-
Hari Hari Vitthal Vitthal (हरी हरी विठ्ठल विठ्ठल)
अवती-भवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणजे तरुण- तरुणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पद्धतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात. लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली-सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या घरातील मुले अपघाताने गुन्हेगारी विश्वात ओढली जातात, ऑफिसातील स्त्रियांची लैंगिक छळवणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी सहकारी गृहसंस्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऐकतो. हे विषय न संपणारे आहेत. १९९२ साली, नोकरीतून निवृत्त झाल्यावर साठाव्या वर्षापासून, या चिरंजीव विषयांवर, २०२३ या चालू वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ वर्षांपर्यंत मी कथा लिहितो आहे. माझ्या कथा कालबाह्य होत नाहीत. कारण गैरप्रकार वेष पालटून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माझ्या कथांची अखेर मी आनंददायी करतोच करतो. मला रडवणाऱ्या कथा लिहिताच येत नाहीत. ही माझी लेखनमर्यादा मला मान्य केलीच पाहिजे!
-
Vedanech Gana (वेदनेच गाणं)
द्वारकानाथ संझगिरी यांचा एक आजवरच्या लिखाणापेखा वेगळा असा हा कथा संग्रह, आपल्या भोवती घडणाऱ्या दृश्य , अदृश्य अनुभवांना आपल्या अस्सल संझगिरी लेखणीतून टिपून मांडलेल्या आणि रंजनाबरोबर डोक्याला जाणिवेची चालना देणाऱ्या या कथा
-
Pravah Maza Sobati (प्रवाह माझा सोबती)
नर्मदा परिक्रमा म्हटलं की ती पायीच करायची आणि ज्यांनी ज्यांनी पायी परिक्रमा केली त्यांच्यापैकी काहींनी यावर पुस्तकेही लिहिली. त्यामुळे नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे पायीच करायची अशीच भावना सर्वसामान्यांची झाली होती. अशाच प्रकारची भावना कैलास मानसरोवर यात्रेबद्दल ही पसरली होती. 2000 साली माझ्या मुलानं चि. अभयनं, त्याचा मित्र ऋषिकेश जोशी सोबत भारत सरकारनं आयोजित, कैलास मानसरोवर हिमालय मार्गे पदयात्रा केली होती. ती पदयात्रेची पद्धत नेपाळ मार्गे बसने कैलास मानसरोवर यात्रा सुरू होण्यापर्यंत चालू होती. कारण मी व माझी पत्नी प्रभा दोघेही नेपाळ मार्गे बसने (पायी नव्हे) 31 ऑगस्ट 2009 ते 13 सप्टेंबर 2009 अशी यात्रा केली. ती आकांक्षा पर्यटना तफेर् ! थोडक्यात सांगायचे म्हणजे नर्मदा परिक्रमा काय किंवा कैलास मानसरोवर परिक्रमा काय बस मार्गाची सोय झाल्यामुळे चालण्याचा त्रास वाटणार्यांना ‘बस प्रवासाचा’ पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या दोन्ही अवघड यात्रा बस प्रवासामुळे सुखदायक झाल्या आहेत. असंच म्हणायला हवं, नाही कां?
-
Anvat Watevaril Parytan Stale (अनवट वाटेवरील पर्यट
विविध वृत्तपत्रं आणि मासिकांमध्ये प्रसिद्घ झालेल्या अनोख्या पर्यटनस्थळांवरील लेखांचं संकलन या पुस्तकात करण्यात आलं आहे. ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर न जाता, रुळलेल्या वाटांवर न वळता वेगळ्याच ठिकाणांची चाकोरीबाहेरची भटकंती करण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणी आहे. अशा भटक्यांना मार्गदर्शन करणारं आणि नव्या ठिकाणांची ओळख करुन देणारं हे पुस्तक आहे. ज्यांना प्रवासवर्णन वाचण्याची आवड आहे, अशांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव देणारं हे पुस्तक आहे. जम्मू-काश्मिरमधील नुब्रा खोरं, लडाखजवळील मॅग्नेट हिल्स, तवांग, लाहौल-स्पिती, कांगडाचे खोरे व किल्ला, पाँगचा जलाशय, हिमालचलमधील पाच शक्तीपीठं, नाको सरोवर, पराशर तळे, हिलस्टेशन नारकंडा, चांपानेर, विजापूर, उत्तराखंडमधील कटारमल सूर्यमंदिर, अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या, वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या ठिकाणांची संपूर्ण माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. त्या ठिकाणी कसं जायचं, तेथील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, तेथे जाण्यासाठी योग्य काळ, अशी उपयुक्त माहिती लेखक अरुण अग्निहोत्री यांनी या पुस्तकात दिली आहे.
-
Vegali Manse (वेगळी माणसे)
आपल्या आजूबाजूला किंवा इतिहासात अनेक अशी माणसं दडलेली असतात की ज्यांचं काम पुढील पिढीत अत्यंत प्रेरणादायी ठरतं पण ही माणसं प्रसिद्धी पासून लांब रहातात. त्यांची उपेक्षाही होते. या साऱ्यांचा परिचय नवीन पिढीसाठी करून दिला आहे
-
Aale Vartan Aapla Mendu(आपले वर्तन आपला मेंदू )
आपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू
-
Priy Palak (प्रिय पालक)
मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ! मुलांना स्वत:ची मतं पुâटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम पुâटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...
-
Bandivan (बंदिवान)
नजरवैâदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाNया वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरवैâदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!
-
Kahur Eka Vadalache (काहूर एका वादळाचे)
ही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते. स्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. विद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे निर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. त्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची शक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, ही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले यांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला आहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. मानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. मानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. मनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी मानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला जाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची संवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. डॉ. ऋषीकेश कांबळे
-
So Cool Tek 2 (सो कूल टेक २)
सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-ऐकण्याएवढंच ‘वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
-
Seeta (सीता)
सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण र्मूिच्छत पडल्यावर - या साNया महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून ‘पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं ‘सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी
-
Kalokhatun Ujedakade (काळोखातून उजेडाकडे)
इंजिनीयर होण्याची महत्त्वाकांक्षा पुरी करण्याची जिद्द. तत्त्वांशी तडजोड न करण्याची सचोटी. मिंधेपणा अव्हेरणारा स्वाभिमान. या बळावरच त्यांनी लढा दिला व्यवस्थेतील भ्रष्ट मानसिकतेविरुद्ध. आजही ही लढाई सुरूच आहे. आपल्या सहप्रवाशांच्या सहकार्याने ही भ्रष्ट मानसिकता कधी ना कधी नष्ट होईल, असा आशावाद जागवणारे आत्मकथन.
-
Fakiri Ek Anghad Pravas (फकिरी एक अनघड प्रवास)
पडल्या - झडलेल्या आणि तुटक्या फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास.
-
Tantra Mukti (तंत्र मुक्ती)
माणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित अशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे. पण अठराव्या शतकातल्या ‘औद्योगिक क्रांती’मुळे ऊर्जांचं अन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता, वेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं. केवळ ‘यांत्रिक’ न राहता ती चहू अंगांनी विस्तारली : इतकी की, आज आपल्याभोवती एक ‘तंत्रावरण’ तयार झालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण पावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या साNया तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत मोजतो आहोत ! वास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा, विविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट वा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत. Homo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर कठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून देणारं हे पुस्तक : ‘समुचित’ तंत्रांच्या संयमित वापराकडे जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं. तंत्र : मुक्ती