-
Mi Boltoy (मी बोलतोय)
डॉ. सुनील शशीकांत काळे यांनी या पुस्तकातून स्वतःचा आणि पर्यायाने मानवाचा शोध घेतला आहे. भक्ति, श्रद्धा आणि समर्पणाच्या मार्गावर चालत द्वैतातून अद्वैताचा प्रवास करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. ते म्हणतात, परब्रम्हालाच बहु व्हावे असे वाटले आणी त्याने सृष्टि निर्माण केली. परब्रह्म स्वतःच ईश्वररूपात सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगात स्थिरावले. या रूपाचा त्यांनी शोध घेतला आहे. विश्वाच्या, अनंताच्या प्रवासाकडे, नराच्या नारायणाकडे झालेल्या प्रवासाकडे त्रयस्थपणे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. धर्म, सत्य, सत्कृत्ये, ईश्वर, जीवन यांचाही हा शोध आहे. पुस्तकाच्या अखेरीस काही कवितांचा समावेश केला आहे.
-
New Zealand Sathi Bharat Sodtana (न्यूझीलंडसाठी भा
न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून, हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.
-
Krutrim Paus(कृत्रिम पाऊस)
कृत्रिम पाऊस पाडण्याची शास्त्रीय प्रक्रिया, त्या प्रक्रियेचा मनोरंजक इतिहास, पर्यावरणविषयक संदर्भ, पूर्वापर पावसासंदर्भातील आपल्या अंधश्रद्धा, इत्यादी गोष्टींचा शास्त्रीय मागोवा घेणारे असे पुस्तक आजतागायत तरी मराठीत उपलब्ध नाही. विशेष म्हणजे विषय पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असूनही कुठेही वाचताना कंटाळा येत नाही. याचे कारण हेच आहे. कि श्री. चंद्रसेन टिळेकर हे शिक्षणाने इंजिनियर असले तरी मराठीतले शैलीदार लेखक आहेत. मराठीतील संगणकावरची पहिली दोन पुस्तके त्यांच्याच नावावर आहेत. भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना व शिक्षकांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल ! - कॅप्टन सुनील मुळे
-
Eka janardani (एका जनार्दनीं)
संत एकनाथांच्या आयुष्याची सारी वाटचाल इतर पूर्वसूरींच्यापेक्षा वेगळ्या वळणाची आहे. तीच या कादंबरीत आली आहे.
-
Schizophrenia Ek Navi Janeev (स्चीझोफ्रेनिया एक नव
स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात.
-
Gazal (गझल)
"मूळ उर्दू ग़जल ही काय चीज आहे? ह्या दिलकश गुलबदनीची असली खूबसूरती कशी आहे? तिच्या रंगात नि अंतरंगात गेल्या दीडशे वर्षांत काय बदल होत गेले ? तिचा स्थायिभाव कोणता? प्रमुख शिल्पकार कोणते? इत्यादी बाबींविषयी रसिकतेनं आणि व्यासंगीपणानं विवेचन करणारा ‘ग़जल’ हा ग्रंथ म्हणजे उर्दू शायरीचा छोटासा ‘हेमकोश’च (GOLDEN TREASURY) आहे! "
-
Belbhasha (बेलभाषा)
सुमन बेलवलकर यांना परभाषिकांना मराठी शिकवताना जे स्वभाषेचे आणि महाराष्ट्राच्या संस्कॄतीचे दर्शन झाले ते त्यांनी मोठया खेळकरपणाने छोटया छोटया लेखातून टिपले आहे.
-
Zunj Mazi cancershi (झुंज माझी कॅन्सरशी)
खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? येणार्या प्रत्येक जीवाला हातच्या खेळण्यासारखं खेळवते सर्व दोर हाती धरून कठपुतळीसारखं नाचवते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? चेहर्यावरचे हसू किती कठोरतेने पुसते डोळ्यातले पाणी पाहून निर्दयतेने हसते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? गेल्या जन्मीच्या पाप-पुण्याचे हिशेब या जन्मी मांडते आणि खरोखरीच निष्पाप जीवावर जीवघेणे अगाध करते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? दोन क्षणात होत्याचं नव्हतं करते पाहता - पाहता उभ्या जीवनाचं मातेरं करते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? पण हळूच कधी - कधी ओंजळ भरभरून सुख देते दुरावलेल्या जीवाला मायेची उब देते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते?
-
Ghas Ghei Panduranga (घास घेई पांडुरंगा)
ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांची तसेच समकालीन संतांची अभंगरुपी चरित्रे लिहिणारे नामदेव आद्य चरित्रकर समजले जातात. पांडुरंगासमोर चोखोबांची संधी बांधणारे नामदेव आद्य अस्पृश्योधारक आहेत, तर परधर्मीयांचा प्रभाव जाणवणाऱ्या सीमेवरील पंजाब प्रांतात राहून तेथे भागवत धर्माचे व्यासपीठ उभे करणारे व उत्तरेकडील भाषेत अभंग रचना करणारे नामदेव आद्य समाजकारणी व भारतीय एकात्मतेचे उद्गाते आहेत. जनाईला संतपदी नेणारे नामदेव स्त्रीमुक्तीचे आद्य प्रचारक आहेत. नामदेवांचे हे आगळेपण रवींद्र भात यांनी 'घास घेई पांडुरंगा' या नामदेवांवरील कादंबरीत व्यक्त केले आहे. नैवद्याचा घास घेण्यासाठी घेण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्याऱ्या बाल नामदेवांच्या लीलांपासून पूर्ण ज्ञानाची आस व गुरुकृपेची ओढ लागलेल्या आणि ज्ञानदेव - निवृत्तीनाथ, मुक्ताई यांच्या मेळ्यात रंगणाऱ्या संत नामदेवांचेचरित्र यात रेखाटले आहे. नामदेव, जनाबाई यांची काव्यरचना, राजाईच्या निवडक अभंगाचा कादंबरीत उपयोग केलेला आहे. पंजाबमधील घुमान गावात नागदेवांनी भागवत धर्माचा प्रसार केला. तेथील त्यांच्या कार्याची महती व त्यांनी हिंदीत केलेल्या रचना यात आहेत. माणूसधर्माचा विचार कृतीत उतरवून नंतर तो लोकांमध्ये रुजविणाऱ्या संत नामदेवांचे विचर आजच्या समाजासाठी आदर्श आहेत.