-
Bandhavarchya Babhali (बांधावरच्या बाभळी)
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
-
Kanchanmrug (कांचनमृग)*
"‘श्री’ मिळवायची झाली, तर वेडीवाकडी वळणं घेतल्याखेरीज ती हाती येत नाही. पण आज ‘श्री’चं वेडंवाकडं वळण तेवढंच लक्षात ठेवलं जातं.‘श्री’च्या वळणातलं सामथ्र्य नेमकं विसरलं जातं. वेडीवाकडी वळणं घेतच नदी जाते. पण तिची वळणं भूभाग अधिक समृद्ध करायला कारणीभूत ठरतात. वेडीवाकडी वळणं घेत द-याखो-यांचा रस्ता जातो. म्हणूनच माणसाला सहजतेनं संकटांचे डोेंगर तरता येतात. आज ‘श्री’चं नेमकं सामथ्र्य हरवून वेडीवाकडी वळणं तेवढीच कवटाळली जातात! कष्ट, सेवा हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते उरलेत. सामथ्र्याच्या पायाखाली ‘त्याग’ चिरडला जात आहे. जीवनमूल्यांचा हा -हास माणसाला कुठवर पोहोचवणार आहे ?"
-
Bharatmuniche Natyashashtra (भारतमुनींचे नाट्यशाश्
नाट्य आणि शास्त्रीय नृत्य यातून निर्माण झालेल्या नाट्यशास्त्राची मोहिनी आजही कलाक्षेत्रावर आहे. हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भारतमुनींनी नाट्यशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्याचा अभ्यास, प्रत्यक्ष प्रयोगासाठी उपयोगिता, मर्यादा याचा विचार व त्याविषयीची मते डॉ. सरोज देशपांडे यांनी भारतमुनींचे नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडली आहेत. यात नाट्य, अभिनय याचबरोबर त्याचे रंगमंचावर सादरीकरण, प्रयोगासाठी इतर कलांचा विचार, प्रेक्षकांचा अनुभव या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. नाट्यशास्त्राचा अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी आहे.
-
Death Was Not Painful (डेथ वॉज नॉट पेनफुल)
१९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय फायटर पायलट्सचे अनुभव.
-
Rahul Virchit Mahabhartatil Ufarata Ghatotkachha (
राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे काँग्रेसचा कसा ऱ्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते काँग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचूक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
-
Bhedile Suryamadala (भेदिलें सूर्यसमंडळl)
आदर्श लोकनेतृत्व, नि:स्वार्थ समाजकारण आणि प्रपंचाभिमुख परमार्थ ही समर्थ रामदासांच्या विचारधारेची मूळ त्रिसूत्री. ती जाणून घेणे व जाणवून देणे ह्या विचाराने लिहिली गेलेली ही समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी.