-
Ganara Mulukh (गाणारा मुलुख)
ठणठणपूरच्या चक्रमादित्य महाराजांकडे एक गानसेन नावाचा गवई येतो. त्याच्या अदाकारीवर महाराज फिदा होतात. गवयाची इच्छा पूर्ण करायची म्हणून एक अचाट आदेश आपल्या प्रजेला लागू करतात. त्यामुळे होणाया गंमती अनुभवा ‘गाणारा मुलुख’ या नाटिकेमध्ये.
-
The Feast Of God ( द फिस्ट ऑफ गॉड)
प्रत्येक युद्धातून आपल्याला काही ना काही बोध घेण्यासारखा असतो. पण तसा तो घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हे खरे महत्त्वाचे असते. नाहीतर युद्धात जे सैनिक किंवा नागरिक प्राणास मुकले असतील, त्यांचे बलिदान व्यर्थच ठरते. इराक-कुवेत. युद्धानेही एक धडा जगाला शिकवला आहे. फ्रेडरिक फोरसीथ यांच्या बहुतेक कादंबर्या या एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या असतात. प्रस्तुत मूळ कादंबरीचे स्वरूपही असेच आहे. इराक-कुवेत युद्धाच्या आणि त्या वेळी जगभरात देशोदशी घडलेल्या राजकीय घटनांच्या प्रचंड पार्श्वभूमीवर एका प्रत्यक्ष घडलेल्या युद्धाच्या इतिहासामध्ये कौशल्यपूर्ण रीतीने गुंफलेली काल्पनिक पात्रांची कथानके, असे या मूळ पुस्तकाचे दोन पदर आहेत. त्यामुळे या पुस्तकाची भाषाशैलीही त्यांनी अपरिहार्यपणे दोन वेगळ्या प्रकारची वापरलेली आहे. मूळ पुस्तकात जेव्हा इतिहासात घडलेले प्रसंग किंवा राजकीय घडामोडी वर्णन केल्या आहेत, तेव्हा फोरसीथ यांची भाषा स्वाभाविकपणे काहीशी कोरडी, एखाद्या वृत्तनिवेदकाच्या शैलीची, त्रयस्थपणे घटनेचे वर्णन करणारी आहे. पण काल्पनिक किंवा खर्या पात्रांमध्ये, काल्पनिक किंवा प्रत्यक्ष घडलेले प्रसंग जेव्हा ते वर्णन करतात, तेव्हा मात्र त्यांची भाषा आपोआपच प्रसंगानुरूप त्या त्या भावना दर्शवणारी, त्या पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे अचूक वर्णन करणारी, त्यांचे परस्परसंबंध रंगवणारी अशी झालेली आहे.
-
The Seventh Secret ( द सेव्हन्थ सिक्रेट)
पावलांचा अजिबात आवाज होऊ न देता रेक्स फोस्टर त्या दारापाशी पोहोचला. दाराचं हँडल पकडून त्यानं ते हळूच फिरवलं त्याला कुलूप नव्हतं ! दाराला हलकेच फट पाडून त्यानं पलिकडे नजर टाकली. त्या दारापलीकडे खाली उतरत जाणारा एक जिना त्याला दिसला. आपण एका गुंतागुंतीच्या भुयारी तळघरापाशी येउन पोहोचलो आहोत, असंच त्याला प्रथम वाटलं पण..... दुसर्याच क्षणी त्याचं तोंड आश्चर्यानं वासलं गेलं! त्या जिन्याच्या तळाशी त्याला दुसरा एक फ्युरर बंकर दिसला ! आणि..... आपल्याला काय आढळलंय याची त्याला अकस्मात जाणीव झाली ! ज्याच्या शोधासाठी त्यानं आत्तापर्यंत जिवाचं रान केलं होतं तोच हा जगाला अज्ञात असलेला हिटलरचा गुप्त बंकर होता ! हिटलरच्या भूमिगत साम्राज्यात नेणारी जबरदस्त रहस्यमय कादंबरी ! आयर्विंग वॅलेस यांची प्रचंड लोकप्रिय ठरलेली, 'उत्कृष्ट अनुवाद' म्हणून नावाजल्या गेलेल्या कादंबरीची द्वितीय आवृत्ती.
-
First To Die (फर्स्ट टु डाय)
विक्रमी खपाचे उच्चांक निर्माण करणारा सध्याच्या काळातील लोकप्रिय लेखक जेम्स पॅटरसन यांची एक खळबळजनक रहस्यकथा. वैयक्तिक गंभीर समस्या, सामाजिक सुरक्षेची जबाबदारी आणि नव्यानं फुलणारं प्रेम या तिहेरी पेचात अडकलेल्या लिंडसे बॉक्सर या महिला पोलिस इन्स्पेक्टरची रोमांचक कहाणी. नवपरिणीत जोडप्यांची हत्या करणारा विकृत खुनी आणि त्याला कोर्टासमोर खेचून कडक शासन देण्यासाठी कटिबद्ध झालेला 'वुमेन्स मर्डर क्लब'. भावी सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं रंगवत हनिमून साजरा करणार्या तरुण वधुवरांचे मृतदेह लाजिरवाण्या अवस्थेत उघडकीस येतात. योजनाबद्ध खून करणारा लिंगपिसाट गुन्हेगार एकेक पुरावा मागे ठेवत पोलिसखात्याची मती गुंग करुन सोडतो आणि या रहस्याची उकल करण्यासाठी, स्वत:च्या अडचणीवर मात करुन, लिंडसे बॉक्सर आकाशपाताळ एक करते. तिच्या या धडपडीला उत्तम साथ देतात, अन्य तीन महिला - एक बातमीदार, एक सरकारी वकील आणि एक शवचिकित्सक डॉक्टर - रहस्याच्या या भोवर्यात वाचकही वेगानं फिरत राहतो...
-
The Last Don ( द लास्ट डॉन)
कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची -- फार कशाला, सार्या जगाची -- डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं’, तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां’चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बर्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द डार्क एरिना’, 'फॉर्च्युनेट पिल्ग्रिम’, 'गॉडफादर’, 'फूल्स डाय’, 'द सिसिलियन’, 'ओमेर्ता’, 'द फोर्थ के’ या त्याच्या याआधीच्या सर्व जगभरात गाजलेल्या कादंबर्या आहेत. 'द लास्ट डॉन’ ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.
-
J.R.D Tata Yanche Patra (जेआर.डी टाटा यांचे पत्र)
सध्याच्या वेगवान जगात ई-मेल्स ,सेलफोन, अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे :पण एकेकाळी मुख्यत्वे पत्र या माध्यमातून संपर्क साधला जात असे पत्रांतून कामांच्या तपशीलाखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे . शिवाय हि पत्रे पत्रं त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तएवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत .पत्र हा कायमस्वरूपी माहितीस्त्रोत असतो . या पुस्तकातील सुमारे ३०० पत्र इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत . जे .आर. डी. टाटा या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली हि विविध विषांयान स्पर्श करणारी पत्र तत्कालीन सामाजिक , राजकीय, आर्थिक, औघोगिक अशा अनेक क्षेत्रंच दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एक महान, बहुआयामी व्याक्तीत्वंच अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात .
-
Vadal Matha Te 1965 Bharat-Pak Yuddha (वादळ माथा त
२० नोव्हेंबर, १९६२ ला यशवंतराव चव्हाण भारताचे 'सरंक्षण मंत्रिपद' भुषविण्यासाठीच दिल्लीला गेले. 'हिमालयाच्या संरक्षणसाठी सह्याद्री' या शब्दात मराठी जानतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रिला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीन विरुद्ध १९६२ मधील युधातिल पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधेर्य उच्वान्यसाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचालित बंदुका, दारूगोळा व सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले त्यामुळे १९६५ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.
-
Pavitram (पवित्रम्)
"सोडून देतो मांझ काम.पण जसे जन्म होत राहतात,तसेच मृतयुही.मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार,अग्नि देणार?कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यांन काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही."सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला... कालिंदी म्हणाली,"तुम्ही योग्य तेच केलंत.आत्तपर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यत आलं.हीन वागणूक देण्यात आली.आता नदी पलीकडच्यांनीही मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं.मला नाही बोलावलं.ही एवदीशी होती शेवंता.जेव्हा हीला.वैद्य त्या वस्तीत यायला तायर नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं.त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?" दाराआडून एकणारा गोविंदा मात्र दुखावला.जो त्रास वर्गातील मुलं आपल्याला देतात,तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग तयांचजवळ तक्रार ती काय करायची?
-
Parmeshwar: Ek Sanketik Nav (परमेश्वर:एक सांकेतीक
बरेच जन असे मानतात की , विज्ञानाने मानुस व परमेश्वर यांच्यामद्धे मारून त्या दोघातील अंतर वध्ह्वत नेले आहे. कुठे आहे तो परमेश्वर? तो मृत्यु पवल आहे का? धर्म आणि श्रद्धा या केवळ अफुसारख्या आहेत. चारशे वर्षा पूर्वी विज्ञानाची प्रगती होऊ लागली. तोपर्यंत दैवी शक्तिचा प्रभाव जगावर सर्वत्र होता. पण नंतर हळूहळू माणसाचा देवावार्चा विश्वास ढळू लागला. देवीची जागा विज्ञानाने घेतली. परंतु खुद्द विज्ञान हा एक भ्रामक देव ठरला. परिणामी मानवजात निराश झाली. मणि भौमिक या शास्त्राज्ञाने 'एक्सायमर लेसर ' चा शोध लावला. डोळ्याचा चश्मा घालवण्याची शस्त्रक्रिया परमेश्वराचे अस्तित्व विज्ञानाच्या आधारे शोधायचा प्रयत्न केला. त्याची ही एक थरारक कहानी !
-
Tantradnyanachi Mulakshare Bhag-2 (तंत्रज्ञानाची म
माणसाचे निसर्गाशी जन्मतः च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रुपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्राज्ञानाची पाउलवात होती. या पाउलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहित म्हणजे 'तंत्रज्ञानाची मुलाक्षारे'.
-
Dairy Of Anne Frank (डायरी ऑफ ऑन फ्रँक)
ऍन फ्रँक ही एक तेरा वर्षाची ज्यू बालिका. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून तिच्या कुटुंबातली चार व आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जवळजवळ दीड दोन वर्षे लपून रहातात. या अवधीत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर ती जगत राहतात. ऍनला तिच्या तेराव्या वाढदिवशी तिचे वडील एक रोजनिशी बक्षीस देतात. त्या दिवसापासून ती रोजनिशी लिहायला सुरवात करते, ती त्या सर्व मंडळींना पकडून छळगृहात नेईपर्यंत. तिथे अतिशय हालअपेष्टा सोसताना त्या आठांपैकी सात जणंना मृत्यू गाठतो. फक्त ऍनचे वडील ऑटो फ्रँक जगून वाचून सुटून परत येतात. त्यांना ऍनची रोजनिशी सापडते. तिचे संकलन करून ती ते छापतात. त्यात व्यक्तींची नावे काल्पनिक होती. परंतु युद्धसमाप्तीला अर्धशतक लोटल्यानंतर परत संपूर्ण रोजनिशी काही काटछाट न करता छापलेली आहे. 1995 साली हे लोक ज्या ठिकाणी अज्ञातवासात राहिले होते ती इमारत आता विकत घेऊन तिथे ऍन फ्रँकचे स्मारक केले आहे. ऍन वापरत असलेल्या काही वस्तू, तिचे हस्ताक्षर तिथे ठेवलेले आहे. तिच्या रोजनिशीची आजपर्यंत जगातल्या जवळजवळ सत्तर (70) भाषेत भाषांतरे झाली आहेत. ती सर्व, त्या ऍम्स्टरडॅममधल्या तिच्या स्मारकाच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवली आहेत.
-
Aamar Meyebela (आमार मेयेबेला)
तसलिमा नासरिन या बंगाली लेखिकेचे नाव गेली काही वर्षे जगभर गाजत आहे. सलमान रश्दीप्रमाणे तसलिमा नासरिनवरही देश सोडून जाण्याची वेळ आली. आपल्या 'लज्जा' या कादंबरीत बंगालमधील हिंदू शेजार्यांवर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केल्यामुळे तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपली मते अभ्यासपूर्ण रीतीने, ठामपणे, निर्भीडतेने मांडणे हे तसलिमांच्या विचारसरणीचे बलस्थान आहे. तसलिमा अशा कशा घडल्या याचे उत्तर आपल्याला त्यांचे 'आमार मेयेबेला’ वाचून मिळते. आमार मेयेबेला म्हणजे 'माझा मुलगीपणाचा काळ’. वयाच्या तेरा-चौदा वर्षापर्यतच्या आठवणी या पुस्तकात आहेत. तिचे कुटुंब या लेखनातून वाचकांपुढे उभे राहते. त्यात कोठेही उदात्तीकरण केलेले नाही. व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शनच घडवलेले आहे. तसलिमाचे वडील रजब अली डॉक्टर आहेत. देखणे, बुद्धिवादी, अहंकारी आहेत. स्वत:च्या पुरुषपणाचा त्यांना अभिमान आहे. तर आई कुरूप, कमी शिकलेली आहे. आपला नवरा कधीही आपल्याला तलाक देईल या भीतीने कायम धास्तावलेली आहे. या विजोड जोडप्याला चार मुले आहेत. तसलिमा स्वत:चे पूर्वायुष्य, त्यातील व्यक्ती, त्यांचे वागणे, बोलणे, स्वभावविशेष याबद्दल औचित्य-अनौचित्याचे दडपण न ठेवता लिहिते. तसलिमांच्या व्यक्तिमत्त्वात आणि तिच्या पारिवारिक ताण्याबाण्याचा प्रभाव मोठाच पडलेला आहे. तसलिमांचे संवेदनशील मन पानोपानी प्रकट होते. तीच या लेखनाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रसंगातून तसलिमाचं बंडखोर व्यक्तित्व वाचकाला जागवत राहते.