-
The Art Of Creative Thinkng (द आर्ट ऑफ क्रिएटीव्ह
सर्जनशीलतेचा रूढ अर्थ बदलवून टाकून, एका अगदी अभिनव संकल्पनेद्वारे सर्जनशीलतेचे अगणित पैलू लेखकानं या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. ही सर्जनशीलता – रुळलेली वाट नाकारणारी, खडतर वाटेवर चालायला लावणारी, साहसपूर्ण प्रवासातून नवनिर्मितीच्या शोधाचा शुद्ध आनंद देणारी आहे. सर्जकता ही केवळ कलावंतांची मिरासदारी नाही, ती तुमच्या-आमच्यात, साध्यासुध्या माणसांत दडलेली असते. जगात आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणारे चित्रकार, शिल्पकार, नाट्यकर्मी, चित्रपटनिर्माते, अभिनेते, लेखक, वास्तुरचनाकार, संगीतकार, संशोधक... या सर्व लोकांनी दैनंदिन घटनांमधील वेगळेपण सदैव टिपलं आणि त्यातूनच नवनिर्मिती केली. प्रत्येक व्यक्तीत कल्पकता आहे, सर्जनशीलतेचा स्फुलिंग आहे, असा दिलासा देणारी असंख्य उदाहरणं या पुस्तकात जागोजागी विखुरलेली आहेत. लेखक स्वत:च एक अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. कलाक्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तींच्या उदाहरणांसह त्यांनी सर्जनशीलतेबद्दल मार्गदर्शन केलं आहे.
-
Criminals In Uniform (क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म)
देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ माजवणाNया घटनेचा ‘आंखो देखा हाल’रंजक अविष्कारात...प्रत्यक्ष कुबेराचाच वरदहस्त असलेला कुबेर... ‘कुबेरिया’ या त्याच्या अलिशान निवासासमोर एक अज्ञात स्कॉर्पिओ आढळते आणि सुरू होतं उत्सुकता आणि थरारानं भरलेलं नाट्य... तरुण मुंबई पोलीस आयपीएस अधिकारी महावीर तोमर आयुक्तपदाच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी, पैशांच्या हव्यासापोटी पैसा वसुलीतंत्र अवलंबतो. हाताखालच्या पोलीस कर्मचाNयांची गुन्हेगारी टीमच बनवतो...कायदा, सुरक्षायंत्रणांनाही न जुमानता राक्षसी कल्पना अवलंबतो...एकही पुरावा मागे न ठेवता तो मगरूरपणे जगत असतो... अखेर एके दिवशी पर्दाफाश होतोच... हा पोलीस आयुक्त कायद्याच्या अक्राळ-विक्राळ जबड्यात सापडतोच...! कसा...? कुठे...? जाणून घेऊ या... ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’मधून.
-
Krushnasakha (कृष्णसखा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.