-
Kaleteel Bharateeyatvachee Chalwal - The Bombay Re
‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.
-
The Compound Effect (द कम्पाउंड इफेक्ट)
यशाची इच्छा असणार्या प्रत्येकानेच हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. यशासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे का? हे सर्व या पुस्तकात सांगितलं आहे. हे पुस्तक म्हणजे यशापर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट आणि संक्षिप्त मार्गदर्शन आहे. डॅरेन हार्डीनी आत्म-सुधारणेचे नवीन ‘बायबल’ लिहिले आहे. तुम्ही जर तुमचं आयुष्य खरोखरच बदलवून टाकणार्या आणि तुमची स्वप्नं साकार करणार्या वास्तविक अशा पद्धतींच्या, तंत्रांच्या आणि साधनांच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे.
-
Motya Chuka Kara,Mote Yash Milva (मोठया चुका करा,म
या पुस्तकात दीर्घकालीन यश संपादन करण्यासाठी कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे इथपासून अर्थ व्यवस्थापनाचा पाया कसा घालावा - इथपर्यंत आणि अपयशाला आपलं मानून त्याचा स्वीकार करण्यापासून अनुकंपा म्हणजे नक्की काय इथपर्यंत अनेकांगी विचार लेखक व्यक्त करतात. हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकणारं नाही, तर तुमची जाणीव वाढवणारं आहे. ज्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय अजाणतेपणानं नाही तर जाणीवपूर्वक घेऊ शकाल.
-
Taryanchee Jeevangatha (ताऱ्यांची जीवनगाथा)
निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो ताऱ्यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का? 'तारा तुटतो' म्हणजे नेमके काय घडते? दुसऱ्या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा । डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.
-
Ardhanaari (अर्धनारी)
एक अनोखी कथा. दोन वेगळे शेवट. पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्यातल्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंधड्या उडालेल्या पाहून वाचक मोठ्या विमनस्क स्थितीत जातात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? ट्रायल बाय सायलेन्स (मौन बचाव/अर्धनारी) ही कादंबरी म्हणजे मूळ कादंबरीच्या दोन कल्पक आनुषंगिक भागांपैकी एक होय. ‘वन पार्ट वुमन’च्या शेवटी कालीने पोन्नाला शिक्षा करायचा कठोर निश्चय केलेला असतो. तिने त्याचा पूर्ण विश्वासघात केल्याची त्याची खात्रीच पटलेली असते. परंतु, पोन्नाचा स्वत:चा दोष नसताना तिला जे प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं जातं, त्यापायी तीही अतिशय अस्वस्थ होते. मंदिरोत्सवपश्चात दोघांनाही त्यांच्या आधीच्या आदर्श सहजीवनाच्या नव्या आणि कठोर अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. मुरुगन यांच्या जादुई बोटांतून सहज झरणारी ही कथा एका आश्चर्यकारक आणि नाट्यपूर्ण निष्कर्षाला पोहोचते.
-
Haravlelya Goshtinche Rahasya (हरवलेल्या गोष्टीचे
"चौदा वर्षांची अनुष्का मागचे वर्षभर लॉकडाऊन मध्ये राहिलेली आहे. आता ती सोमनहळ्ळीमध्ये राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या भेटीला निघालेली आहे. गेल्या खेपेला सोमनहळ्ळीला तिनं पुरातन पायऱ्यांची विहीर शोधून काढली होती. या तिच्या ‘हरवलेल्या मंदिराचे रहस्य’ च्या आठवणी अजून ताज्या आहेत. अखेर एकदा घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला मिळाल्यामुळे अनुष्का खूष आहे. पण लवकरच ती आणखी एक रहस्य शोधून काढणार आहे, हे तिला कुठे माहीत आहे? फक्त याखेपेला ती तिच्या स्वतःच्याच घराण्याच्या इतिहासातील एक हरवलेला दुवा शोधून काढणार आहे. या पुस्तकातून लेखिकेनं प्रश्न विचारण्याचं आणि यांची समर्पक उत्तरं मिळवण्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा चित्रांनी आणि थक्क करणाऱ्या दृश्यांनी नटलेल्या या पुस्तकातून भारतातील सुप्रसिद्ध कथालेखिका सुधा मूर्ती आपल्याला विशाल अशा तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानं एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जातात.
-
Raaz Mahal (राझ महाल)
आग्रा, भारत – ताजमहालाचं शहर. ब्यूरो ऑफ आर्किऑलॉजिकडे (बीओए) माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत एक विचित्र याचिका येते, ज्यात ताजमहाल या जागतिक वारसा स्थळाद्दलची आख्यायिका सिद्ध करणारे अधिकृत ऐतिहासिक पुरावे जाहीर करण्याची मागणी केलेली असते. ब्यूरो या याचिकेची जबाबदारी विजय कुमार या अत्यंत हुशार, पण स्वच्छंदी पुरातत्त्वशास्त्रज्ञावर सोपवते. हे आरटीआय प्रकरण दिसतं तितकं साधंसरळ नसल्याचं विजय कुमारच्या लक्षात येतं. काही गूढ मृत्यू व इंटरपोलचा सावधगिरीचा इशारा यामुळे प्रकरण आणखी चिघळते. सत्य शोधण्यासाठी विजय कुमार आंतरराष्ट्रीय शोध-दौर्यावर निघतो त्या दरम्यान तो स्वतःशिवाय कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कुणीतरी विजय कुमारला जाणीवपूर्वक अडकवलं आहे का? त्याचा जीव धोक्यात आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं, तो सत्य सर्वांसमोर आणू शकेल की... ते कायमस्वरूपी एक गुपितच राहील... राझ?
-
The Girlfriend (द गर्लफ्रेंड)
डॅनिएल हा हॉवर्ड व लॉरा या दाम्पत्याचा डॉक्टर होऊ पाहणारा लाडका मुलगा. हे कुटुंब सुखवस्तू आहे. चेरी नावाची गरीब घरातील मुलगी त्याच्या प्रेमात पडते. तो तिला त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घेऊन येतो; पण त्याच्या आईच्या, लॉराच्या लक्षात येतं की, चेरीची नजर त्यांच्या संपत्तीवर आहे. लॉरा ही गोष्ट डॅनिएलला समजावू पाहते; पण त्याला ते पटत नाही. तो आणि चेरी एकदा वीकेन्डला गेलेले असताना अपघात होतो आणि डॅनिएल कोमात जातो. त्या अपघाताला अप्रत्यक्षरीत्या चेरीच जबाबदार असते. डॅनिएल गेला, असं लॉरा तिला खोटंच सांगते. काही दिवसांनी डॅनिएल शुद्धीवर येतो, तेव्हा चेरी त्याला सोडून गेली, असं लॉरा त्याला सांगते. डॅनिएल जिवंत असल्याचं जेव्हा चेरीला समजतं, तेव्हा ती लॉरासमोर येऊन उभी ठाकते. मग दोघींमध्ये रंगतो शह-काटशहाचा सामना. मग चेरी ठरवते, लॉरालाच नाहीसं करायचं. काय घडतं पुढे? चेरी यशस्वी होते का? प्रेमकहाणीच्या आडून रंगलेलं एक जबरदस्त, थरारक संघर्षनाट्य.
-
Cell (सेल)
डॉ. जॉर्ज विल्सन एल.ए. युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये तिसऱ्या वर्षाचा रेडिऑलॉजीचा निवासी डॉक्टर (रेसिडेंट) असतो. अमाल्गमेटेड कंपनीने तीन मोबाईल कंपन्यांच्या साह्याने ‘आयडॉक’ नावाचं एक अॅप विकसित केलेलं आहे आणि या कंपनीने वीस हजार रुग्णांवर घेतलेल्या बीटा चाचणीविषयी जॉर्जला समजतं. हे समजल्यानंतर जॉर्ज अस्वस्थच असतो. आयडॉककडून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे जॉर्जची अस्वस्थता वाढते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं तो ठरवतो. त्यासाठी तो पुरावे गोळा करायला सुरुवात करतो; पण आयडॉकचे निर्माते त्याच्या मार्गात आडवे येतात, त्याला विकत घेऊ पाहतात. ते पुरावे मिळविण्यासाठी तो काय काय उपद्व्याप करतो, त्याचा मित्र झीकडून त्याला कोणती माहिती मिळते, त्याची मैत्रीण पॉला खरंच त्याच्या बाजूने असते का, आयडॉकच्या निर्मात्यांच्या आर्थिक आमिषाला जॉर्ज बळी पडतो का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘सेल’ नक्कीच वाचली पाहिजे.