-
Angulimal (अंगुलीमाल)
अंगुलीमाल इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या - अंगुल्याच्या (करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल ? हातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल बुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा? मुळात अंगुलीमाल होता तरी कोण ? श्रावस्थीमध्ये कुठून आला? कशासाठी आला? अश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची केलेली ही उजळणी!
-
Gadhivarun (गढीवरून)
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत. आपलं वर्तमान केवढं अशक्त आहे, यापेक्षाही आपला इतिहास केवळ दिव्य होता हेच सांगण्यात ज्यांना कृतकृत्यता वाटते, किंवा आपण स्वतः किती कर्तृत्वहीन आहोत ही गोष्ट साफ नजरेआड करून आपल्या पणजोबांच्या काळात आपल्या गढीवरून केवढी जबरदस्त सरदारी होती, याच्या खऱ्याखोट्या कथांमध्ये रमून त्या सरदारीचे अवशेष विकून खात राहणं आणि त्यालाच 'खानदानीपण' म्हणत राहणं, यातलं विदारकत्व राजाभाऊ, विनोदाच्या उपरोधाच्या उपहासाच्या माध्यमातून दाखवायला लागतात, तेव्हा ते सामाजिक अंगानेही फार महत्वाचं वाटत राहतं. मराठी साहित्यात मानसपुत्रांची मोठी परंपरा आहे. बाळकराम आणि तिबूनाना किंवा चिमणराव आणि गुंड्याभाऊ वगैरे अतिशय प्रसिद्ध जोड्यांमध्ये या गढीवरून प्रकटत असलेली 'राजाभाऊ' आणि 'तंबूशेठ' ही जोडीही नक्कीच एक वेगळा आणि स्मरणीय ठसा उमटवणारी आहे. एकुणातच या संग्रहाच्या निमित्ताने 'गढीवरून' उतरून एक सशक्त अशी कथात्मक अभिव्यक्ती साहित्याच्या प्रदेशात प्रवेश करत आहे. वाचकांनी उत्सुकतेने स्वागत करावं, असंच हे कथन आहे.
-
Miracle (मिरॅकल)
कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? कार्डीओ – ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? फायर फ्लाय अॅाक्शन मरणासन्न अवस्थेतील प्रियकर कोमामध्येही आपल्या प्रेयसीबरोबरचं जीवन जगतो. मात्र सत्य समजल्यानंतर तो धक्कादायक निर्णय घेतो. काय होतं ते सत्य ? कोणता होता त्याचा निर्णय ? मिरॅकल हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणारे यंत्रमानव माणसाची सर्व कामे चोख करत आहेत. माणसाला त्यांची सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा आहे येणारा भविष्यकाळ ! गुरूमहाराज विज्ञान-तंत्रज्ञान आज मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचं अविभाज्य अंग झालं आहे. आजच्या विज्ञानाच्या पायावर भविष्यातील विज्ञानकल्पनेचा महाल उभारणार्याय - मानवी भावभावनांचा, परस्परसंबंधांचा वेध घेणार्याा - उत्कंठावर्धक, चित्तथरारक अन् रंजक विज्ञानकथांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य !
-
Rag Darbaree (राग दरबारी)
तलत महमूद सुभाष दांडेकर प्रो. मधु दंडवते माधुरी आणि स्नेहलता दीक्षित प्रिया तेंडुलकर अनंत पै उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं : राग दरबारी
-
Olakh Aplya Vishvachi (ओळख आपल्या विश्वाची)
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यान्पिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार्याक आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार्यात या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -
-
Punha Ekada Stri Purush Tulana (पुन्हा एकदा स्त्री
मला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय़ पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय़ मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणार्याग तिच्या कणखरपणाविषयी!
-
Nikola Tesla (निकोला टेस्ला)
‘अग्नीवर मिळवलेले नियंत्रण’ हा मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण. आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे अनेक दरवाजे उघडले गेले, ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच! आज तर आपण ‘विजेशिवाय आयुष्य’ अशी कल्पनाही करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान विकसित करणार्याय वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक निकोला टेस्ला! विद्युतनिर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय जाते निकोला टेस्लाकडे. आपले अवघे आयुष्य विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणार्याण या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध.
-
Teen Hotya Pakshinee Tya (तीन होत्या पक्षिणी त्या)
डोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामथ्याने नेपायातले साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...
-
Deonarcha Dongar Ani Farzana (देवनारचा डोंगर आणि फ
एका बाजूला चंगळवादात बुडालेला झगमगता श्रीमंती थाट जोपासणारं एक जग आणि दुसऱ्या बाजूला उपभोगाला प्राधान्य देणाऱ्या वापरा आणि फेका संस्कृतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्यालाच उपजीविकेचं साधन बनवणाऱ्यांचं एक बकाल जग. मुंबईसारख्या शहरांचं हे दुभंगलेपण आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं. परंतु यातल्या बकाल जगातील माणसांचं जगणं तितकंसं जवळून पाहायला मिळत नाही. देवनारचा कचरा डेपो आणि त्यावर जगणाऱ्या माणसांमध्ये तब्बल दहा वर्षे काम करून अनुभवलेलं एक दुर्लक्षित जग पत्रकार असलेल्या सौम्या रॉय यांनी आपल्यासमोर उलगडलं आहे. शहराच्या बकालीकरणात भर घालणारा, मानवी आरोग्य धोक्यात आणणारा हा कचरा डेपो बंद करावा म्हणून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आणि त्याचवेळी 20 मजल्यांची उंची गाठलेल्या कचऱ्याच्या डोंगरावर शहरातली जमा केलेली घाण घेऊन येणाऱ्या ट्रक्सच्या मागे धावणाऱ्या कचरावेचकांचा सुरू असलेला जगण्यासाठीचा संघर्ष यातल्या विरोधाभासाचं चित्रण आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतं. ‘माउंटन टेल्स" या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद वाचकांना अस्वस्थ तर करेलच परंतु मानवानेच निर्माण केलेल्या प्रश्नांकडे बघण्याची नवी दृष्टीही देईल.