-
Salt And Honey
कोबा! वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणार्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी! गोर्या लोकांच्या शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या जगापासून दूर, त्या गोर्यांच्या जगात नेलं जातं. त्या सुंदर पण तिच्यासाठी धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला. त्यात टिकाव धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते ती म्हणजे त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे, त्यांचा त्याग करावाच लागेल.
-
Diva
प्रमोदिनी वडके कवले मनोव्यापार आणि नात्यांमधले तानेबाणे यांची गुंफन उलगडून दाखवणा-या कथा
-
50 Years Of Silence
मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली, नहे, गाडलेली ही गोष्ट आपल्या मुलींना, नातवंडांना कशी सांगायची? ही गोष्ट साधी सुधि नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी भोगवटा होता. असा भोगवटा ज्याचं दु:ख, अपमान, लाज इतक्या प्रदीर्घ काळानंतरही तब्बल पन्नास वर्षानंतरही यत्किंचितही कमी झालेली नाही. एक दिवस आपलं मन त्यांच्याजवळ मोकळं करावंच लागणार आहे, त्याची जाणीव मला होतीच पण मी कुठल्या तोंडानं त्यांना हे सांगणार होते.. "मग ठरवलं, ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं.'' आयुष्याचं अर्ध शतक थोडीथोडकी नहे, पन्नास वर्ष जॅननं मनात धूमसत राहिलेला कोंडमारा सहन केला. पण 1992 साली या कोंडमा-याचा उद्रेक झाला. ऐन तारुण्यात जॅनला जो शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला त्याचं हृदयद्रावक कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. "सुखदायिनी' हे गोड बिरुद ज्या स्रियांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याचीही सोय नहती. कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरादाराची अब्रू वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होती. लौंगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही कहाणी.
-
Haat Vidhatyache (हात विधात्याचे)
"टेनफिंगर्स फॉर गॉड' हे पुस्तक म्हणजे डॉ. पॉल ब्रँन्ड या कर्म तपस्याची विलक्षण जीवनगाथा. त्यांना वैद्यकीय व्यवसायातील संतच म्हणावे लागेल. कारण आपलं संपूर्ण आयुष्य आणि वैद्यकीय ज्ञान त्यांनी जगभरातल्या अगणित कुष्ठरोग्यांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी वेचलं. शस्त्रक्रियांद्वारे, संशोधनाद्वारे, इतरांना दिलेल्या प्रेरणेद्वारे - आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजानं दूर लोटलेल्या गरीब कुष्ठरोग्यांना दाखविलेल्या सहानुभूतीमुळे त्यांना वौद्यकीय जगतातच नहे तर जनमानसातही अलौकिक किर्ती लाभली आहे. डॉ. ब्रँन्ड यांच्या यावसायिक आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे एक अनोखा विषय - विधात्यानेच निर्माण केलेला एक अविष्कार - वेदना. ते एका वेगळ्याच नजरेने या विषयाकडे बघतात. वेदनेचं मानवी आयुष्यातील स्थान त्यांना फार महत्त्वाचं वाटतं. ते म्हणतात, शारीरिक वेदना हे मनुष्यमात्राला परमेश्वरानं दिलेलं एक वरदान आहे. वेदना आहे म्हणूनच माणूस टिकून आहे. डॉ. ब्रँन्ड हे एक शल्यविद्या विशारद तर आहेतच, पण ते एक उत्कृष्ट शिक्षक आणि पर्यावरणवादी ही आहेत. स्वार्थ, त्याग आणि विनम्रता यांचं विलक्षण मिश्रण म्हणजेच डॉ. पॉल ब्रँन्ड!
-
Prakashachi Jhade
मनुष्य नावाच्या हिंस्र श्वापदांनी भरलेल्या अरण्याचा वसु भगत यांच्या लेखणीने समर्थपणे घेतलेला वेध म्हणजेच मानवी जीवनाचे अनेकविध कंगोरे दाखविणा-या कथांचा हा संग्रह ! कच्चे गोश्त खाण्याची भाषा करणा-या सामान्य माणसांसोबतच सामान्य राहून आपले वेगळेपण जपणारी माणसे या कथांमधून आपल्याला वळणावळणावर भेटत राहतात, जशी घनगर्द अरण्यात प्रकाशाची झाडे !
-
The Associate (द असोसिएट)
पेनिसिल्वानिया मधील यार्क गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय ये कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतो. "येल लॉ जर्नल'' चा मुख्यसंपादक म्हणून शेवटच्या वर्षी मान पटकावतो. कॉलेजच्या चार वर्षांमधले त्याचे आणि त्याच्या मित्रांचे एक काळे गुपित काही लोकांच्या हाती लागते आणि ते काईलला जाळ्यात अडकवतात. वरवर चांगला वाटणारा, लॉच्या अनेक विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटणारा पण काईलला नको असणारा जॉब त्याला घ्यावा लागतो. एका मोठ्या फर्मचा असोसिएट बनण्याचे आमिष त्याला - दाखविले जाते. एका मोठ्या लॉ फर्ममध्ये तो जॉब स्वीकारतो. अमेरिकेसाठी एअरक्राफ्" बनविणाऱ्या कंपनीकरता ही फर्म काम करीत असते. आपल्या अस्तित्वासाठी काईलला परिस्थितीशी जबरदस्त झगडावे लागते. मोठ्या निग्रहाने सामना करावा लागतो. त्यात तो यशस्वी होतो का? हे या कादंबरीतच वाचायलाच हवे.
-
Asmita
अस्मिता फुरसुंगीकर, भारतीय लष्करातील कर्नलच्या मुलीचे अपहरण झाले. शोध घेण्याची जबाबदारी संजय पाटील य पोलीस अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. मालाड नदी, जहागीरदार अहवाल, मुशी कट्यार, मृत्युंजय यज्ञ, घारापुरी बेट, इराडी देवी, अलिबाग किल्यातील तळघर यातील गूढरहस्य, मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या शोध मोहिमेत संजयची गाठ पडली आहे अघोर पंथातील सिद्धीपुरुष सर्पराजमहाराजांशी, त्याला तोंड देण्यासाठी मदत घ्यावी लागली ती अध्यात्म जगातील श्री गुरुमणी यांची आणि सुरु झाला जीवघेणा संघर्ष.