-
Soulmate (सोलमेट)
सातासमुद्रापार राहणारा, २/३ वर्षातून कधीतरी फक्त ३/४ दिवसांसाठी भेटणारा, कधीही फोन म करणारा असं एक कुणी माझ्ह्यासाख्या मध्यमवर्गीय स्त्रीचा सोलमेट असू शकतो ? केवळ तोकडे कपडे घातले म्हणजे आम्ही मुली यांच्यासाठी उपलब्ध असतो का ? पण मग आईवडिलांनी मुलांची काळजी करायचीच नाही का ? कोण चूक आणि कोण बरोबर ? काहीही असले तरी आयुष्यातली सुरवातीची १३-१४ वर्ष आम्ही एकत्र काढली आहेत. आता आयुष्याच्या उत्तरार्धात हा एकटेपणा सहन करण्यापेक्षा तिला परत घरी बोलावून तिच्याबरोबर राहायला काय हरकत आहे ?
-
Sath Sath-The Silent Defenders (साथ साथ-द सायलेंट
Nation First, Duty First या आपल्या योद्ध्याने घेतलेल्या शपथेला मनापासून साथ देणं सैनिकपत्नीला जमलं तरच संसार सुखाचा होतो. आपल्यापेक्षा महत्त्वाचं, त्याच्या आयुष्यात आधीच काहीतरी आहे हे जाणणं आणि त्याबद्दल प्रेम, आनंद आणि अभिमान असणं हे खूप महत्त्वाचं. किंबहुना त्यामुळेच अधिकाधिक स्वतंत्र आणि खंबीरपणे एकटीने निर्णय घेणं आणि निभावणं हे जमू लागतं. कारणपरत्वे, न डगमगता काही दिवस, महिने किंवा काही वर्षांसाठी देखील एकटे राहणे, इतर कोणाच्या मदतीशिवाय आणि एकत्र असतानाही रोजच्या दिनक्रमात त्याला गृहित न धरता आपल्या मुलाबाळांसकट स्वतःचीही सकारात्मक वाढ करणे हे प्रशिक्षण होत जाते. म्हणूनच सैनिकांच्या पत्नींना army behind army, Silent Ranks, Rear Guards, Silent Defenders अशी अनेक संबोधने दिली जातात ती अगदी समर्पक वाटतात.
-
Tumchi Jaat Kay (तुमची जात काय)
कवितेचा 'आदिबंध' जपणारे जे काही निवडक कवी आहेत, त्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या या पाचव्या संग्रहातील अवकाश 'खोलवर प्रतिक्रियात्मक' असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. वर्तमानात आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्त्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तोच आहे. ही कविता आत्मचरित्रात्मक वाटत असली तरी फॅसिस्ट जातीय प्रवृत्तींबरोबर दोन हात करतानाचा स्वर मात्र समताधिष्ठित आहे. ८०-८५ नंतर मराठी कविता म्हणून थेट हिंदी कविता लिहिणाऱ्या अनेकांना लिंबाळे यांची ही कविता अनुकरणीय वाटायला हवी, असा ऊर्जास्त्रोत तिच्यात आहे.
-
Tisarya Parvakade (तिसऱ्या पर्वाकडे)
गेली साडेनऊ वर्षे भारतात 'मोदी पर्व' सुरू आहे. या काळात मोदींनी परराष्ट्र संबंध, सीमा सुरक्षा, ईशान्य भारतातील राज्यांच्या समस्या, सुरक्षा दलांतील सुधारणांबरोबरच गेली सत्तर वर्षे रखडलेले ३७० कलम, तोंडी तलाक यांसारखे प्रश्नही सोडवले. महिलांसाठी भरघोस काम, गरिबी, बेरोजगारीच्या क्षेत्रांतील आशादायक काम, शेतकऱ्यांच्या जटिल समस्यांचे निराकरण, यांबरोबरच शिक्षण, दळणवळण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही देशाच्या प्रगतीचा रथ सुसाट वेगाने धावतो आहे. या वेगाला आणखी एका पर्वाची संधी मिळाली, तर ती नक्कीच 'सुवर्णसंधी' ठरेल!
-
Maurya Chandragupta Te Samrat Ashok Parshwabhumi G
चंद्रगुप्त ते सम्राट अशोक पार्श्वभूमी, गाथा आणि वार इ.स.पूर्व ३२४ ते इ.स.पूर्व १८५ या काळात मौर्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडावर कार्यक्षमतेने आणि राज्यववस्थापनातील कौशल्याने राज्य केले. ख्रिस्त-पूर्व सहाव्या शतकातील मगध साम्राज्याच्या उद्यापासून सुरुवात करून हे स्पष्ट विवेचक पुस्तक मौर्यांच्या काळातील नाट्य, मौर्यांच्या राजकारणातील कुटिलता, आणि गुंतागुंत चित्रित करते. मौर्य साम्राज्याचा पहिला, गूढ राहिलेला राजा चंद्रगुप्त याच्यापासून सुरुवात होते आणि चंद्रगुप्त याच्यापेक्षा अधिक गूढ म्हणून राहिलेला, चंद्रगुप्त याचा मार्गदर्शक / गुरू चाणक्य / कौटिल्य याचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. चंद्रगुप्त याचा मुलगा आणि वारस बिंदुसार हा मौर्य.
-
Focus On What Matters (फोकस ऑन व्हॉट मॅटर्स)
मनातल्या गोंधळाला अडवून स्पष्टतेनं पुढे जा! कोलाहलात आणि आवाजात चांगल्या रीतीनं जगणं इतकं अवघड का असतं? तुम्हाला ही आधुनिक जगातील समस्या वाटेल, पण ही कालातीत समस्या आहे. २००० वर्षांपूर्वी प्राचीन स्थितप्रज्ञांनी आपण आज सामोरे जात असलेल्या समस्यांबद्दल भाष्य केलं होतं आंतरिक शांतता कशी मिळवू शकतो? आनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? आपण अधिक लवचीक कसे होऊ शकतो? या पुस्तकामधून तुम्हाला खालील काही गोष्टी समजतील. अधिक लवचीक आणि एकाग्र होण्यासाठी विचारांचे सोपे अभ्यास. दररोज वर्तमान क्षणात कसं जगायचं? आनंदानं परिपूर्ण जीवन जगण्यासाठी खरी स्थितप्रज्ञ मूल्यं. • अधिक शिस्त बाणवण्याचा मार्ग. आनंद, संपत्ती, आरोग्य, तुम्ही, तुमचे स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर असलेले नातेसंबंध, अशा जीवनाच्या विविध अंगांबद्दल भाष्य करणाऱ्या, अंतर्दृष्टी देणाऱ्या ७० पत्रांचा संग्रह म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक होय. जीवनातल्या आव्हानांना न जुमानता, योग्य गोष्टींवर लक्ष कसं केंद्रित करायचं याची आठवण करून देणारं स्मरणपत्र… फोकस ऑन व्हॉट मॅटर्स.
-
Jeevan Kaushalye (जीवन कौशल्ये)
जीवन कौशल्ये, जीवन मूल्ये आणि हार्ड स्किल्स या एकूणच सर्व प्रकारच्या जीवन व्यवहारांमध्ये अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जीवन विषयक कौशल्यांची सविस्तर ओळख या पुस्तकात करून दिली आहे.
-
Paishachi Goshta (पैशाची गोष्ट)
पैसा आपल्याला भेडसावणारा प्रश्न किंवा आयुष्याचा आनंद लुटण्याच्या मार्गातला अडथळा बनू नये असं वाटत असेल तर... पैशाबद्दल स्पष्ट बोलायचं म्हटलं तर... ते काही सोपं नाही. खरंतर, पैसा म्हणजे इथून तिथून टाळण्याचाच विषय असतो. इतकच नव्हे, तर पैसा हा आपल्या जीवनातील एकमेव विषय नसला तरी, प्रमुख चिंतांपैकी एक विषय नक्कीच बनला आहे. आणि तसं पाहिल, तर पैसा हा स्वत:च, ना चांगला असतो ना वाईट असतो. तो आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे की आपल्या स्वातंत्र्याची किल्ली बनतो आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, आपले त्याच्याबरोबरचे संबंध कसे असतातं ह्यावर ठरत असतं. जर का पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांची आपण पूर्णपणे जाणीव ठेवली आणि त्या संबंधाकडे पूर्णपणे लक्ष दिलं, तर आपण आपल्या वैयक्तिक संपत्तीबरोबर निकोप आणि सकारात्मक संबंध निर्माण करू शकतो; मग आपली मिळकत कितीही भरभक्कम असो किंवा कितीही तुटपुंजी असो. क्रिस्टिना बेनितो ह्या लेखिकेचं ह्या पुस्तकामागचं तत्त्वज्ञानच ते आहे. सारं आयुष्यभर त्यांनी अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तीय सल्लागार म्हणून काम केले. पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांच्या पूर्ण जाणिवेच्या तत्त्वांची आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या सवयींची गाठ घालून, त्या एक आगळीवेगळी पद्धत सादर करत आहेत. तीन टप्प्यांत विभागलेल्या ह्या पद्धतीमार्फत आपल्याला आपल्या जवळची रक्कम अधिक चांगल्या रीतीने हाताळता येते, आपल्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि काळज्यांचं आपल्या डोक्यावरचं ओझं हलकं करता येतं.
-
The Diary Of A CEO (द डायरी ऑफ अ सीईओ)
माझ्या उद्यमशीलतेच्या प्रवासात मी टोकाचे यश आणि अपयश यांचा सामना केला आहे. ते अनुभव आणि माझ्या पॉडकास्टद्वारे घेतलेल्या हजारो मुलाखती यांच्या मुळाशी काय आहे- कोणत्याही क्षेत्रासाठी लागू होऊ शकतील अशी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली काही मूलभूत तत्त्व असतात. जिला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आहे, किंवा महान काही निर्माण करायचे आहे ती प्रत्येक व्यक्ती या तत्त्वांची अंमलबजावणी करू शकते. या मूलभूत नियमांचा अवलंब केल्यामुळे तुम्ही सर्वोत्तम कामगिरीच नोंदवता. मानसशास्त्र आणि वर्तनशास्त्र यांमधली तत्त्व, मी सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक खंडातल्या आणि प्रत्येक वयोगटातल्या लाखो लोकांच्या शहाणपणाचे सार आणि अर्थातच माझ्या अत्यंत लोकप्रिय पॉडकास्टद्वारे मी जगातल्या सगळ्यांत यशस्वी लोकांशी साधलेला संवाद या सगळ्यांचे सत्व या नियमांमध्ये आहे. हे नियम आज लागू आहेत आणि आजपासून १०० वर्षांनीही लागू असतीलच. तुम्ही कधीपासून अमलात आणताय?
-
Vaat Majhiya Gharachi (वाट माझिया घराची)
मी पुन्हा चांदणे देतो तू ओंजळ धर ना आधी श्वासात झिरपतो गंध ही गोष्ट एवढी साधी श्रीरंगाचे दोन भाग हे राधेआधी राधेनंतर पावा होता सुटला पावा इतुके त्याने पडले अंतर मनातले वादळ मनातच विरले तर बरे उदासीन कोसळ आतुनच जिरले तर बरे.
-
Vavtal (वावटळ)
श्री प्रकाश कुलकर्णी लिखित 'वावटळ' ही एक रहस्यमय कादंबरी आहे. एखाद्या अत्यंत मामुली वाटणाऱ्या घटनेकडे संशयी वृत्तीने पाहण्याचा स्वभाव जगात काही लोकांचा असू शकतो. एका डॅक्टर दांपत्याला पडलेल्या आगळ्या प्रश्नातून निर्माण झालेले घोगावणारे वादळ म्हणजेच वावटळ ही कादंबरी. या कादंबरीचा प्रवास अनपेक्षित वळणे घेत पुढे जातो व वाचकांना खिळवून ठेवतो. ऐका आ- गळ्याच विषयावरची ही कादंबरी वाचकांना नक्कीच आवडेल. - विवेक मेहेत्रे
-
Don Cutting Let's talk Krushna (दोन कटिंग लेट्स टॉ
हे पुस्तक वाचकाला जागृततेच्या नव्या परिमाणाची ओळख देत प्रत्येकास कृष्णाबरोबर बौद्धिकरित्या जोडले जाण्याचा मार्ग दाखवेल. तसेच पुस्तकात शरीर, मन व आत्मा यांना जागृत करणारे अनेक सोपे व्यायाम आहेत आणि संकीर्ण आध्यात्मिक संकल्पनांना उलगडून सांगणाऱ्या कथा आहेत. यामुळे पुस्तकाची रंजकता वाढीस लागते. ह्या पुस्तकातील अनेक छोट्या-छोट्या मनोरंजक, प्रबोधनपर कथा वाचकाला विचार करण्यास, अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करतात. केवळ गम्मत म्हणून वाचन नव्हे तर प्राप्त मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने आणि विशेषतः तरुणाईने अवश्य वाचावे असे मी आवाहन करतो.