-
Maharashtra Desha (महाराष्ट्र देशा)
माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे म्हणून हे महाराष्ट्र! इतिहास अनेकांनी शब्दबद्ध केला. अनेकदा तो शब्दबंबाळही केला. महाराष्ट्र जसा आहे तसा दाखवायचा तर फक्त कॅमेरा-लाईटच्या शब्दांतच तो दिसावा. महाराष्ट्र भूमी समृद्ध करणार्या अनेक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक 'स्थळां'चे हवाईछायाचित्रण करून महाराष्ट्र कॅमेर्यात शब्दबध्द केला.
-
-
Faslela Kshan (फसलेला क्षण)
द गॉल याचा खून करायचा असे फ्रेंच अतिरेक्यांनी ठरवले. आपल्या या राष्ट्राध्यक्षाची हत्या करणे अशक्य नसले तरी अवघड आहे, याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच, त्यांनी ही अवघड कामगिरी सोपविली, एका सराईत, आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडे. तो 'जॅकल' म्हणून ओळखला जात होता. जॅकल पॅरिसमध्ये येऊन पोहोचला, द गॉलच्या मोटारीवर त्याने नेम धरला आणि एवढ्यात... राजकीय पार्श्वभूमी लाभलेली एक विलक्षण उत्कंठापूर्ण व रोमांचक कादंबरी.
-
-
Vidnyanatil Saras Ani Suras
विज्ञान इतिहासाची पाने ही शास्त्रज्ञांच्या जीवनकथांनी आणि शोधांच्या रंजक कथांनी नटली आहेत. साध्या सेफ्टी पिनपासून अणुबाँबपर्यंत अनेकविध जे शोध लागले, ते संशोधकांच्या, शास्त्रज्ञांच्या परिश्रमांची, चिकाटीची आणि मुख्यत: त्यांच्या प्रतिमेची साक्ष पुरवितात. विज्ञानइतिहासातील अशीच काही पाने उलगडून दाखविण्याचा हा प्रयत्न. या पुस्तकात लिओनार्दो द विंची या प्रख्यात चित्रकारातील संशोधक भेटेल, नोबेल, पॉलिंग, साखारॉव्ह, भटनागर हे संशोधक-शास्त्रज्ञ भेटतील, तसेच अँस्पिरीनपासून विजेच्या दिव्यांपर्यंत अनेक शोधांच्या रंजक कथा वाचायला मिळतील. विज्ञानातील हे सारे 'सरस' तितकेच 'सुरस'ही आहे. ते तितक्याच रंजक पद्धतीने मांडलेले या पुस्तकात आढळतील.
-
One Shot
सहा शॉट्स. पाच ठार. काही तासांत बिनतोड पुराव्याच्या आधारावर गुन्हेगाराला अटक, पण तो तोंडातून अक्षर काढत नाही. शेवटी खूप प्रयत्नांनंतर तो बोलतो, "तुम्ही चुकीच्या माणसाला पकडले आहे... माझ्यासाठी जॅक रीचरला बोलवा." जॅक रीचरचा इतरांना शोध घेता येत नसला तरी टी.व्ही.वरच्या बातम्या बघून तो यायला निघालेलाच असतो. त्याची खात्री असते की काही तरी घोटाळा आहे. गुन्हेगार लष्करातला नेमबाज असताना एक शॉट चुकलाच कसा ? आणि शहरात पोहोचल्यावर रीचरच्या लक्षात येते की त्याचे या शहरातले अस्तित्व कुणाला तरी खुपते आहे. रीचर तेरा वर्षे मिलिटरी पोलीस असतो. तपास करण्यात, माग काढण्यात तरबेज. त्याला भानगडीत अडकवण्यासाठी निरपराध व्यक्तीचा खून करण्यापर्यंत मजल गेल्यावर, संतापलेला रीचर बचाव पक्षाच्या तरुण आणि सुंदर अशा वकिलाला घेऊन त्यांच्यामागे लागतो. त्याला माहीत असते की खरा गुन्हेगार शोधायचा तर तेवढेच कावेबाज आणि निर्दय व्हायला हवे. प्रत्येक पावलाला गोळीचे उत्तर गोळीनेच द्यायला हवे.
-
Circle Of Light
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा !