-
Chiranjiv (चिरंजीव)
मी दिग्विजय कर्ण, आज अखेरच्या क्षणापर्यंत मी माझ्या मनाशी लढतो आहे. तुम्ही मला कित्येक हजार वर्षांपासून ओळखता आणि मीही तुम्हाला जाणतो! माझ्या जीवनाचे वेगवेगळ्या रूपातले तुम्ही साक्षीदार आहात. तुमचे जन्म बदलले, तरीही माझ्याशी असलेली एकरूपता तीच आहे. हा कर्ण तुम्हा साऱ्यात आजही जगतो आहे. तुम्हाला ओळखीचा वाटणारा हा कर्ण तुम्ही रणभूमीवर पाहिलात परंतु आज मी माझ्या मनोभूमीवर अखंड तेवत ठेवलेले युद्ध तुम्हास सांगणार आहे. शेवटी रणांगण तेच आणि योध्येही!
-
O Henrychya Laghukatha (ओ हेन्रीच्या लघुकथा)
आनंद, कारुण्य, प्रेम, चौर्य, उन्माद, उत्कंठा, क्षमा, क्षालन, अशा अनंत भावभावनांच नितांतसुंदर मिनिएचर म्हणजे ओ हेन्री च्या लघुकथा साहित्याच्या उंबरठ्यावर पाश्चात्य आणि पौर्वात्य सीमांना जोडणारे पुस्तक. रसिकहो तुमच्यासाठी...
-
Digital Bharat (डिजिटल भारत)
पूर्वी तंत्रज्ञान व संलग्न तंत्रे फक्त मूठभर श्रीमंतांच्या हातात असत. बहुजन समाज त्यापासून लांबच होता. चैनीच्या गोष्टी म्हणून उपकरणांची संभावना एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी होत असे. घरोघरी मातीच्या चुली जाऊन स्मार्टफोन, संगणक आले. तरुण पिढीने ते लवकर आत्मसात केले. पण प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांनीही यापासून दूर जाऊ नये, आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला हर तऱ्हेने सक्षम, स्वतंत्र, स्वतःच्या पायांवर उभे राहायला मदत करेल. 'सबलीकरणाचा' हा एक नवीन दृष्टिकोन आहे, हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.
-
Chala Thoda Common Sense Vapru Ya (चला थोडा कॉमन स
बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, कल्पनाशक्ती आणि विश्लेषणसामर्थ्य अशा अनेक देणग्यांनी समृद्ध असलेले आपण मनुष्यप्राणी… आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये साधा कॉमनसेन्स का बरं नाही वापरू शकत? तुम्ही कधी स्वतःला हे प्रश्न विचारले आहेत का... आपण का वैतागतो? आपल्याला राग नक्की कशाचा येतो? आपल्या मनात अपराधीपणाची भावना का निर्माण होते? आपण खोटे का बोलतो? कधी विनाकारण बचावात्मक पवित्रा का घेतो? लोकांचा एकमेकांवर विश्वास का नसतो? स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारण्यासाठी आपल्याला धडपड का करावी लागते? बरेचदा आपण आपले आयुष्य गुंतागुंतीचे का करून ठेवतो? आपण एखाद्यावर टीका करण्यात तत्पर असतो, पण त्यासंदर्भात त्या व्यक्तीशी स्पष्ट संभाषण मात्र आपण कटाक्षाने टाळतो, असे का ? खरे तर निव्वळ कॉमनसेन्स वापरुन आपण आपल्या समोरील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हे पुस्तक, आपल्याला सर्वपरिचित अशा दैनंदिन परिस्थिती आणि घटनांकडे अधिक डोळसपणे पाहायला शिकवते. फक्त आपला दृष्टिकोन बदलून आणि थोडासा कॉमनसेन्स वापरून आपण आपल्या समस्या कशा सोडवू शकतो, किंवा निदान कमी करू शकतो यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. जीवनातील आनंद हिरावून घेणाऱ्या राग, निराशा, पश्चात्ताप, शोक, चिडचिड, दुःख आणि नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनांना दूर ठेवायला शिकविणारे एक साधेसोपे सहज आचरणात आणण्याजोगे मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक काम करते.
-
Godfathers Of Crime(गॉडफादर्स ऑफ क्राईम)
दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन, अश्विन नाईक, अरुण गवळी इ. गुन्हेगारी जगताशी संबंधित नावं... नक्की कोणत्या प्रकारचे गुन्हे केलेत या गँगस्टर्सनी... कशी आली ही माणसं गुन्हेगारी जगतात... त्यातील काहींना परदेशात का पळून जावं लागलं.. .पोलिसांची, न्यायालयांची, प्रसारमाध्यमांची काय भूमिका आहे त्यांच्याबाबत...कसं आहे त्यांचं कौटुंबिक जीवन... गुन्हेगारी जगतातील गँगस्टर्सच्या घेतलेल्या महत्त्वपूर्ण मुलाखती, त्यांच्याशी फोनवरून झालेली बातचीत आणि अन्य स्रोतांद्वारे शीला रावळ यांनी या गँगस्टर्सची गुन्हेगारी, कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी उलगडण्याचा केलेला प्रयत्न.
-
The Mother (द मदर)
चीनमधील एका छोट्या खेड्यातील तीन मुलांची (दोन मुलगे, एक आंधळी मुलगी) आई...सासू, नवरा, मुलं यांची काळजी घेते...नवऱ्याच्या बरोबरीने शेतात राबते...समोर राहणाऱ्या चुलत जावेशी, दिराशी स्नेहाने वागते...नवरा अचानक परागंदा होतो...खोटी पत्रं लिहून घेऊन तो शहरात नोकरीसाठी गेल्याची बतावणी तिला करायला लागते...प्रपंचाचा गाडा एकटीच ओढत असते...जमीनदाराच्या मुनिमाची नजर तिच्यावर पडते...हो-ना करता ती त्याच्या अभिलाषेला बळी पडते आणि तिला दिवस राहतात...दरम्यान, स्वत:चा नवरा शहरात जळून मेल्याचं खोटं पत्र लिहून तिने स्वत:ला विधवा म्हणून जाहीर केलेलं असतं...मुनिमाने झिडकारल्यामुळे तिला गर्भपात करावा लागतो...यथावकाश तिचा थोरला मुलगा हाताशी येऊन कुटुंबाची जबाबदारी घेतो...धाकटा मुलगा शहरात जातो...थोरल्याचं लग्न होतं, सून घरात येते...तिच्या आंधळ्या मुलीचं लग्न होतं, पण ती मुलगी मरण पावते...तिच्या धाकट्या मुलाचाही शिरच्छेद केला जातो...असे दु:खाचे आघात होत असतानाच तिला नातू होतो...एका आईच्या जीवनाचं बहुपदरी भावनाट्य.
-
Zund (झुंड)
पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विशाल. तालुक्याच्या गावी त्याचं घर. घरी आई वडील आणि लहान बहीण. वडील मजुरी करणारे. आई गृहिणी. बहीण अजून शिकतेय. एका बड्या असामीला गावात मध्यवर्ती भागात एक भव्य इमारत बांधायची आहे. विशालच्या वडिलांनी बांधलेलं यांचं छोटंसं घर त्याच्या आडवं येतं. त्या वादाचा तोडगा काढण्यासाठी विशाल पुण्याहून गावी येतो. येतो तो अडकतो. तालुक्यातलं राजकारण, आई वडील, इतर नातेवाईक आणि त्याची नव्याने झालेली जीवनसाथी या सगळ्यांमध्ये गुंतत जातो. एका बाजूला राजकारणाल्या कुरघोड्या, लढाया, हाणामारी, अपहरण आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाकडून मिळालेली साथ, प्रेम आणि झुंडीसोबतचे ऋणानुबंध. राजकारणी आणि व्यवसायातल्या बड्या ध्येंड्यांशी दोन हात करताना त्याच्या पाठीशी उभी राहते तरुण पोरांची झुंड. विशालच्या झुंडीची ही कथा. वाचकाला सकारात्मक भावनिक अनुभव देणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
-
Cured (क्युअर्ड)
पंधरा वर्षं `स्वयंस्फूर्त रोगमुक्ती` या संकल्पनेचा अभ्यास करणारे हार्वर्ड मेडिक - डॉ. जेफ्री रेडिगर.. हजारो रोगमुक्तीच्या कहाण्यांचा आढावा घेत ते जगभर हिंडले. स्वादुपिंडाचा अत्यंत दुर्धर कर्करोग झालेला निवृत्त क्लेअर ते ब्रेन ट्यूमर झालेला तरुण मॅट. अशा अनेक केसेसचा त्यांनी मागोवा घेतला.. या रुग्णांची बचावण्याची शक्यता नगण्य होती. त्यात त्यांनी किमो थेरपी आणि रेडिएशन घेण्यासही नकार दिला. त्यांनी मृत्यूला शांतपणे सामोरं जायचं ठरवलं; पण दरम्यान असं काय घडलं की आज सुमारे दशकभरानंतर देखील दोघंही जिवंत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या शरीरात त्या भयंकर गाठींचा मागमूसही राहिलेला नाही!!
-
Rafinu (राफिणू)
कनसाई गावात होतो कोरोनाचा प्रवेश... त्याच गावातील फिरके गुरुजींचा चुणचुणीत, हुशार, जिज्ञासू मुलगा राजू इतरांसह करतो कोरोनाग्रस्तांना आणि इतर गावकर्यांना मदत... आपल्या ड्रोनचा वापर करून तो आजारी लोकांसाठी मागवतो औषधं...शेजारच्या गावातील लाकोंना एका वनस्पतीचा रस घेतल्याने कोरोनापासून मुक्ती मिळाल्याचं समजतं त्याला... शेजारच्या गावातल्या माणसाला मदतीला घेऊन तो जातो ती वनस्पती माहीत असणार्या आदिवासींकडे...ती वनस्पती घेऊन त्याचा प्रयोग करतो कनसाई गावातल्या रुग्णांवर आणि ते होतात कोरोनामुक्त...तो आपल्या किरणमामाची आणि त्या आदिवासींची घालून देतो भेट... तेव्हा त्या दोघांनाही कळतं की ते कुणी आदिवासी नसून आहेत परग्रहवासी... परग्रहवासीयांकडून वनस्पती घेऊन डॉक्टर किरण देतात औषध निर्माण करणार्या विविध कंपन्यांना...त्यातून वेगळ्या केलेल्या रेणूला नाव दिलं जातं राफिणू (राजू फिरके रेणू)... या कामासाठी राजूचा पंतप्रधानांच्या हस्ते होतो सत्कार...
-
Dharm Ani Samlaingikta (धर्म आणि समलैंगिकता)
समलैंगिकता म्हणजे काय? आपले धर्म याबद्दल काय म्हणतात? हिंदू पौराणिक कथा, इस्लाम, जैन आणि बौद्ध धर्मातील साहित्यात याविषयी काय दृष्टीकोन दिसतो? या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन देवदत्त पट्टनायक यांनी जगभरातील प्रत्येक धर्माचा समलैंगिकतेबद्दलचा काय विचार आहे, हे या पुस्तकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय, निसर्गात समलैंगिकता सहजपणानं दिसते व त्यात अनैसर्गिक काही नाही असंही ते दाखवून देतात. अनेक संस्कृतींमध्ये समलैंगिकतेबद्दलची विचारसरणी सकारात्मक नसली तरी, आधुनिक काळात तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे आणि जगभरात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळते आहे.प्रसिद्ध पुराणकथातज्ज्ञ देवदत्त पट्टनायक यांचं हे पुस्तक या विषयावरील अनेक गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. खूप माहिती देणारं आणि वस्तुस्थितीबद्दल समृद्ध करणारं हे अप्रतिम पुस्तक आहे.