-
Shailendra Aani Saheer-Shabdchitanyache Kimayagar
हिंदी चित्रपटांतील गाणी आणि विशेषतः जुनी हिंदी गाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ मनोरंजनच नाही तर अनेकदा एखाद्या मूड मध्ये जाण्यासाठी किंवा एखाद्या मूड मधून बाहेर येण्यासाठी, लोकांच्या नकळत खुले आम एखाद्याला निरोप देण्यासाठी आणि इतकंच नाही तर जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ही गाणी कामी आली आहेत आणि येत राहतील. विलास देशमुख यांनी त्याही पुढे जाऊन काव्यामागील कवी आणि कवीमागील माणूस शोधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. मुळांत गाणी आणि गीतकार अशा पध्दतीने समजून घेण्याची आस जागी होणं ही गोष्टच त्यांना सामान्य श्रोत्यांपासून वेगळं करते आणि मग आपण त्यांनी दाखवलेल्या शक्यतांचा हात धरून पुढील प्रवास करतो. प्रत्येक घरात गोष्टी सांगणं, ऐकणं अप्रूपाचं असतंच पण या अशा पुस्तकांच्या रूपाने "गाणी सांगणारं" ही कुणीतरी आहे हे विशेष. अनेकानेक शुभेच्छा.
-
Nivadak Shi.K. (निवडक शि. क.)
'निवडक शि. क.' या संग्रहाची कल्पना वाचकांमुळेच सुचली. याचे श्रेय तमाम वाचकांचेच. अनेक पुस्तकांतून प्रसिद्ध झालेल्या लेखनातील निवडक लेख निवडणे तसे फारच जिकीरीचे. पण वाचकांना आनंद मिळेल आणि चित्रपट, क्रिकेट व ललित लेखन यांचा समतोल राहील याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तो वाचकांनाही नकीच आवडावा.
-
An Island (ॲन आयलंड)
"सॅम्युअल प्रदीर्घ काळापासून एकटा राहिला आहे. ठरावीक कालावधीनं सामानाचा पुरवठा करणारी बोट आणि भूतकाळात मुख्य भूमीवरून आलेले सरकारचे प्रतिनिधी यांनीच केवळ इथं भेट दिली आहे. तो दीपस्तंभाची व्यवस्था पाहतो आणि आपल्या कोंबड्या सांभाळत किनार्यावर येणार्या लाटा बघत राहतो. मग एका सकाळी, त्याच्या सोबतीसाठी आणि त्याच्या एकांतवासाला धोका निर्माण करण्यासाठी समुद्र कुणाला तरी घेऊन आला असल्याचं त्याला आढळतं... अपराधभाव आणि भीती, मैत्री आणि नकार यांविषयीची; तसंच `घर` या संकल्पनेच्या अर्थाविषयीची उत्कट आणि प्रभावी कादंबरी. "
-
Bhavgiri (भावगिरी)
मृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी कोकणी माणसं भुताला घाबरत नसली, तरी त्यांच्या सभोवतालचे जग व त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा-वेदना-दु:ख, काळजाला पीळ पाडते; कारण कोकणातील निसर्गसमृद्धी जरी आपल्याला वेड लावत असली, तरी परिस्थितीने गांजलेल्या माणसांची दुनिया तिथेही आहेच.गरिबीत दिवस काढूनही कोकणी माणूस काटेरी फणसासारखा आहे. वरून कठोर वाटला तरी त्याच्या हृदयात शहाळं असल्याची जाणीव कायमच दिसते. कोकण म्हणजे पिशाच्चांचं आगर समजलं जातं. मानवी प्रवृत्तीत जसा स्वार्थ-अधाशीवृत्ती दडलेली असते,तीच अतृप्त इच्छा मनात धरून भुतांच्या जगतातील विचित्र असे मानसिक व्रÂौर्य, बदला आणि अतृप्त आत्म्यांची घालमेल कोकणकथांतून आपल्याला दिसते. भावगिरी पर्वताचे दर्शन मनाला मोहवणारे, त्यामुळे माणूस कोकण प्रेमात पडला नाही तर नवलच! येथील जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयता, गूढगुंजनात्मकता कोकणचे गाणं बनते... मनात रुंजी घालते. ‘भावगिरी’ पर्वताशी केलेलं हे हितगुज म्हणजे आपल्या गावातील मातीशी असलेलं विश्वासाचं घट्ट नातं!
-
Room Number 312 Aani Itar Katha (रूम नंबर ३१२ आणि
देशभरातील नामांकित लेखकांनी लिहिलेल्या १९ खुमासदार कथांचा हा संग्रह. कथानकांमधले अजब ट्वीस्ट आणि रंगत प्रत्येक कथेत अनुभवास येते. मैत्री, नातेसंबंध, भयपट आणि अशाच गमतीशीर रोमांचित करणाऱ्या या कथा आहेत.
-
Amir Khusro (अमीर खुस्रो)
तेराव्या शतकातील भारतीय कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ज्ञ अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो. सुलतान जलालुद्दीन खिलजीने खुसरोंच्या काव्यरचनेवर खूष होऊन त्यांना `अमीर` हा किताब दिला. या अमीर खुस्रो यांची जीवनकथा उलगडणारे पुस्तक म्हणजे मिलिंद जाधव यांची ही नवी कादंबरी `अमीर खुस्रो`. खुस्रो यांचा जन्म सध्याच्या पंजाबातील पतियाळा येथे झाला. खुस्रोनी फारसी, हिंदवी आणि उर्दू मध्ये काव्यरचना व लिखाण केले. ते उर्दू भाषेतील पहिले कवी. खुस्रो उत्तर भारतीय संगीतातील खयाल गायकीचे, कव्वाली रचनांचे आणि गझल या काव्यप्रकाराचे जनक मानले जातात. खुस्रो दिल्लीच्या तत्कालीन सात सुलतानांचे दरबारी जाणकार, संगीतकार होते. मिलिंद जाधव यांनी खुसरोंच्या जीवनपटासोबतच तेव्हाच्या काळाला देखील वाचकांसमोर उभे केले आहे. खुस्रो यांच्या मूळ लेखनाच्या बरोबरीने त्या लेखनाची प्रक्रिया, खुस्रो यांचा दरबार, समाज आणि वैयक्तिक आयुष्यतील वावर, त्यांनी केलेल्या चर्चा, टीका यांचा समावेश कथानकात केला आहे. तत्कालीन उर्दू, हिंदवी भाषेचा लहेजा वापरत कादंबरीची भाषा नटवली आहे.