-
VICTORY CITY (व्हिक्टरी सिटी)
पंपा कंपाना ही बिसनागची राणी, कवयित्री तर होतीच; पण ती एक लोकविलक्षण स्त्री होती. ती नऊ वर्षांची असताना तिला देवीचा साक्षात्कार झाला. तिच्या अंत:प्रेरणेतून बिसनाग नगराची निर्मिती झाली. त्या नगरीचा पहिला राजा हक्कपासून शेवटचा राजा अळीय राया इथपर्यंतचा काळ तिच्या दोनशे सत्तेचाळीस वर्षांच्या आयुष्यात तिने पाहिला. पंपा कंपानाचा निर्भयपणा, कलाप्रेम, युद्धकौशल्य इ. गुणांतून तिचं व्यक्मित्त्वं तर ही कादंबरी उलगडतेच; पण तिने पाहिलेल्या राजकीय कारकिर्दींपेक्षा त्या कारकिर्दितील मानवी स्वभावाचे, अंतर्मनाचे पैलू उलगडून मानवी मनाचं, जीवनाचं वास्तव, सूक्ष्म आणि थक्क करणारं दर्शन ही कादंबरी घडवते. The epic tale of a woman who breathes a fantastical empire into existence, only to be consumed by it over the centuries—from the transcendent imagination of Booker Prize-winning, internationally bestselling author Salman Rushdie. In the wake of an insignificant battle between two long-forgotten kingdoms in fourteenth-century southern India, a nine-year-old girl has a divine encounter that will change the course of history. After witnessing the death of her mother, the grief-stricken Pampa Kampana becomes a vessel for the Goddess, who begins to speak out of the girl's mouth. Granting her powers beyond Pampa Kampana's comprehension, the goddess tells her that she will be instrumental in the rise of a great city called Bisnaga—literally 'victory city'—the wonder of the world.
-
SYCAMORE ROW (सिकॅमोर रो)
सेथ हबर्ड यांनी त्यांच्या प्रचंड संपत्तीचा नव्वद टक्के भाग त्यांच्याकडे घरकाम करणार्या लेटी लँग नावाच्या गरीब, कृष्णवर्णीय मोलकरणीला मृत्युपत्राद्वारे देऊन टाकला होता! अर्थातच मृताच्या नातेवाइकांनी मृत्युपत्राच्या वैधतेला कोर्टात आव्हान दिलं. लेटीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. अन्यही आरोप झाले तिच्यावर; पण वकील जेक ब्रिगन्स लेटीच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता; कारण त्यानेच आपल्या मृत्युपत्राची केस चालवावी असं सेथ यांनी मृत्युआधी त्याला लिहिलेल्या पत्रात बजावलेलं होतं. असं काय कारण घडलं असावं, की ज्यामुळे सेथ हबर्ड यांनी त्यांच्या अगदी अखेरच्या क्षणी नवं मृत्युपत्र लिहून त्यांची बहुतेक सगळी मालमत्ता लेटीला देऊन टाकली? त्यांनी आत्महत्या करण्यासाठी फार पूर्वी ‘सिकॅमोर रो’या नावाने ओळखल्या जाणार्या एका निर्जन भागाची निवड का केली? त्यांनी ज्याचं वर्णन ‘कोणीही आयुष्यात कधीही बघू नये’ या शब्दांत केलं, असं कोणतं भयंकर दृश्य त्यांनी आणि त्यांच्या भावाने त्यांच्या लहानपणी पाहिलं होतं? Seth Hubbard bequeathed ninety percent of his vast fortune to a poor, black maid named Lettie Lang who worked for him as a housekeeper! Of course, the relatives of the deceased challenged the validity of the will in court. Letty's character was assailed. There were other allegations against her; But attorney Jake Brigance stood firmly by Letty's side; Because Seth had warned him in a letter written to him before his death that he should handle the case of his will. What could have caused Seth Hubbard to write a new will in his final moments, leaving most of his property to Letty? Why did he choose a secluded area long ago known as 'Sycamore Row' to commit suicide? What horrible sight did he and his brother witness in their childhood, which he described as 'no one should ever see in his life'?
-
SHAHU MAHARAJANCHYA ATHAVANI (शाहू महाराजांच्या आठ
ज्यांना शाहू महाराजांचा सहवास लाभला अशा लोकांनी महाराजांच्या सांगितलेल्या आठवणींचं हे भाई माधवराव बागल यांनी केलेलं संकलन आहे. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या आठवणींमधून समोर येतात. प्रयाग स्नानाला महिनाभर जात असताना महाराज शूद्र आहेत म्हणून पुराणोक्त सांगणार्या नारायण भटजींमुळे महाराजांना ब्राह्मण्याचा बसलेला पहिला तडाखा, महाराजांच्या विश्वासातील ब्राह्मण लोक, गोविंदराव टेंबे यांच्या सांगण्यावरून एका असहाय विधवेला मदत करण्यासाठी महाराजांनी शोधलेला सयुक्तिक मार्ग, गंगाराम कांबळेच्या चहाच्या दुकानासमोर जाऊन महाराजांचं चहा पिणं, महाराजांच्या मेहुण्याने त्यांच्या हुजऱ्याला स्वत:च्या पायातले बूट काढायची केलेली आज्ञा आणि महाराजांनी मेहुण्याची केलेली कानउघाडणी, बालगंधर्व, आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना महाराजांनी दिलेलं प्रोत्साहन इ. आठवणींमधून महाराजांचं पुरोगामी, दिलदार, प्रेमळ, न्यायप्रिय, द्रष्टं, गुणग्राहक, हजरजबाबी, साधेपण जपणारं व्यक्तिमत्त्व समोर येतं. THIS BOOK, COMPILED BY BHAI MADHAVRAO BAGAL, IS A COLLECTION OF THE REMINISCENCES OF ALL THOSE PEOPLE WHO GOT AN OPPORTUNITY TO SPEND VALUABLE TIME WITH SHAHU MAHARAJ. VARIOUS ASPECTS OF HIS PERSONALITY ARE REFLECTED FROM THESE MEMORIES. WHILE MAHARAJ USED TO GO FOR A BATH IN PRAYAG FOR A MONTH, NARAYAN BHATJI CHANTED SHLOKAS AS HE WAS FROM SHUDRA COMMUNITY. THIS WAS THE FIRST BLOW OF BRAHMINISM RECEIVED BY SHAHU MAHARAJ. INSPITE OF THIS, HE FOUND A SOLUTION TO SUPPORT A HELPLESS WIDOW ON THE ADVICE OF GOVINDRAO TEMBE AND OTHER BRAHMINS THAT HE TRUSTED. MAHARAJ WAS HUMBLE ENOUGH TO HAVE TEA IN GANGARAM KAMBLE`S TEA SHOP. MAHARAJA`S BROTHER-IN-LAW ORDERED MAHARAJ’S ATTENDANT (HUJRYA) TO REMOVE HIS SHOES. HOWEVER, MAHARAJ DID NOT APPROVE OF THIS AND REPRIMANDED HIM. THIS BOOK ALSO TELLS US ABOUT THE ENCOURAGEMENT GIVEN BY THE MAHARAJA TO ARTISTS LIKE BALGANDHARVA, ABALAL RAHIMAN AND SO ON. FROM THE RECOLLECTIONS, MAHARAJA`S PROGRESSIVE, KIND HEARTED, LOVING, JUSTICE-LOVING, VISIONARY, MERITORIOUS, HUMBLE, SIMPLE PERSONALITY COMES TO THE FORE.
-
Krishndwaipaayan Maharshi Vedvyas (कृष्णव्दैपायन म
Krishndwaipaayan Maharshi Vedvyas (कृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास)
-
-
Swarswamini Asha(स्वरस्वामिनी आशा)
माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती; जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. 'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे' हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे; त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातलीहोती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या 'आमचे छोटे दादा' यामध्ये आलीआहे, पण जिभेने ती जरा तिखट आहे. आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे. थोडक्यात काय तर मंगेशकरांच्यासोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे. स्वकष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणिकलेच्या अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे. -- शांता शेळके
-
Cyber Attack(सायबर ॲटॅक)
बिनचेहऱ्याच्या व्यक्तीने फेकलेले जाळे आणि त्याला लावलेली वेगवेगळी आमिषे. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण यात सहजपणे अडकतात. लोन फ्रॉड, एटीएम क्लोन, ऑनलाईन गेमिंग, घसघशीत उत्पन्नाची लालूच दाखवणारे प्रीपेड टास्क, कार्ड फ्रॉड, फिशिंग, इन्व्हॉईस फ्रॉड... एक ना दोन, अनेक प्रकार. सायबर फ्रॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बनवाबनवीत आपले बँकखाते एका झटक्यात रिते होते. मोबाईलवरून किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून अनेकांना जाळ्यात अडकवणाऱ्या या ठकसेनांपासून स्वत:चा बचाव करायचा एकच मार्ग - सजग राहणे, या जाळ्यात न अडकणे. त्यासाठीच हे पुस्तक वाचायचे आणि त्यामधून योग्य ते धडे घ्यायचे, सावधपणे पुढच्या हाका आधीच ऐकायच्या ! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा दाखवणारे - सायबर गुन्ह्यांबाबत सर्वांना सतर्क बनवणारे
-
-
Audumbaravat Eka Shoor Yoddhyachi Vilupt Kahani
आज तो सम्राट आहे पण जन्मापासून तो मेळघाटच्या जंगलात राहणारा एक शिकारी योद्धा होता. आपल्या मातेला मिळालेल्या यातनांचा आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी तो आपल्या जंगलाच्या कायद्याविरुद्ध गेला आणि औदुंबरावतचा सम्राट झाला. त्याचा संघर्ष त्याला पराक्रमी वीर बनवून गेला. त्याने आपल्या ताकदीने भारतवर्षांतील अनेक बलशाली मल्लांना चित केल तो त्या युगाचा नायक ठरला, तो औदुंबरावतच्या जनतेचा रक्षक ठरला. "औदुंबरावत" ही त्याच्या पराक्रमाचीच गोष्ट नाही तर त्याची एक निरागस प्रेम कहाणी देखील आहे. अमरावतीच्या मातीत दडलेली एक विलक्षण गाथा.
-
Jyacha Tyacha Everest (ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट )
ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट हिमालय अनेकांना वेड लावतो . का? कसं ? एव्हरेस्ट सारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुनःपुन्हा हिमालयाकडे का वळतात ? सत्य घटनेवर आधारित कादंबरी!
-
Savashna(सवाष्ण)
लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंबऱ्यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची...? आता तो सगळा दिमाख ओसरलाय... कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची? अंधाऱ्या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर? का? काय घडलं असं? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय. कधी होईल का या रहस्यांचा उलगडा? माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे?
-
Made In China(मेड इन चायना)
आपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं
-
Marathi Bhasha : Lekhan-Margadarshan (मराठी भाषा :
श्री. सलील वाघमारे हे शासनमान्य मराठी लेखनविषयक नियमांचे केवळ अभ्यासकच नाहीत, त्या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. हे या लेखांच्या स्वरूपावरूनच लक्षात येते. शिवाय, शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतकेच नव्हे तर, मराठी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांना, वृत्तपत्रांना, औपचारिक लेखन करणाऱ्यांना, शासकीय लेखन करणाऱ्यांना अशा सर्वांना निर्दोष लेखन करता यावे, या उद्देशाने सोप्या शब्दांत केलेले विवेचन हे ह्या पुस्तकातील लेखांचे वैशिष्ट्य आहे. या सर्व लेखांतून मराठीच्या विविध शब्दांचे लेखन, त्यासंदर्भात येणारे काही व्याकरणातील शब्द, सामान्य वाचकाला अपरिचित शब्द, यांचे स्पष्टीकरण श्री. वाघमारे यांनी इतक्या सोप्या, सुलभ पद्धतीने केले आहे, की त्यामुळे सर्वसामान्य मराठी भाषकांना हे पुस्तक अतिशय आवडेल, ते संग्राह्य वाटेल, इतकेच नव्हे, तर त्या पुस्तकाचे वारंवार वाचन करून मराठीच्या विविध शब्दांचे अनुकरण करावे, असे वाटेल. यास्मिन शेख (ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ)
-
Lavnaya Nakshatra (लावण्य नक्षत्र...)
लावणी आणि तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. आजवर तमाशा कलावंतांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र ही कादंबरीदेखील प्रत्येकाप्रमाणेच वेगळी आहे हे निश्चित. यात एक नायक, एक नायिका आणि त्यांचं प्रेम आहे. तसंच दोन बहिणींचं घट्ट नातं कसं असतं हे देखील यात दाखवलं आहे. मात्र तरीही ही केवळ एक प्रेमकहाणी आहे असं मी म्हणणार नाही. अर्थात असं का, ते वाचकांच्या ही कादंबरी वाचल्यानंतरच लक्षात येईल. या कहाणीमध्ये फक्त प्रेम नाहीये. तर विरहही आहे, दुःख आहे, वेदना आहेत, ताटातूट आहे. त्याच जोडीला लावणीची साधना आहे, त्याग आहे, घुंगरांचा नाद आहे, ढोलकीचा आवाज आहे, गरिबी आहे, प्रसिद्धी आहे, अन्याय आहे, विद्रोह आहे, समर्पण आहे आणि समाधानसुद्धा. म्हणूनच ही फक्त प्रेमकहाणी नसून जीवनकहाणी आहे.