-
Mi, Sampat Pal, Gulabi Sareewali Ranaragini
मी आवरून तयार होतीये, यांत्रिकपणे माझ्या हालचाली घडतायत. मी माझ्या छोट्याश्या अंधाऱ्या खोलीत आहे. गेल्या २ वर्षांपासून हे माझं मुख्य कार्यालय आहे. मी केसांचा अंबाडा वळते, मग गुलाबी साडीची घडी उघडून ती नेसते. बाहेर जमलेल्या गर्दीचा गलका केंव्हापासूनच कानावर पडतोय. त्या सगळ्याजणी युद्धासाठी सज्ज आहेत. माझ्याकडून एक इशारा मिळायचा अवकाश, त्या आणखीन मोठ्यानं गर्जत उसळून उठतील! मी दारापाशी येताच आभाळाच्या दिशेने उंचावलेल्या काठ्यांचं जंगल माझ्या स्वागतासाठी उत्साही आवाजात गगनभेदी गर्जना करतं : " गुलाबी गँग! गुलाबी गँग!"
-
Smart Leadership
बहुराष्ट्रीय उद्योगाच्या प्रमुखांना कार्यक्षमता वाढवायचे नवनवे मार्ग शोाावे लागतात. `स्मार्ट लीडरशिप - सीईओसाठी नवी दृष्टी' या पुस्तकामये बारा यशस्वी सीईओंनी (चीफ एक्झिक्युटिह ऑफिसर म्हणजे प्रमुख कार्यकारी अिाकारी) आपले मनोगत यक्त केलेले आहे. या सवा|नी विकासाचे आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले, आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सर्वश्री कुमारमंगलम् बिर्ला, एन. आर. नारायण मूर्ती, राहुल बजाज, के. ही. कामत यांनी वर्षानुवर्षे गुणवत्ता राखून विकासाच्या वेगात सातत्य राखता येते, हे दाखवून दिले. त्यांच्या अनुभवसमृद्धतेतून उद्योगक्षेत्रातील यवहाराबद्दल काही मूलभूत ाडे शिकता येतात. नेतृत्व करणे, निर्णय घेणे, योग्य माणसे निवडून टीम बांाणे, गुणवत्ता ओळखून उत्तेजन देणे, बदल पचवणे आणि हे सर्व करताना विकासावरील लक्ष ढळू न देण्याचे मर्म सांगितले आहे. परिवर्तन घडवण्यासाठी `स्मार्ट लीडरशिप' सर्व स्तरांवरच्या यवस्थापकांना काही अनुभवसिद्ध यवहार्य सूचना देऊ पाहते.
-
My Stroke Of Insight
मानवी मनाच्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी मेंदूचा ठाव घेणे अत्यंत आवश्यक ठरते. जगभरातील संशोधक मेंदूवर संशोधन करत असून अजूनही त्यांना मेंदूच्या गुंतागुंतीची उकल झालेली नाही. मानवी शरीराचे नियंत्रण करण्यार्या आणि अणुबॉम्बपासून संगणकापर्यंत असंख्य गोष्टींचा शोध लावणारा मानवी मेंदू हा शास्त्रज्ञ व डॉक्टरांसाठी कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. डॉ. जिल टेलर यांचे मेंदूवरील संशोधनविषयक अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले असून स्वत:ला आलेल्या अनुभवावर आधारित एका मेंदू शास्त्रज्ञाचे हे पुस्तक अफलातून म्हणावे लागेल. यात मेंदूची रचना, कार्यपद्धती, आजारांची माहिती लिहिताना सर्वसामान्य वाचकाला कळेल, अशा भाषेत हे पुस्तक लिहिण्याची हातोटी डॉ. जिल यांनी साधली आहे. या पुस्तकात चार टप्पे मांडण्यात आले आहेत. डॉ. जिल यांचे ब्रेन स्ट्रोकपूर्वीचे आयुष्य, त्यांना मेंदूशास्त्रज्ञ का व्हावेसे वाटले, याचा वेध घेताना त्यांच्या शाळा ते विद्यापीठ शिक्षणापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. संशोधनासाठी मेंदू उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ, त्यांच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनाचा आढावा, देशभरातील दौरे, गाणारी शास्त्रज्ञ म्हणून मिळालेली त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीचाही आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
-
Paanpoi
वपुंचेच पुस्तक परंतु हे तसे वपुंचे पुस्तक नाही. काही सुचलेले विचार, काही घडलेल्या घटना, काही ऐकीव, वाचीव गोष्टी, इतरांना खुलवून सांगावे असे काव्य - विनोद मात्र हे सारे व. पु. काळे ह्यांच्या शैलीत व ढबीत असे ह्या छोट्याशा पुस्तकाचे वेगळेपण. ही एक प्रकारची पाणपोई आहे. थकल्यावर तहान लागल्यावर तीवर तहान भागवायची असते, एवढेच वपुंचा उद्देशही तेवढाच आह. मात्र वपुंना हे एक सामाजिक कर्तव्यच वाटलेले आहे म्हणून ज्यांना ज्यांना आपले अनुभव धन इतरांना सांगावे असे वाटते त्यांनी त्यांनी कुचराई न करता ते सांगितलेच पाहिजे असेही त्यांना वाटते. याबद्दल त्यांची धारणा अशी आहे की, "अनुभव व्यक्त करण्याकरता लेखक व्हावंच लागतं असं नाही तो अनुभवच लेखणीच्या टोकाशी उपस्थित असतो."
-
Mazi Janmakahani (माझी जन्मकहाणी)
आयान हिरसी अली - एक सुंदर वृत्तीची इस्लामधार्मीय स्त्री … आईवडिलांकडून झुंझार वृतीच बाळकडू मिळालेली आयन वडिलांच्या पसंतीच्या तरुणाशी लग्न करायला नकार देते . तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहाला ती जीवाच्या आकांताने विरोध करते तो हॉलंड मधील निर्वासितांच्या छावणीत . मुस्लिमांच्या धर्म पंचायतीसमोर ती धीटपणे सांगते " मला हा निकाह मंजूर नाही . कारण माझे मन तो मान्य करत नाही ." या तिच्या निर्भीड जवाबाला धर्म मार्तंड थोर मनाने स्विकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते . हॉलंड मध्ये राज्य शास्त्र विषयातील पदवी उत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व … आयान चा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश . तिच्या दुर्दैवाने तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्व रद्द होण्याची भीती समोर ठाकते . त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयान न अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरावादी इस्लामने स्त्रीच्या तनामनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इंफिडेल म्हणजेच माझी जन्मकहाणी . तिने अशा धर्माचा त्याग केला तो तिच्या समाजातील ५०% लोकांना कुठलही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही . अशा ह्या झुंझार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येकानेच हे पुस्तक वाचायला हवे .
-
Guernsey Vachak Mandal
चार्ल्स लँबचा नि:स्सिम भक्त असलेला डॉसी एका प्रतीवर ज्युलिएटचं नाव पाहून तिला पत्र धाडतो. त्याला लँबची अन्य पुस्तकं कुठं मिळतील विचारायचं असतं आणि इथून सुरु होतो हा पत्रांचा सिलसिला. 'गर्नसी लिटररी अॅन्ड पोटॅटो पील - पाय सोसायटी' असे लांबलचक आणि मजेदार नामकरण झालेल्या या वाचक मंडळातले अन्य सभासदही डॉसीच्या पाठोपाठ ज्युलिएटचे 'पत्रमित्र' बनतात.