-
Lok Maze Sangati Bhag-1 Aani 2 (लोक माझे सांगाती भ
“ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.हा सर्वसामान्य भारतीय माणूसभारतातील सर्व राजकारण्यांपेक्षाखूपच शहाणा आणि समजूतदार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतजनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं.हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे.त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे.सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचामी आपल्या साडेपाच दशकांच्यासार्वजनिक जीवनात काम करतानावारंवार अनुभव घेतला आहे.या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला,यापेक्षा अधिक काय असू शकतं?”शरद पवारगेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीतमहत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेलाआपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
-
Lt Colonel Purohit -Vishvasghatacha Bali (लेफ्ट क
‘हा हिंदू वहशतवाद आहे,’ अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतून उच्चरवाने सांगितल्या जात होत्या. राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच एखाद्या आर्मी ऑफिसरला. लेफ्ट, कर्नल पुरोहित यांना सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात अटक झाली होती. कोण होती ही व्यक्ती आणि तिचं नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर का चिकटवलं गेलं होतं? सर्वांना सोडून याच व्यक्तीला का बरं यात गोवलं गेलं होतं? ते खरोखर गुन्हेगार होते का? की त्यांना षड्यंत्रात गोवलं गेलं होत? त्यांना बळीचा बकरा बनवलं गेलं होतं का? न्यायालयात खटले चालू असतानाच्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या मानचिन्ह विभूषित अधिकाऱ्याला तुरुंगात डांबलं गेलं होतं; त्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली होती? ‘लैफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी?’ या पुस्तकात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना, भयाण अशा षड्यंत्रावर प्रकाशझोत टाकलेला आहे. ते सर्व वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहील.
-
Karheche Paani (Sankshipt) कऱ्हेचे पाणी (संक्षिप्त
जविनायें हैं विलक्षण पेड माझ्यामद्धे कसे आहे? लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडडूंतून उगम पावलेल्या कन्हेच्या कोठी मी जन्माना आलो आणि तिच्याल अंगाखांद्यावर जेजूरांच्या खंडोबा च्या भंडाऱ्याने वाढलो. मोठा झालो. उशालाशिव छत्रपतचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पारा करी तर श्रीसोपानदेवांची भक्तिवीणा शेजारीं सदैव वाजे.
-
Replay (रिप्ले)
"अॅन्ड्र्यू स्टिलमनचा खून झाल्यापासून त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. २०१२ च्या ९ जुलैच्या सकाळी, न्यू यॉर्क टाइम्सचा शोधपत्रकार अॅन्ड्र्यू स्टिलमन हडसन नदीच्या भागात जॉगिंगसाठी गेल्यावर त्याच्या पाठीच्या खाली अचानक तीव्र वेदना त्याला जाणवते. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळतो. त्याची शुद्ध परत येते तो दिवस असतो ७ मे, २०१२– म्हणजे दोन महिने आधीचा. त्याचा मृत्यू व्हावा आणि का व्हावा, असं कुणाला वाटतं, याचा शोध घेण्यासाठी अॅन्ड्र्यूकडे आता बासष्ट दिवस उरले आहेत. त्याचं स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याला एक संधी आहे. न्यू यॉर्क सिटी ते ब्यूनॉस आयरिसच्या प्रवासात अॅन्ड्र्यूची काळाविरुद्धची शर्यत वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेते. कौशल्यपूर्ण रचना असलेली आणि चातुर्यानं सांगितलेल्या या रोमांचक कहाणीचे लेखक आहेत फ्रान्सचे सर्वांत लोकप्रिय समकालीन कादंबरीकार. कथेचा शेवट अविस्मरणीय रीतीनं करतात. "
-
Heads You Win (हेड्स यु विन)
अलेक्झांडर कारपेन्कोला बालपणापासूनच स्पष्ट दिसत असतं की, तो देशवासीयांचं नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आला आहे; पण राज्य वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या वडिलांची ‘केजीबी’द्वारे हत्या होते, तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या आईबरोबर रशियातून पळ काढावा लागतो. गोदीवर त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात – त्यांनी अमेरिकेला जाणार्या जहाजाच्या कंटेनरमध्ये चढावं की ग्रेट ब्रिटनला जाणार्या, याची निवड अलेक्झांडर नाणं उडवून करतो... एका क्षणात, अलेक्झांडरच्या भविष्याला दुहेरी कलाटणी मिळते. दोन खंड आणि तीस वर्षांच्या काळाची व्याप्ती असलेल्या या भाग्य आणि भविष्याच्या दंतकथेमध्ये, एक स्थलांतरित म्हणून नवीन जगावर राज्य करण्याच्या त्याच्या जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवर आपणही स्वार होतो. अलेक्झांडरची ही अद्वितीय कथा उलगडत असताना, आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याची त्याला जाणीव होते आणि शेवटी रशियातील भूतकाळ आपली पाठ सोडणार नाही, हे तो स्वीकारतो.
-
Ice Station Zebra (आइस स्टेशन झेब्रा)
ही एक रहस्यकथा/थरारकथा आहे. आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी `यूएसएस डॉल्फिन`वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून, बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का?
-
Telgi Scam Reporter Chi Diary (तेलगी स्कॅम रिपोर्ट
"एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते. एका मागोमाग नवनवी नावं गुंफली जातात. राजकारण, पोलीस, प्रशासन, माध्यमं आणि सामान्य जनता या सगळ्यांना हादरवून टाकणारा हा महाघोटाळा. बनावट स्टॅम्पच्या धंद्यातून त्यानं निर्माण केलेली एक समांतर यंत्रणा आणि त्याचे भयंकर परिणाम, हे सगळं नंतर उघड्यावर आलंच. भारतीय दंड संहितेनुसार त्याला शिक्षाही झाली. पण हा संपूर्ण घोटाळा आणि त्याचं शोधपत्रकारितेच्या अनुषंगाने एका पत्रकारानं धुमाकूळ उडवणारं केलेलं संशोधन यांची ही रोचक आणि आश्चर्यचकित करणारी कहाणी. जी सोनी ‘SCAM 2003 : THE TELGI STORY’ या मालिकेतून सिनेजगतातही धुमाकूळ घालत आहे."
-
The Elephant Whisperer (द एलेफन्ट व्हिस्परर)
"दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंवर्धनाचे काम करणार्या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक ‘गुंड’ जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहारज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे; पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता, तर तो ठार केला गेला असता. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांत तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला, तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूपच शिकण्यासारखे आहे. आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणार्या प्राण्यांबरोबरची अँथनीची ‘द एलेफंट व्हिस्परर’ ही कथा अतिशय हृदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मजेशीर आणि कधीकधी विषण्ण करणारी आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्रे आणि अनोखी प्राणिसृष्टी ह्यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. प्राणिमित्रांना आणि साहसी कथा आवडणार्यांना तर ही गोष्ट खूपच आवडेल. "
-
The Hungry Tide (द हंग्री टाइड)
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
-
Share Bazaar (शेअर बाजार)
शेअर बाजाराविषयी सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे. चांगला गुंतवणूकदार होण्यासाठीचं तसंच शेअर बाजाराच्या उगमाविषयीचं विवेचन सुरुवातीला केलं आहे. नंतर शेअर बाजाराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्या तसेच सट्टेबाजी करणार्या व्यक्तींच्या अनुषंगाने शेअरबाजार हा विषय विस्तृतपणे मांडला आहे. त्या त्या व्यक्तीचं काय वैशिष्ट्य होतं, हे सांगताना त्याचे स्वभावविशेष आणि त्याचं खासगी जीवन याकडेही लक्ष वेधलं आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराकडे आकृष्ट करणं, शेअरदलालांना प्रशिक्षण देणं, ही होती चार्ल्स मेरिलची वैशिष्ट्यं. अभ्यासाच्या जोरावर शेअरबाजाराविषयी अचूक भाकितं करणं, ही होती एडसन गोल्डची खासीयत. तर, अशा व्यक्तींच्या माहितीमधून शेअर बाजाराचे विविध पैलू, विविध देशांची चलनं, शेअर बाजाराचा अर्थकारणाशी असलेला संबंध इ. बाबी उलगडतात. आवश्यकतेनुसार कोष्टकं दिली आहेत. शेवटी संदर्भसूची जोडली आहे. शेअर बाजाराविषयीचं साध्या-सोप्या भाषेतील रोचक पुस्तक.
-
Zero Day (झिरो डे)
मुंबई शहरात प्रचंड गोंधळ माजला आहे. शहराच्या रस्त्यावरील सर्व ट्रॅफिक सिग्नल बंद पडले आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे मुख्य शाहवाझ अली मिर्झा यांच्या कार्यालयीन ई-मेलवर आलेल्या इमेलमध्ये या सायबर हल्ल्याची जबाबदारी मुन्तकिम नावाच्या अतिरेक्याने घेतली आहे. त्याने आणखी हल्ल्यांची धमकी दिली आहे. मिर्झांसह सायबर गुन्हे शाखेचे आयजी विक्रांत सिंग, राष्ट्रीय सुरक्षा बलाची मेजर शायना वर्मा आणि इतर तिघे लगेच सायबर जगताच्या काळोख्या गुन्हेगारी जगतात शोध घेऊ लागतात. पण हॅकरला घेरण्यासाठी मिर्झा आणि विक्रांत यांनी खेळलेली खेळी उलटी पडते. परिणामी शहरावर आणखी एक सायबर हल्ला होतो आणि तोही मुंबईची जान असलेल्या रेल्वे सेवेवर! झिरो डेचे संकट संपूर्ण देशाच्या यंत्रणेला कोसळवू शकते. मिर्झा आणि विक्रांत झिरो डेमध्ये त्यांचे आयुष्य पणाला लावून या महाभयंकर अस्त्राचा सामना करण्यास सज्ज आहेत.
-
Lokshahichya Hatyesathi (लोकशाहीच्या हत्तेसाठी)
"मर्मभेदी जीवनकथा आणि तीक्ष्ण, अभ्यासू अंतर्दृष्टी यांचे मिश्रण असलेले ‘लोकशाहीच्या हत्येसाठी` हे पुस्तक भारत हा एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ होता आणि आता तो मोदी शैलीतील लोकानुनयवादामुळे मोडकळीस येतो आहे या मताला नाकारते. आज नागरी स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीत्मक संस्थांवर होणार्या हल्ल्यांच्या ऐतिहासिक मुळांपाशी हे पुस्तक जाते. लेखकांचे असेही प्रतिपादन आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका आणि सत्तेच्या विभाजनापेक्षा बरेच काही आहे. ती एक प्रतिष्ठेने जगली जाणारी जीवनशैली आहे. आणि म्हणूनच भारतीय लोकशाहीच्या ढासळत्या सामाजिक पायाकडे लेखकांनी विशेष लक्ष दिले आहे. अस्तित्वाच्या दैनंदिन लढायांकडे हे पुस्तक प्रभावीपणे आपले लक्ष वेधते. प्रत्यक्ष अनुभवलेले सामाजिक अन्याय आणि पारतंत्र्य भारतीय निवडणुकांचा अर्थ कशा प्रकारे हिरावून घेतात आणि त्याच वेळी प्रशासकीय संस्थांची अवनती होत त्यांची पोलादी पकड कशी मजबूत होत जाते याचा खुलासा या पुस्तकातून होतो. देशात जे घडते आहे ते जागतिक स्तरावर महत्त्वाचे आहे याकडे हे पुस्तक लक्ष वेधते. आणि लोकशाहीत राहणारा प्रत्येक तिसरा माणूस भारतीय आहे म्हणूनच केवळ ते महत्त्वाचे नाही. पुस्तक दाखवून देते की जेव्हा लोकशाही व्यवस्था आपल्या सामाजिक पायाला उद्ध्वस्त करतात तेव्हा त्या फक्त लोकशाहीचा आत्मा आणि सारतत्त्वच मारत नाहीत तर जुलूमशाहीची पायाभरणी करतात. "
-
Gulamacha Jina,Andharatala Jagana (गुलामाचं जिणं अ
गुलामांचा जिंण अंधारातल जगण बीड हा दुष्काळाच्या छायेतला मागास जिल्हा. पाऊस कमी. सिंचन व्यवस्था नाही, त्यामुळे शेती नाही. उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे हाताला काम नाही. मग माणसाने पोट भरावं कसं ? या परिस्थितीत जगण्यासाठी इथली माणसं उस तोडायला जातात. सांगली-कोल्हापूरपासून पार कर्नाटकपर्यंत. सहा सहा महिने बायको पोरांसह तिकडेच राहतात. त्यांच्या राहण्याला 'राहणं' कसं म्हणणार? फाटक्या-तुटक्या उघड्या खोपट्यातला तो संसार. पहाटे तीनपासून काम संपेपर्यंत गुरासारखं राबायचं. काहीबाही शिजवून पोटात ढकलायचं. रानटी प्राणी आणि रानटी माणसं यांच्या भीतीखाली जगायचं. कामगार म्हणून नोंद नसल्याने ना वेतननिश्चिती, ना बोनस, ना पेन्शन. पोराबाळांच्या शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या सगळ्या वाटा खुंटलेल्या जणू गुलामाचं जिणंच. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली. पण लोकांचं तोंड गोड करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या उसतोड कामगाराचं आयुष्य मात्र कडूजार आहे. 'भारत आमचाही देश आहे आणि आम्हाला इतरांसारखं मानाचं जगणं हवं आहे', असं त्यांचं म्हणणं आहे. उसतोड कामागारांचे प्रश्न, त्यांच्या बायकामुलांच्या समस्या, त्यांचं जिणं सुधारावं यासाठी शासनस्तरावर झालेले प्रयत्न, 'शांतिवन' या संस्थेमार्फत राबवले जाणारे उपक्रम आणि मागण्या यांची दोन दशकांतील कामाच्या आधारे चर्चा करणारं पुस्तक.
-
Pichkari (पिचकारी)
हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत, वास्तववादी, उत्कंठावर्धक आणि डोळ्यात अंजन घालणारी कादंबरी…