-
Banking Pravas-Samajik Janivetun (बँकिंग प्रवास सा
बँकेतल्या नोकरीकडे एक आरामदायी, अधिक पगार आणि प्रतिष्ठा देणारी नोकरी म्हणून पाहणारे अनेक जण असतात. ज्या वेळी बँकेतल्या नोकरीकडे केवळ नौकरी म्हणून पाहिले जाते, त्या वेळी हाती काहीच लागलेले नसते. सेवाकाळात मिळालेला पगार, बोनस आणि निवृत्तीच्या वेळी मिळणारे फंड, मॅच्युइटी हे इतकेच घेऊन मंडळी ज्येष्ठ नागरिक बनलेले असतात; परंतु काही मोजकेच लोक या नोकरीकडे दरमहाच्या पगार देणाऱ्या नोकरीपलीकडे बघतात आणि ही नोकरी म्हणजे समाजासाठी, समाजातल्या दुर्बलांसाठी काही करण्याची एक संधी आहे, असंही समजतात. ही मंडळी पगार तर मिळवतातच, तसेच अन्य नोकरीतले जे काही लाभ असतात, तेही प्राप्त करतात. त्याशिवाय त्यांनी प्रचंड मोठे समाधान मिळवलेले असते. आपण एका संस्थेच्या विकासात पूर्ण ताकदीनिशी आपला हातभार लावला आहे. याचे ते समाधान असते. आपण आपल्या अधिकाराचा सुयोग्य उपयोग सामाजिक हित सांभाळण्यासाठी केला आहे, याचे त्यांना समाधान असते. त्यांनी अनेक तरुणांना रोजगारप्रवण केलेले असते, अनेक उद्योगांना हातभार लावलेला असतो. हे सगळे प्रसंग, त्यातून मिळालेले समाधान याची मोजदाद कशातच करता येणार नाही. आजही कुणीतरी चुणचुणीत, पण गरीब असा एखादा वसंत बँकेत आलेला आठवतो आणि आपल्या समोरच त्याचा उद्योग बहरलेला आपण पाहिलेला असतो. हे असे अनेक प्रसंग निवृत्तीनंतर एक आत्मिक समाधान देत असतात. नोकरी म्हणजे सामाजिक दायित्व निभावण्याची संधी आहे, असे समजून काम केलेल्या व्यवस्थापिका सौ. जान्हवी जोगळेकर यांचा सेवाकाळ म्हणून तर अत्यंत समाधानाचा ठरला आहे. सगळे प्रसंग आजही आनंद देणारे आहेत आणि आता नोकरीत असणाऱ्यांसाठी तो एक वस्तुपाठ आहे. आवर्जून वाचावे, असे हे स्मरणरंजन आहे.
-
Gautam Buddhanche Charitra (गौतम बुद्धांचे चरित्र)
गौतम बुद्ध आपल्या आनंदा नावाच्या सत्शिष्याला शेवटचे सांगणे सांगताना म्हणतात की, ‘तू सन्मार्गानुवर्तनाचा प्रयत्न सर्वदा उत्साहपूर्वक व खऱ्या आस्थेने चालू ठेव. असे करशील, तर तू विपत्तींपासून मुक्त होशील. दुर्वर्तन, आत्मपरताभ्रम व अज्ञान यांपासून तुझे मोचन होईल. मी इहलोक सोडून गेल्याबद्दल तुम्हास वाईट वाटण्याचे कारण नाही. माझा देह येथून नाहीसा झाला, तरी माझ्या सत्यधर्मरूपाने मी सर्वदा तुम्हास सन्निध राहीन. माझे देहावसान झाले, तरी मी उपदेशिलेले सत्य अमर राहील. ह्या लोकी मी जे सत्याचे राज्य स्थापिले आहे, ते जगाच्या अंतापर्यंत अढळ राहावयाचे. आता ह्या सत्याच्या यथार्थ स्वरूपाविषयी जनाची चित्ते वेळोवेळी भ्रांत होतील; परंतु माझ्यासारखे सत्यबोध करणारे पुरुष पुढे निर्माण होऊन जन पुन्हा सन्मार्गवर्ती होतील.’ गौतम बुद्ध या नावातील ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा होतो. बुद्ध ही उपाधी त्यांनी अत्यंत प्रयत्नांनी मिळविली होती. शाक्यमुनी गौतम बुद्धांना संमासंबुद्ध मानतात. संबुद्ध म्हणजे स्वतःवर विजय मिळविलेला आणि स्वतःचा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध; तर संमासंबुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त झालेला, स्वतःसोबतच संपूर्ण जगाचा उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.
-
Maharashtrachi Phule Sankruti Arthat Bhahujan Sans
डॉ. सो. रा. शेडे फुले संस्कृतीला ‘बहुजन संस्कृती’ म्हणतात. सत्यशोधक चळवळीची क्रांतिकारकता दोन शब्दांत सांगायची म्हटले तर, सध्याच्या भारतीय संविधानाचे ‘ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे आणि फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करताना सुरुवातीलाच ‘सत्यमेव जयते’ असा नारा दिलेला आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीने केलेली मानसिक व वैचारिक मशागत अत्यंत मूलगामी आहे आणि तिची आज नितांत गरज आहे. भारतीय संविधानाने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, समाजवाद इत्यादी मूल्ये रुजविण्यासाठी सत्यशोधक चळवळीची नितांत गरज आहे. डॉ. सो. रा. शेंडे यांचे हे पुस्तक या दिशेने टाकलेले एक पाऊल वाटते. डॉ. बाबा आढाव (ज्येष्ठ समाजवादी नेते)
-
The Making Of Star India (द मेकिंग ऑफ स्टार इंडिया
१९९०च्या सुरुवातीला रिचर्ड ली यांच्याकडून रुपर्ट महोक (कार्यकारी अध्यक्ष, न्यूज कॉर्पोरेशन) यांनी स्टार टीव्ही ही कंपनी ८७० मिलियन डॉलर एवढी अवाढव्य रक्कम खर्च करून विकत घेतली, तेव्हा जगभरातील माध्यम तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या होत्या. कसलंही निश्चित भवितव्य किंवा ओळख नसलेल्या आशियातील या कंपनीमध्ये मर्डोक यांनी इतकी प्रचंड गुंतवणूक का केली असेल? आज २५ वर्षांनंतर ‘स्टार इंडियाचा महसूल २ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. आज ‘स्टार इंडिया’ भारतातील तीन प्रमुख प्रसारमाध्यम कंपन्यांपैकी एक आहे. शेकडो गुंतवणूक तज्ज्ञांना जे जमलं नाही; ते मर्डोक यांच्या अंतःप्रेरणेनं घडवून आणलं होतं! आणि भारतातील प्रचंड मोठ्या बाजारपेठेची ओळख रुपर्ट मर्डोक यांच्यामुळे जगाला झाली! वनिता कोहली-खांडेकर यांनी भारतीय प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू असलेल्या ‘स्टार टीव्ही’ची ही रोमांचक कथा या पुस्तकामध्ये चितारली आहे. मुळात अत्यंत उत्कंठापूर्ण अशी कथा अतिशय रोचक किस्से आणि रतिकांत बासू, पीटर मुखर्जी, उदय शंकर, समीर नायर आणि खुद्द रुपर्ट मर्डोक यांच्या व्यक्तिरेखांमुळे अधिकच उठावदार झाली आहे.
-
Rashtriya Ekatmateche Shilpkar-Barrister Sardar Va
पंकज रूपचंद पाटील आणि संदीप भानुदास तापकीर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ हा ग्रंथ आधुनिक भारताच्या एकात्मतेसाठी व समृद्धीसाठी उपयुक्त ठरणारा वैचारिक ग्रंथ आहे. वल्लभभाईंच्या चरित्रासह भारताच्या इतिहासाचे अंतरंगी वास्तव या ग्रंथात सप्रमाण चित्रित झाले आहे. सरदार पटेल यांच्या विनोदी स्वभावाचे अनेक किस्से व घटनाप्रसंग लेखकाने सांगितले आहेत. पोलादी पुरुषाचे हे वेगळे रूप नवीन असल्याने वाचकांना प्रचंड भावते. विशेष म्हणजे, म. गांधी व पटेल यांच्यातील खुमासदार संवाद आणि त्यातून जन्माला आलेला विनोद मुळातून वाचणे महत्त्वाचे ठरते. वल्लभभाई आणि म. गांधी यांचे सहअस्तित्व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या गाभ्यातील सूत्र आहे. म. गांधींची उपोषणे, आंदोलने यांचा थेट अनुबंध सरदारांच्या जीवनाशी येतो. म्हणून गांधींचा जीवनपट पटेलांच्या नोंदीशिवाय पूर्ण होत नाही; तसेच गांधी-नेहरू-पटेलांविना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजून घेता येणार नाही. पंतप्रधानांचे पद पंडित नेहरूंनी भूषविल्याने गांधीनंतर त्यांचेच नाव गाजले आणि पटेलांच्या वाट्याला उपेक्षा आली; पण या ग्रंथाने सरदार पटेल यांना न्याय दिला आहे.
-
Steve Jobs (स्टिव्ह जॉब्स)
स्टीव्ह जॉब्ज या द्रष्ट्या संयोजकाने कॉम्प्युटर, मोबाईल फोन, आयपॅड, म्युझिक प्लेअर यांची निर्मिती करून तंत्रज्ञानाला सर्वमान्यता मिळवून दिली. सर्वोत्तम गोष्टींचा ध्यास घेतलेल्या स्टीव्हने हे सर्व कसे साध्य केले, त्याबरोबरच अॅपल, पिक्सार या अग्रगण्य कंपन्यांच्या निर्मितीची यशोगाथा, कर्करोगाने सर्व शरीर पोखरून टाकलेल्या स्टीव्हने शेवटच्या क्षणापर्यंत नवनिर्मितीचा घेतलेला ध्यास, हे सारेच अत्यंत रोचक आहे. स्टीव्ह जॉब्ज म्हणजे, पृथ्वीवरचा एक प्रसिद्ध जादूगार! जग समृद्ध करायच्या प्रयासांमुळे त्याने आपल्या मनात आदराचे स्थान का व कसे निर्माण केले, हे सर्व सविस्तरपणे वाचल्याशिवाय आपल्या मनाचे समाधान कसे होईल?
-
Eka Aarambhache Prastavik (एका आरंभाचे प्रास्ताविक
असंख्य प्रश्नांनी भरलेल्या या विराट दुनियेत व्यक्तीच्या आपल्या म्हणून असणाऱ्या प्रश्नांना जागा आहे की नाही? जागा असेल किंवा नसेल, जागा द्या किंवा देऊ नका, व्यक्ती म्हणून प्रत्येकाला अशा आपल्या आपल्या फक्त स्वतःच्याच अशा प्रश्नांशी कायमच झगडावं लागत असतं. हे कोणालाही पटावं. ते आपल्या सगळ्यांचं वास्तव असतं. अन हे प्रत्येकी वेगळं असतं. दुनियेत अशी सात अब्ज वास्तवं या घडीला मौजूद आहेत. अन ती सगळी एकमेकांपासून भिन्न आहेत. अन त्या प्रत्येकाची आतली एक भली मोठी दुनिया आहे. तिला काही महत्त्व आहे की नाही?… अशा प्रश्नांची दुनिया घेऊन वावरणारी काही प्रातिनिधिक पात्रं या कादंबरीत आहेत. त्यांच्या प्रश्नांची देवघेव, त्यांचे टकराव, बारक्या बारक्या इच्छा, आकांक्षा आणि हितसंबंधांचे टकराव यांच्यातून कथानक पुढे सरकत जातं. आणि प्रत्येक पात्रासाठी काही एका आरंभाजवळ येऊन थांबतं. असा आरंभ कुठे स्पष्ट कुठे अस्पष्ट सुद्धा असतो. उदाहरणार्थ लमुवेल आणि तुंगाक्का यांच्यासाठी हा आरंभ स्पष्ट दिसतो. बाकीच्यांसाठी तो तितका दिसत नाही. पण तो असतो. कारण कोणताही शेवट हा मुळात आणखी एका आरंभाचं प्रास्ताविकच असतो. म्हणून ही कादंबरी. एका आरंभाचे प्रास्ताविक.
-
Rath (रथ)
१९८४ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीला वाङ्मयीन चळवळींची विशेषतः ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे. या चळवळीतील विविध पातळ्यांवरील नेते, कार्यकर्ते, त्यांचे मनोव्यापार, त्यांच्या भूमिका; त्यांचे जगणे या साऱ्याचे वेधक चित्रण व विश्लेषण स्वाभाविकपणेच तिच्यात येते. चळवळी या त्या त्या काळाच्या अपरिहार्य गरजा म्हणून निर्माण होत असतात. माणसं निमित्तमात्र असतात. ती नसती तर त्यांची जागा आणखी कोणीतरी घेतलीच असती, हे खरंच आहे. पण माणसं निवडण्यासाठीची उपलब्धता ही त्या त्या काळाची मर्यादा सुध्दा असते. या मर्यादेचा चळवळीच्या गतिचक्रावर, तिच्या भवितव्यावरही प्रभाव पडत असतो. आणि हे अपरिहार्यही असतं. काही संपतं वा थांबतं तिथून नवं काही सुरू होतच असतं. किंबहुना माणसांना काहीच सुरू करता येत नाही वा थांबवताही येत नाही. दोन्ही प्रकारात कृतीचे जे भ्रम असतात त्यांचा निरास फक्त अनुभवाच्या ज्ञानाच्या उजेडातच होतो. या प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते. स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व सांस्कृतिक आकांक्षेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सुध्दा या कादंबरीकडं पाहता येईल.
-
Charlatans (शार्लटन्स)
बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमधील एका लोकप्रिय कर्मचऱ्याचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू... त्यानंतर आणखी दोन मृत्यू...तीनही वेळेला अॅनेस्थेसियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. एवा लंडन...... डॉ. नोहा हा सुपर चीफ सर्जिकल रेसिडेन्ट याची चौकशी करतोय... नोहा आणि एवाचं प्रेमप्रकरण...एवाऱ्याभोवती गूढतेचं वलय...अचानक ते दुरावतात...नोहाला निलंबित केलं जातं...त्याचा पाठलाग होत असतो... काय रहस्य असतं एवाचं? नोहाचं निलंबन मागे घेतलं जातं का? उत्कंठावर्धक कादंबरी.
-
The Monkeys Raincoat (द मंकीज रेनकोट)
जेव्हा एलन लँग एल्विस कोलच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तिचा नवरा आणि मुलगा दोघेही बेपत्ता असतात. वरकरणी पाहता हे प्रकरण साधे वाटत असले तरी एल्विस कोल किंवा त्याचा ताकदवान सहकारी ज्यो पाईक यांना त्यात फार काही रोमांचक किंवा आव्हानात्मक वाटत नाही. पण हॉलिवूडच्या स्टुडिओपासून सुरू झालेले हे शोध प्रकरण त्यांना अमली पदार्थ आणि लैंगिकता आणि खुनापर्यंत घेऊन जाते. आता हे प्रकरण नुसतेच रोमांचकारी, आव्हानात्मक नसते तर घाणेरडेदेखील होते. कारण पोलिसांपासून ते गुंडांपर्यंत सर्वांनीच एलन आणि एल्विस यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही एल्विस अखेरच्या दुव्यापर्यंत पोहचतोच, पण तो उत्कंठावर्धक प्रवास हे पुस्तक वाचूनच अनुभवता येईल.
-
Auchwitz Cha Photowala (ऑशविट्झचा फोटोवाला)
"जर्मनीतील सामूहिक हत्याकांडाच्या केंद्रस्थानी घडणारी ही धाडसी आणि आशावादी कथा आहे. जर्मनीने १९३९ मध्ये पोलंड वर विजय मिळवला. तेव्हा विलहेम ब्रेस याला हिटलर गोटात सामील होण्याचा आदेश करण्यात आला. त्याने तो नाकारला. मग त्यानंतर राजकीय कैदी नंबर ३४४४ म्हणून त्याला अशविट्झच्या छळछावणीत पाठवण्यात आले. शुट्झशाफेलनी त्याला छावणीतील आतील कामाचा लेखाजोखा मांडण्याचे काम दिले. छावणीत येणाऱ्या कैद्यांचे फोटो घेण्यापासून त्याने कामाला सुरवात केली आणि कालांतराने जोसेफ मेंगल यांनी गुन्हेगारांवर केलेले वैद्यकीय प्रयोग आणि प्रत्यक्ष कैद्यांच्या कित्येक फाशी नोंदवण्यापर्यंत त्याने काम केले. १९४० ते १९४५ दरम्यान, ब्रेसने त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक घटनांचे ५०,००० फोटो घेतले. तसे फोटो काढत बसण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. पुढे पुढे त्या कॅमेराच्या मागे लपून राहणे ब्रेसच्या विवेक बुद्धीला पटेना. सुरवातीला तो छावणीतील रहिवासी चळवळीत सहभागी झाला. कैद्यांची खोटी कागदपत्रे तयार करणे, या छावण्यांमध्ये काय चालू आहे हे बाहेरच्या जगाला कळावे म्हणून आटले फोटो बाहेर पाठवणे अशा गोष्टी तो या चळवळीतून करू लागला. नंतर शेवटी सोव्हिएत सैनिक आले तेव्हा शुट्झशाफेलनी ब्रेसला ते फोटोग्राफ नष्ट करण्याचे आदेश दिले. ते आदेश नाकारत ब्रेस म्हणाला, `कारण ,जगाला हे कळलं पाहिजे`. "
-
Smruti ganga ( स्मृतिगंगा)
भा.द.खेरांना त्यांऱ्याजीवनात अनेक व्यक्ती भेटल्या. त्यांपैकी काहींना लेखरूपात गुंफायचं काम त्यांनी केलं. सावरकरांऱ्याबचावासाठी उभे राहिलेले धर्मवीर भोपटकर...भा.द.खेरांना ‘केसरी’द्वारे प्रगतिपथावर नेणारे जयंतराव टिळक...‘हसरे दु:ख’ या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया पत्ररूपाने देणारे पु.ल.देशपांडे...न्याय क्षेत्रातील उच्च पदं भूषवणारे खेरांचे शाळासोबती दादा देशमुख... ‘शेवग्याऱ्याशेंगा’ लिहिणारे य.गो. जोशी...पावसचे स्वामी स्वरूपानंद...सुनील गावस्कर...लंडनमधील भवानी तलवार, कोहिनूर हिरा आणि नटराजाऱ्यामूर्तीसाठी लढणारे बॅरिस्टर भास्करराव घोरपडे...विनम्र कवी/गीतकार गंगाधर महांबरे...प्रतिकूल परिस्थितीतही ‘रोहिणी मासिक सुरू ठेवणारे वसंतराव काणे...खेरांवर मनापासून प्रेम करणारे त्यांचे चुलतबंधू नानासाहेब...या सगऱ्याव्यक्तिचित्रांसह भा. द. खेरांनी ‘केसरी’तील दिवसांऱ्याआठवणी जागवऱ्याआहेत. वाचकांना स्नेहधारांमध्ये न्हाऊ घालणारी ही ‘स्मृतिगंगा’ आहे.
-
Rumi Anandghan (रुमी आनंदघन)
प्रेमाच्या तत्त्वज्ञानाला हळव्या भावनिक नजाकतीचा साज चढवणारा कवी म्हणजे रुमी. या रुमीभोवतीच फिरणारं हे कथानक. नायक स्वप्नात येशूला भेटतो आणि त्याचं आयुष्य पालटून जातं. येशू त्याला आपण गेलेल्या अखेरच्या रस्त्यावरून जाण्यास सांगतो. या दृष्टांतानंतर नायक इटलीवरून थेट जेरुसलेमचा रस्ता पकडतो. तो ही पायी. पण त्याच्या या आध्यात्मिक प्रवासाची वळणवाट वेगळ्याच उत्कंठावर्धक घटनांनी व्यापलेली ठरते. या प्रवासात अचानकच नायकाला रुमीची ओढ लागते. रुमीच्या या शोधप्रवासात जीवनविषयक तत्त्वज्ञानाचं भांडार खुलं होत जातं. आणि हा प्रवास अलौकिकाच्या नव्या वळणावर पोहचते.
-
Sur Bharala Antari (सुर भरला अंतरी )
लेखक-पत्रकार भा.द.खेर यांनी बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, विनायकराव पटवर्धन, भीमसेन जोशी, सुधीर फडके, हिराबाई बडोदेकर, जे.एल.रानडे, शंकरराव बिनीवाले, गजाननराव वाटवे, इ.जुन्या-जाणऱ्याकलावंतांची नजाकतभरी वैÂफियत मांडून त्यांचे थोरपण सांगितलं आहे. तसेच हे श्रेष्ठ कलावंत कसे दिलदार होते याचे मार्मिक किस्सेही या पुस्तकातून वाचायला मिळतात. कलाकारांतही राग-लोभ,वाद-विवाद अबोला होतो.; पण तरीही कलेवर त्याचा परिणाम होऊ न देता कलाकार कलेविषयीचं आपलं योगदान रसिकांना भरभरून देतात. कलावंताचं मन कायम सरस्वतीच्या, उत्तुंग प्रतिभेने भारावलेले असतं; अनंत दु:ख-यातना सहन करून, आर्थिक झळ सोसूनही कुठलाही सच्चा कलावंत आपली कला मुक्तहस्ते उधळत असतो, हेही सूत्र या लेखांतून जाणवतं. सर्वच कलाकारांऱ्याकलेचं आणि या व्यक्ती आपऱ्याजीवनात माणूस म्हणून किती श्रेष्ठ होत्या, याचं दर्शन या पुस्तकातून घडतं.
-
Amar Hruday (अमर हृदय)
‘अमर हृदय’ (इमॉर्टल हार्ट) या सरदार ओस्कान यांच्या पुस्तकातून अंतरंगातील प्रेमाची अमर शक्ती, प्रत्येकाच्या हृदयातून कसा प्रवास करते व आत्म्याचा अंतर्नाद कसा ऐकायचा, आनंदाच्या बेटावर कसे जायचे? याचं मार्गदर्शन करते. हृदयातील ‘मी-माझं-मला’ या स्वार्थी व संकुचित भावनांच्या राक्षसरूपी भिंती निखळ आयुष्य जगू देत नाहीत. म्हणूनच लेखकाने अंतरंगातील सकारात्मक पैलूंची ओळख मित्रत्वाच्या नात्यांतून डायनाच्या साहसी कथेतून करून दिलेली आहे. अमर हृदयातील निखळ प्रेमाच्या शक्तीचा आपण डोळसपणे, अष्टावधानी राहून शोध घेतला पाहिजे, आणि जीवनात आनंद महोत्सव साजरा केला पाहिजे.