-
Pranayam
आपले शरीर निरोगी आणि सदृढ असावे आणि मन सदैव प्रसन्न असावे, याकरिता सर्वांत सोपा - सुलभ मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायम होय. व्यायामाचे वेगवगळे प्रकार आहेत. त्यापासून फायदाही होतो; परंतु अत्यंत फायदेशीर आणि गुणसंपन्न आणि कोणत्याही खर्चाविना, उपकरणाविना, कमी जागेत, कमी वेळेत, कोठेही, करता येणारे हे व्यायामप्रकार आहेत. सूर्यनमस्कार कसे करावेत? सूर्यनमस्कारचे फायदे, योगासने-प्राणायाम कसे करावेत आणि त्याचे लाभ कोणते यावर या पुस्तकात विवेचन करण्यात आले आहे. आरोग्यदायी जीवनासोठी सूर्यनमस्कार प्राणायाम आणि योगासनाची त्रिसूत्री आचरणात आणायलाच हवी.
-
Platform Number Zero
रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगू पाहणा-या मुलांचं जीवन रुळावरून पुरतं घसरलेलं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने घर सोडून आलेली ही मुलं स्टेशनच्या आस-याने आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण तिथल्या उघड्यावाघड्या जगण्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या सर्व ब-यावाईट प्रसंगांना बालपणीच सामोरं जावं लागतं. त्यात त्यांचं बालपण करपून जातं. अशाही परिस्थितीत ही मुलं सन्मानाने जगण्याचा प्लॅटफॉर्म शोधत राहतात, पण या मुलांची परवड काही केल्या थांबत नाही. किशोर, जग्गू, अँथनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणा-या कहाण्या...
-
Mazi Janmakahani (माझी जन्मकहाणी)
आयान हिरसी अली - एक सुंदर वृत्तीची इस्लामधार्मीय स्त्री … आईवडिलांकडून झुंझार वृतीच बाळकडू मिळालेली आयन वडिलांच्या पसंतीच्या तरुणाशी लग्न करायला नकार देते . तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहाला ती जीवाच्या आकांताने विरोध करते तो हॉलंड मधील निर्वासितांच्या छावणीत . मुस्लिमांच्या धर्म पंचायतीसमोर ती धीटपणे सांगते " मला हा निकाह मंजूर नाही . कारण माझे मन तो मान्य करत नाही ." या तिच्या निर्भीड जवाबाला धर्म मार्तंड थोर मनाने स्विकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते . हॉलंड मध्ये राज्य शास्त्र विषयातील पदवी उत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व … आयान चा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश . तिच्या दुर्दैवाने तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्व रद्द होण्याची भीती समोर ठाकते . त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयान न अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरावादी इस्लामने स्त्रीच्या तनामनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इंफिडेल म्हणजेच माझी जन्मकहाणी . तिने अशा धर्माचा त्याग केला तो तिच्या समाजातील ५०% लोकांना कुठलही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही . अशा ह्या झुंझार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येकानेच हे पुस्तक वाचायला हवे .
-
Guernsey Vachak Mandal
चार्ल्स लँबचा नि:स्सिम भक्त असलेला डॉसी एका प्रतीवर ज्युलिएटचं नाव पाहून तिला पत्र धाडतो. त्याला लँबची अन्य पुस्तकं कुठं मिळतील विचारायचं असतं आणि इथून सुरु होतो हा पत्रांचा सिलसिला. 'गर्नसी लिटररी अॅन्ड पोटॅटो पील - पाय सोसायटी' असे लांबलचक आणि मजेदार नामकरण झालेल्या या वाचक मंडळातले अन्य सभासदही डॉसीच्या पाठोपाठ ज्युलिएटचे 'पत्रमित्र' बनतात.
-
Salt And Honey
कोबा! वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणार्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी! गोर्या लोकांच्या शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या जगापासून दूर, त्या गोर्यांच्या जगात नेलं जातं. त्या सुंदर पण तिच्यासाठी धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला. त्यात टिकाव धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते ती म्हणजे त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे, त्यांचा त्याग करावाच लागेल.