-
Gypsy (जिप्सी)
ही गोष्ट आहे एका फिरस्त्याची… दिशाहीन झालेल्या भटक्याची… स्वतःचा शोध घेत निघालेल्या एका तरुणाची… ही गोष्ट आहे एका प्रवासाची… या प्रवासातल्या भल्या-बुऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे जिवलग मित्रांची… त्यांच्यातल्या अतूट नात्याची… ही गोष्ट आहे हातून निसटून गेलेल्या रिलेशन्सची… आणि पुन्हा नव्याने गवसणाऱ्या प्रेमाची… ही गोष्ट आहे तुमची-आमची… सगळ्यांची… तुमच्या-आमच्या आतल्या वाट चुकलेल्या एका जिप्सीची…!
-
Prasangik Prasad (प्रासंगिक प्रसाद)
उत्तम आणि वाचनीय पुस्तक आहे. पुस्तक वाचताना आपल्याला जाणवेल की हे प्रसंग आणि घटना आपल्याही आयुष्यात कधीतरी घडून गेल्या आहेत. प्रसादजींची भाषा सहज, ओघवती आहे आणि त्यामुळे ते आपल्यासमोर बसून बोलत आहेत,असे वाटते. निरिक्षण उत्तम आहेच पण निरिक्षणाचे लेखन समर्थपणे केले आहे. आपल्या घरात घडणारे प्रसंग, सौभाग्यवतीबरोबर होणारे संभाषण, परदेशातून कधीतरी येणारी कन्या, ती काही दिवसच रहाणार म्हणून जाणवणारी उद्विग्नता, नेहमीच्या कामवाली बाईने दिलेली दुसऱ्या प्रांतातील बदली कामवाली, बुफेमधील गमतीदार प्रसंग, सर्व आपल्या अगदी जवळचं वाटावं,असं आहे. चांगल्या वाचनाच्या शोधात असणाऱ्यांनी हे पुस्तक ( अर्थात विकत घेऊन) जरुर वाचावे आपल्या मित्रमंडळींना काही विशेष प्रसंगी भेट द्यायलाही हरकत नाही
-
Mithak Ani Natak (मिथक आणि नाटक)
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर लिखित ‘मिथक आणि नाटक’ हे महत्त्वपूर्ण वैचारिक पुस्तक आहे. यामध्ये १९२०पर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाचा परामर्श घेण्यात आला आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या प्रबंधाचा उत्तरार्ध यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. विष्णुदास भावे यांच्या नाटकांपासून खाडिलकरांच्या पौराणिक नाटकापर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण यात स्पष्ट केली आहे. त्यासाठी या ग्रंथात पौराणिक नाटकाची संकल्पना, या नाटकाची आशयवस्तू असलेली पुराणकथा, तिचे स्वरूप, पुराणकथेचा नाटकनिर्मितीशी असलेला अन्योन्य संबंध यांची विस्तृत बैठक उलगडली आहे. प्रारंभीच्या विधिनाट्याकडून नाटकाकडे होत गेलेली ‘नाटक’ या वाङ्मयप्रकाराची वाटचाल लेखिकेने नाट्यवस्तू, नाट्यस्थळ, नट व प्रेक्षक अशा सर्व अंगांनी विशद केली आहे. त्यामुळेच, लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या कक्षा विस्तारणारे हे पुस्तक आहे. मिथकीय समीक्षादृष्टीतून अभिव्यक्त झालेले हे वैचारिक लेखन आहे.
-
Kanganam (कंगनम)
कंगणम् ही पेरुमाल मुरुगन यांची कादंबरी ग्रामीण तमिळ समाजातील लिंग असमतोल आणि त्याचे सामाजिक परिणाम यांवर प्रकाश टाकते. स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलींची कमी संख्या यामुळे लग्न न होऊ शकलेल्या मारीमुत्तू या पुरुषाच्या जीवनाभोवती कथा फिरते. त्याच्या एकटेपणातून, मानसिक संघर्षातून आणि सामाजिक उपेक्षेतून ही कादंबरी पुरुषप्रधान समाजरचनेतील खोलवर रुजलेल्या समस्या, लैंगिक भेदभाव आणि मानवी वेदना प्रभावीपणे मांडते.
-
Jahanara (जहाँआरा)
शाहजहानची मुलगी जहाँआरा हिच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. ती सर्व मुघल शाहजाद्यांमध्ये सर्वांत विद्वान होती. कुमारवयातही ती तिच्या सम्राट वडिलांना राज्यकारभार आणि मुत्सद्दीपणाने सल्ले देत असे. आधी आपला पती जहाँगीर आणि नंतर औरंगजेब यांचे कान भरून त्यांना एखाद्या कठपुतळीप्रमाणे नाचवणारी शाहजहानची धूर्त सावत्र आई नूरमहल हिची कारस्थाने हाणून पाडताना जहाँआराने सातत्याने शाहजहान, दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. पर्शियन, संस्कृत आणि इतर अनेक भाषांमध्ये पारंगत असलेल्या जहाँआराने फक्त कुराणच नाही, तर वेद आणि पुराणांचाही अभ्यास केला होता. एके काळी बंगालच्या उपसागरात सागरी व्यापारासाठी सर्वाधिक जहाजांची मालकीण म्हणून तिची ख्याती होती. तथापि, तिचे आयुष्यही प्रचंड भावनिक उलथापालथीचे होते. राजपूत राजा छत्रसालच्या प्रेमात ती खोलवर बुडाली होती; पण तिचे आजोबा, सम्राट अकबर यांनी नियम घालून दिला होता की, मुघल राजघराण्यात जन्मलेल्या स्त्रियांना प्रियकर असता कामा नये, तसेच त्यांनी विवाहदेखील करता कामा नये. तिने एकाकी राहून आपल्या वडिलांची सेवा करत आणि पानिपत नावाच्या एका प्रामाणिक हिजड्याच्या मैत्रीवर अवलंबून राहूनच आयुष्य व्यतीत केले. सुकुमार यांची जहाँआरा आपल्याला अशी गोष्ट सांगते की, जिचा साक्षीदार पानिपत नावाचा हिजडा आहे. तिच्या वैयक्तिक रोजनिशीतून आपल्याला तिच्या भावांच्या संघर्षादरम्यान तिचे आयुष्य कसे नरकाच्या आगीत होरपळून निघत होते, याचे स्पष्ट चित्रण वाचायला मिळते.
-
Yogini (योगिनी)
"संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडं म्हणजे, मराठी अस्मितेचा मानबिंदू! त्यांपैकी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘योगिनी’ संक्षिप्त चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यामध्ये लहानपणापासूनची अल्लड-खेळकर मुक्ता ते संतपदापर्यंत पोहोचलेली ‘योगिनी’ मुक्ता हा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे. या पुस्तकात मुक्ताईचे अनेक स्वभावपैलू आपल्याला उलगडत जातात. तिच्या प्रचंड विद्वत्तेला लाभलेली मायेची झालरही या पुस्तकात चित्रित होते. या अनुषंगाने अनेक प्रसंग त्यात चित्रित झाले आहेत. मुक्ताईची लहान वयातली प्रचंड समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याची क्षमता हे सर्व पैलू पुस्तकातून ज्ञात होतात. तिचा इतर भावंडांशी असलेला अनोखा अनुबंधही लक्षात येतो. या सगळ्यांमधूनच ‘संत मुक्ताबाई’पर्यंतचा तिचा जीवनप्रवास तिची खऱ्या अर्थाने ‘योगिनी’ म्हणून ओळख करून देणारा आहे. तसंच, ‘योगिनी मुक्ता’ म्हणून तिचं चिरंतनत्व अबाधित आहे, हे अधोरेखित करणाराही आहे"
-
Nile Aakash Hiravi Dharati (निळे आकाश हिरवी धरती )
मंगोलिया ! हिमालयापलीकडचा अलांघ्य, अपरिचित प्रदेश. अथांग, हिरवीगार कुरणे. निळेभोर आकाश. गवताळ रानांवर स्वच्छंदपणे चरत असणारे प्राणी. कठोर हवामान. अवघड भूगोल. तरीही अद्भुत इतिहास. तिथल्या पशुपालक-समाजांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ - लेखकाने केलेली भटकंती
-
Suvarnabhumi Cambodia (सुवर्णभूमी कंबोडिया)
कंबोडिया म्हटलं की, अद्भुत असा मंदिरांचा देखणा खजिना डोक्यांसमोर येतो, पण सुंदर वास्तुशिल्पांबरोबरच कंबोडियाला संस्कृतीचे अनेकविध तरल असे पदरही आहेत, कंबोडिया आणि भारत नागसूत्रानेही बांधलेले आहेत. तो संबंध लेखिका सीधतिनी नूलकर यांनी सोपा करून मांडला आहे. अखंड खळखळणारी मेकींग, तिचे महत्त्व, त्यातील दंतकांबरोबरच जलचरांचे महत्त्व, त्यांचे स्थलांतर व त्याबरोबरच नदीच्या सानिध्यात राहणाऱ्या मानवी जमाती यांचं निसर्गाशी असलेलं जवळचं नातं रंजक आहे. वास्तुकलेचा अप्रतिम नजारा आणि त्याच्याशी संलग्न तीनले सँप है गोडे सरोवर व तरंगत्या गावाची सफर आगळावेगळा अनुभव देते. कंबोडियातील खाद्यसंस्कृतीचा आढावा वेगळा असला, तरी शिरशिरी आणणारा आहे. कंबोडिया ही सर्वांगाने अनुभवण्याची जागा आहे. कंबोडियातील अंगकोरवाट, जलाशये, कालवे हा तपशील, स्थापत्यकला, वास्तुकला आणि नगरविन्यासाच्या अभ्यासाचा भाग आहे. लेखिकेच्या लेखनाचा भर कंबोडियाच्या प्रसिद्ध वास्तुकलेच्या अंगाने ख्मेर व इतर, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पौराणिक, तात्त्विक व सद्यः परिस्थितीतील जीवनव्यवहार हा आहे. या सर्वांचा भारतीय संस्कृतीशी जोडणारा दुवा अलगदपणे मांडला आहे. लेखिकेचे हे पुस्तक वाचताना त्यामुळेच त्या देशाबद्दलचा, त्या देशाकडे बघण्याचा समतोल दृष्टिकोन जागृत ठेवतो. अंजली कलमदानी (वारसा वास्तू जतन-संवर्धनकार, वास्तुविशारद, नगरविन्यासकार)
-
Kalokhatil Kalokh (काळोखातील काळोख)
`काळोखातील काळोख' या दीर्घ कथासंग्रहातील ग्रामीण भाग, त्यांची राहणी आणि त्यातील भयावह वाटावेत असे प्रसंग शहरी लोकांच्या अंगावर काटा आणणारे आहेत. घडी घडीला चांगल्या-वाईट प्रकाराचे आश्चर्य वाचनातून अनुभवताना एकच विचार येतो की, जर हे सत्यात घडलं अथवा घडत असेल तर, त्या भागातील मानवजातिच्या संवेदनांचं काय होत असेल? या संग्रहात एक ‘चक्रव्यूह’ असतो.. पैसा आणि स्त्री-वासना असते.. शाळेतील मास्तर संस्कारांची उधळण करतो; पण त्याचा बळी जातो. संस्कारांचा `काळोखातील काळोख’ आपल्याला बघायला मिळतो तो स्त्रीयांच्या धंद्यातील चढाओढीत.. स्वत:चा पदर पाडणं आणि दुसर्यांना पाडायला शिकवणं यात प्रत्येक जण धंद्याच्या काळोखात खोल खोल जातो. वैचारिक ज्ञानाची `येल’ सगळीकडे खुंटलेलीच दिसते. ‘दलित’ ही फक्त एक जात? नाही ते एक शाब्दिक शस्त्र आहे व व्यापारी आणि दलित यांच्यातील वादात स्वत:चाही आर्थिक फायदा करून घेणारे गुरुजी हे नावाचे गुरुजी आहेत हेच बरं आहे... चला वाचू या..!
-
Children Are From Heaven (चिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन)
जच्या काळात पालक आणि मुलं यांच्या नात्यांमध्ये सतत येणारा दुरावा कमी करण्यासाठी आणि पालकांनी कसं स्वत:ला बदलावं - मुलांशी संवाद साधत कसं त्यांना सक्षम करावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. मुलांशी संवाद साधताना ‘करू शकशील का?’ ऐवजी ‘करशील का?’ असा उल्लेख करावा; पण त्याने नेमका काय बदल होतो ते विस्तृतपणे मांडताना लेखक सांगतात की, ‘करू शकशील का?’ यात कुठेतरी शंका दडलेली आहे; तर ‘करशील का?’ यात पाल्यापोटी विश्वास दिसून येतो. परंतु, इथेही पालकांनी स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू न देणे - प्रत्येक क्षणी नमतं न घेणे - मुलांना सतत स्पष्टीकरण न देणे हे करावे. मुलांना काही परिपूर्ण पालकांची गरज नसते; पण त्यांना नक्की असे पालक हवे असतात जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आपल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी न मारता त्यांची जबाबदारी स्वत:च घेतील. जेणेकरून पालकांचं अनुकरण करताना मुलं स्वत:च्या चुकांची जबाबदारी स्वत:च घेण्यास सक्षम होतील. हेच पुस्तक सांगते.
-
Bhishma Nirwan (भीष्म निर्वाण)
खोल अभ्यासपूर्ण , आधुनिक खगोलशास्त्राच्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महाभारत संहितेतील भीष्म निर्वाणाच्या संदर्भातील कालक्रम आणि खगोल शास्त्रीय पुरावे यांचे तपशीलवार विवेचन. भारतीय संस्कृती विषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे आणि संग्रही ठेवावे. #परम #मित्र, #भारतीय संस्कृती #खगोलशास्त्र,#महाभारत, #श्रीकृष्ण #भीष्म, #इतिहास,#अभिजातभाषा,# मराठी,#पुस्तक,#वाचन पाने १७२, आकार ९"* ६"
-
Ajitdada Pawar Vichar Netrutva Aani Maharashtra (अजितदादा पवार विचार नेतृत्व आणि महाराष्ट्र)
अजित पवार साहेबांचे अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शिस्तबद्ध कामाचा आढावा म्हणजेच हे पुस्तक,युवा पिढीला अजित दादांविषयी समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आहे. नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, घोषणा नाही किंवा लोकप्रियतेचा क्षणही नाही. नेतृत्व म्हणजे निर्णय घेण्याचं धैर्य, त्या निर्णयांची किंमत स्वीकारण्याची तयारी आणि परिणामांशी प्रामाणिक राहण्याची शिस्त. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अजितदादा पवार यांचं नेतृत्व या अर्थाने वेगळं ठरतं. गोंगाट न करता काम करणं, सत्ता साधन मानून प्रशासनाला दिशा देणं, आणि निर्णयांना वेग व परिणामांची जोड देणंही त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे. हे पुस्तक त्यांच्या प्रवासाकडे चरित्र म्हणून नव्हे, तर नेतृत्व आणि प्रशासनाचा अभ्यासग्रंथ म्हणून पाहतं. या ग्रंथाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे शरद पवार साहेब आणि अजित दादा पवार यांच्यातील नेतृत्वपरंपरेचा सखोल वेध. दृष्टी आणि अंमलबजावणी, संयम आणि वेग, परंपरा आणि परिवर्तनया दोन वेगवेगळ्या शैली एकमेकांना विरोधी नाहीत, तर पूरक कशा ठरतात, हे पुस्तक स्पष्ट करतं. वाद, आरोप आणि तात्कालिक राजकीय गदारोळ बाजूला ठेवून, हे पुस्तक निर्णयप्रक्रिया, प्रशासनिक शिस्त, संकटातील भूमिका आणि विकासाच्या सातत्याचा अभ्यास मांडतं. सत्ता कशी प्रशासनात रूपांतरित होते, आणि प्रशासन कसं लोकांच्या आयुष्यात बदल घडवतेयाचं सखोल विश्लेषण या ग्रंथात आढळतं. राजकारणात रस असणाऱ्या वाचकांसाठीच नव्हे, तर प्रशासन, नेतृत्व, सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन यांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. हे पुस्तक कुणाला पटवण्यासाठी नाही; ते विचार करायला लावण्यासाठी आहे.
-
Pakistan ka matlab kya? (पाकिस्तान का मतलब क्या?)
इस्लामी चेहऱ्याच्या पेचात आणि भारताविरोधात फसलेला देश. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या या देशाच्या आजवरच्या प्रवासाचा वेध.
-
Aalashipanach Manasshastra (आळशीपणाचं मानसशास्त्र)
वैमानिक व्हायचं असेल तर विमान कसं चालतं, हे आधी समजायला हवं. तसंच जगातील सगळ्यात शक्तिशाली गोष्ट म्हणजेच तुमचं मन. ते नियंत्रित करायचं असेल, तर त्याचं शास्त्र माहिती असायला हवं. • जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींसारखं तुम्हीही आठवड्याला १०० तास काम करू इच्छिता का ? • तुम्हाला सतत ऊर्जावान राहण्याची इच्छा आहे का? • कामात परिपूर्णता येण्याची तुम्ही वाट बघताय का? • तुम्ही कामात चालढकल करता का ? • तुम्ही नेहमीच आळस करता का ? • तुम्ही अजूनही ज्यावर काम करायला सुरुवात केली नाही अशी काही तुमची स्वप्नं आणि ध्येयं आहेत का ? असं असेल तर, हे पुस्तक तुमच्यासाठी जादूसारखं काम करेल. आधी लिहिल्या गेलेल्या गोष्टींवर लिहायला मला अजिबात आवडत नाही. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं सूत्र देईलच, आणि कामात चालढकल करणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक वरदानच ठरेल!
-
Shuddha Buddha Kaya Tukobarayaa (शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया)
कलावंतांनी शक्यतो भूमिका घ्यायचीच नाही, चुकून घेतलीच तर ‘हाही छान, तोही छान’ असा आशाळभूत बोटचेपेपणाच करायचा, असा लाचार काळ बोकाळला आहे. त्यात सुस्पष्ट आणि खणखणीत भूमिका घेऊन प्रसंगी सत्तेच्या विरोधात बेडरपणे उभा ठाकणारा, त्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा, मेंदूगहाण ट्रोल्सच्या झुंडी अंगावर घेऊन साता समुद्रापार भिरकावून देणारा मराठीतला खराखुरा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजे किरण माने. नुसताच अभिनेता नाही, तर चौफेर टोलंदाजी करणारा फर्डा वक्ता आणि फेसबुकवरच्या एकेका पोस्टमधून लोकांना एकीकडे शब्दांच्या तालावर डोलवत दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक प्रखर सामाजिक भान बाळगणारा लेखक. आपल्या धडावर आपलंच डोकं बाळगणाऱ्या किरण मानेंची वैचारिक नाळ जुळली आहे ती आपल्या काळातील ‘अँग्री यंग मॅन’च असलेल्या, दांभिक व्यवस्थेवर शब्दांचे आसूड ओढणाऱ्या तुकोबारायांशी. म्हणूनच तुकोबांच्या एरवी सर्वपरिचित असलेल्या अभंगांचीही ओळख माने वेगळ्याच प्रकारे करून देतात. टाळकुटे, परमार्थी संत अशी सगळ्याच वारकरी संतांची मतलबी मांडणी करणाऱ्या पोटार्थी परंपरेला धुडकावून, या अभंगांवर झळझळीत प्रकाश टाकतात. ही तुकोबांची ‘शुद्ध बुद्ध काया’ रूप महाप्रतिमा उभी करणारी मांडणी तुकोबांच्या विद्रोही परंपरेचाच वारसा अभिमानाने पुढे चालवते आणि वाचकांना तुकोबाराया नव्याने भेटवते.
-
Steal Like An Artist (स्टील लाइक ॲन आर्टिस्ट)
सर्जनशीलतेला मुक्त करा. १) कलाकारासारखी चोरी करा. २) तुम्ही कोण आहात है समजेपर्यंत सुरुवात करायला थांबू नका. ३) तुम्हाला वाचायला आवडेल असं पुस्तक लिहा. ४) तुमच्या हातांचा वापर करा. ५) दुय्यम प्रकल्प आणि छंद अत्यंत महत्त्वाचे असतात. ६) महत्त्वाचं गुपित : चांगलं काम करा आणि लौकांना ते सांगा. ७) आता भूगोल तुमच्यावर नियंत्रण गाजवू शकत नाही. ८) चांगले वागा. (जग है एक लहानसं गाव आहे.) ९) कंटाळवाणे व्हा. (काम पूर्ण करण्याचा हाच एक मार्ग आहे. १०) सर्जनशीलता म्हणजे वजाबाकी.
-
Show Your Work (शो युअर वर्क)
कलाकाराप्रमाणे शेअर करा. १) तुम्ही ‘जीनियस’ असण्याची गरज नसते. २) उत्पादनापेक्षा प्रक्रियेचा विचार करा. ३) रोज काहीतरी थोडंसं शेअर करा. ४) कुतूहलांचं कपाट खुलं करा. ५) चांगल्या गोष्टी सांगा. ६) तुम्हाला जे माहीत आहे ते शिकवा. ७) मानवी स्पॅम होऊ नका. ८) एखादा ठीसा खायला शिका. ९) सेलआउट – ‘विकला गेलेला’. १०) चिकाटीने टिकून रहा.
-
Swatashi Khote Bolane Thambava (स्वतःशी खोटे बोलणे थांबवा)
ही अशी कठोर सत्ये आहेत जी कोणीच तुम्हाला सांगणार नाही, पण ती ऐकण्याची, समजून घेण्याची नितांत गरज आहे. तुमच्या जीवनाच्या जोडीदाराच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरणे देणे, त्याच्या समर्थनार्थ सबबी सांगणे बंद करा. तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा अपेक्षाभंग केला असेल, तुम्हाला निराश केले असेल, तर त्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या उत्तम कामाविषयी उगीचच विनम्रता दाखवू नका, त्याविषयी चारचौघांत अभिमानाने बोलायला अजिबात कचरू नका, मागे-पुढे पाहू नका.
-
Keep Going (कीप गोइंग)
आता थांबू नका ! १) प्रत्येक दिवस नकारात्मक पुनरावृत्तीचा असतो. २) निर्भेळ आनंदाचं केंद्र बांधा. ३) नाम विसरून जा, क्रियापद करा. ४) भेटवस्तू बनवा. ५) ऑर्डिनरी + एक्स्ट्रा लक्ष -एक्स्ट्राऑर्डिनरी अर्थात असाधारण ६) कला राक्षसांचं शिरकाण करा. ७) तुम्ही तुमचं मत बदलू शकता. ८) जेव्हा शंका वाटेल, तेव्हा नीटनेटकं आवरा. ९ ) सैतानांना ताजी हवा आवडत नाही. १०) तुमची बाग तुम्ही फुलवा.
-
What You Are Looking For Is In The Library (व्हॉट यू आर लुकिंग फॉर इज इन द लायब्ररी)
‘काय हवं आहे?’ टोकियोच्या समंजस ग्रंथपाल हा प्रश्न विचारतात. ग्रंथालयात येणारी प्रत्येक व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, तिला नेमकं काय हवं आहे, हे सायूरी कोमाचीना न सांगता समजतं. आणि तिचा शोध सफल व्हावा, ह्यासाठी त्या योग्य पुस्तकाची शिफारस करतात. अस्वस्थ विक्रेता साहाय्यकाला नवी कौशल्यं शिकायची आहेत. बाळंतपणाच्या रजेनंतर कामावर रुजू झालेली आई पदावनतीमुळं आलेल्या नैराश्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. प्रामाणिक लेखापालाला पुरातन वस्तूंचं दुकान उघडायची तळमळ आहे. अलीकडेच निवृत्त झालेला कर्मचारी आयुष्याचा नवा अर्थ शोधत आहे. ह्या प्रत्येकाला कोमाचींनी सुचवलेल्या विलक्षण पुस्तकामध्ये आपली स्वप्नं साकार करण्याचे मार्ग सापडतात. ‘तुम्ही जे शोधत आहात, ते ग्रंथालयात मिळेल’ हे पुस्तक ग्रंथालयांची अद्भुत दुनिया आणि परस्परसंबंधांची जाणीव ह्याविषयी आहे. हृदयाची धडधड काय सांगते हे लक्षपूर्वक ऐकलं, समोरून आलेली संधी सोडली नाही आणि मनमोकळेपणानं बोललात, तर तुम्ही दीर्घकाळ पाहिलेली स्वप्नं साकार होतील असं सांगणाऱ्या प्रेरणादायी कहाण्या ह्या पुस्तकात वाचायला मिळतील.
-
Ravan (रावण)
आपल्या भावांप्रति असलेल्या प्रेमाबाबत राम आणि रावण यांच्यात काय फरक होता ? शूर्पणखेने रावणाविरुद्ध कशा प्रकारे षड्यंत्र रचलं ? कोण होती रावणाची बहीण कुंभिनी ? बौद्ध परंपरेत रावणाविषयी कोणती समजूत आहे ? रामायणातील खलनायक लंकाधिपती रावण याच्याविषयी असे अनेक प्रश्न भारतीय जनमानसात उपस्थित होत राहतात. हे पुस्तक भारतातील सर्वांत विख्यात महाकाव्य रामायण आणि रावण यांचं विस्तृत विश्लेषण करत, रावणास सविस्तरपणे जाणून घेण्याची वाट मोकळी करतं. या ज्ञानी आणि महान राजाच्या कर्मांमुळे त्याचं राज्य आणि परिवार यांवर आपत्ती कोसळली. आधुनिक काळात पौराणिक गाथांच्या प्रासंगिकतेविषयी तर्कपूर्ण रीतीने लेखन करणारे देवदत्त पट्टनायक यांचं हे पुस्तक रावणाच्या पतनाची कारणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतं. इथे रावण एक मनोवैज्ञानिक अवस्थेचं रूपकही आहे. रावणाला समजून घेताना आपण स्वतःला आणि आपल्या व इतर लोकांच्या आत दडलेल्या रावणाला समजून घेऊ शकतो.