-
Udhan Vara
१९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या "आमार मेयेबेला' (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली. एक अविस्मरणीय आत्मकथन म्हणून आता ते पुस्तक मान्यता पावले आहे. "उतोल हवा' (उधाण वारा) हा त्याच आत्मकथनाचा दुसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोकपणाचे व करुणेचे दर्शन होते. पण आता तसलिमा वयाने मोठ्या झाल्या आहेत. त्यांची भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणखी तीक्ष्ण झाली आहे. अनुभवांचा परीघ आणखी विस्तृत झाला आहे. त्यामुळे तसलिमांची जडणघडण कशी झाली हे या पुस्तकात आणखी तपशीलवारपणे समजते. एका मागासलेल्या समाजात आणि कुटुंबात मोठ्या झालेल्या युवतीने कशा प्रकारे पुराणमतवादाची बंधने तोडून टाकली हे या पुस्तकात दिसते. त्यांचे प्रेमप्रकरण, त्यामधील आनंद-वेदना, संबंधामधले चढउतार आणि शेवटी त्यातून बाहेर पडणे हे सारे वाचताना वाचकांनाही खिन्नतेचा अनुभव येतो. तसलिमांचे गद्य काव्याच्या तेजाने झळाळणारे आहे. या धारदार आत्मकथनाचा मराठी अनुवाद समर्थ अनुवादक विलास गीते यांनी तितक्याच प्रत्ययकारीपणे केला आहे.
-
A Better India A Better World
लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेह-याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणा-या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. -डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे, की भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तींच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. - बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन