-
Vitamins (व्हिटॅमिन्स)
संशोधनात वापरण्यात येणार्या सर्व शास्त्रीय पध्दतींचा या पुस्तकात मागोवा घेण्यात आला आहे. पाश्चिमात्य परंपरा व भारतीय परंपरा यांचे दाखले दिल्यामुळे हे लिखाण आकर्षक झाले आहे. पोषण, आहार व निकृष्ट शरीर यांचा संबंधही प्रस्तुत पुस्तकातील विविध प्रयोगांमुळे सिध्द झालेला दिसून येतो. आहारातील प्रत्येक व्हिटॅमिन्सचे कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, न घेतल्यास होणारे दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती या पुस्तकाद्वारे मिळते.
-
Nisargakallol (निसर्गकल्लोळ)
कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...
-
Adhunik Vaidyak : Tathya ani Mithya (आधुनिक वैद्यक
आज आपणा सगळ्यांचे जीवन तणावग्रस्त आहे. तांत्रिक प्रगतीचा अनावर ओघ, सगळ्या व्यवसायांचे अन् व्यवहारांचे वैश्विकीकरण करण्याचा ध्यास, जीवनाच्या सर्व पैलूंचे सपाटीकरण करण्याचा हव्यास आणि तथाकथित विज्ञानाच्या ठोकळ चौकटीत मानवी आयुष्याचे प्रत्येक अंग बसवण्याचा आग्रह ही या युगाची वैशिष्ट्ये. वैद्यकीय क्षेत्रालाही ती लागू आहेत. विविध प्रकारच्या तांत्रिक प्रगतीतून वैद्यकशास्त्राचा चेहरा-मोहराच पालटून गेला आहे. वैद्यकाचे बदलत गेलेले हे प्रारूप भरकटत तर चालले नाही ना? समाजात शारीरिक, मानसिक आरोग्याचा प्रसार व्हावा, सर्वसामान्यांचे जीवन सोपे, सुखकर, आनंदी व्हावे - हे वैद्यकाचे ध्येय असावे, असे जर आपण मानले; तर सध्या चालू असलेला वैद्यकशास्त्राचा प्रवास योग्य दिशेने चाललेला आहे का? वैद्यकीय विवेकच भ्रष्ट होतो आहे का? वैद्यकीय व्यवसायाला ग्रासणार्या या नवनिर्मित समस्यांवर सखोल विचार करणारे, वैद्यकक्षेत्रातील जागल्याचे काम करणारे एका प्रामाणिक डॉक्टराचे साक्षेपी चिंतन.
-
Ya Jivanache Kay Karu? (या जीवनाचे काय करु?)
अभय बंग यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुस्तकाने महाराष्ट्राच्या हृदयाला व जीवनशैलीला हात घातला. ‘कोवळी पानगळ’ अहवालाने महाराष्ट्राच्या सामाजिक संवेदनशीलतेला हलवले. ‘निर्माण’ या उपक्रमाने युवा पिढीसमोर नवी क्षितिजे उभी केली. आता ते महाराष्ट्राशी संवाद करत आहेत, एका खास प्रश्नावर. या जीवनाचे काय करू? माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न! आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला येतो. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही!! ...पण हा शोध सोपाही नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत व्हावी, या हेतूने घेऊन येत आहोत... अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा व दिलेल्या भाषणांचा निवडक संग्रह. या जीवनाचे काय करू? ...आणि निवडक
-
Veer Savarkar (वीर सावरकर)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' ही अठरा अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच! अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत : ‘सावरकर म्हणजे तेज! सावरकर म्हणजे त्याग! सावरकर म्हणजे तप! सावरकर म्हणजे तत्त्व! सावरकर म्हणजे तर्क! सावरकर म्हणजे तळमळ! सावरकर म्हणजे कविता अन् सावरकर म्हणजे क्रांती!' सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक दुर्लक्षित पैलू विश्वासार्ह कागदपत्रांच्या साहाय्याने उजेडात आणणारा आणि सावरकरांवरील अनेक टीकांचे सज्जड प्रमाणांच्या आधारे निराकरण करणारा मौलिक दस्तऐवज. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगिंत असा कवण जन्मला
-
Mumbai Dangal Ek Vishleshan (मुंबई दंगल एक विश्लेष
मुंबईमध्ये १९९२ च्या डिसेंबरमध्ये आणि १९९३ च्या जानेवारीत भीषण जातीय दंगली झाल्या. त्याच वर्षी मार्चमध्ये बॉम्बस्फोट झाले. दंगल आणि बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या आयोगाने यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला १९९८ मध्ये सादर केला. तो सादर करण्यापूर्वी सरकारने टाळाटाळ केली होती. या सगळ्याचे पत्रकार म्हणून अवलोकन करणारे निखिल वागळे यांचे हे पुस्तक आहे. पुस्तकात पहिल्या भागात त्यांनी वस्तुस्थिती आणि विपर्यास सांगितला आहे. श्रीकृष्ण अहवाल, पोलिस दल, पत्रकारांची भूमिका, अपुरी शस्त्रास्त्र आणि जातीयवादी मनं आदी मुद्यांवर त्यात भाष्य आहे. दुसऱ्या भागात थैमानाच्या कहाण्या आहेत. खाकी वर्दीतील अत्याचार दाखवले आहेत.
-
Nathuramayan (नथुरामायण)
मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक इतिहासाचा कसा विपर्यास करतं, खोटं बोलतं ते सांगण्यासाठी य.दिंनी लेख लिहायचं ठरवलं आणि त्या लेखांचं एक पुस्तकच बनलं.
-
Buran Ghatitil Te Tevis Tas (बुरान घाटीतील ते तेवी
ट्रेकचे थरारक अनुभव, हिमालयाचे रौद्र रूप, अतिउंचावरील आजाराची लक्षणे व परिणाम इत्यादी सर्व नेमक्या शब्दात मांडले आहे. अतिबर्फवृष्टीमुळे दोन सदस्यांच्या जीवावर बेतले त्यांना मृत्यूच्या दाढेतून सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले. अश्या अनेक थरारक अनुभव घेतलेल्या ट्रेकचे वर्णन लेखिकेने केले आहे. त्यामुळे हा सर्व अनुभव एक अभ्यासाचा विषय झाला आहे. कारण साहसी खेळामध्ये अनुभव हाच सर्वात मोठा गुरु व मार्गदर्शक असतो.
-
Virat (विराट)
अधीर नि आतूर दिल्ली का छोकरा...वयाला न शोभणारी आव्हानं बेधडकपणॆ स्वीकारणारा...प्रारंभालाच यशाचं मांद्य शरीरावर चढल्याने बहकलेला गुलछबू-गोबरा क्रिकेटपटू...ही विराट कोहलीची अर्थातच भूतकाळाची तीन रुपं. पण वर्तमानातला विराट याहून पूर्णपणे आगळावेगळा... डू अचूक तडकावल्यानंतरचा टणत्कार दर खेपेला स्टेडियमभर घुमत राहतो, तशी प्रेक्षकांमधल्या चैतन्याला, उत्साहाला बहार येते. तेव्हा, अवघा आसमंत सर्वार्थानं विराटमय होऊन गेलेला असतो. याच सहस्त्रकी विराटमय पर्वाचा वेध घेणारं हे रंजक नि प्रेरक पुस्तक....
-
Melelya Lekhakanchya Chaukashiche Prakaran (मेलेल्
जे लोक आज पुस्तके जाळतात ते एक दिवस माणसे जाळू लागतील.” अठराव्या शतकातील जर्मन लेखक हेन्रिक हें यांचं हे प्रसिद्ध वाक्य जणू या कादंबरीचा गाभा आहे असं म्हणता येईल. मानवी इतिहासात अनेक तत्त्वचिंतकांनी आणि तत्त्वप्रणालींनी ‘मी’, ‘स्व’ किंवा मानव एजन्सी असणं यांबद्दल महत्त्वाची मांडणी केलेली आहे. अर्थातच त्यांच्या एकंदर तत्त्वविचारातील तो एक घटक होता. असा घटक, ज्याचा विचार सामाजिक-राजकीय वास्तव, ते मानवी अस्तित्वविषयक प्रश्न, ते नैतिक मूल्यव्यवस्था, ते भावनिक प्रेरणाविश्व अशा व्यापक अवकाशावर पसरलेला होता. काही विचारवंतांचे ‘मी कोण’बद्दलचे असे काही विचार माझ्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे गुंफावेंत की, त्याला माझी म्हणून काही चौकात असावी, समकालीन राजकीय संदर्भ असावेत, हा लेखकाचा या साहित्यकृतीच्या निर्मितीमागचा हेतू आहे. असा प्रयत्न करणारं हे एक फिक्शन आहे, एक कल्पित आहे, थोडंसं ललितही आहे. या लिखाणाला कादंबरी म्हणता येईल की नाही याबद्दल जरी मतभेद संभवले तरी आजमितीस अनेक गोष्टींच्या व्याख्याच बदलत आहेत त्यामुळे कादंबरीच्या शैलीचा आणि आशयाचा हा एक नवीन प्रयोग म्हणता येईल. या कादंबरीत लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न सोपा नाही, या कोड्याला एकाच एक उत्तरही नाही. पण या कोड्याशी झुंजताना लेखकाला जे समाधान मिळालं, जो आनंद मिळाला तसाच आनंद कदाचित वाचकांनाही मिळेल. मात्र लेखकाचं म्हणणं समजून घेत, नव्या शैलीशी जुळवून घेत नेटाने वाचण्याची जिद्द मात्र हवी
-
Dhag (धग)
ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे.तिच्यातील बोली वर्हाडी आहे.प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात ,तर प्रादेशिकता हे वास्तववादाचेच विस्तृतीकरण असल्यामुळे ते वाड्मयमूल्य होऊ शकत नाही,अशीही बाजू मांडली जाते.
-
Imperfect (इम्पर्फेक्ट)
हे पुस्तक माझ्याविषयी आहे. माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीविषयी, माझ्या आयुष्याविषयी माझं यश आणि अपयश याविषयी माझं सामर्थ्य आणि माझी दुर्बलता याविषयी प्रत्येक व्यक्ती एक आगळं आयुष्य जगत असते. प्रत्येकाच्या जगण्याच्या या कहाण्या नेहमीचं रंजक असतात. कोणीही माणूस निरर्थक आयुष्य जगत नाही. एक खेळाडू म्हणून माझ्या कारकिर्दीपासून तरुण , नवोदित खेळाडूंनी काही धडे घ्यावेत असंही मला वाटतं. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला होता त्याप्रमाणे, 'माझ्या आयुष्यात मी वीस चुका केल्या ; तू नवीन वीस चुका कर.'
-
Spashta Bolayach Tar (स्पष्ट बोलायचं तर)
२०१४ ते २०१७ या काळातल्या प्रमुख घटनांचा वेध या लेखसंग्रहात आहे. २०१४ च्या मे महिन्यात नरेंद्र मोदी बहुमत मिळवून पंतप्रधान झाले. विकासाची स्वप्नं आणि मनमोहनसिंग सरकारविरुद्धचा राग अशा घोड्यावर मोदी स्वार झाले होते. त्यांच्या विजयाने जनतेत एक नवी आशा निर्माण झाली होती. पण पहिल्या शंभर दिवसातच या आशेला तडा जायला सुरुवात झाली. सर्व राजकारण एका नेत्याभोवती फिरु लागलं. विकास राहिला बाजूला आणि नवे राजकीय, सामाजिक, आर्थिक तणाव राज्या-राज्यात निर्माण झाले. प्रामुख्याने या तणावांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी या लेखसंग्रहात केला आहे.