहराची सार्वत्रिक जाणीव टिपलेली आहे आणि मुस्लीम मनाचा कानोसा घेतलेला आहे. ही कादंबरी वेगवान असून एका नवीन शोधलेल्या प्रकारात मोडते. यातील घटनांची दखल ही प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून पाहून घेतलेली आहे. एक गर्भपात करणारा तज्ज्ञ, एक बाटगा, एक गरोदर कुमारिका, एक निर्वासित, लपून बसलेला एक गुंड, एक खाटिक आणि एक सहानुभूतीशून्य चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अशी व अन्य पात्रे यात आहेत. शिवाय अनेक तरुण माणसे व स्त्रिया ह्या लौंगिक आकर्षणाचे अंतिम परिणाम जोखण्याचे प्रयत्न करीत असतात. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवरती मुंबई शहर आहे. हे शहर माणसाला पूर्ण समाधान देऊ इच्छिते. पण या शहरापुढे सपशेल शरणागती पत्करली तरच ते तुम्हाला जगू देते. पुस्तकांच्या जगात एका नवीन आवाजाची नांदी करणारी समर्थ कादंबरी !
-
Simepalikadun
नारायण धारप यांचा हा काही पहिला कथासंग्रह नाही. पण त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या द्विशताहूनही जास्त अशा कथांतील वैशिष्ट्ये याही कथांत आहेत. परिनामकारक भयकथेमध्ये वाचकांना त्यांचा अविश्वास क्षणभर खुंटीवर टांगून ठेवायला लावण्याची जी किंमया असते ती या कथांमध्ये अवश्य आहे. धारपांची भाषा चित्रमय आहे. वाचकांच्या डोळ्यांसमोर घटना साक्षात् उभी करण्याचे सामर्थ्य त्या भाषेत आहे. शिवाय धारपांनी ( आजवरच्या सर्वच भयकथालेखकांनी ) या अमानवी विश्वासाठी जे एक तर्कशास्त्र निर्माण केलेले आहे त्याच्याशी या सर्व कथा सुसंगत आहेत. ....दिलीप प्रकाशन .