-
Cancer Grastha, Tarihi Swastha (कॅन्सरग्रस्त, तरीही स्वस्थ)
“गेलेले आयुष्य सुंदरच होते, पण त्या आठवणीत बुडायचे नाही. जुने राग लोभ त्यांच्या जागी, त्यांचा आता काही संबंध नाही. काही, काही ठरवायचे नाही. उद्याचा तर विचारही नाही. आजचा दिवस नक्की आपला, तो सुंदर करणे आपल्याच हातात!!!” गेली अडीच-तीन वर्षे मी हे प्रयत्नपूर्वक पाळते आहे. म्हणूनच माझा आजार थोडातरी आटोक्यात ठेवू शकले असावे. हा आठ पायांचा विंचू कधीही, कुठेही आपल्याला घट्ट करकचवून टाकू शकेल ह्या भानासह ह्या काळातल्या जाणीवा, अनुभव शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न! माया धर्माधिकारी ◆ कॅन्सरग्रस्त असूनही शक्यतो स्वस्थ राहू बघणारी ही लेखिका माझी सख्खी धाकटी बहीण आहे. उपचारादरम्यान व नंतर मनात होणारी भावनिक आंदोलनं, भेटलेली माणसं, जाणवलेल्या वृत्ती प्रवृत्ती, झालेले साक्षात्कार ह्यांचं तिच्याकडून झालेलं वर्णन थेट वाचणंच योग्य ठरेल... त्यातून अनेक व्यक्तीगत, सामाजिक विचारांना चालना मिळू शकेल.
-
Harkamya (हरकाम्या)
लतिफ हा किशोरवयीन मुलगा पॅराडाईज लॉजमध्ये कामाला लागतो आणि त्याचं भावविश्वच बदलून जातं. लॉजमधला हा हरकाम्या. सतराव्या वर्षी वडिलांना गमावलेल्या लतिफची गोष्ट त्याचं बेट आणि शहरातल्या लॉजच्या आवारातच घडते. दोन छोट्या बहिणी आणि आईची जबाबदारी पेलायला लतिफला नोकरी करावी लागते. लॉजवर काम करत असताना तिथं राहायला येणाऱ्या प्रवाशांविषयी त्याच्या मनात कुतूहल असतं. कधी तो दरवाज्यातून डोकावल्याबद्दल मारही खातो. तर कधी एका आत्महत्त्या केलेल्या अभिनेत्याचा शर्टही स्वतःकडे ठेवून घेतो. लॉजच्या कामादरम्यान तिथंच झाडूपोछा करणाऱ्या स्टेलाशी त्याची गट्टी जमते. एकत्र जेवतेवेळी तो तिला एका कल्पित मित्राची गोष्ट सांगत असतो. पण एके दिवशी त्याच्या या वरकरणी सुरळीत सुरू असलेल्या जगण्याला सुरूंग लागतो. आणि गोष्ट अस्वस्थ करणाऱ्या वळणावर पोहचते.
-
Masala And Murder (मसाला अॅन्ड मर्डर)
मेलबर्नस्थित अँग्लो-इंडियन प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर सॅमसन रायडरसाठी आव्हानात्मक वेळ आहे. बहिणीच्या मृत्यूबद्दल गुप्त अपराधाने तो वेढलेला आहे. कुटुंबीयांसोबतच्या नात्यात दुरावा आलेला आहे. अशात एका श्रीमंत उद्योगपतीच्या बॉलीवूड स्टार असलेल्या मुलीच्या मृत्यूचा तपास त्याच्याकडे येतो. सॅमसन हे काम पैशासाठी घेतो, पण ती त्याच्या बहिणीच्या मृत्यूच्या अपराधभावनेतून बाहेर येण्याची चाबी ठरते. सत्य शोधण्यासाठी सॅमसन त्याच्या जन्मगावी मुंबईला परततो. त्याची दुभाषी आणि गॉडमदर यांच्यासोबत संधान साधतो. आणि बॉलीवूडचा खरा चेहरा उघड करण्याचे प्रयत्न करतो. क्षणोक्षण उत्कंठा वाढणारी रहस्यमयी कादंबरी.
-
Dahi Disha (दाही दिशा)
रवींद्र ठाकूर लिखित ‘दाही दिशा' ही कादंबरी अरविंद नावाच्या एका वंचित युवकाची प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्वत:च्या पायावर उभारण्याच्या संघर्षाची कथा आहे. महाराष्ट्रातील खानदेश आणि मराठवाडा ही या कादंबरीची भौगोलिक पार्श्वभूमी आहे. प्राथमिक शिक्षकाचा पोर अरविंद. वडिलांची नोकरी व कुटुंब म्हणजे विंचवाचं बिर्हाड. अरविंद परिस्थितीने अकाली प्रौढ होतो नि काही बनण्याच्या ध्यासाने पडेल ते काम करत राहतो. अरविंद नाही नाही त्या गाढवांचे पाय धरत स्वत:चं जग निर्माण करत प्राध्यापक होतो. एका क्षणी लेखकाचीच आत्मकथात्मक कादंबरी वाटावी अशी अनेक साम्यस्थळे इथे आढळतात. अहिराणी भाषा खानदेश जिवंत करते तर नामांतर चळवळ मराठवाडा. वाचनीय तरी अंतर्मुख करणारी ही कादंबरी प्रत्येक वंचित तरुण-तरुणींना त्यांचीच वाटेल!
-
Use Of Force (यूज ऑफ फोर्स)
जगातील सर्वांत निष्ठुर आतंकवाद्यांकडून अमेरिकेला एक भयंकर संदेश पाठवला जातो - तुम्ही कुठेही सुरक्षित नाही आणि आतंकवादविरोधी कारवाईत सामील झालेला माजी सील ऑपरेिटव्ह स्कॉट हार्वथकडून त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळतं. भूमध्य समुद्रावर वादळ घोंघावत असताना इटालियन तटरक्षक दलाला एक बोट संकटात सापडल्याचा संदेश येतो. काही दिवसांनी एका बुडून मेलेल्या माणसाचा मृतदेह किनार्यावर वाहून येतो. तो मृतदेह सर्व देश गेल्या तीन वर्षांपासून शोधत असलेल्या एका संशयित दहशतवाद्याचा असतो. त्या माणसाच्या नावाने सीआयएमध्ये धावाधाव सुरू होते. तो कुठे चालला होता? त्याची काय योजना होती? जगातल्या गुप्तहेर संस्थांचा त्या उन्हाळ्यात युरोप-अमेरिकेत एक जबरदस्त आतंकवादी हल्ला होणार आहे असा अंदाज होता. त्याच्याशी त्या मृतदेहाचा संबंध असेल काय? हृदयाचे ठोके वाढवणारी साहसे, मोहिनी घालणार्या व्यक्तिरेखा आणि चक्रावून टाकणार्या कलाटण्या.
-
The Forth Estate (द फोर्थ इस्टेट)
लब्जी हॉक दुसर्या महायुद्धातून वाचला. युद्ध संपल्यावर रिचर्ड आर्मस्ट्राँग असं नाव घेऊन त्यानं बर्लिनमधली एक नवीकोरी वृत्तपत्रसंस्था विकत घेतली आणि अत्यंत धूर्तपणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धेतून बाहेर काढलं. दरम्यान, जगाच्या दुसर्या टोकावर एका लक्षाधीश वृत्तपत्र-मालकाचा, ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेऊन आलेला मुलगा कीथ टाउनसेंड आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळायला सुरुवात करतो. तो ऑस्ट्रेलियामधला अग्रगण्य वृत्तपत्र प्रकाशक बनतो. भिन्न वातावरणात वाढलेले आर्मस्ट्राँग आणि टाउनसेंड अव्वल दर्जाचे जुगारी आहेत. दिसेल त्या प्रत्येक गोष्टीवर ताबा मिळवत असतानाच या दोघांची जागतिक पातळीवर टक्कर होते. त्याच वेळी अचानक आलेली आर्थिक आपत्ती आणि कर्जाचा बोजा यामुळे ते दोघंही संकटात सापडतात. आपलं ढासळत चाललेलं साम्राज्य वाचवण्यासाठी उतावीळ झालेले दोघंही वेडेपिसे होतात. काय होतं दोघांचं पुढे? जेफ्री आर्चर यांच्या लेखणीतून साकार झालेली सर्वांत महान कारागिरी.
-
As The Crow Flies (ॲज द क्रो फ्लाइज)
Growing up in the slums of East End London, Charlie Trumper dreams of someday running his grandfather’s fruit and vegetable barrow. That day comes suddenly when his grandfather dies leaving him the floundering business. With the help of Becky Salmon, an enterprising young woman, Charlie sets out to make a name for himself as “The Honest Trader”. But the brutal onset of World War I takes Charlie far from home and into the path of a dangerous enemy whose legacy of evil follows Charlie and his family for generations. Encompassing three continents and spanning over sixty years, As the Crow Flies brings to life a magnificent tale of one man’s rise from rags to riches set against the backdrop of a changing century. सुष्ट व दुष्ट शक्तीवरील संघर्ष हा नेहमीच चाललेला असतो. ‘अॅज द क्रो फ्लाईज.’ जेफ्री आर्चर यांच्या चार्ली व बेकीच्या आयुष्यातील संघर्ष हा कित्येक वर्षं चाललेला असतो. कॅप्टन गायिल्स ट्रेंथममुळे बेकीच्या आयुष्यात वादळे येतात. मिसेस ट्रेंथम या कॅप्टन गायिल्सची आई हे वादळ थांबविण्याऐवजी त्याला हवा देतात. अनेक जीवने त्यात उन्मळून पडतात; पण मिसेस ट्रेंथम आपले एकेक दुष्ट डाव हेतुपूर्वक टाकतच असतात. या सर्वांना चार्ली व बेकी पुरून उरतात. कॅ.गाय व त्याच्या आईने टाकलेला धूर्त डाव चार्ली नेहमीच उघडकीस आणतो. कोण-कोण भेटतं या प्रवासात चार्लीला? अशा परिस्थितीतही चार्ली किती अष्टावधानी राहून प्रत्येक वेळी बेकीचे रक्षण करतो. एक भाजीविक्रेता मोठा होऊन स्वत:चं भविष्य घडवतो. सैन्यात उत्तम कामगिरी करतो. बेकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. काय आहे चार्ली व बेकी यांच्या सत्याची संघर्षगाथा? जरूर वाचा ‘अॅज द क्रो फ्लाइज’ या कादंबरीतून!