-
Gazal (गझल)
"मूळ उर्दू ग़जल ही काय चीज आहे? ह्या दिलकश गुलबदनीची असली खूबसूरती कशी आहे? तिच्या रंगात नि अंतरंगात गेल्या दीडशे वर्षांत काय बदल होत गेले ? तिचा स्थायिभाव कोणता? प्रमुख शिल्पकार कोणते? इत्यादी बाबींविषयी रसिकतेनं आणि व्यासंगीपणानं विवेचन करणारा ‘ग़जल’ हा ग्रंथ म्हणजे उर्दू शायरीचा छोटासा ‘हेमकोश’च (GOLDEN TREASURY) आहे! "
-
Belbhasha (बेलभाषा)
सुमन बेलवलकर यांना परभाषिकांना मराठी शिकवताना जे स्वभाषेचे आणि महाराष्ट्राच्या संस्कॄतीचे दर्शन झाले ते त्यांनी मोठया खेळकरपणाने छोटया छोटया लेखातून टिपले आहे.
-
Zunj Mazi cancershi (झुंज माझी कॅन्सरशी)
खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? येणार्या प्रत्येक जीवाला हातच्या खेळण्यासारखं खेळवते सर्व दोर हाती धरून कठपुतळीसारखं नाचवते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? चेहर्यावरचे हसू किती कठोरतेने पुसते डोळ्यातले पाणी पाहून निर्दयतेने हसते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? गेल्या जन्मीच्या पाप-पुण्याचे हिशेब या जन्मी मांडते आणि खरोखरीच निष्पाप जीवावर जीवघेणे अगाध करते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? दोन क्षणात होत्याचं नव्हतं करते पाहता - पाहता उभ्या जीवनाचं मातेरं करते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? पण हळूच कधी - कधी ओंजळ भरभरून सुख देते दुरावलेल्या जीवाला मायेची उब देते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते?
-
Ghas Ghei Panduranga (घास घेई पांडुरंगा)
ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांची तसेच समकालीन संतांची अभंगरुपी चरित्रे लिहिणारे नामदेव आद्य चरित्रकर समजले जातात. पांडुरंगासमोर चोखोबांची संधी बांधणारे नामदेव आद्य अस्पृश्योधारक आहेत, तर परधर्मीयांचा प्रभाव जाणवणाऱ्या सीमेवरील पंजाब प्रांतात राहून तेथे भागवत धर्माचे व्यासपीठ उभे करणारे व उत्तरेकडील भाषेत अभंग रचना करणारे नामदेव आद्य समाजकारणी व भारतीय एकात्मतेचे उद्गाते आहेत. जनाईला संतपदी नेणारे नामदेव स्त्रीमुक्तीचे आद्य प्रचारक आहेत. नामदेवांचे हे आगळेपण रवींद्र भात यांनी 'घास घेई पांडुरंगा' या नामदेवांवरील कादंबरीत व्यक्त केले आहे. नैवद्याचा घास घेण्यासाठी घेण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्याऱ्या बाल नामदेवांच्या लीलांपासून पूर्ण ज्ञानाची आस व गुरुकृपेची ओढ लागलेल्या आणि ज्ञानदेव - निवृत्तीनाथ, मुक्ताई यांच्या मेळ्यात रंगणाऱ्या संत नामदेवांचेचरित्र यात रेखाटले आहे. नामदेव, जनाबाई यांची काव्यरचना, राजाईच्या निवडक अभंगाचा कादंबरीत उपयोग केलेला आहे. पंजाबमधील घुमान गावात नागदेवांनी भागवत धर्माचा प्रसार केला. तेथील त्यांच्या कार्याची महती व त्यांनी हिंदीत केलेल्या रचना यात आहेत. माणूसधर्माचा विचार कृतीत उतरवून नंतर तो लोकांमध्ये रुजविणाऱ्या संत नामदेवांचे विचर आजच्या समाजासाठी आदर्श आहेत.
-
Bandhavarchya Babhali (बांधावरच्या बाभळी)
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
-
Kanchanmrug (कांचनमृग)*
"‘श्री’ मिळवायची झाली, तर वेडीवाकडी वळणं घेतल्याखेरीज ती हाती येत नाही. पण आज ‘श्री’चं वेडंवाकडं वळण तेवढंच लक्षात ठेवलं जातं.‘श्री’च्या वळणातलं सामथ्र्य नेमकं विसरलं जातं. वेडीवाकडी वळणं घेतच नदी जाते. पण तिची वळणं भूभाग अधिक समृद्ध करायला कारणीभूत ठरतात. वेडीवाकडी वळणं घेत द-याखो-यांचा रस्ता जातो. म्हणूनच माणसाला सहजतेनं संकटांचे डोेंगर तरता येतात. आज ‘श्री’चं नेमकं सामथ्र्य हरवून वेडीवाकडी वळणं तेवढीच कवटाळली जातात! कष्ट, सेवा हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते उरलेत. सामथ्र्याच्या पायाखाली ‘त्याग’ चिरडला जात आहे. जीवनमूल्यांचा हा -हास माणसाला कुठवर पोहोचवणार आहे ?"
-
Bharatmuniche Natyashashtra (भारतमुनींचे नाट्यशाश्
नाट्य आणि शास्त्रीय नृत्य यातून निर्माण झालेल्या नाट्यशास्त्राची मोहिनी आजही कलाक्षेत्रावर आहे. हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भारतमुनींनी नाट्यशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्याचा अभ्यास, प्रत्यक्ष प्रयोगासाठी उपयोगिता, मर्यादा याचा विचार व त्याविषयीची मते डॉ. सरोज देशपांडे यांनी भारतमुनींचे नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडली आहेत. यात नाट्य, अभिनय याचबरोबर त्याचे रंगमंचावर सादरीकरण, प्रयोगासाठी इतर कलांचा विचार, प्रेक्षकांचा अनुभव या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. नाट्यशास्त्राचा अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी आहे.
-
Death Was Not Painful (डेथ वॉज नॉट पेनफुल)
१९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय फायटर पायलट्सचे अनुभव.