-
Advait (अव्दैत)
भावार्त आवर्तात मौन असलेल्या श्री. अशोक चिटणीसांच्या कल्लोळाचा प्रत्यय 'अद्वैत' ह्या त्यांच्या नव्या काव्यसंग्रहातून येतो. एक खोलवरची प्रतीक्षा हा साऱ्या कवितांचा स्थायी भाव आहे. 'अद्वैत' ह्या काव्यसंग्रहातून उत्कटतेची निसर्गरूपे जशी आहेत, तशीच 'कुणाचे पाप कुणाच्या माथी' सारखी ओवी रूपबंधातून व्यक्त जागवलेली सामाजिक जाणिवेची, समाजमनात दाटून उरलेल्या अदृश्य धाकांची सल आहे. 'अवघा क्षणभर'सारखी मुग्ध प्रीतीचे मंत्रभान सुचवणारी ही कविता आहे. 'तरंग उचकी'सारखा निसर्ग संवेदन टिपणारी हायकू स्पर्शीची तरलिकाही कवी श्री. अशोक चिटणीस यांचे तरल संवेदन सुचवीत येते. निराशेचा नव्हे तर विरक्तीचा करडा सूर छेडणारी 'आवरावे पसारे' सारखी कविता कवी अशोक चिटणीस यांच्यातील व्यवहाराच्या ओझ्याने आता होत असलेली दमणूक व्यक्त करते. अव्यक्ताला व्यक्त करू पाहणारा हा शब्दप्रवास म्हणजे 'अद्वैत' हा काव्यसंग्रह ! माझ्या हार्दिक शुभेच्छा!
-
Leedar (लीडर)
हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरी करताना एकीकडे कायद्याच्या क्षेत्रात मिळवलेल्या अनेक पदव्या. शिवाय पीएच.डी. सारखी उच्चतम पदवी गाठीशी! असं असतानाही त्या पलीकडे जात युनियन लीडर म्हणून स्वभावानुसार कामगारांच्या प्रश्नांशी सातत्याने भिडत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे डॉ. अशोक भाईडकर यांचे हे जिवंत अनुभव काळजाला भिडतात. कारण ते अत्यंत खरे आहेत! मिळवलेल्या अधिकारपदाला रामराम ठोकून युनियन लीडर म्हणून आयुष्य जगलेला हा कामगारबंधू कोणत्याही आकर्षणांपासून अलिप्त राहत, त्यांना बळी न पडता 'लीडर' म्हणून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहिला. 'मोडेन पण वाकणार नाही' ही उक्ती अंगी बाणवत लढत राहिला. आजमितीला मात्र कठोरपणे केलेल्या परीक्षणातून ते या निष्कर्षाप्रत येतात- आज भारत सरकारची लेबर पॉलिसी पूर्णपणे बदलली आहे. सर्वच कामं कॉन्ट्रॅक्टरतर्फे केली जात आहेत. आमच्या कंपनीत मागच्या वीस- पंचवीस वर्षांत वर्कर्सची नवीन भरती झाली नाही. जिथे दहा-पंधरा हजारांत वाटेल तेवढे कॉन्ट्रॅक्ट लेबर, फॅज्युअल लेबर मिळतात त्यामुळे वर्कर्सना लाखो रुपयांचा पगार देण्याची कंपनीला गरज वाटत नाही. जर परमनंट वर्कर्सच नाहीत तर युनियन कशी राहणार ? गव्हर्मेंटच्या या पॉलिसीमुळे आज तरुणवर्ग देशोधडीला लागला. हायर ॲन्ड फायर सीस्टिममुळे तरुणाला कुठल्याच कंपनीत भविष्य राहिलं नाही. कंपनीत कायम कामगार नाही म्हणून युनियन नाही आणि युनियन नाही म्हणून लीडर नाही ! ---- डॉ. अलका आगरकर-रानडे
-
Vatela Sobat Havi (वाटेला सोबत हवी)
आयुष्याच्या या वाटेवर हवा कुणी सोबती, हवा कुणी सोबती कधी अचानक उठते वादळ घरट्यालाही येते भोवळ मनोरथाच्या आवेगाला अवघड वळणे किती...? हवा कुणी सोबती... - स्व. पंडित यशवंत देव
-
Anandache Pan (आनंदाचे पान)
सुखी आयुष्याचा सुखकर मंत्र सुख द्यावे, घ्यावे, असे जगावे आयुष्याचे पान, हिरवे हिरवे, सुंदर बरवे आयुष्याचे रान. चुका जाहल्या ? माफही केल्या आयुष्याचा उद्या असावा, कोरा मस्त महान. दुसरे मोठे, आपण छोटे कायम व्हावे लहान. तरच आनंदी, तरच सुखी हाची 'मंत्र' महान
-
Valuche Kille (वाळूचे किल्ले)
मुंबईसारख्या महानगरात वाढलेली, शिकलेली आणि नोकरी करणारी व्यक्ती जीवनाकडे एका वेगळ्या आत्मविश्वासाने बघत असते. अशा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून सतत असा आत्मविश्वास व्यक्त होत असतो. मात्र जीवनात कधी तरी असे काही प्रसंग येतात, अशा काही घटना घडतात, तेव्हा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो. जे आयुष्य आपल्या मुठीत आहे, ते आयुष्य वाळूप्रमाणे हातातून निसटत असतांना बघावे लागते. तेव्हा स्वतःच्या मर्यादांची, हतबलतेची जाणीव टोचते. अशा प्रसंगी लक्षात येते की आपल्याला वाटत होतं ते आपलं आयुष्य म्हणजे एक अजिंक्य, अभेद्य किल्ला; पण प्रत्यक्षात तो असतो एक साधा वाळूचा किल्ला! एक लाट येते आणि किल्ला वाहून जातो. जरा धारदार नजरेने बघितले तर आपल्या आजूबाजूला असे अनेक वाळूचे किल्ले दिसतील.
-
Maharani Durgavati (महाराणी दुर्गावती)
इतिहास गाजवणाऱ्या ज्या काही थोड्या स्त्रिया होऊन गेल्या, त्यातली दुर्गावती एक अग्रगण्य आहे. दुर्देवाने तिच्याबद्दल फारच थोडी माहिती लिहिण्यात आली आहे. ती शूर जितकी तितकीच देखणीही होती, हे तिचे आणखीही एक वैशिष्ट्य. शेरशहा, हेमू, राणी रूपमती व गौंड राजा संग्रामसिंह आणि त्याचा पुत्र दलपतराय सिंह या त्या काळातल्या म्हणजे सोळाव्या शतकातल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा होत्या. या समजून घेण्यासाठीही प्रस्तुत कादांबरी वाचणे आवश्यक आहे. या काळात अकबर दिल्लीचा बादशहा होता. त्याने स्वतःव्यतिरिक्त दुसऱ्या सर्वांची नावे इतिहासातून वगळण्याचा हुकूम केल्यामुळे या व्यक्तिरेखांची नोंद इतिहासात नाही, दुर्गावतीच्या सौंदर्यामुळे तिला अनेकांनी मागण्या घातल्या त्यापैकी एक अकबर. क्षत्रिय असूनही दलपतराय या गोंड म्हणजे आदिवासी राजपुत्रावर तिचे प्रेम बसले. ही प्रेमकहाणीही सुंदर आहे. दुर्दैवाने विवाहानंतर पाचच वर्षांनी दलपतराय स्वर्गवासी झाला परंतु दुर्गावतीने राज्य ताकतीने सांभाळले, ही कादंबरी विलक्षण घटनामय आहे. खेरीज नवनवीन माहिती देणारी आहे.
-
Maharajadhiraj Chadragupta Vikramaditya (महाराजाधि
चौथ्या शतकातील आर्यावर्ताचे सार्वभौम महाराजाधिराज विक्रमादित्य यांची चरित्रगाथा ही सामान्य युद्धकथा नव्हे. या कथेला असंख्य, अचाट व अकल्पनीय पैलू आहेत. येथे पात्रांचे व घटनांचे जे वैविध्य आहे, ते इतरत्र क्वचितच असेल. विक्रमादित्याची नवरत्ने, त्याला मदत करणाऱ्या दोन गणिका व त्याचा शत्रू रुद्रसिंह ही वेगळ्या प्रकारची पात्रे आहेत. नवरत्नांमध्ये कालिदास प्रमुख. कालिदासाने स्वतःबद्दल बोटभरही माहिती लिहून ठेवली नाही; परंतु त्याचा मित्र व आश्रयदाता विक्रमादित्य याच्याबद्दलच्या कृतज्ञतेचे अनेक संकेत त्याने मागे ठेवले. ते मी उलगडून दाखवले आहेत. त्या काळात गणिकांना समाजात मानाचे स्थान होते. म्हणून त्या दोन पात्रांनाही वेगळपण आहे. या पात्रांव्यतिरिक्त वेताळ व शनिदेव ही दोन पात्रे विक्रम-चरित्राशी निगडित आहेत. वेताळाच्या कथा मी जशाच्या तशा ठेवल्या आहेत. सगळ्या अर्थातच उल्लेखिल्या नाहीत; पण वेताळाचाही मी वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला आहे. नवरत्नांमध्ये काहींच्या चरित्रकथा नमुनेदार आहेत. त्याही दिल्या आहेत. - इंद्रायणी सावकार
-
Angaraj Karna (अंगराज कर्ण)
अंगराज कर्ण ही महाभारतातील सर्वात लोकप्रिय व दिलखेचक व्यक्तिरेखा आहे, परंतु इंद्रायणी सावकारांचा कर्ण रडवा नाही. आपण महापराक्रमी व कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असूनही त्या उच्चवर्णीय जातीत आपल्याला प्रवेश नाही, या घटनेचे दुःख त्याला निश्चित आहे. परंतु ते त्याने मनाच्या कोपऱ्यात ढकलून दिले आहे. किंबहुना जे दुःख निवारता येत नाही ते विस्मृतीत ढकला आणि आपले जीवन सकारात्मक करा हाच या कर्णाचा संदेश आहे. या कर्णाचा आणखी एक विशेष मनावर ठसतो तो म्हणजे त्याचे वक्तृत्व युक्तिवाद करण्याचे त्याचे कौशल्य. जेव्हा जेव्हा दुर्योधन अडचणीत येतो तेव्हा तेव्हा कर्णाने त्याच्यावतीने जबरदस्त व बिनतोड युक्तिवाद केला आहे. वृषालीची व त्याची प्रेमकथा मनोरंजक आहे. कर्णाने उपस्थित केलेले मुद्दे वाचनीय आहेत. महाभारत हे एक भलेमोठे काव्य आहे. पण घटनाप्रधान आहे. त्या काव्यातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये लेखिकेने रंग भरले आहेत. सूर्य व इंद्र या देवांच्या स्वभावामधील फरक महाभारतात नाही पण इथे स्पष्ट केला आहे
-
Chatrapati Sambhaji Maharaj-Fauladi Manachi jabard
मराठ्यांच्या इतिहासात संभाजी महाराजांच्या चरित्रगाथे- इतकी दुसरी शोकांतिका सापडणार नाही, इंद्रायणी सावकारांनी नेहमीच्या रसाळ व आकर्षक शैलीत आणि इतिहास जराही न बदलता ही चरित्रगाथा रंगवली आहे. संभाजी महाराजांच्या चरित्रगाथेत शिवाजी महाराजांनाही बरोबरीचे महत्त्व आहे. त्यांच्याही व्यक्तिरेखेतले बारकावे इंद्रायणी सावकारांनी उकलले आहेत. इंद्रायणी सावकारांनी संभाजी महाराजांची चरित्रगाथा ते दोन वर्षाचे असल्यापासून सुरू केली आहे. संभाजी महाराजांचे चरित्र अतीव घटनात्मक आहे. या सर्व घटनांचा तपशील व पूर्वपीठिका लेखिकेने दिली आहे, संभाजी महाराज शूरवीर होते तसेच गुणवानही होते पण राजकारणात आवश्यक असलेले दोन गुण त्यांच्याकडे नव्हते. सहनशीलता व सरळमार्गीपणा.. 'राजकारणात हे दोन गुण अग्रिम महत्त्वाचे आहेत' असा उपदेश शिवाजी महाराजांनी त्यांना वारंवार केला, पण स्वतःला बदलणे त्यांना शक्य झाले नाही या दोन गुणांचा अतिरेक त्यांना नडला व या शोकांतिकेस कसा कारणीभूत झाला याचे हे मर्मभेदक चित्रण आहे.