-
Golmaal (गोलमाल)
‘‘हे पहा, बाहेर टळटळीत दुपार आहे. उजेड नुसता पावसानं कोसळणाऱ्या दरडीसारखा अंगावर कोसळतोय. तरीही तो बाहेरच ठेवून इथं मिट्ट काळोख केल्याशिवाय तुम्हाला काही दिसत नाहीय. मघाशी तुम्हाला दिलेली कॉफी जीभच काय पण हातही भाजेल इतकी कडकडीत होती. त्यात पाक होण्याइतपत साखर घातली होती; पण ती तुम्हाला प्रेतासारखी थंडगार आणि खारट लागली. उलट तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या कपात बर्फाचा खडा आणि चमचाभर मीठ घालताच ती तुम्हाला व्यवस्थित वाटली. आज उन्हाळ्याचा कडाका आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारं टेम्परेचर आहे. आणि तुम्ही अर्धा डझन ब्लँकेट्स अंगावर घेऊनही थंडीनं कुडकुडताय. मी तुमच्या गालावर सॅन्डपेपर फिरवला तेव्हा तुम्हाला कोणीतरी मोरपीस फिरवल्यासारखं हुळहुळलं. उलट कापसाच्या बोळ्यांत कोणी टाचण्या का ठेवल्यात म्हणून तुम्ही बोंब ठोकलीत. निरनिराळे रंग मी तुम्हाला दाखवले तेव्हा जांभळ्याच्या ठिकाणी तुम्हाला पिवळा दिसला, तांबड्याच्या जागी हिरवा आणि नारिंगीच्या ऐवजी निळा. आता समजलं, तुम्हाला काय झालंय ते?’’
-
Asa Asava Jodidar (असा असावा जोडीदार)
एलियट काट्झ यांनी ‘बीइंग द स्ट्राँग मॅन ए वुमन वाँट्स’ या विचारांना चालना देणार्या पुस्तकात ‘महिलांना नेमकं काय हवं असतं?’ या मुद्द्याचा वेध घेतला आहे. एका निरोगी स्त्रीला कणखर पुरुष हवा असतो. निर्णय घेईल असा पुरुष, ज्याच्यावर अवलंबून राहता येईल असा पुरुष, आपल्या जवळच्या माणसांसाठी सर्वोत्तम असंच ठरवेल असा पुरुष, योग्य गोष्टी करेल असा पुरुष - केवळ सोप्या, लोकप्रिय, फायदेशीर गोष्टी करणारा नाही. अनादि काळापासूनच्या शिकवणीतून, काट्झ यांनी वाचकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुषांच्या भूमिकांबाबत सध्या होत असलेल्या चर्चांतून निर्माण झालेला संभ्रम. हजारो वर्षांपासूनच्या उपयुक्त तत्त्वांचा आधार घेऊन, अधिकार न गाजवता, अपमानास्पद न वागवता, नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता, महिलांना हवा असलेला पुरुष कसं बनायचं, हे काट्झ यांनी आधुनिक पुरुषांना सांगितलं आहे.
-
Badalata Bharat Khand - 1 (बदलता भारत खंड-1)
बदलता भारत- पारतंत्र्यातून महासत्तेकडे संपादन- दत्ता देसाई भारताचे बहुरूपदर्शक आणि समग्र चित्र रेखाटणारा संदर्भग्रंथ आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे. असे स्वातंत्र्य आहे की जे जगात सर्वाधिक वर्चस्वशाली असणार्या ब्रिटिश सत्तेविरुध्द इथल्या कोट्यवधी जनतेने अथक संघर्ष करून मिळवले. जगाच्या इतिहासातील एक महान मुक्तिपर्व. एक असा गौरवशाली स्वातंत्र्यसंग्राम की ज्याने आधुनिक भारताला जन्म दिला आणि जगाच्या इतिहासावर आपली छाप उमटवली. असा इतिहास की ज्याने प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीची मान आजही उंचावते. असे स्त्रीपुरुष 'नायक',नेते, समाजधुरीण, क्रान्तिकारक आणि महामानव की त्यांच्याविषयी आजही देशभर अपार आदर, प्रेम आणि अद्भुत आकर्षणही आहे. दोन शतकांचे विविध जनसमुदायांचे असे संघर्ष की ज्यांना अभिवादन केल्याशिवाय कोणीही भारतीय आजही पुढे जाऊ शकत नाही. या साऱ्याला मनोविकास प्रकाशन अभिवादन करत आहे 'बदलता भारत:पारतंत्र्यातून महासत्तेकडे. ' या आपल्या महाग्रंथाद्वारे! असा ग्रंथ की जो स्वातंत्र्य संग्रामाचा व स्वातंत्र्योत्तर देश उभारणीचा अनोख्या पद्धतीने अगदी मुळापासून वेध घेतो. ज्यात ‘रामायाण-महाभारत आणि भारतीय राष्ट्रवाद’,‘छत्रपती शिवाजी, मराठेशाही आणि स्वातंत्र्याची वाटचाल’,‘जालियनवाला बाग ते नमस्ते ट्रम्प’,‘विवेकानंदांचा धर्म आणि त्यांची भारताची कल्पना’,‘सावरकर-जीना आणि द्विराष्ट्रवाद’,‘डावी कॉंग्रेस, उजवे राजकारण आणि सुभाषचंद्र बोस’,‘चित्रपटांतून घडणारं भारतीयतेचं दर्शन’,‘भारतीयता आणि बहुसांस्कृतिकता’ अशा विविध विषयांची सखोल मांडणी आहे. एक असा ग्रंथ की ज्याच्या दोन खंडातील आठ विभागात गुंफलेले साठ लेख आपल्याशी बोलतात - या सार्या गुंतागुंतीच्या आणि रोमांचकारी इतिहासावर. ते उकलतात या देशाचे असे अंतरंग की जे जितके विलोभनीय आहे तितकेच विषण्ण करणारेही आहे. विविध नामवंत लेखकांनी स्वतंत्र दृष्टिकोनांमधून आणि आपापल्या परिप्रेक्ष्यांतून भारतीय जीवनाच्या विविध क्षेत्रांचे आणि पैलूंचे केलेले परखड विश्लेषण! ज्यातून आपल्या समोर येतो भारताच्या भविष्याची निश्चित अशी दिशा उलगडणारा महाग्रंथ!
-
Ravan Ani Eddie (रावण आणि एडी)
ब्रिटिश वसाहतीनंतरच्या भारतातल्या दोन कल्पनातीत हिरोंच्या जीवनात घडणाऱ्या वात्रट व साहसी कृत्यांची एक अतिशय विनोदी, 'रिबल्ड' कादंबरी.
-
The Red Haired Woman (दि रेड हेअर्ड वुमन)
पौंगडावस्थेत असताना लाल केसांची एक आकर्षक बाई सेमचं लक्ष वेधून घेते. आणि मग तो तिच्या विचाराने पुरता झपाटला जातो…. मनातल्या विचारचक्रात तीच आणि तीच! सेमचे वडील तत्पूर्वी गुढरित्या परागंदा झालेले असतात. शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी सेम इस्तंबूलजवळ विहीर खणणाऱ्या मास्टर महमूत यांच्या हाताखाली काम करत असतो. सेमच्याच एका चुकीमुळे झालेल्या अपघातात महमूत दगावतो का…? आता कथानक वेगळंच वळण घेतं…. कादंबरीचं कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसे नात्यातले गुंते गहन होत जातात. राजा इडिपसची ग्रीक पुराणकथा आणि रुस्तम व सोहराबर पर्शियन पुराणकथा यांची समांतर पातळीवर या गुंत्याशी लेखक सांगड घालत राहतो. त्यामुळे या कादंबरीला वेगळे आयाम प्राप्त होतात….. वाचकांची उत्कंठा पानागणिक वाढत जाते. पुराणकथांची सांगड घालण्याचं प्रयोजन त्यांचं कुतूहल वाढवत जातं….. कोण होती ती लाल केसांची बाई? महमूतविषयीचं वास्तव काय होतं ? ग्रीक पुराणकथा पेरण्याचं प्रयोजन कोणतं? नोबल राजकारणविजेते लेखक ओरहान पामुक यांची बेस्टसेलर कादंबरी…
-
Aku-Aku (आकु-आकु)
‘आकू आकू’ पुस््तकाचे लेखक थॉर हेयरडाहल यांनी पॉलिनेशियन लोकांच्या उत्पत्ती सिध्दांताबद्दलचा रहस्यमयता उलगडून दाखविली आहे. जगाचे टोक गाठायला निघालेली ही शोधमोहीम ‘प्रशांत महासागरा’कडे निघते व ‘ईस्टर बेटा’वरील यूकेचा भाग जगातील अतिशय दुर्गम वस्तीचा. चिलीच्या महाद्विप किनार्याचे हे अंतर ३७०३ कि.मी. ‘इस्टर संडे’-१७२२ रोजी डच प्रवासी जेकब रोगवेन याने या बेटाचा शोध लावला. ही मोहीम राक्षसांचे व लंबकर्ण जमातींचे गुपित जाणून घेते.पुतळे स्वत: ठिकाणे बदलतात,असे म्हटले जायचे. ‘रानोराराकू’ च्या ज्वालाकुंडावर उभे राहून शोधमोहिम गवताळ बेटाचे नयनरम्यदृश्य पाहते. पाण्याने भरलेला ज्वालामुखी म्हणजे-‘रानोराराकू’, हे जगातले सर्वांत मोठे कोडे.‘आकु-आकु’ म्हणजे भूत-सैतान किंवा आत्मा. यांना ‘वरुआ’ही म्हणतात. प्रत्येकाचा ‘आकु-आकु’ स्वत:शी संवाद साधतो. ‘इस्टर बेटा’ च्या ‘रापानुई ’ पौराणिक कथेतील हे मानवीय आत्मे असून, ते आपल्या बांधवांशी बोलतात.मेयर आपल्या आजीच्या ‘आकु-आकु’शी बोलायचे. ईस्टर बेटाच्या पहिल्या राजाच्या पूर्वजांची ही कहाणी ‘मायथॉलॉजी-मिथक विद्या,’ ‘आकु-आकु’ तून दंतकथेप्रमाणे वाचकांसमोर येते.
-
Icon (आयकॉन)
बलाढ्य रशिया अराजकतेच्या चक्रात सापडतो. समाजजीवन गढूळ होते. जनता दु:खसागरात लोटली जाते. अशा भावूक स्थितीत देशाला तरून नेणारा तारणहार नेता-‘इगॉर कोमारोव्ह’ समोर येतो. कोमारोव्हची प्रभावी भाषणे, आत्मीयता पाहून, योग्य नेता मिळाल्याचा आनंद रशियन जनतेला होतो. रशियाचा सुवर्णकाळ आता दूर नाही, असे स्वप्न लोक पाहतात... आणि एकदमच रहस्यमय, ‘काळ्या जाहीरनाम्या’ चा बोलबाला होतो. कोमारोव्हने गुप्तपणे लिहलेला ‘काळा जाहीरनामा’ चोरीस जातो. त्याचे हिटलरशाही राबवायचे मनसुबे कोसळतात. ‘काळा-रहस्यमय जाहीरनामा’ ब्रिटिशांच्या हाती लागतो. जाहीरनामा अनधिकृत असल्याने पाश्चात्य राष्टे कारवाई करू शकत नाहीत. पण ‘कॉन्सिल ऑफ लिंकन’ हा प्रभावी आंतरराष्ट्रीय समुदाय, अनधिकृत अस्तित्व नाकारणारा गट. हा गट ‘गुप्तहेर यंत्रणेचे-सीआयए’ चे ‘जेसन मंक’ यांची प्रतीक-आयकॉन-म्हणून निवड करतात. ही महान कामगिरी मंक यांचेवर सोपवल्याने इमॉर कोमारोव्हचे दुष्ट मनोरे गळून पडतात. जेसन मंक त्याची कृष्णकृत्ये शोधून ती धुडकावून लावतात. कोमारोव्हचा पर्दापाश होऊन हिटलरशाहीला पायबंद बसतो, हे ‘आयकॉन’ ही कादंबरी सांगते.
-
Chautha Ank (चौथा अंक)
असं म्हणतात, "History Repeats"... पण खरंतर, "Man does not learn from history and that's why history repeats". आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप (मूळ नमुना) असावा. स्वभावाला औषध नाही, पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करत आहे. तुम्हीही करावा. गश्मीर रवींद्र महाजनी