-
Dangerous Minds (डेंजरस माइंड्स)**
‘दहशतवादी दुनियेची दस्तक’ कशी असते, हे आपल्याला ‘डेंजरस माइंड्स’ मधून दिसून येते. विकृत व स्वार्थी प्रवृत्ती देशद्रोह करण्यास तरुणांना भाग पाडतात. ‘जन्नत आणि जिहाद’ च्या गैरसमजांतूनच दहशतवाद पोसला जातोय. या मूठभर ‘दहशती जगताला’ कायमची वेसण घालण्याचे महानकार्य आपले सैनिक करत आहेतच. यासाठी देशातल्या प्रत्येकाने आपले योगदान, शिस्त, वर्तन चांगले ठेवून सतर्क राहणे गरजेचे आहे, हेच ‘डेंजरस माइंड्स’ आपल्याला सांगत आहे.
-
Deserter(डेझर्टर)
आघाडीवर प्राण पणाला लावून लढणार्या, दुर्दैवी परिस्थितीवर मात करणार्या साहसवीरांची अर्थात ल लष्करातील ढवय्या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा उलगडवून दाखविणारी कादंबरी ‘डेझर्टर्स’. या कादंबरीतील संघर्ष, नाट्य, शोकांतिका, व्यथा-वेदना वाचकाचे मन खिळवून ठेवतात. सैनिक कसे तोंड देतात या युद्धपरिस्थितीला? का ‘डेझर्टर्स’ म्हणून घोषित केलं जातं त्यांना? सैनिकांच्या पलायनामागील घेतलेला अचूक शोध म्हणजेच ‘डेझर्टर’
-
The Stories We Tell (द स्टोरीज वी टेल)
‘द स्टोरीज वी टेल : पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधताना’ या पुस्तकात प्रख्यात पुराणकथा अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी भारतातील व जगभरातील पुराणकथांच्या खजिन्यातून ७२ रत्ने निवडली आहेत. `टी टाईम टेल्स’ या त्यांच्या वेबकास्टमध्ये त्यांनी सांगितलेल्या कथांवर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकात त्यांनी पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचकाला काळाच्या प्रदीर्घ टप्प्याची अनोखी सफर घडवते.
-
Khulbhar Dudhachi Kahani (खुलभर दुधाची कहाणी)
अमरापूरकर हे नाव ऐकलं की लगेच चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नजरेसमोर अवतरतो. अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांचा. एकीकडे हा दिग्गज अभिनेता आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर ठसा उमटवत होता, तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर त्यांची सहचारिणी सगळ्या ताळमेळाचं नेमकं गणित मांडत होती. म्हटलं तर ती खुलभर दुधाची कहाणी आणि म्हटलं तर एका दीर्घ प्रवासाचा नितळ पट. ज्यात सुनंदा अमरापूरकर आपल्या जीवनपटाची छोटी छोटी क्षणचित्रे असोशीने जगतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके...शैक्षणिक प्रवास...नाटकातूनच सदाशिव अमरापूरकरांशी जुळलेले सूर आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह...विवाहोत्तर जीवन...असा हा पट. पतीच्या प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर ठेवून त्यांनी एका कलावंताला आवश्यक असणारा अवकाश जोपासला. त्याच वेळी साऱ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. स्वतः नाटकात काम करण्याची क्षमता असूनही नवऱ्याचं कलावंतपण जोपासण्यासाठी इच्छेला मुरड घातली. सदाशिव अमरापूरकरांच्या करिअरसाठी मुंबईला केलेलं स्थलांतर असो वा दोन शहरातला, नातेसंबंधातला आपुलकीचा धागा कायम जोपासणं असो, सुनंता अमरापूरकरांनी सगळं अढळ श्रद्धेनं केलं. सोबत अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळंच त्यांचं हे आत्मकथन निष्ठेनं संसाराची सूत्रे चालवणाऱ्या खमक्या स्त्रीचं चरित्र वाटतं. माणसांनी, छोट्या-मोठ्या घटना-प्रसंगांनी गजबजलेलं बहुआयामी आणि हृदयस्पर्शी आत्मकथन...
-
Tanviche Abhal (तन्वीचं आभाळ)
‘तन्वीचे आभाळ' हे डॉ. मेधा मेहेंदळे या प्रतिभावान स्त्रीचे चरित्र लिहिलंय तितक्याच प्रतिभावान महिलेने ! डॉ. शुभा चिटणीस यांनी ! शुभाताई सर्व ठाण्याला जवळून परिचित आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांतील दिग्गजांवर वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून व वेगवेगळ्या ग्रंथांतून असंख्य व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहिलेले आहेत. चरित्रेही लिहिलेली आहेत. त्यांचे लेखन महाराष्ट्रात सर्वत्र गाजले आहे... तेच डॉ. मेधा मेहेंदळेंच्या चरित्रलेखनातून पानोपानी जाणवत आहे...डॉ. मेधा यांनी निसर्गोपचार- प्रसारक म्हणून चिमूटभर सत्त्वातून जे आभाळ उभे केले आहे त्याला तोड नाही. छोट्या मेधा देसाई ते आजच्या जगप्रसिद्ध 'तन्वी' निर्मात्या डॉ. मेधा मेहेंदळे यांचा प्रदीर्घ जीवनप्रवास विलक्षण आत्मीय आणि वाचनीय झालेला आहे. शून्यातून आयुर्वेदासारख्या आभाळाला कवेत घेणे सोपे नाही. ते अवघड कार्य डॉ. मेधा मेहेंदळे यांनी केलेले आहे. त्यांचे कर्तृत्व डॉ. शुभा चिटणीसांनी विलक्षण बोलके केले आहे. मी या चरित्र ग्रंथास शुभेच्छा देतो. वाचकांचे अभिनंदन करतो. 'तन्वी हर्बल्स' चिरायू होवो ! - अशोक समेळ, ज्येष्ठ नाटककार
-
Nivdak Chin.Tra.Khanolkar : Nakshtra Dena (चिं. त्
मराठी साहित्यविश्वात एक अनाम पक्षी थोडाच वेळ फांदीवर बसला आणि उडूनही गेला. पण त्या पक्ष्याने अंत:करणातील सूर आळवले. त्या सुरांमुळे सर्व भावविश्व ढवळून निज्ञाले, इतकी त्या सुरातील आर्तता विलक्षण होती. त्या सुरांनी सर्व साहित्यविश्व गंधित झाले. ते सूर आजही विसरले गेलेले नाहीत. त्या सुरांची मोहिनी आजही सर्वांच्या मनात कायम आहे. आणि त्याने दिलेले 'नक्षत्रांचे देणे' आजही कायमस्वरूपी मनी वसलेले आहे. हा अनामपक्षी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कोकणाने महाराष्ट्राला दिलेले एक तेजस्वी रत्न ! चिं. त्र्यं. खानोलकर - आरती प्रभु ! त्यांची साहित्यातली काही 'निवडक नक्षत्रे', त्यांच्या काही साहित्यकृतींद्वारे आपल्यासमोर ठेवत आहोत. मनात कृतज्ञतेची भावना दाटून येत आहे "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणेमाझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने..." --- डॉ. माधवी वैद्य
-
Kala Vidushak Ani Gori Swapnapari (काळा विदूषक आणि
टक्कर भीषण होती. आता दोन्ही गाड्या उडून स्वतः भोवतीच फिरु लागल्या होत्या. सगळ्या खिडक्यांच्या काचा एकाच क्षणी खळ्ळकन फुद्धन त्यांचे तुकडे आसमंतात उडत होते. वेदनेची एक जीवघेणी कळ सेंमीच्या शरीरातून सर्रकन फिरली. पण आपण जिवंत कसे, हेच त्याला कळत नव्हते चार्ली मागच्या सीटवर होता. त्याचे कण्हणे सेंमीच्या कानावर आले. नशीब तोही अजून जिवंतच होता. सॅमीने सुस्कारा सोडत देवाचे आभार मानले. आपल्या चेहऱ्यावरुन रक्ताचे ओघळ वाहात असल्याची त्याला जाणीव झाली. काही क्षणांतच ते त्याच्या डोळ्यांत उत्तरुन त्याला क्षणभर दिसेनासेच झाले. 'चार्ली, तू ठीक आहेस ना बाबा?' त्याने विचारले. तो वळला. चार्ली खालून वर उठण्याचा प्रयत्न करीत होता. सॅमीने दरवाजा उघडला आणि तो त्याच्या मदतीस धावला. मागच्या सीटवर जाऊन त्याने त्याचा दंड पकडला. चार्लीचा जबडा लटकत होता आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहात होते. 'बापरे। काय रे चार्ली, हे काय झाले रे ? माझ्यामुळे ?' सॅमीने चिचारले.
-
The Scapegoat (द स्केपगोट)
आता माझं नाव जॉन होतं आणि ते जीन कधीपासून झालं, याचा विचार माझ्या मनात आला. कदाचित तो माणूस मला कुठेतरी ओळखणारा असावा. मी त्याला ओळखावं अशी त्याची रास्त अपेक्षा दिसली. त्याला नाराज करणं माझ्या जिवावर आलं आणि मी फ्रेंचमध्येच म्हणालो 'असाच चाललो होतो इथून. आज रात्री मी परत चाललोय.' तो कोण होता, देव जाणे! 'तुझी आजची भेट फुकट गेली असेल?' तो म्हणाला, 'पण तू घरच्यांना मात्र सांगशील की ती कामाला आली ?' हा भलताच आरोप होता माझ्यावर. त्याला कशानं वाटलं, की माझी सुट्टीतली भेट फुकट गेली म्हणून ? बाकी माझा मूड खराब होता ही गोष्ट खरी होती. पण मी एक अपयशी माणूस होतो. ही गोष्ट त्याला कशी काय कळली ? मग माझ्या लक्षात आलं, की तो एक परका माणूस होता. मी त्याला यापूर्वी कधीच बघितला नव्हता. मी नम्रपणानं झुकलो आणि म्हणालो, 'आय बेग युवर पार्डन. मला वाटतं आपला दोघांचाही काहीतरी गैरसमज झालाय.' पण उलट तो चक्क हसला व त्यानं मला डोळा मारला. मी चकित झालो. 'ठीक आहे बाबा. आपण भेटलोच नाही असं समज. पण पॅरिसमध्ये करता येण्यासारख्या गोष्टी तू इथे मध्ये कशाला करतो आहेस ? हरकत नाही, आपण नाहीतरी पुढच्या रविवारी भेटतोच आहोत! तर तेव्हा उत्तर दे. ठीक आहे?' आणि त्यानं क्लचवर पाय दाबला आणि तो निघालादेखील. जातानादेखील तो हसतच होता.
-
Under Water (अंडर वॉटर)
'अंडरवॉटर' हा शब्द उच्चारताच नजरेसमोर अथांग असा महासागर पसरतो. पाण्याखालील परिसर उभा राहतो. अंडरवॉटर यातील कथांमधील प्रसंग आणि निसर्गातील संघर्ष सत्य घटनेतच सामावलेले आहेत. निरनिराळ्या धाडसी माणसांनी ते अनुभव आपल्या आयुष्यात घेतलेले आहेत. पाण्याखाली काम करणाऱ्यांचे, पाणबुड्यांचे, मच्छीमारी करणाऱ्यांचे, संशोधकांचे तसेच गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांचे ते अस्सल अनुभव आहेत. संपादक फिल हिरच यांनी ते सर्व अनुभव एकत्रित संकलीत केलेले आहेत.
-
Jwel Thief (ज्वेल थीफ)
सकाळी साडेसात वाजता तो उठला. तोसुद्धा धडधडा जिना चढल्याच्या आवाजाने. बघतो तो पेनेलपी धावत त्याच्याकडे येत होती. 'पपा, पपा, हिरा चोरीला गेलाय !' ती किंचाळली. 'काय वेड लागलंय का तुला ?' 'अहो, खरंच सांगते, गेलाय. अजिबात दिसत नाहीये तिथे तो. कसा गेला, कुठे गेला, कुणी नेला, कुणालाच माहिती नाही.' तिनं त्याला रेचेलच्या सिटिंग रुममध्ये ओढत नेलं. बेडरुमच्या दरवाजातच ती उभी होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. तिच्या इंडियन कॅबिनेटचे दोन्ही दरवाजे सताड उघडे होते. त्यातला एक ड्रॉवरही बाहेर खेचलेला होता. 'हे खरं आहे, मिस ?' बेटरएजने विचारलं. तिनं निर्जीवपणे मान हलवली. 'होय, तो हिरा गेलाय !' हे बोलून ती बेडरुममध्ये गेली आणि तिनं दरवाजा आतून घट्ट बंद करुन घेतला.
-
Patanjalyogdarshan (पातंजलयोगदर्शन )
उपनिषदांचा काळापासूनच भारतीय तत्त्वचिंतकानी मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा गंभीर प्रयत्न सातत्याने केला आहे. भौतिक जगापलिकडे असलेल्या गूढ अशा सृष्टीच्या परमतत्त्वापर्यंत मानवी अस्तित्व पोहोचू शकते का? विस्तारू शकते का, याचा शोध घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे योगसाधना! याची जाणीव झाल्यावर भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा फार मोठा भाग योगसाधनेच्या अनेक मौलिक प्रणालींनी व्यापला आहे. पातंजल महाभाष्याबरोबरच योगसूत्रांचेही कर्तृत्व ज्यांच्याकडे जाते ते पतंजली इसवीसनापूर्वी सुमारे दीडशे वर्षे होऊन गेलेले महापंडित. त्यांचे योगदर्शन म्हणजे भारतीय योगविषयक तत्त्वाचिंतनाचा सर्वमान्य आणि सर्वाधिक प्रमाण मानला गेलेला ग्रंथ आहे. पूर्वाभ्यासांच्या आधारे या योगसूत्रांचे साधे आणि आकलनसुलभ असे विवेचन इथे केले आहे. साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्वांना योगशास्त्राची ओळख करून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे असे लक्षात येते. एक महत्त्वाचा योगविषयक ग्रंथ सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत यावा ही या पुस्तकामागची प्रेरणा अभिनंदनीय आहे. - डॉ. अरुणा ढेरे