-
Mahapratapi Subhedar Malharrao Holkar (महाप्रतापी सुभेदार मल्हारराव होळकर)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर करणारे आणि मराठेशाहीचा इतिहास घडवणारे काही शूरवीर होते. त्यामध्ये अग्रस्थानी असणारे सुभेदार मल्हारराव होळकर हे अत्यंत पराक्रमी, शूर, बुद्धिमान आणि धाडसी असे सुभेदार होते. धर्म, आचार, विद्या, व्यापार आणि युद्धकला या सर्वात ते पारंगत होते. सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता, महत्वकांक्षीपणा आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावर या सामान्य मेंढपाळ व्यक्तीने दिल्लीचा बादशाह कोण व्हावा हे ठरवण्यापर्यंत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र राज्याच्या राजासारखे ते आयुष्यभर वागले. पण छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावरील निष्ठा त्यांनी अखंड जपली. एकूण ७४ परगणे मल्हाररावांच्या ताब्यात होते. प्रत्येक युद्धात मल्हाररावांनी भीम पराक्रम केला. आपल्या कारकिर्दीत ते एकूण ५२ लढाया लढले आणि त्या सर्वांमध्ये त्यांनी यश मिळवले. मराठेशाहीच्या उत्कर्षात मल्हारराव होळकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठेशाहीचा भगवा झेंडा अटकेपार फडकवण्यात मल्हाररावांचा सिंहाचा वाटा होता. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा पाया मल्हाररावांनी बळकट केला. आपल्या राज्यात प्रशासन, शेती, जलव्यवस्था, न्याय, धार्मिक बाबी, स्थैर्य, शांतता राबवून त्यांनी शिवरायांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. रघुराज मेटकरी हे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, दुमिर्ल कागदपत्रे धुंडाळून मल्हारराव होळकर यांचे हे चरित्र लिहिलेले आहे. मल्हाररावांचे हे चरित्र प्रेरणादायी आहे. मराठी वाचकांना ते नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. डॉ. देवीदास पोटे (ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक, मुंबई)
-
Avakash Peltana (अवकाश पेलताना)
कादंबरीकार प्रियांका कर्णिक यांचा हा पहिला कथासंग्रह. संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक द्वंद्वांचं वैविध्यपूर्ण चित्रण असणारा कथासंग्रह
-
Menduchi Mashagat (मेंदूची मशागत)
‘मेंदूची मशागत’ या देवा झिंजाड लिखित पुस्तकात गावाशी जोडलेले अनुभव, संघर्ष आणि ज्वलंत विषय मांडले आहेत. शहरात राहत असूनही त्यांच्या लेखनाची नाळ गावाशी जोडलेली आहे. वाचनसंस्कृतीचे महत्त्व ते वारंवार अधोरेखित करतात. मेंदूच्या विकासासाठी वाचन गरजेचे असून, हे पुस्तक छोट्या प्रकरणांतून अनुभवांद्वारे मौल्यवान संदेश देते. आजचा मेंदू मोबाइलमध्ये अडकला असून, तो पुन्हा डोक्यात आणण्यासाठी अशी ‘मेंदूची मशागत’ आवश्यक आहे, असे मत शरद तांदळे यांनी व्यक्त केले. – शरद तांदळे
-
Krudhyati Ek Thararak Mahasangram (कृध्यती एक थरारक महासंग्राम)
मानवतेच्या कल्याणासाठी महाभारतासमान विध्वंस पुन्हा होऊ नये, हे गरजेचे होते. याच उद्देशाने श्रीकृष्णाने दैवी अस्वे सुरक्षित ठेवण्याची सोय केली होती; परंतु सत्तेच्या लोभापायी मनुष्य कोणताही थर गाठू शकतो, हे कृष्णमृत्यूपश्चात सातशे वर्षातच समजले. कृथ्यति, हा दैवी शक्तीने भरलेला एक असा विक्षिप्त गुन्हेगार उठ्यास आला, ज्याचे लक्ष्य शत्रू राज्यातील गर्भाचा वध करणे, हे होते. हा योद्धा जर 'विद्यधुरंधर स्पर्धा जिंकून इंद्रपदी बसला, तर समग्र आर्यावर्ताचा सर्वनाश होणार हे निक्षित. या दैवी शक्तीने उन्मत्त विक्षिप्त गुन्हेगाराला छोट्याशा राज्याचा सेनापती वीरसेन रोखू शकेल का? डॉ. ऋषिकेश बोधे यांसारख्या लेखकांनी 'कृथ्यती'सारखी गहिराई असलेली साहित्यकृती साकारून मराठी फिक्शनला एक नवे परिमाण दिले आहे. या कादंबरीचे साहित्यिक मूल्य अत्यंत ठोस आहे. तिचं भाषिक सौंदर्य, मनाच्या गुंतागुंतीचा सुक्ष्म येध आणि अंतःप्रेरणेला भिडणारी तिची शैली यामुळे ही कादंबरी एक दीर्घकाळ आठवणीत राहील अशी ठरते. खरे सांगायचे तर, बऱ्याच काळानंतर एवढं शुद्ध, विचारप्रवृत्त आणि संवेदनशील साहित्य वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मराठी साहित्यात अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या सशक्त कल्पनाविष्काराच्या अभावाची जाणीव होती; पण 'कृध्यती मुळे त्या पोकळीची भरपाई झाल्याचे समाधान वाटते. आगामी काळात ह्याचे पुढील भागही येवोत, अशा शुभेच्छा.
-
Pimpalpan Part -16 (पिंपळपान भाग-१६)
आशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Khaki Stories Part 1 (खाकी स्टोरीज भाग १)
पोलिसी तपासकथा उत्कंठावर्धक असतातच, परंतु डिजिटल युगात गुन्ह्यांचा सारीपाटच बदलला गेलाय. अर्थात, तपासाचं तंत्रही बदलून गेलंय. गुन्ह्याची शस्त्रं आणि क्लृप्त्या बदलल्या, तसा त्यांचा माग काढण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला. गुन्हेगारीच्या विकृतीला आता अत्याधुनिक गॅजेट्सची साथ लाभलेली आहे. मनोरंजन आणि उपयुक्तता असलेली गॅजेट्स प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे त्यांच्यावर जाळं फेकण्याऱ्यांची कमी नाही. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना हातोहात 'मामा' बनवण्याचे फंडे विकसित झालेले आहेत. या गुन्ह्यांचं स्वरूप चक्रावणारं आणि विजेच्या वेगानं कवेत घेणारं आहे. तपासयंत्रणांच्या बुद्धीचा कस पाहणाऱ्या या गुन्ह्यांचं आव्हान आक्राळविक्राळ आहे. या पार्श्वभूमीवर गुंतागुंतीच्या केसेसचा लीलया फडशा पाडणाऱ्या इन्स्पेक्टर किरण देशमुख आणि त्यांच्या टीमच्या कौशल्याचा चित्तथरारक वेध घेणाऱ्या खाकी वर्दीतल्या तपासकथा एक कडक सॅल्यूट ठोकायला भाग पाडतील.
-
Pimpalpan Part -15 (पिंपळपान भाग-१५)
Madhuri Shanbhag Vrunda Bhargav Suman Phadke Mandakini Godse Kalpana Bhagwat Pravin Davane Prakash Pathak Rajesh Belhekarआशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Santaji Ghorpade Japhatan Mulukh (संताजी घोरपडे जफतन मुलूख)
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य बुडालं या औरंगजेबाच्या भावनेला संताजींनी जोरदार तडाखा दिला. चार साडेचार वर्ष ब्रम्हपुरी या ठिकाणच्या काळ्या मातीत औरंगजेब बादशहा राहिला. त्याला कारण म्हणजे मराठ्यांचा सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशहाला निर्माण केलेला धोका होय. वडू कोरेगावच्या बादशाही छावणीवर सन १६८९ साली जो धाडसी छापा संताजी यांनी घातला त्यांने बादशहाची झोपच उडाली, बादशहा मरता मरता त्या रात्री वाचला. संताजीला ठार केल्याशिवाय बादशहाला ब्रम्हपुरीच्या छावणीतून बाहेर पडता येईना. औरंगजेब बादशहा आणि मोगल राजवट ही आशिया खंडातील बलाढ्य राजवट होती. संताजी घोरपडे यांचा अलौकिक पराक्रमाचा दरारा या राजवटीवर एवढा पडला होता की मोगल सरदार संताजी घोरपडे यांच्या बरोबर युध्द प्रसंग पडल्यावर ते युध्द टाळण्याचा प्रयत्न करत. अशा या नर शार्दुल रणधुरंधरास स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांकडून मुजऱ्यास न येणे पासून ते ममलकतमदार ह्या पदवी पर्यंतचा प्रवास म्हणजे संताजी बाबा. संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडणारी कादंबरी म्हणजे संताजी घोरपडे जफतन मुलूख.
-
Sheel (शीळ)
शीळ, कैफियत आणि खलनिग्रहणाय.... अगदी वेगळ्या विषयावरच्या तीन दीर्घकथा ◆ प्रियकराच्या विशासावर लग्न करून शलाका सासरी येते. दिराच्या कारस्थानांना बळी न पडता शलाका युक्तीनं त्यालाच जन्माचा धडा शिकवते. कसा? ◆ गौरव आणि कामिनी दोघंही स्वार्थी उपभोगाला चटावलेले. सरळसाधी कावेरी आयुष्यभर वाट्याला आलेली कर्तव्यं प्रेमानं पार पाडत राहते. शेवटी कोण जिंकतं ? ◆ आपल्या वडलांवर, शाळेतल्या बाईंवर झालेला अन्याय साधना विसरू शकत नाही. योग्य वेळ येण्याची ती वाट पाहते आणि योजनाबद्धरीतीनं दुष्टांचा काटा काढते.
-
Atrupta (अतृप्त)
सिनेसृष्टीतील गाजलेले चित्रकार आणि संवेदनशील लेखक श्रीकांत धोंगडे यांनी मीनाकुमारीच्या जीवनावर ‘अतृप्ता’ हे नवे पुस्तक लिहिले आहे. खरं तर मीनाकुमारीच्या जीवनावर अनेक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. परंतु, श्रीकांत धोंगडे यांचे हे पुस्तक लक्षणीय आहे. कारण तिच्या जन्मापासून अखेरपर्यंतचे हे शोधचरित्र आहे. मीनाकुमारी राहत असलेल्या दादर परिसरातील रहिमाबाई चाळीपासून श्रीकांतजींनी शोधकार्य सुरू करून सलग साडेतीन वर्षे तिच्या जीवनाचा धांडोळा घेतला आहे. अन् अनेक दुर्मिळ फोटो शोधून काढले आहेत. त्यामुळे या पुस्तकात एक हजार फोटोंचा दुर्मिळ साठा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. “शिवाय या पुस्तकात पेन, पेन्सिल व चारकोलने श्रीकांतजींनी केलेले मीनाकुमारीचे १६ पोर्टेटस् आहेत,” त्यांच्या काळजाला भिडलेली, मनात शिरलेली आणि मेंदुत भिनलेली मीनाकुमारी त्यांनी या पुस्तकात उभी केली आहे.
-
Mazi Shipaigiri (माझी शिपाईगिरी)
" गेल्या शतकात कोल्हापूर संस्थानातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा हिंदी लष्करातील सर्वोच्च अधिकारपदावर जातो, ही काही आपोआप सहजगत्या घडून आलेली घटना नसून तिला एक ऐतिहासिक व सामाजिक कारणपरंपरा होती आणि त्या परंपरेचा उद्गम बिंदू होता कोल्हापूरचा लोकराजा रावर्षी शाहू छत्रपती. त्यांच्या राजाश्रयाने वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा, पांडुरंग, हा उच्चविद्याविभूषित झाला आणि भारतातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून रावब. डॉ.पी.सी.पाटील या नावाने प्रसिद्धी पावला! या रावबहादुरांचे चिरंजीव शंकरराव म्हणजे प्रस्तुत चरित्र नायक ले.ज.एस.पी.पी.थोरात. हे सर्व इथं आठवले एवढ्यासाठी की सन १८९९ मध्ये शाहू छत्रपतींनी पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या गावी खास घोडेस्वार पाठवून त्याला बोलावून घेतले नसते व पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर 'रावबहादूर डॉ.पी.सी. पाटील'च नव्हे तर जनरल एस.पी.पी. थोरातही देशाला मिळाले नसते. अशा ऐतिहासिक व सामाजिक घटनांची कारणपरंपरा इतिहास आपणास सांगत असतो. इतिहासाची खरी फलश्रुती हीच आहे." " गेल्या शतकात कोल्हापूर संस्थानातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा हिंदी लष्करातील सर्वोच्च अधिकारपदावर जातो, ही काही आपोआप सहजगत्या घडून आलेली घटना नसून तिला एक ऐतिहासिक व सामाजिक कारणपरंपरा होती आणि त्या परंपरेचा उद्गम बिंदू होता कोल्हापूरचा लोकराजा रावर्षी शाहू छत्रपती. त्यांच्या राजाश्रयाने वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा, पांडुरंग, हा उच्चविद्याविभूषित झाला आणि भारतातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून रावब. डॉ.पी.सी.पाटील या नावाने प्रसिद्धी पावला! या रावबहादुरांचे चिरंजीव शंकरराव म्हणजे प्रस्तुत चरित्र नायक ले.ज.एस.पी.पी.थोरात. हे सर्व इथं आठवले एवढ्यासाठी की सन १८९९ मध्ये शाहू छत्रपतींनी पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या गावी खास घोडेस्वार पाठवून त्याला बोलावून घेतले नसते व पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर 'रावबहादूर डॉ.पी.सी. पाटील'च नव्हे तर जनरल एस.पी.पी. थोरातही देशाला मिळाले नसते. अशा ऐतिहासिक व सामाजिक घटनांची कारणपरंपरा इतिहास आपणास सांगत असतो. इतिहासाची खरी फलश्रुती हीच आहे."
-
Ethiopiyi Suras Katha (इथियोपियी सुरस कथा)
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस’ या जागतिक मानवतावादी संघटनेतल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले उमेश कदम यांचा ‘इथिओपियी सुरस कथा’ हा कथासंग्रह. कामाच्या निमित्ताने दहा वर्षं ते आफ्रिकेत होते. त्यांपैकी अडीच वर्षं ते इथिओपियात वास्तव्यास होते. या कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. ‘भुतांची टेकडी’, ‘मेंगेशा’, ‘इथिओपियी कांद्यांची गोष्ट’, ‘चिन्मय आफ्रिका’ यांसारख्या एकूण पंधरा कथा त्यात समाविष्ट केल्या आहेत. सर्वच कथांमधून इथिओपियन संस्कृती, दैनंदिन जीवन आणि त्या अनुषंगाने सर्व गोष्टींचं चित्रण आढळतं. त्या संदर्भातले विविध उल्लेख अगदी बारकाव्यांसहित येतात. इथिओपियातलं दैनंदिन जीवनच या कथांमधून वाचकांना भेटत राहतं. लेखकाच्या स्वानुभवांवर आधारित असलेल्या या सर्वच कथांमधून त्याच्या परिघातल्या सर्व माणसांचं भावविश्वही उलगडतं. उमेश कदम यांनी सत्य घटनांना कल्पिताची जोड देऊन लिहिलेल्या या कथा अतिशय ओघवत्या शैलीत आल्या असून त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
-
Draupadi Indraprasthachi Samradyni part -3 (द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी भाग ३)
आपल्या रजःस्वला बहिणीला केसांनी ओढून नेऊन तिची सार्वजनिक विटंबना केली जाते, हे कळल्यावर द्रौपदीचा भाऊ, उत्तमौजस, काय प्रतिज्ञा करतो? द्रौपदीचे माहेरघर तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट परीक्षेत तिला कशी साथ देते? द्रौपदीची लाज राखणाऱ्या साडीचं पुढे काय झालं? वनवासाच्या काळात पांडवांच्या साथीनं तिचं अनोळखी आणि धोकादायक वाटांवरून मार्गक्रमण करणारं रूप, एक साम्राज्ञी, प्रेमळ पत्नी आणि प्रेमळ आईपासून ते एक शूर तलवारधारी होऊन तिच्या शत्रूचा नाश करणाऱ्या तिच्या या रौद्र अवतारावर मंत्रमुग्ध होण्यासाठी तयार राहा. राक्षसांच्या कुळांमध्ये जातीय दंगल उसळू नये म्हणून हिडिंबा आणि मौरवी यांच्याशी सखोल संबंध प्रस्थापित करताना त्यांच्या सुसंस्कृत राजकीय मुत्सद्देगिरीचे साक्षीदार व्हा. सोनाली राजे यांनी लैंगिक शोषणाची विकृती आणि प्रवृत्ती कशी ठेचून काढली, हे महाभारतातील द्रौपदी-कीचक आणि अर्जुन-उर्वशी या पीडित-अपराधी जोड्यांच्या माध्यमातून, आपल्या प्रकरणांत अधोरेखित केली आहे. कर्मठ आणि निर्भय अशा योद्ध्या राणीला भेटा; जी स्वाभिमान राखण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची वाट पाहत नाही. स्वतः साठी आणि आजूबाजूच्या इतर स्त्रियांच्या सन्मान रक्षणासाठी द्रौपदी खंबीरपणे कशी उभी राहते ते पाहा. तिच्या आयुष्याच्या नीचांकात तिच्याबरोबर पावले उचला.
-
Swatantryasurya (स्वातंत्र्यसूर्य)
'स्वातंत्र्यसूर्य' या पुस्तकात नरगुंद राज्याचा राजा भास्करराव भावे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्यातील नाट्यमय संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी भास्कररावांना त्यांच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा दत्तक घेण्यास परवानगी नाकारली. ते त्यांचे राज्य 'दत्तकविधान विरोधी कायद्या'च्या मदतीने स्वतःच्या अधिकारात विलीन करू इच्छित होते. मात्र, याला धूप न घालता भास्कररावांनी इंग्रजांवर हल्ला चढवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना त्यांचे राज्य परत मिळवता आले, की ब्रिटिशांनी आपल्या क्रूर शक्तीने बदला घेतला? अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, निर्भयता आणि शौर्याची सत्यकथा.
-
Pitali Nondvahi - Aathavani Datatat (पितळी नोंदवही - आठवणी दाटतात)
देवकी जैन यांचे त्यांच्या 'दाटलेल्या आठवणीं'चे ग्रंथरूप 'द ब्रास नोटबुक' या नावाने, मराठीत 'पितळी नोंदवही' म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे एकूणच आत्मचरित्रात्मक साहित्यात लक्षणीय भर पडली आहे. लक्षणीय अशा अर्थाने की हे पुस्तक (आणि त्याचा अनुवाद) अतिशय धाडसी, मनमोकळ्या आणि विलक्षण ऊर्जा असलेल्या व्यक्तीचे चरित्र म्हणूनच केवळ नव्हे तर एक मोठा सामाजिक सांस्कृतिक पट आपल्यासमोर मांडते. मूळ इंग्रजी ग्रंथात जी चित्रमयता आहे आणि जो अनुभव-प्रवास आहे तो तितक्याच समर्थपणे अलका गरुड यांनी केलेल्या मराठी अनुवादात आला आहे. देवकी जैन यांचा जीवनप्रवास कर्नाटक ते दिल्ली व्हाया ऑक्सफर्ड आणि जगातील अनेक देश, भाषा आणि संस्कृतींमधून समृद्ध झाला आहे. शिक्षणप्रवासही विलक्षण झपाटलेला आणि तेजस्वी विशेष स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स आणि सन्मान. पुढे विवाहही लक्ष्मीचंद जैन या निष्ठावान गांधीवादी विचारवंताशी. विद्यापीठांतील बुद्धिमान विद्यार्थिनी, अर्थशास्त्रात संशोधन करणारी महिला, स्त्री जीवनाचा साद्यंत अभ्यास करणारी विश्लेषक, काही नवे प्रबंध व सिद्धांत मांडून स्त्रीवादाचे परिपेक्ष्य बदलणारी विचारवंत, बंडखोरी करतानाही समतोल संभाळणारी पण बंडप्रवृत्ती न सोडणारी व्यक्ती, मनस्वी पत्नी आणि आई, चौकटीत राहूनही चौकटीबाहेर विचार करणारी व सक्रिय जीवन जगणारी स्त्री आणि कधीही उमेद वा आशावाद न सोडणारी व्यक्ती आणि वयाच्या ८७ व्या वर्षी आपले जीवन कॅनव्हासवर सापेक्षरीत्या चितारणारी सर्जनशील लेखिका ही त्यांची काही रूपे. अलका गरुड यांनी हा कॅनव्हास आणि ते जीवनचित्र यावरचे रंग तितकेच जिवंत ठेवले आहेत. देवकी जैन यांनीच हे मराठी 'ब्रास नोटबुक' लिहिले असावे, असे वाटण्याइतके प्रभावी आणि प्रवाही 'अनुवादांतर' केले आहे. स्त्री चळवळीत कार्य करणाऱ्या, पण मुख्यतः मराठी समाज/स्त्री जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देवकी जैन यांचे पुस्तक आणि अलका गरुड यांचे भाषांतर अतिशय प्रबोधनकारी ठरणार आहे.
-
Pashchim Aaghadivar Samsum (पश्चिम आघाडीवर सामसूम)
सत्यबोध हुदलीकर याने मूळ जर्मन भाषेतून मराठीत आणलेलीही कांदबरी 1932 साली प्रकाशित झाली. युद्धाची विफलता पटवणे हाच या कादंबरीचा हेतू आहे. या कांदबरीवरील चित्रपट कमालीचे लोकप्रिय झाले. 1930 पासूनच युद्धविरोधी सूर जगात उमटू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून इंग्लडमध्ये बर्ट्रान्ड रसेल यांनी अण्वस्त्र विरोधी व युद्ध विरोधी चळवळ सुरु केली. या चळवळीचे ब्रीदवाक्य ‘पुन्हा युद्ध नाही’ असेच होते. त्या चळवळीचा ‘पहिला हुंकार’ म्हणजेच ही कांदबरी. ही कादंबरी प्रसिद्ध होऊन 90 वर्षे झाली आहेत तरीही या कादंबरीचे महत्त्व कणभरही कमी होत नाही.
-
Ek Kali Don Pane (एक कळी दोन पानं)
जगातील दोन नंबरचं पेव... पहिला नंबर अर्थात पाण्याचा. पावणे पाच हजार वर्षापासून मानवजात चहा पितेय, त्याच्या लागवडीसाठी अनेक भूखंड बळकावतेय, अनेक युद्ध लढतेय... अशा या चहाच्या मळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगवलेली ही कादंबरी. ही कहाणी आहे एका संघर्षाची, स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मजुरांच्या लख्याची! स्वतःच्या देशात मजूर म्हणून राबणारा गौरा साब क्रेग ब्रोडी भारतात येऊन एका चहाच्या मळ्याचा मालक बनतो आणि त्याचबरोबर वेठबिगार म्हणून राबणाऱ्या शेकडो जीवांचाही। कथानक फिरतं ते दोन प्रमुख पात्रांभोवती- ब्रोडीचा औरस मुलगा जेम्स आणि ब्रोडीलाही अज्ञात असलेला त्याचा अनौरस मुलगा जॉर्ज... एक असतो वसाहतवादी 'गोरा साहेब' आणि एक स्वतंत्र भारतातला 'काळा साहेब'. पिचलेले साचे मजूर बिरजू, भोला, सावित्री, गंगा, चंपा, मौनिमौसी एकीकडे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणारी, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणारी मिसेस ब्रोडी म्हणजेच जेन दुसरीकडे. ही सगळीच पात्रं चहाच्या मळ्यातील हा संघर्ष जिवंत करतात. कथानकाच्या ओघाने मजुरांना सोसावे लागणारे अन्याय, मानहानी, अपार कष्ट चहाच्या शेतीतील शोषणाचा इतिहास सांगून जातात.
-
Choices (चॉइसेस)
लिव्हसारखी अत्यंत संवेदनशील अभिनेत्री, तिचे आगळेवेगळे आयुष्य, त्यातले भावनांचे अनेक चढउतार, गुंतागुंतीची नाती - याबद्दल तिला नेमके काय म्हणायचे आहे, हे समजून घेऊन ते शब्दबद्ध करणे हे अत्यंत अवघड काम, पण मृणालने ते अप्रतिमरित्या पार पाडले आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते लेखन कुठेही अनुवाद वाटत नाही. मला तर हा मृणालने घेतलेला लिव्ह उल्मन या स्त्रीचा अनुभव वाटतो. एका अभिनेत्रीला, स्त्रीला, आईला, प्रेयसीला आणि व्यक्तीला जाणून घेताना, जणू परकायाप्रवेश करून मृणालने लिव्ह आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. - डॉ. मोहन आगाशे
-
Eklavya (एकलव्य)
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य ! महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता. एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा. एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
-
Tathakathit (तथाकथित)
विजय तांबे हे गेली २०+ वर्षे अत्यंत निष्ठेने कथा लिहीत आहेत. 'तथाकथित' हा त्यांचा तिसरा कथासंग्रह. ते मूलतः एक प्रयोगशील लेखक आहेत. साहजिकच त्यांच्या कथा प्रामुख्याने 'अनुष्टुभ' सारख्या वाङ्गयीन नियतकालिकात प्रकाशित झाल्या आहेत. कथेमध्ये होणारे बहुतांश प्रयोग हे शैली, घाट आणि आशयाच्या अंगाने होत असतात. विजय तांबे ह्यांचं वेगळेपण असं की ते त्यांच्या कथांमध्ये सामाजिक भान आणि कपोलकल्पित ह्यांची सांगड घालायचा एरवी सहसा न आढळणारा प्रयोग करतात. लहानपणापासून सामाजिक चळवळींशी संबंध आल्याने त्यांची पात्रं, प्रसंग, एकूणच आशयद्रव्य हे त्यांची सामाजिक जाणीव दर्शवणारं असतं. मात्र सामाजिक आशयद्रव्य असणाऱ्या बहुतांश कथा जशा वास्तववादी ढंगाने लिहिल्या जाण्याची वहिवाट आहे ती सोडून ते त्यातून फिक्शन साकारण्याचा प्रयत्न करतात. हे करताना त्यांना उपयोगाची ठरते ती त्यांची दृक्भान असलेली कथनशैली. विजय तांबे ह्यांचे कल्पनाचक्षू खूपच ताकदीचे आहेत. ह्या संग्रहातील 'तथाकथित' ही शीर्षककथा त्यादृष्टीने पुरेशी बोलकी ठरावी. ही कथा त्यांच्या कल्पनाचक्षूनी अशी काही देखिली आणि रेखिली आहे की वाचणाऱ्याला एक प्रतिसृष्टी नजरेसमोर साकार व्हावी. ह्या प्रदीर्घ कथेत त्यांनी केवळ कल्पनेने जे काही बारकावे दिले आहेत ते चकित करणारे आहेत. ह्या संग्रहातील त्यांच्या कथांमध्ये सामाजिक भानाच्या तुलनेत कल्पकता अधिक जाणवते. अर्थात 'भीतीचा मॉल' ह्या कथेत एका गरोदर मातेला तिला होणारे बाळ सुदृढ असेल की नाही ह्या भीतीने तिच्या आत अंधश्रद्धांचे जे थैमान चालते, त्याचे अनेक कंगोरे इतक्या बारकाईने आलेत की त्यातून त्यांची समाजातील आक्षेपार्ह गोष्टींबाबतची निरीक्षणशक्ती अधोरेखित होते. प्रयोगशील लेखकांच्या कथा वाचकांपर्यंत पोहोचणे हे साहित्यसंस्कृतीच्या सकस जोपासनेसाठी अत्यंत आवश्यक असते. ह्यासाठीच विजय तांबे ह्यांची कथा न केवळ अधिकाधिक वाचकांपर्यंत, तर उदयोन्मुख, होतकरू लेखकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. वास्तववादाच्या आहारी गेलेल्या मराठी साहित्यासाठी ह्या कथा एक अभ्यासाचा असा वस्तुपाठ ठरू शकतात.
-
Marathi Saatasamudrapar (मराठी सातासमुद्रापार )
मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मेघना साने यांचा कलाप्रवास प्रथम व्यावसायिक नाटकांतून अभिनेत्री म्हणून सुरू झाला. पुढे त्या लिहित्या झाल्या. कथा, काव्य, ललित, बालसाहित्य अशी त्यांची एकूण बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'कोवळी उन्हें' हा स्वलिखित कथाकथनाचा एकपात्री प्रयोग करत त्यांनी देश-विदेशांत दौरे केले. मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी परदेशातील मराठी बांधव कसे झटून योगदान देत आहेत हा त्यांच्या कौतुकाचा विषय राहिला. या विषयावर संशोधकवृत्तीने लिहिलेले 'मराठी सातासमुद्रापार' हे पुस्तक मराठी भाषेच्या कालप्रवासात अतिशय महत्त्वाचे ठरते. साहित्य, शिक्षण व कला या क्षेत्रांत संस्मरणीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातील काही व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परिचयही त्यांनी या पुस्तकातून करून दिला आहे.
-
The Escape Artist (द एस्केप आर्टिस्ट)
द एस्केप आर्टिस्ट: द मॅन हू ब्रोक आऊट ऑफ ऑशवित्झ टू वॉर्न द वर्ल्ड हे पुस्तक रुडी व्हर्बा यांच्या अद्वितीय धैर्याची आणि मानवतेविरुद्ध झालेल्या भयानक अत्याचारांशी संघर्षाची कथा साकारते. रुडी, एक युवा यहूदी, ऑशवित्झ कॅम्पमधील छळछावणी आणि नरसंहाराचा साक्षीदार बनतो, जिथे प्रत्येक क्षण जीव वाचवण्याच्या लढाईसारखा असतो. पण तो भयावहतेला सामोरे जातो. चाणाक्षतेचा वापर करून आपल्या मित्र फ्रेडीसोबत पळून जातो. त्याच्या साहसामुळे जगाला ऑशवित्झचं सत्य समजतं. जे ऑशवित्झ रिपोर्ट म्हणून इतिहासात अमर झालं. हे पुस्तक केवळ ऐतिहासिक नोंद नाही; ते धैर्य, निश्चय आणि मानवतेच्या प्रती सुसंगत न्यायासाठी उभे राहण्याच्या शक्तीची एक सजीव चित्रकथा आहे.