-
Peshave (पेशवे)
पेश करतो तो पेशवा…..पेशवा म्हणजे छ्त्रपतींचा सरकारकून…छत्रपतींनी पेशवेपदाचे रुपांतर ’मुख्यदिवाण’, ’नेता’,’पंतप्रधान’ या बिरुदावलीत केले…
-
Kashmir Ani Kashmiri Pandit (काश्मीर आणि काश्मिर
काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे.
-
Javed Akhtar : Navya Suryachya Shodhat (जावेद अख़्
जावेद अ़ख्तर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. ‘सलीम-जावेद’ या जोडगोळीनं एके काळी एकाहून एक यशस्वी चित्रपटांची माळ लावली. त्यानंतरही जावेद यांच्या लेखणीतून किती तरी गाजलेल्या पटकथा अन् कैक संस्मरणीय चित्रपटगीतं उमटली. ‘तरकश’ अन् ‘लावा’ या कवितासंग्रहांमध्ये बुद्धी अन् मन, विचार अन् भावनांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांची चित्रपटकारकीर्द यशानं झळाळणारी, तर त्यांची वेळोवेळी केलेली वक्तव्यं वादाचा धुराळा उडवणारी. आपलं भारतीयत्व, आपला विवेकवाद, आपली धर्मनिरपेक्षता, आपलं ‘एथेइस्ट’ असणं या सर्वांचा जाहीर स्वीकार करणारे, त्या सार्याचा सार्थ अभिमान बाळगणारे अन् त्यानुसार हिरिरीनं वागणारे जावेदजी. त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं चरित्र.
-
Abhinayankit (अभिनयांकित)
आपण अनेक वेळा एखादी कलाकृती पाहतो आणि त्यातलं अभिनेत्याचं काम चांगलं का वाईट असा शिका मारून मोकळे होतो, परंतु अभिनेत्याने एखाद्या पात्रासाठी काय आणि कशी मेहनत घेतली असेल याचा आपल्याला अंदाज असतोच असं नाही. पण काहीअभिनेते आणि अभिनेत्री मात्र आपल्या सहज अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आले आहेत. या कसदार कलाकारांनी आपलं एक स्थान निश्चित केलं आहे. · लेखिका आणि ज्येष्ठ सिने-नाट्य अभ्यासक जयश्री दानवे यांनी या पुस्तकात अशाच १६ अभिनेत्यांचा एक माणूस आणि एक कलाकार म्हणून झालेला प्रवास उलगडून दाखवला आहे. यातील काही कलावंताना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. · निळू फुले, डॉ. श्रीराम लागू ते भरत जाधव, सुबोध भावे आणि सचिन खेडेकर अशा अजून काही निवडक ज्येष्ठ आणि गुणी अभिनेत्यांचा प्रवास या पुस्तकात लेखिकेने उलगडून दाखविला आहे. जयश्री जयशंकर दानवे या ज्येष्ठ सिने नाट्य अभ्यासक आहेत. ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ संगीत शिक्षिका म्हणून काम केलं आहे. आजवर त्यांची जवळपास ३१ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना त्यांच्या कार्यासाठी आणि लेखनासाठी असंख्य पुरस्कार लाभले आहेत. आघाडीच्या वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमध्ये त्यांचे लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. लेखनाबरोबरच त्या पार्श्वगायनही करतात. साहित्य अभिवाचनाचे कार्यक्रमही त्या करतात.
-
Sharir (शरीर)
शरीर ‘वैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे.’ - डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन. ‘मानवी शरीर प्रणाली, त्याची रचना व कार्य हे अत्यंत जटिल आणि समजून घेण्यास कठीण आहे. यातून सर्वसामान्यांच्या मनातील असंख्य प्रश्नांचे निरसन होईल.’ - डॉ. अविनाश सुपे, डीन, केईएम हॉस्पिटल. ‘शरीर हे पुस्तक वाचणं म्हणजे शरीरविज्ञानाच्या क्षेत्रात मुशाफिरी घडवून आणणारा आणि मनाला उल्हासित करणाऱ्या तरल सिंफनीसारखाच अनुभव आहे.’ - डॉ. नंदकुमार, सुप्रसिद्ध हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ. ‘प्रत्येकानं ‘शरीर’ हे अद्भुतरम्य पुस्तक वाचणे आणि संग्रही ठेवणे अगत्याचे आहे, या पुस्तकामुळे आपल्याला आपल्यातल्या अणूरेणुला ओळखण्यासाठी मोलाची साथ लाभणार आहे.’ - डॉ अनिल गांधी, सुप्रसिद्ध सर्जन. ‘ग्रामिण भागातून मेडिकलचं शिक्षण घ्यायला येणाऱ्या आणि इतरही सगळ्याच विद्यार्थ्यांना शरीरक्रियाशास्त्र हा विषय समजण्यासाठी ‘शरीर’ हे पुस्तक खूपच मदत करेल असं मला वाटतं.’ - डॉ. अजित भागवत, सुप्रसिद्ध हृदयक्रियातज्ज्ञ ‘अत्युकृष्ठ! हे पुस्तक वाचताना आपण प्रत्येक अवयवसंस्थेच्या आत जाऊन प्रत्यक्ष अनुभवतोय असंच वाटत राहतं.’ - डॉ. विवेक नळगिरकर ‘जनांसाठी असलेलं हे ‘शरीर’ इतिहास आणि शरीर विज्ञान यांची गुंफण करून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आपण स्वतःला नव्याने ओळखायला लागतो.’ - डॉ. शंतनू अभ्यंकर
-
Sukshmajantu (सूक्ष्मजंतू)
सिध्दहस्त लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांच सूक्ष्मजंतू सर्वसामान्य वाचकालादेखील समजेल अशा सहज सोप्या शैलीतून साकार झालेल अतिशय सुंदर पुस्तक आहे. सूक्ष्मजंतूंचा इतिहास, विज्ञान आणि मानवी संस्कृतीवेर पडलेला प्रभाव यांचा धांडोळा घेताना लेखकव्दयींनी अतिशय परिश्रम घेऊन प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतच्या जंतुविज्ञानाचा सखोल आढावा घेतला आहे. साथीच्या रोगांच्या मुळाशी जाऊन सूक्ष्मजंतूंचा वेध घेणार्या, त्यावर लस शोधून काढणार्या शास्त्रज्ञांच्या चरित्रकथांनी नटलेल हे पुस्तक वाचकाला गोष्टीच पुस्तक वाचल्याचा आनंद देत.