-
Nivdak AbhidhaNantar (निवडक अभिधानंतर)
अभिधा सुरू असताना ग्लोबलायझेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. आमच्या काही कविता आणि याच दरम्यान स्वतःला आलेलं जगण्याचं नवं भान, ग्लोबलायझेशनमुळे बदललेला भोवताल आणि या सर्वांमुळे उमजलेले लिहिण्याचंही नवीन भान ह्या ‘अभिधा’मधून आम्ही दिलेल्या किंवा आम्ही मिळविलेल्या काही गोष्टी. १९९९ मध्ये अभिधानंतर सुरू केलं तेव्हा ग्लोबलायझेशनचा परिणाम असलेले साहित्य आम्ही प्रसिद्ध करू असे धोरण होते आणि २०१४ साली अभिधानंतर बंद करेपर्यंत आम्ही ते लावून धरले. ग्लोबलायझेशननंतर जीवनाप्रमाणे साहित्यही बदलत होतं. हा बदल पकडण्याचा, डॉक्युमेण्ट करण्याचा, नवीन साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता. हा अवकाश ग्लोबलायझेशन 'नंतर' चा आणि एका अर्थाने 'अभिधा' 'नंतरचा' अवकाश होता. या पुस्तकातून अभिधानानंतरमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक कविता, लेख, मुलाखती आणि संपादकीय देत आहोत. या सर्व लिखाणांमधून ग्लोबलायझेशन आणि डिजिटालायझेशननंतर निरंतर बदलत असलेली भाषा, संस्कृती,आणि जगणं अधोरेखित होतं. मराठीत सध्या लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, विचार करणाऱ्या, भाषेची आणि संस्कृतीची चिंता करणाऱ्या आणि भाषेसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकेल याची खात्री आहे.
-
Moneychi Smart Psychology (मनी ची स्मार्ट सायकोलॉज
मनीची स्मार्ट सायकोलॉजी मनीच्या सर्व पैलूंना समजवणारा एक मास्टरपीस इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये उपलब्ध मनीच्या मागे धावू नका... मनीला तुमच्यामागे धावू द्या! मनी कमवायची स्मार्ट पद्धत काय आहे? मनीची कमतरता दूर कशी करायची? मनीला हुशारीने मॅनेज कसं करायचं? इनव्हेस्टमेंट पॉवरचा योग्य उपयोग कसा करायचा? फायनान्शिअल प्रॉब्लेम्स आणि मनी ट्रॅप्सपासून कसा बचाव करायचा? मनीच्या स्मार्टनेसला कसं टॅकल करायचं? या प्रश्नांची उत्तरं शोधणं आजच्या आधुनिक युगात जगण्यासाठीच नाही तर प्रगती करण्यासाठीही आवश्यक आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं मनीची सायकोलॉजी सखोलतेने समजून घेतल्यावरच शोधली जाऊ शकतात. तर याच संदर्भात ‘मी मन आहे’, ‘मी गीता आहे’ आणि ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ अशा अनेक बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी मनीवर आपलं बहुप्रतिक्षित पुस्तक ‘मनीची स्मार्ट सायकोलॉजी’ सादर करत आहेत. दीप त्रिवेदी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे की मनी कमवणं एवढंही कठीण काम नाही जेवढं ते दिसतं. खरं तर मनी कमवण्याच्या योग्य अप्रोचच्या अभावी अधिकाधिक लोकांना मनी कमवणं कठीण दिसत आहे. सरळ भाषेत लिहिलेलं हे पुस्तक मनी कमवण्याचा योग्य अप्रोच शिकवण्यासोबत आपल्या मनाला मनासारखी मनी कमवण्यासाठी सेटही करते. सोबतच लेखकाने या पुस्तकात इनव्हेस्टमेंटच्या पॉवरलाही समजवलं आहे आणि त्यानुसार मनीची गुंतवणूक करण्याचे उपायही सुचवले आहेत. सर्वात खास गोष्ट ही की लेखकाने या पुस्तकात मनी कमवण्यासह मनीमुळे होणारे स्ट्रेस आणि भांडणं मिटवण्याचे सोल्यूशन्स दिले आहेत. एका वाक्यात सांगायचं तर हे पुस्तक मनीसंबंधित सर्व प्रॉब्लेम्सचं वन पॉइंट सोल्यूशन तर आहेच, सोबतच एक मास्टरपीसही आहे जो मनीच्या सर्व पैलूंना वेगवेगळ्या केस स्टडीजच्या माध्यमातून सोप्या भाषेत स्पष्टपणे समजावते. एकंदर हे पुस्तक आजच्या आधुनिक युगात कुठल्याही मनी प्रॉब्लेमशिवाय एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठीचं एकमेव गाइड आहे.
-
Vishwamitra Bharat (विश्वामित्र भारत)
जागतिक क्रमवारीत उन्नत होण्याचा भारताचा प्रयत्न हा एक संतत प्रवास आहे. परंतु आपण केलेल्या प्रगतीचा आढावा घेत असताना आणि पुढील आव्हानांचा अंदाज घेत असताना, हा प्रवास प्रखर राष्ट्रीय बांधिलकी आणि आत्मविश्वासाने प्रेरित असणे ही गोष्ट खरेच खूप आश्वासक आहे. स्वतःच्या वारसा आणि संस्कृतीतून बळ मिळवणारा असो किंवा लोकशाही आणि तंत्रज्ञानाच्या आशेवर आव्हानांना सामोरा जाणारा असो, हा नक्कीच नवा भारत आहे. स्वतःचे हितसंबंध ठरवू शकणारा, स्वतःची भूमिका स्पष्ट करणारा, स्वतःचे उपाय स्वतः शोधू शकणारा आणि स्वतःचे मॉडेल पुढे नेणारा भारत. थोडक्यात एक असा भारत, जो अधिक भारत आहे.
-
Gosht Sangnyacha Anand Arthat Tekdimagche Gaon (गो
परतून कुणीही घराकडे जाऊ शकत नाही हे आधुनिक साहित्यातील एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. तरीही माणसे आपल्या भूतकाळाकडे जाऊ पाहतात. काय हवे असते त्यांना? त्यांना जे मिळते ते खरेच मौल्यवान असते का? माणसे जे प्रश्न घेऊन मागे जातात त्यांना त्यांची उत्तरे मिळतात का? असे प्रश्न घेऊन आपल्या भूतकाळाकडे वळलेल्या आणि हा प्रवास शब्दबद्ध करू पाहणाऱ्या एका लेखकाला अचानक एक रचनाबंध गवसतो-कलाकृतीचा आणि जीवनाचाही. त्याला जाणवत जाते, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असा अट्टहास नकोच बाळगायला, कारण या प्रवासात एक आगळा आनंद आहे आणि तसाच तो या प्रवासाची गोष्ट सांगण्यातही आहे. स्वतःला शोधता शोधता स्वतःमधील लेखकाला लागलेला आयुष्याबद्दलचा हा एक शोध आहे- आत्मशोधाच्या दिशेने जाणारी विजय पाडळकर यांची एका आगळ्या प्रवासाची ही नवी कादंबरी. वाचकांना गोष्ट ऐकल्याचा आनंद देत, स्वत:च्या आतही पाहायला भाग पाडत राहते... अंतर्मुखतेचा प्रत्यय देत...
-
Medhavini (मेधाविनी)
अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात १९७८ साली बी.ए.ची पदवी प्राप्त केलेले आद. यशवंत बैसाणे यांनी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर राजपत्रित पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्याकडे यास्तव शासन सेवेचा प्रदीर्घ अनुभव तर होताच. त्या शिवाय खाजगी छापखान्यापासून पंचतारांकित सेंटॉर हॉटेल, तसेच आयकर विभागामधील सेवेचा अनुभव त्यांनी संपादित केला. त्या अनुभवाचा त्या-त्या क्षेत्रातील सहकारी कर्मचारी वर्गाला फायदा मिळवून देण्यासाठी झटत आलेले आहेत. याच दरम्यान कर्मचारी संघटना बांधण्याचा मूलभूत हक्क नाकारणाऱ्या हिटलरशाही वृत्तीच्या विरोधात न्यायालयीन लढा देताना नऊ वर्षे सेवेतून निलंबित झाले. तरीही शोषित, पिडीत कर्मचारी बंधू-भगिनींना न्याय देण्यासाठी सातत्याने पुढे राहिले. 'मोहाडीचे तात्यासाहेब' या स्मरणिकेचे सहसंपादन, त्याचबरोबर वृत्तपत्र व नियतकालिकांतून कथा, लेख व प्रासंगिक लेखनाबरोबरंच मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक संघटनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. आजवरच्या जीवनप्रवासात सान्निध्यात आलेल्या विविध वृत्ती, व्यक्तिमत्त्वांचा उमटलेला सकारात्मक ठसा 'मेधाविनी' या कथासंग्रहाच्या निमित्ताने त्यांनी शब्दबद्ध केला आहे. यातील कथांना सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेची किनार आहे. प्रत्येक कथेतील क्षणाक्षणाची गूढ उत्कंठा हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. समाजाप्रति असणाऱ्या जाणीवांच्या बाबतीत कृतघ्न होणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू लब्धप्रतिष्ठितांना आपल्या सामाजिक बांधिलकीचे उत्तरदायित्व निभावण्याचे स्मरण करून देणे हाच प्रस्तुत लेखकाचा या 'मेधाविनी' च्या निमित्ताने मूळ उद्देश आहे.
-
Jagacha Etihas Ek Drushtikshep (जगाचा इतिहास एक दृ
गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांच्या काळात जगाच्या इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा सदर पुस्तकात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत अमेरिका व युरोपात अमेरिकेची क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनचा उदय, शीत युद्ध, सोविएत संघाचे विघटन आदी ठळक घटना घडल्या. यातील घटना अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकात घडलेल्या आहेत. या घटनांविषयीची माहिती व त्यांचे जगाच्या इतिहासातील महत्व वाचकांना कळावे या दृष्टीने या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. हे पुस्तक सामान्यवाचक, अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. या पुस्तकात नमूद केलेल्या घटनांचा परिणाम जगाच्या इतिहासावर कळत नकळतपणे झालेला आढळतो. त्यामुळे या घटनांचा अभ्यास करणे उपयोगी ठरणार यात वाद नाही.