-
Kaljugari (काळजुगारी)
काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला... आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणाऱ्या काळजुगारी स्पर्धेत! जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल? मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!
-
Perfectchi Bai Foldingcha Purush (परफेक्टची बाई फो
‘मनापासून पतंग उडवणाऱ्या’वर ‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं, पण ती त्याच्यासोबत जाईल की तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील? समस्त स्त्रीजातीला समाधान देईल असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला तरी वास्तवात खरोखरीच तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल? पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या दोन अनवट दीर्घकथा!
-
Zurangling (झुरांगलिंग)
टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ मी आहे एक लेखकदेव... एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले...अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी... अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची... झुरांगलिंग !
-
Iti - Aadi (इति - आदि)
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,' असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात.... या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात....''
-
Give and Take (गिव्ह अॅन्ड टेक)
गिव्ह अॅन्ड टेक इतरांना मदत केल्याने तुम्ही यशस्वी कसे होता कठोर मेहनत, भाग्याची साथ आणि प्रतिभा यांची आपल्या करिअरमध्ये मोठी भूमिका असते, हे प्रत्येकालाच माहीत असतं; पण या पुस्तकात लेखक इतरांना आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणं, हाच यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हे तत्त्व पटवून सांगतात. ‘आधी मी’ या मानसिकतेचे लोक नेहमी यशाच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचतात, या धारणेलाच हे पुस्तक छेद देतं, तसंच ते यशासंदर्भातल्या आपल्या मूलभूत आकलनात बदल घडवतं, शिवाय आपले सहयोगी, ग्राहक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी आपलं नातं कसं असावं, यासंबंधीची नवी प्रारूपं सादर करतं.
-
Prayaschitth (प्रायश्चित्त)
सतराव्या शतकात घडणारं आणि हेस्टर प्रिन या स्त्रीच्या आयुष्याभोवती गुंफलेलं हे कथानक. आपल्या मुलाच्या बापाची ओळख पटवू न शकल्यानं हेस्टर अघोरी अपमान आणि सामूहिक हिंसेला बळी पडते. हेस्टरची भूमिका तिला काळाच्या पुढची नायिका ठरवते. अनैतिक वागण्याचं सूचक म्हणून तिला तिच्या शरीरावर एक खूण बाळगण्याची शिक्षा होते. ही खूण पुढे तिचा न बदलता येणारा भूतकाळ आणि मानहानिकारक भविष्यकाळ यांचंही प्रतीक ठरते.
-
Pather Panchali (पथेर पांचाली)
बिभूतिभूषण बॅनर्जी यांची अभिजात कांदबरी. जवळपास शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखं चित्रण वाचकाला वेगळ्या विश्वात नेतं. दारिद्र्यग्रस्त जीवनात एका उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण या कादंबरीची सशक्त बाजू आहे. तिचं सिनेमाच्या रूपातील माध्यमांतरही अभिजात कलाकृती म्हणून नावाजलं गेलं आहे.
-
The Ministry Of Utmost Happiness (द मिनिस्ट्री ऑफ
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे. शहरातील एका कब्रस्तानात ‘घर’वसवणारी अन्जुम आणि तिच्या परिघातील पात्रे, एका रात्री फुटपाथवर अचानक प्रकट झालेली एक बालिका, एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष... या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकाला विविध भावभावनांचं उत्कट दर्शन घडवते.