-
Astitvancha Utsav (अस्तित्वाचा उत्सव)
‘ईशावास्य उपनिषद’ हे फक्त अठरा श्लोकांचं छोटसं उपनिषद आहे. ईशावास्य उपनिषदांत अस्तित्वाचा उत्सव करण्याची कला ऋषींनी दाखविली आहे. परम लयेश्वर अशा कृष्णलीलेच्या प्रेमलीलांनी आणि रहस्यांनी भरलेलं ‘कॉस्मिक काव्य’ म्हणजे ईशावास्य उपनिषद! या उपनिषदातील आयुष्य व्यापून टाकणारी लय हे पुस्तक अधोरेखित करतं.
-
I Can See You (आय कॅन सी यू)
एकामागोमाग एक सहाजणींचे खून पडलेत...या सहाहीजणी शॅडोलॅन्ड या व्हर्च्युअल जगाशी निगडित असतात, जिथे त्या वेगळ्या नावाने वेगळ्या अवतारात वावरत असतात...सहाही जणींचा खून एकाच पद्धतीने झाला आहे...अॅब्बॉटच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्टिव्ह नोआह आणि जॅक खुन्याचा माग काढू पाहत आहेत...पण तो गुंगारा देतोय...शॅडोलॅन्डचा अभ्यास करणारी इव्हही त्यांना सहकार्य करते आहे...सहा वर्षांपूर्वी निर्घृण हल्ला होऊनही त्याच्यातून बचावलेली इव्ह आणि अपघातात आपली पत्नी आणि मुलगा गमावलेला नोआह यांच्यात प्रेमबंध निर्माण झालाय...डेलला नोआह, जॅक आणि इव्हचा बदला घ्यायचाय...त्याच्याकडे संशयाची सुई आहेच...पण त्याला अटक केल्यावरही खुनांचं सत्र सुरू राहतं...खुन्याचं मुख्य लक्ष्य आहे इव्ह आणि नोआहही...तो इव्हचं अपहरण करतो...कोण आहे हा विकृत खुनी? इव्ह सुटते का त्याच्या तावडीतून? थरारक घटनांनी भरलेली, धक्कादायक वळणांनी पुढे सरकत राहणारी उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरी.
-
Dr. Maria Montessori (डॉ. मारिया मॉंटेसरी)
डॉ. मारिया मॉंटेसरी इटलीतील पहिल्या महिला वैद्यक डॉक्टर. स्त्रीवादाचा जाहीर पुरस्कार करणाऱ्या.. प्राचीन संकुचित सामाजिक धारणा मोडीत काढणाऱ्या.. अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक मिळवलेल्या.. बाल शिक्षणाला त्यांनी नवीन वळण दिलं. इटलीमधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तयार केलेली शिक्षणप्रणाली जगभर यशस्वी ठरली. . भारतातील आपल्या दहा वर्षांच्या वास्तव्यात 'मॉंटेसरी शिक्षणपद्धती'चा प्रसार आणि रुजवण करून त्यांनी शेकडो शिक्षक घडवले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना तीन वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांना गुरुस्थानी असणाऱ्या डॉ मारिया मॉंटेसरी यांची ही जीवन कहाणी.
-
Kedarnath (केदारनाथ)
* केदारनाथ १७ जून * तो गिधाडाकडे पाहत राहिला , अगदी शेवट पर्यंत !!! नदीमध्ये अडीच तीन वर्षांच्या बाळाच्या हाडाचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता ! सिद्धार्थ ने सररकण आपली नजर वळवली ....त्याच्या बाजूला मूल कधी येऊन थांबलं होत त्याचं ही त्याला भान न्हवत मुलगा ही त्या हाडाच्या सांगाड्या कडे पाहत असावा सिद्धार्थ गुडग्यावर बसला दोन्ही हातांनी त्यांचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला ,"भीती वाटतेय ? मुलाने मान हलवून होकार दिला . त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला ,"घाबरू नकोस ....जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत म्हणूनच आपण मरायचं नाही..." "आपल्याला जिवंत रहावंच लागेल !" एका सत्य घटनेवर आधारित कादंबरी .... *केदारनाथ १७ जून