-
Chicken Soup For The Soul-Indian Women
चिकन सूप फॉर द सोल : इंडियन विमेन' हे पुस्तक स्त्रिजतिला भेडसावनारे सार्वत्रिक प्रश्न आणि संदर्भ मात्र अस्सल भारतीय आहेत. या पुस्तकातील संवादी स्वर कन्या, बहिनी, माता, विद्यार्थिनी आणि कर्तुत्ववान स्त्रियां यांच आहे. ज्याना भोवतालच्या कोलाहलात कधी प्रयत्नाने तर कधी योगायोगान आपल्या जीवनसत्याचा साक्षात्कार झाला, अंधारात आशेचा किरण दिसला, प्रतिकूल परिस्थितीत धेर्य आणि प्रेम गवसल. वेगवेगळ्या भूमिका निभावणारे आणि आपापल्या संसारात व कामाच्या ठिकाणी एकाच जन्मात अनेक आयुष्ये जगणारे विविध स्त्रियांच्या पाककौशल्यातुन तयार झालेले हे ' चिकन सूप' तुम्हाला नक्कीच उल्हासित आणि प्रेरित करेल!
-
Akash Badaltana (आकाश बदलताना)
लंडन: तिशीच्या आसपासची ती मंडळी त्यांच्यातल्या एकाचा वाढदिवस साजरा करायला जमाली होती. वरवर बघायला हयात विशेष काही नहव्तं सगळं छान नार्मल वाटत होतं. पण ह्या चित्राचे अंतरंग मात्र वेगालेच होते. अखंड साधनेच्या जोरावर क्लेअरचे प्रथितयश नर्तिका म्हणून नाव कमविण्याचे चांगले आकाराला आलेले स्वप्न रस्त्यावरील एका अपघातामुळे अचानक धुळीला मिळाले होते. त्यातून सावरण्यासाठी तिला अँथनीची साथ मिलाली खरी; पण लग्नाला काही वर्ष होऊं गेली, तरी त्यांना मूल होत नव्हतं. मात्रुत्वाची आस असलेल्या क्लेअरला, ह्या समस्येवारिल खर्चिक उपाययोजनांना सामोरे जात असतानाच, आपल्या नोरा नावाच्या छोट्या विद्यार्थिनिचा ज़रा जास्तच लळा लागला होता. ही मानसिक उलघाल कमी होती म्हणून की के अँथनीच्या नोकरीवर गदा येउ घातली होती. ह्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे शहरात प्रचंड तणाव होता. दिवसेंदिवस बकाल होत चाललेल्या ह्या शहरात तग धरून राहणे आनाखिनाच कठीन होउ लागले होते. आपल्या अतिरेकी जखमांवर फुंकर घालणारे एक अशांत शहर, आर्थिक, सामजिक व् मानसिक तणावांनी ग्रासलेली एक विवाहिता ह्यांचे दहशदवादाच्या पार्श्वभुमिवारिल मनोवेदक चित्रण.
-
Dongri Te Dubai (डोंगरी ते दुबई)
मुंबईत ६० वर्षे गुंडांच्या टोळ्या चालवणा-या माफियांचा प्रभाव होता. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांच्या तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले पहिले पुस्तक आहे. एका साध्या शाळकरी पोरापासून टोळीच्या दादापर्यंत दाऊदची उत्क्रांती कशी होत गेली, दाऊदने पोलीसांचा उपयोग करून आपल्या प्रतिस्पर्धाना कसे निपटले आणि शेवटी तो मुंबई पोलिसांचा एकमेव सुडकरी कसा बनला याचे वर्णन यात आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक इतिहास आहे. पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद याने पठाणाच्या टोळीला कसे निपटले, पहिली सुपारी कशी दिली गेली व शेवटी दुबईतून दाऊद कसा पळून गेला, याचे थरारक वर्णन पुस्तकात आले आहे.
-
Bhokarwaditil Rasvantigruha (भोकरवाडीतील रसवंतीगृ
दुकानदारीची सदोबांची काय कल्पना होती, कोण जाणे! गिऱ्हाईक वाढवण्यासाठी नित्य काही नवे करावे लागते, निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात, दुकानाची आकर्षक सजावट करावी लागते, या गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. अर्थात हा त्यांचा दोष नव्हता. गावचे वातावरणच तसे होते. सगळेच दुकानदार एकाच छापातले गणपती होते. दुकान मांडून बसायचे, गिऱ्हाईक आले तर सौदा करायचा, नाही आले तर निवांत बसायचे. मुद्दाम कसलीही हालचाल करायची नाही, अशीच एकूण पद्धत होती. आधुनिक विक्रीकलेचा गंधही त्या काळात गावाला नव्हता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भरभराटीची आणि सुबत्तेची काही वर्षे संपली. गिऱ्हाईक कमीकमी होत गेले. फार हाल झाले त्याचे... शेवटी सदोबा नेवासकर अन्नान्न करीत मेला!
-
Goshtich Goshti (गोष्टीच गोष्टी)
जादू-बिदू काही नसते; सगळी बनवाबनवी असते, हे दाखविण्यासाठी बाबू बनला भोकरवाडीतील ‘जादूगार’! हॉटेलमध्ये चोरी झाल्याची ‘कम्प्लेंट’ बजाबाने दिली, मात्र चोरी झालीच नाही, असेही लिहून दिले! भोकरवाडीतील ‘गावगुंडी’ला कंटाळून नव्या शिक्षिकेने गावच सोडले! रामाच्या वाट्याला आलेला ‘वनवास’ बाबू आणि चेंगट्याच्या वाट्यालाही आला! सरकारने वटहुकूम काढून ‘भ्रष्टाचार’ कायदेशीर ठरवला, पण बाळू सरकारी नोकर असल्यामुळे त्याचे काम दुप्पट झाले! बापू पाटल्याच्या मुलाचा दत्तक-विधी तर झाला, पण बाबू आणि चेंगटाने घोटाळा केला! चौथीच्या गणिताच्या मारकुट्या मास्तरांचा ‘तास’ एकदा दगडू गवळीने घेतला! शिवा जमदाडे, रामा खरात, गणामास्तर, नाना चेंगट आणि बाबू पैलवान ही सर्व ‘कंपनी’ ट्रिपला निघाली! ‘गोष्टी’ म्हणजे गमती... उपहास... उपदेश... आणि बोचरी टीका अन् व्यथाही... हेच आहे ‘गोष्टीच गोष्टी’चं सूत्र!
-
Stones Into Schools (स्टोन्स इनटु स्कूल्स)
ग्रेग मॉर्टेन्सन. बेस्ट सेलर म्हणून जगभरात गाजत असलेल्या 'थ्री कप्स ऑफ टी' या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक पाकिस्तानमधील काराकोरम या अतिशय उंच व दुर्गम पर्वतराजीतील कोर्फे या गावात ग्रेगच्या 'सेंट्रल एशि[...]
-
Gappa Goshti (गप्पागोष्टी)
`माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय` मधला नायक आपल्या बौद्धिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी कैलासवासी` झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणाऱ्यांना खेडेगावाबद्दल किती गैरसमज असतात याचा उपरोधिक शैलीत समाचार `खेड्यातील एक दिवस` मध्ये आढळतो... भिकू इंगळे कारकून होण्यापेक्षा मास्तरकी करण्याचं ठरवतो आणि त्याचा `एका वर्गातील पाठ` आयुष्यभराचा धडा ठरतो!... आणि पुण्यातल्या जलप्रलयाने हळहळलेली भोकरवाडीतली मंडळी मदत मागायला निघतात आणि त्यांनाच `मदत` करायची पाळी येते... केस हरणार असं ठाऊक असूनही केवळ प्रतिष्ठेकरिता केस लढणारा, दिलदार पण इरसाल `गणपत पाटील` शेवटी सखूला माफ करतो, तर गणपत वाघमोडे वेगळीच शक्कल लढवून `निकाल` आपल्या बाजूने लावून घेतो... मानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या `गप्पागोष्टी`च वाटतात.
-
kalakabhinna (काळाकभिन्न)
काळाकभिन्न' काळोख आणि त्यातूनच होणारा मनुष्याचा जन्म ! मग 'टाहो' फोडत या 'आटपाट नगरी'त होणारा जीवनाचा प्रवास ! या प्रवासात मिळतात आई-वडिल, नातेवाईक, सखे-सोबती. जीवन फुलत जातं. वळणावर भेटते 'सहेलियोंकी बाडी'. मन गुंग होतं. स्तिमित होतं. 'अल्याड-पल्याड'ची जाणीव राहत नाही. मग कधीतरी मनुष्याचा उबग येतो आणि यंत्रं मित्र होतात. 'मी आणि चॅमी' मौत्री जुळते. 'हरवले आहेत' या मथळ्याखाली जेव्हा नावांची यादी फोटोंसकट वर्तमानपत्रांतून वाचनात येते तेव्हा 'वस्तुस्थिती'ची जाणीव होते. मनुष्य आणि मनुष्य जातींची आपापसातली नाती म्हणजे केवळ 'हिशोब' होऊन राहतात. शरीर आणि मन म्हातारं होतं. रिकामंही होतं, कारण आता काय शोधायचं हा प्रश्न आऽ वासून उभा राहतो. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून अनेक वर्षं धूळ खात पडलेला 'अल्बम' बाहेर काढला जातो आणि त्या पिवळ्या पडत जाणा-या फोटोंमधून आठवणींचं इंद्रधनुष्य स्वत:च्या बालपणाच्या याऽऽ टोकापासून ते स्वत:च्या मुलांच्या तारुण्याच्या त्याऽऽ टोकापर्यंत अर्धगोल उमटतं. अंधुकसं, धूसरसं, चष्म्याच्या काचा थेंबाथेंबाने ओलावत !
-
Chanderi Swapne (चंदेरी स्वप्ने)
साप, व्यभिचार व लढाई यांच्या गोष्टींना कधी अंत नसतो. मानवजात अजून रानटी आहे.... तुम्ही-आम्ही सारे अजून रानटी आहोत ! म्हणूनच असल्या लढाया होतात् ! नाही तर.... कडुलिंबाचं झाड फार जुनं झालं, म्हणजे त्याच्या लाकडाला चंदनाचा वास येतो, असं म्हणतात. जिला आपण सुधारणा सुधारणा म्हणतो, तो असलाच सुवास आहे. बुद्धीवर जगणार्याचं आयुष्य हे बाभळीच्या झाडासारखं आहे. जवळ येणार्याला त्याला सावली तर देता येतच नाही; उलट, त्याचे काटे मात्र केव्हा पायांत मोडतील, याचा नेम नसतो! प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाचं सुंदर चित्र आवडतं ! पण त्याची लांबी-रुंदी स्वार्थाच्या चौकटीइतकीच असावी, अशीत्याची अपेक्षा असते !