-
Sakshi. (साक्षी)
मानवी भावभावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप गवसते. हा निरंतर संघर्ष या कादंबरीत परमेश्वरय्या यांच्या रूपाने अवतरला आहे. एका खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. पण त्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा पृथ्वीवर पाठवण्यात येत आणि त्यांचा भोवताल साक्षीभावाने पाहण्यास सांगितलं जातं. परमेश्वरय्यांचा हा प्रवास नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षातं प्रतिनिधित्व करतो.
-
Kalpavrukshachi Kanya (कल्पवृक्षाची कन्या)
पौराणिक ग्रंथांमध्ये स्त्रिया कमी आढळत असल्या, तरी त्यांच्या अंगची शक्ती, ऊर्जा आणि गूढता यांचं पानोपानी वर्णन आढळतं. त्यांनी राक्षसांचं निर्दालन करून भक्तांचं रक्षण केल्याच्या कथाही आहेत. या कथासंग्रहात पार्वती,अशोकसुंदरी आणि भामतीपासून मंदोदरीपर्यंत अनेक निर्भय स्त्रिया भेटीस येतात. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या या स्त्रिया स्वत:च्या नशिबाच्या शिल्पकारही होत्या.
-
E.S.2595 ( इ.स.२५९५)
वैज्ञानिक प्रयोग माणसाला प्रगतिपथावर नेतात; पण या प्रयोगांमध्ये काही त्रुटी राहिल्या, चूक झाली किंवा त्या प्रयोगाचा कुणी गैरवापर केला तर किती गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि माणसाच्या भावविश्वाला त्यामुळे कसा सुरुंग लागतो, याचं प्रभावी चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘इ.स.२५९५.’ यातील ‘जिवंत मशीन’ या कथेतील प्रो. समीर, रीबी नावाचा स्त्री रोबोट बनवतात; पण रीबीकडून सरिताचा खून होतो...‘विचित्र नाती’ कथेतील विनय आणि मनोरमा हे दाम्पत्य परस्परांवर प्रेम करणारं...पण मनोरमाला जीवघेणा अपघात होतो आणि ती मरणाच्या दारात पोचते...विनय तिला क्लोनिंगद्वारे जिवंत ठेवू पाहतो...पण त्यामुळे कशी गुंतागुंत होते? ‘आणि एक स्वप्न विरले’ या कथेत परस्परांना ओळखत नसलेल्या चार व्यक्ती काही कारण नसताना आत्महत्या करतात...पण पोलीस तपासात आत्महत्यांमागचं वैज्ञानिक सत्य उलगडतं...काय असतं ते सत्य?...वैज्ञानिक प्रयोगांतून उद्भवलेल्या गंभीर समस्यांचं भेदक आणि उत्कंठावर्धक चित्रण करणाऱ्या कथा.
-
Faiz Ahmed Faiz Ek Pyasa Shayar ( फैज अहमद फैज एक
फैज अहमद फैज. एक सुप्रसिद्ध उर्दू शायर. मूळचे लाहोरचे.फाळणीनंतर त्यांनी भारतात राहावं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा प्रयत्न केला, पण ते तिकडेच गेले. आणि अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या गझलांमधून व्यक्त करीत राहिले.तसे फैज होते मार्क्सवादी, डाव्या विचारसरणीचे. रशियाचे समर्थक. ‘लेनिन’ पारितोषिकाचे पहिले मानकरी. आणि तरीही ‘पाकिस्तानी’ साहित्यविश्वात रमणारे. त्यांचं हे चरित्र. फैज यांच्या गाजलेल्या गजला, त्यांची पत्रकारिता, त्यांची तुरुंगवारी, त्यांची प्रेमप्रकरणं, त्यांच्या आयुष्यातीले असंख्य चढउतार...फैज आणि त्या सर्वांपेक्षाही वरचढ ठरलेली त्यांची अर्धीमुर्धी स्वप्नं... जगावेगळं तेजोवलय लाभलेल्या एका कवीचं रसीलं चरित्र.
-
Mahantecha Dishene Ekatr Yevuya Badal Ghadvuya
महानतेच्या दिशेने एकत्र येऊया, बदल घडवूया एखादं गंभीर आव्हान समोर उभं राहिल्यावर त्यावर यशस्वीपणे मात करतं; सोबतच स्वतःमधील सर्वोत्कृष्ट क्षमतांचं प्रदर्शन घडवतं, तेच राष्ट्र महान असतं. अशा राष्ट्रातील लोक समस्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करत त्या समस्येला पराभूत करतात. जागतिक क्रमवारीत भारताचा ज्या स्थानावर न्याय्य अधिकार आहे, ते गौरवशाली स्थान प्राप्त करण्यासाठी भारताला अजून खूप काही शिकावं लागेल आणि ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या पुस्तकात सांगतात. युवकांना, शिक्षकांना, शेतकर्यांना, सरपंचांना, आरोग्य कर्मचार्यांना, सनदी अधिकार्यांना, न्याय संस्थेतील कर्मचार्यांना, राजकीय नेत्यांना काही महत्त्वाचे संकल्प करण्यासाठी ते या पुस्तकात आवाहनही करतात.
-
Samagra Jayant Naralikar (समंग्र जयंत नारळीकर)
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या – प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या – विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्या – या पाच कादंबर्या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !
-
When We Were Offerns
साहित्यातील नोबेल पारितोषिक आणि बुकर पारितोषिक-कादंबरी लिहिणार्या कादंबरी लेखक 'द रेमाइन्स ऑफ दि डे' या कल्पनेतून हे आश्चर्यकारक काम केले. विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या शांघायमध्ये जन्मलेल्या, त्याच्या पालकांच्या स्वतंत्र गायब झाल्यानंतर बॅंकांना वयाच्या नऊव्या वर्षी अनाथ केले गेले. आता, वीस वर्षांपेक्षा जास्त काळानंतर, तो लंडनच्या समाजातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे; तरीही त्याला प्रसिद्धी मिळालेल्या संशोधनात्मक कौशल्यामुळे त्याच्या पालकांच्या कथित अपहरणांची परिस्थिती प्रकाशझोत टाकू शकली नाही. आपल्या स्वत: च्या, वेदनादायक भूतकाळाचे रहस्य सोडवण्याच्या आशेवर बँका त्याच्या आठवणीच्या सीथिंग, चक्रव्यूहाच्या शहराकडे जातात, केवळ युद्ध हे जाणवते की शांघाय प्रतिष्ठेच्या पलीकडे आहे आणि त्याच्या स्वत: च्या आठवणी आसपासच्या लोकांवर विश्वास ठेवणे तितके कठीण आहे. त्याला. कुशल, संशयास्पद आणि मानसिकदृष्ट्या तीव्र, जेव्हा आम्ही अनाथ होतो तेव्हा स्मृतीच्या बदलत्या गुणवत्तेवर आणि एखाद्याच्या भूतकाळाचा बदला घेण्याची शक्यता यावर सखोल ध्यान ऑफर करते.