-
Kshatriyakulawant Sadhu (क्षत्रियकुळावंत साधू)
शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.
-
Narmada Parikrama Ek Antarmukh Yatra (नर्मदा परिक्
असं म्हणतात कि पूर्वजांची पुण्याई उदयास येते तेव्हा नर्मदा परिक्रमा घडते. गुरूंच्या आदेशाने आणि घरातील लहान थोर मंडळींच्या अनुमती नंतरच परिक्रमा उचलावी. संकल्प सोडताना सगळा भर नर्मदा माई वर टाकला आणि माईने आपल्या लेकराचा हात धरून चालवलं. तहानलेल्या वेळी पाणी पाजलं. भुकेच्या वेळी खाऊ घातलं आणि झोप आल्यावर मांडीवर घेऊन झोपवल. ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी केली आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त पुस्तक.
-
Anandibai Raghunathrao (आनंदीबाई रघुनाथराव)
ध चा मा केला म्हणून इतिहासाने जिला कलंक दिला, त्या आनंदीबाईची आणि अटकेपार झेंडा फडकावून मराठी साम्राज्य भारतभर पसरविणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांची कहाणी.
-
Shivnetra Bahirji Khand 3 (शिवनेत्र बहिर्जी खंड ३)
सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. शिवनेत्र बहिर्जी खंड 3
-
Corporate Aani Itar Katha (कॉर्पोरेट आणि इतर कथा)
मराठी साहित्यात ताज्या दमाचे आणि स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती असणारे अनेक प्रतिभावंत पुढे येत आहेत. असे लेखन करणाऱ्यांत आता सुनील गोडसे हे नाव समाविष्ट करावे लागेल. हा लेखक मानवी मनाच्या विविध विभ्रमावस्थांचा काव्यात्म तरलतेनं हळुवार वेध घेत आपल्या कथांमधील पात्रांच्या मनात शिरून त्यांच्या व्यथा-वेदना आणि भाव-भावनांमध्ये वाचकाला स्वत:सोबत अलगद फिरवून आणतो. त्यातून एक जिवंत, रसरशीत अनुभव घेतल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आजच्या जबाबदार लेखकांच्या पिढीच्या संवेदना अभिव्यक्त करणारा प्रतिनिधी म्हणून त्याची स्वतंत्र कथात्म शैली व जातकुळी वाचकांना भिडल्याशिवाय राहणार नाही!
-
Antarang Manache-Shabdanchi Suruvat, Kathanchi Nir
प्रसिद्ध कादंबरीकार ओरहान पामुक यांनी म्हटले आहे - "मी एके दिवशी एक पुस्तक वाचले आणि माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. लेखक आणि वाचकांना एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात स्टोरीमिररची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक कथा आपल्याला काहीतरी शिकवते, विचार करायला लावते आणि काही भावपूर्ण चिंतन करण्याची संधी देते. या धकाधकीच्या आणि नीरस जीवनात, एक कथापुस्तक आपल्याला स्वप्न बघण्यास मदत करू शकते, जीवनात नवचैतन्य निर्माण करू शकते, आपल्याला आशा देऊ शकते आणि काही कथा आपल्या दैनंदिन समस्यांना तोंड देण्याचे धैर्य देखील देऊ शकतात. जॉर्ज सॉन्डर्स बरोबरच म्हटले आहे, "जेव्हा तुम्ही एखादी छोटी कथा वाचता, तेव्हा तुम्ही थोडे अधिक जागरूक आणि तुमच्या सभोवतालच्या जगाच्या प्रेमात पडता. स्टोरीमिरर वरील रंजक आशयाच्या भरमसाठ कथांमधून मूठभर कथा निवडणे हे अवघड काम आहे. पण, या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्तम कथा निवडून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे होतकरू लेखकांची मेहनत, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे परिणाम आहेत. लेखकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि लेखन कौशल्याला आव्हान देऊन, मनमोहक, आकर्षक आणि सुंदर कथा रचना आपल्यासमोर सादर केल्या आहेत. लघुकथांचा हा संग्रह वाचकांना उत्तमोत्तम कथांपर्यंत पोहोचण्याची संधी देईल आणि स्टोरीमिरर वेबसाईटवरील उत्कृष्ट कार्य आणि व्यापक साहित्य निधीची साक्ष देईल.. आम्हाला आशा आहे की हा कथासंग्रह तुमच्या हृदयाला आणि आत्म्याला स्पर्श करेल, तसेच तुम्हाला वाचनाचा उत्तम अनुभव देईल!
-
Inka Chi Devdari (इंका ची देवदरी)
इंका संस्कृती : गूढ, रहस्यमय, अनाकलनीय.दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे पाचशे वर्षांचे साम्राज्य. स्वत:ला सूर्यपुत्र समजणारी, निसर्गाला देव मानणारी, सोन्याचांदीच्या ढिगामध्ये लोळणारी, दोNयाच्या गाठी मारून संदेश पाठवणारी,शेकडो टनांचे पाषाणखंड कापून अगम्य, अवाढव्य बांधकामे करणारी.पंधराव्या शतकात स्पॅनिश आक्रमकांनी इंका साम्राज्य धुळीस मिळवले, नंतरच्या चारशे वषांत इंका संस्कृती हळूहळू नष्ट झाली.पण एके दिवशी स्पॅनिशांच्या तावडीतून वाचलेले इंकांचे ‘गुप्त’ शहर सापडले –‘माचूपिच्चू’ !अवघे विश्व चकित झाले, पाषाणखंड हळूहळू बोलके झाले,‘इंका’चा सप्तरंगी झेंडा गौरवाने आकाशात फडकायला लागला,सोने लुटून संपले होते, पण अजस्र पाषाणखंडांना सोन्याचे मोल आले,त्याचीच ही कहाणी
-
Mi Boltoy (मी बोलतोय)
डॉ. सुनील शशीकांत काळे यांनी या पुस्तकातून स्वतःचा आणि पर्यायाने मानवाचा शोध घेतला आहे. भक्ति, श्रद्धा आणि समर्पणाच्या मार्गावर चालत द्वैतातून अद्वैताचा प्रवास करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. ते म्हणतात, परब्रम्हालाच बहु व्हावे असे वाटले आणी त्याने सृष्टि निर्माण केली. परब्रह्म स्वतःच ईश्वररूपात सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगात स्थिरावले. या रूपाचा त्यांनी शोध घेतला आहे. विश्वाच्या, अनंताच्या प्रवासाकडे, नराच्या नारायणाकडे झालेल्या प्रवासाकडे त्रयस्थपणे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. धर्म, सत्य, सत्कृत्ये, ईश्वर, जीवन यांचाही हा शोध आहे. पुस्तकाच्या अखेरीस काही कवितांचा समावेश केला आहे.
-
New Zealand Sathi Bharat Sodtana (न्यूझीलंडसाठी भा
न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून, हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.
-
Krutrim Paus(कृत्रिम पाऊस)
कृत्रिम पाऊस पाडण्याची शास्त्रीय प्रक्रिया, त्या प्रक्रियेचा मनोरंजक इतिहास, पर्यावरणविषयक संदर्भ, पूर्वापर पावसासंदर्भातील आपल्या अंधश्रद्धा, इत्यादी गोष्टींचा शास्त्रीय मागोवा घेणारे असे पुस्तक आजतागायत तरी मराठीत उपलब्ध नाही. विशेष म्हणजे विषय पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असूनही कुठेही वाचताना कंटाळा येत नाही. याचे कारण हेच आहे. कि श्री. चंद्रसेन टिळेकर हे शिक्षणाने इंजिनियर असले तरी मराठीतले शैलीदार लेखक आहेत. मराठीतील संगणकावरची पहिली दोन पुस्तके त्यांच्याच नावावर आहेत. भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना व शिक्षकांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल ! - कॅप्टन सुनील मुळे
-
Eka janardani (एका जनार्दनीं)
संत एकनाथांच्या आयुष्याची सारी वाटचाल इतर पूर्वसूरींच्यापेक्षा वेगळ्या वळणाची आहे. तीच या कादंबरीत आली आहे.
-
Schizophrenia Ek Navi Janeev (स्चीझोफ्रेनिया एक नव
स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात.