-
Brahmarshi Vivekananda Te Rajarshi Narendra Modi (
आज भारतवर्षाची विविध क्षेत्रांत होत असलेली वाटचाल, धोरणांतील स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरू भारताची लक्षणेठळक होताना दिसत आहेत. अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनीआपले जीवन घडवले, ती व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. नव्याभारताची पायाभरणी सुरू आहे. अशावेळी जगद्गुरू भारत (विवेकानंद) आणि नवा भारत (मोदी) या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून या ग्रंथाची योजना आहे. या ग्रंथात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे विद्वान लेखकांनी लेखन केले आहे. त्यामुळे या ग्रंथाला सामूहिक चिंतनाचे रूप आले आहे.
-
Hakamari (हाकामारी)
ती तीनदा हाका मारते आणि जो ओ देईल त्याला घेऊन निघून जाते! हो, खरंच हाकामारी असते! खरंच असते! त्या काळ्याकुट्ट रात्री... त्याला हाक मारणारी नक्की कोण होती? संध्या? निशा? की आणखी कोणी? नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधता येतील? की आयुष्यभर ते त्याला टोकरत राहतील? गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी!
-
Kaljugari (काळजुगारी)
काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला... आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणाऱ्या काळजुगारी स्पर्धेत! जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल? मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!
-
Perfectchi Bai Foldingcha Purush (परफेक्टची बाई फो
‘मनापासून पतंग उडवणाऱ्या’वर ‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं, पण ती त्याच्यासोबत जाईल की तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील? समस्त स्त्रीजातीला समाधान देईल असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला तरी वास्तवात खरोखरीच तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल? पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या दोन अनवट दीर्घकथा!
-
Zurangling (झुरांगलिंग)
टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ मी आहे एक लेखकदेव... एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले...अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी... अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची... झुरांगलिंग !
-
Iti - Aadi (इति - आदि)
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,' असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात.... या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात....''