-
Bhari 60 (भारी ६०)
साठ लोकप्रिय व गुणी व्यक्तींची माहिती या पुस्तकात आहे. या साठ व्यक्तींबद्दलचे हे लेख वाचणाऱ्यांनाही खूप भारी वाटेल. प्रत्येक माणसात लपलेले गुण जगापुढे यावेत या भावनेने हे लेख लिहिलेले आहेत.
-
The Motorcycle Diaries (द मोटरसायकल डायरीज)
शत्रुराष्ट्रातही लोकप्रियता मिळवणारा आणि जगभराच्या तरुणाईला आजही भुरळ घालणारा अर्नेस्टो चे गव्हेरा या क्रांतिकारकाच्या देशाटनावर आधारित त्याच्या अत्यंत मनोरंजक अशा 'द मोटरसारकल डायरीज' या प्रसिद्ध पुस्तकाचा रसाळ अनुवाद. अर्नेस्टो 'चे' गव्हेरा, हा एल चे किंवा फक्त चे म्हणून ओळखला जाणारा, एक मार्क्सवादी क्रांतिकारक, चिकित्सक, लेखक, स्वप्निल विचारवंत, गनिमी नेता, मुत्सद्दी राजकारणी आणि लष्करी सिद्धान्तकार होता. तो क्यूबन क्रांतीचा एक प्रमुख नेता होता. त्याच्या मृत्यूनंतर गव्हेरा हा जगातल्या सगळ्याच तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला. इतका की, त्याचे फोटो असलेले टी-शर्ट्स आणि कॅप्स आजही तरुणांच्या अंगावर पाहायला मिळतात. या विस्तारित आवृत्तीमध्ये २३ वर्षीय अर्नेस्टोनं अमेरिका खंडाच्या प्रवासात घेतलेले फोटो आणि नकाशे, अलैदा गव्हेरा-मार्च या त्याच्या मुलीची प्रस्तावना, सुप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन कवी सिंटिओ व्हिटियर यानं केलेलं या पुस्तकाचं रसग्रहण आणि 'चे'नं त्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसमोर केलेलं भावपूर्ण भाषण या सगळ्यांचा समावेश आहे.
-
Samagra Ramayan Ram (समग्र रामायण राम)
वाल्मीकी मुनी लिखित रामायण हे आद्य महाकाव्य. तेव्हापासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक युगातही सगळ्यांना तेवढीच भुरळ पडणारी संपूर्ण रामकथा...
-
Sex Scotch And Scholarship (सेक्स स्कॉच अँड स्कॉलर
खुशवंत सिंग म्हणजे एक बहुरंगी आणि बहुढंगी असे व्यक्तिमत्त्व, साहित्य, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील स्तंभलेखन यामुळे ते भारतात व परदेशातही वाचकप्रिय लेखक आहेत.‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या त्यांच्या निवडक लेखसंग्रहात काही सेक्स, थोडी स्कॉच आणि बरंच काही स्कॉलरशिप, अशा विषयांवरील लेख आहेत. त्यांचे निसर्गप्रेम, पंजाब प्रश्नाबाबतची आस्था, जगातील सर्व धर्मांचा अभ्यास आणि त्याचबरोबर स्वत:च्या शीख धर्माचे संशोधन, या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि उत्कट विवेचन ही या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. खुशवंत सिंग यांचे खास खुसखुशीत आणि परखड शैलीत केलेले स्वत:चे सविस्तर असे लिखाण हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. किंबहुना खुशवंत सिंग यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांपैकी हे परिपूर्ण असे व्यक्तिचित्र आहे. खुशवंत सिंग यांच्या ‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या पुस्तकातील एकूण लेखनाचा केंद्रबिंदू हा ‘माणूस’ आहे, म्हणून हे लेख वाचताना प्रत्येकजण नकळत अंतर्मुख होतो.