-
Tough Mind
माणसाच्या मनात, जगणं आणि जगत राहणं या स्वाभाविक आणि उपजत प्रेरणा असतात. त्यालाच जीवनेच्छा असं म्हणतात. होकारात्मक विचार, भावना आणि क्रिया-प्रतिक्रिया या सर्व गोष्टी आपल्याला जगायला समर्थ करतात. जीवनेच्छा म्हणजे अखेर मानववंशाच्या यशस्वी जागण्याच रहस्य! म्हणूनच होकारात्मक विचारांची किमया अनुभवायची असेल तर टफ बनणं गरजेच आहे. एकदा का तुम्ही तुमच माइण्ड टफ केलंत, की मनाची एकाग्र झालेली अमोघ शक्ती काय चमत्कार घडवते बघा. चला तर मग, आपण टफ बनू. पॉझिटिव्ह राहू!
-
The Secret Rahasya (द सिक्रेट रहस्य)
या क्षणी तुमच्या हाती आहे एक महान रहस्य ... युगा न युगे चालत आलेलं हे महान रहस्य ! हे सर्वांना हवं होतं. हे गुप्त ठेवलं गेलं. लपविलं गेलं. हे चोरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्रचंड किंमत देऊन मिळवण्याचाही यत्न केला गेला. शेकडो वर्ष जुनं पुराणं असं हे रहस्य इतिहासातील फक्त काही मोजक्या विख्यात लोकांना समजलेलं होतं: प्लेटो, गॅलिलिओ, बीथोवन, एडिसन, कार्नेगी, आईनस्टाईन तसेच इतर महान संशोधक, शास्त्रज्ञ, तत्वचिंतक, संतमहात्मे इत्यादी. आता मात्र हे रहस्य पुऱ्या दुनियेसमोर उलगडलं आहे. " एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात, तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ ! तुमच्या व्यापकतेची, विशालतेची, खऱ्या शक्तीची जाणिव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पहातं आहे."
-
Jinnah
1906 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला 90टक्के इतिहास हा श्री. जसवंतसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे 30 माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे 5000 संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ""खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?'' नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व 6000 हिंदूंची कत्तल घडवली. "हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत' असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव 800 वषा|नी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक.
-
The Firm (द फर्म)
एक माफिया फॅमिली : सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून जमवलेल्या प्रचंड काळा पैसा पांढरा करणारी... त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारी... एका वकिलांची फर्म : माफिया फॅमिलीचा सभ्य धुवट चेहरा असलेली... फॅमिलीच्या काळ्या पैशाचं बेमालूमपणे 'शुद्धिकरण' करणारी... एक वकील : नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला अत्यंत हुशार, चलाख तरुण पोरगा... फर्ममध्ये नोकरी मिळाल्यावर त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटतं, आता फक्त सुंदर भविष्यकाळ, भरपूर पैसा, बीएमडब्ल्यू... प्रत्यक्षात मात्र दोघंही फर्मच्या सोनेरी जाळ्यात अडकतात... आणि एकीकडे माफिया फॅमिली, तर दुसरीकडे एफबीआय, अशा कात्रीत सापडतात... आणि जीव वाचवत पळत सुटतात... कायमचे.
-
Rusi Modi The Man Who Also Made Steel
एक अत्यंत संपन्न, अत्यंत सुसंस्कृत कुटुंब. * मुलांचे लाड खूप व्हायचे, पण शिस्तही तितकीच कडक असायची, कपडे साधे असायचे, गरीब मुलांबरोबर खेळायला, खायलाप्यायला सूट असायची. * असं ठासून मनावर बिंबवलं जायचं, की गरिबी, मळके कपडे यात लाजिरवाणं काहीही नाही; खोटं बोलणं, वाईट वागणं हे लाजिरवाणं आहे. * शिक्षण इंग्लंडमध्ये हॅरो आणि ऑक्सफर्डला. बुद्धी तल्लख, पण अभ्यासाची आवड नाही. लक्ष पाट््र्या, डान्सेस, मौजमजा यांमधे इतिहास विषयात स्नातक. * इतिहास राहिला बाजूला, नोकरीला लागले एका मोठ्या कारखान्यात रोजावर मजूर म्हणून! * कष्ट करण्याची तयारी, माणसांना समजून घेणं, माणसं जोडता येणं, सवा|शी मिळतं घेणं हे खास विशेष गुण. शिस्तीचे आग्रही. वेळ पडली तर वज्रादपि कठोराणी एरवी मृदूनि कुसुमादपि! * उत्तम कलांची आवड, उत्तम खाण्याची, पिण्याची, संगीताची, पाश्चिमात्त्य नृत्याची जाण व आवड. उत्तम वक्ते, भरपूर वाचन, कारकिर्दीत प्रचंड प्रगती. ........सगळंच छान? दु:ख कशाचंच नाही? आहे ना! पण त्याचं प्रदर्शन नाही. * सुंदर, गुणी मुलीशी प्रेमविवाह केला, पण चौदा वर्षानंतर घटस्फोट झाला तरीही तिच्याशी संबंध अजून छान! * मुलांची खूप आवड, पण मूलबाळ नाही! "...सगळ्यांनाच सगळंच कसं मिळेल?'' * नोकरीत अन्याय झाला दुसरी कंपनी काढली! इतकी बहुरंगी, बहुढंगी अशी आहे तरी कोण ही आगळीवेगळी विलक्षण व्यक्ती? * ज्यांनी जमशेटपूरच्या टिस्कोमध्ये एकूण त्रेपन्न वर्ष सलग काम केलं, त्यातली नऊ वर्ष अध्यक्ष व प्रमुख संचालक म्हणून काम करून कंपनीची विक्री व नफा प्रचंड प्रमाणात वाढवला, ते आता नत्वदी पार केलेले, तरीही कामात त्यग्र असलेले आणि मजेत जगणारे, हे आहेत रुसी मोदी!