-
-
Valmiki Ramayanatil Paach Striya (वाल्मिकी रामायणा
राजा दशरथाच्या शांता या कन्येने असीम त्याग केला नसता, तर त्याला त्याचे हवेहवेसे वाटणारे पुत्र प्राप्त झाले असते का? कोण होती मंथरा ? राणीची धूर्त आणि दुष्ट दासी, की राजप्रासादातल्या षड्यंत्रापासून आपल्या पाल्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणारी प्रेमळ माता? मीनाक्षीच्या सुंदर डोळ्यांचं रूपांतरण कुरूपता आणि अनैतिक लालसेत कसं झालं? एका सदाचारी राजकुमाराभोवती फिरणाऱ्या महाकाव्यात स्त्रियांची भूमिका कोणती? आनंद नीलकंठन हे अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत. या पुस्तकात त्यांनी वाल्मिकींच्या कालातीत महाकाव्याचे अनेक पदर उलगडत महत्त्वाकांक्षा, प्रेम, समर्पण आणि धैर्य यांच्या कथा समोर आणल्या आहेत. रामायणातल्या स्त्रियांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी ते त्यांच्या वाचकांना देऊ पाहतात. प्रेयसी, बहीण, पत्नी, माता अशा विविध रूपांत वावरणाऱ्या वाल्मिकींच्या रामायणातल्या या स्त्रिया गुंतागुंतीच्या ह्या महाकाव्याला एकत्र गुंफतात.
-
Ichapatra Kalachi Garaj (इच्छापत्र काळाची गरज)
इच्छापत्र हा थोडा भावनिक विषय आहे. या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. मुळातच माहितीचा अभाव आणि जागरुकता नसल्यामुळे इच्छापत्र करण्याबाबत उदासीनता दिसून येते. सर्वसामान्य माणसाला या विषयावर सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देणारे हे पुस्तक त्यासाठीच उपयुक्त आहे. आपल्या मृत्युपश्चात वारसांमध्ये वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपली मिळकत लाभार्थीपर्यंत पोहोचावी यासाठी आवर्जून वाचावे असे हे माहितीपर व मार्गदर्शनपर पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.
-
Mazi Aatmakatha (माझी आत्मकथा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा या विषयांमधील उच्च कोटीचे विद्वान होते. आर्थिक अडचणींवर मात करून दुहेरी पीएच.डी. प्राप्त करणारे आंबेडकर हे अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थी होते. अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, वकील अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलभूत काम करताना वृत्तपत्रांची निर्मिती केली. कायमच दलितांच्याराजकीय हक्कांचा पुरस्कार केला. भारतीय स्वातंत्र्य मिळवताना इंग्रजांना फटकावण्यासही त्यांनी कमी केले नाही. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांच्या अनेक लेखांतून स्वतःबद्दलचे निवडक लेख वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील. “सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती. त्यामुळे बुद्धिमता चातुर्य आणि तडफ यांबाबतीत आम्ही इतरांपेक्षा वीतभरही कमी नाही, हे सिद्ध करू शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकायांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या त्याकाळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी कॅम्पसमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे. सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून, ते कृतघ्नतेचे लक्षण आहे.’ अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक सडेतोड विधाने वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत.
-
Angan Vishvache Avakash Manacha (अंगण विश्वाचे अवक
विज्ञानाने जनुकशास्त्रात केलेली प्रगती पाहून मनात येते, काही वर्षांतच असाध्य रोग नष्ट होऊन मनुष्य अमरत्व प्राप्त करेल; तर कधी भीती वाटते की, सत्तेच्या, पैशाच्या जोरावर जनुकीय प्रगतीचा वापर करून जगभर दहशतवादीच निर्माण होतील; पण माणसाची जनुके ठरतात तरी कशी? धर्माप्रमाणे? कलावंतांची जनुके वैज्ञानिकांच्या जनुकांपेक्षा वेगळी असतात का? महाभारतातल्या द्रोणाचार्यांचा जन्म आणि टेस्ट ट्यूब बेबी सारखे आधुनिक शोध पाहताना दंतकथा सत्य मानाव्यात का? अशा प्रश्नांच्या घोळात कादंबरीची नायिका नेमकी कशी अडकते आणि त्या प्रश्नकोशातून बाहेर पडते की नाही ?
-
Jallianwala Bagh 13 April 1919 (जालियनवाला बाग १३
मराठी साहित्यात पहिल्यांदाच उलगडणार... जालियनवाला बाग : इतिहासात अजरामर झालेल्या 'घटनेचा' लेखाजोगा 13 एप्रिल 1919, अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या सामान्य लोकांवर ब्रिटिश लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल डायरच्या शिपायांनी केलेला निर्दयी गोळीबार हा इतिहासातील एक अजरामर प्रसंग ! या शोकांतिकेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अखेरीची ही सुरूवात ठरली. भगतसिंग, उधमसिंग या क्रांतिकारकांना जन्म देणार्या, समाजाच्या तळापर्यंत स्वातंत्र्याची उर्मी चेतवणार्या या ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मराठी साहित्यात प्रथमच या पुस्तकात ओघवत्या शैलीत मांडला आहे.
-
The Diary of a Young Girl(द डायरी ऑफ अ यंग गर्ल)
द डायरी ऑफ यंग गर्ल -‘माझ्यासारख्या एखादीच्या दृष्टीनं रोजनिशी लिहिणं हा खरोखरच एक अतिशय विलक्षण अनुभव आहे. मी याआधी काहीच लिहिलेलं नाही फक्त म्हणूनच नव्हे, तर पुढे मला किंवा इतर कोणालाही तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीच्या स्वप्नाळू चिंतनात स्वारस्य वाटणार नाही, म्हणून मला तसं वाटतं.’ अॅन फ्रँक, शनिवार, २० जून १९४२ ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’ हा एका लहान मुलींच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या महायुद्धावर टाकण्यात आलेला अपूर्व, हेलावून टाकणारा दृष्टिक्षेप आहे. अॅननं ज्या वेळी हे शब्द लिहिले होते, त्या वेळी अर्थातच आपण स्वप्नाळूपणे केलेलं हे चिंतन नाझींनी ज्यूंच्या केलेल्या सामुदायिक कत्तलींच्या दरम्यानच्या आयुष्याविषयीची माहिती देणारं प्राथमिक संसाधन ठरेल, हे तिला माहीत नव्हतं. अन ही असामान्य, हुशार, विचारी कथाकार आहे आणि तिची रोजनिशी ही मनोरंजक आणि त्याबरोबरच ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही लक्षणीय आहे. या रोजनिशीतील घटना दहशतीची फक्त ओझरती झलक दाखवत असल्या, तरी त्यांच्यातून युद्धाच्या काळातील मानवी स्वभावाचं, नातेसंबंधांचं आणि आशेचं ठसठशीत चित्रण समोर येतं. ‘या पुस्तकात अनेक महत्त्वाचे संदेश आहेत, पण सर्व लोकांना स्वातंत्र्यात मुक्तपणे जगण्याचा हक्क आहे, हा त्यातला सगळ्यांत महत्त्वाचा संदेश आहे. फक्त काही लोक वेगळ्या धर्माचे किंवा वंशाचे आहेत म्हणून त्यांना वेगळी वागणूक देता कामा नये, असं अॅनची ही कथा दाखवून देते: – द गार्डियन – ‘दुसऱ्या महायुद्धाविषयी कोणीही कुठेही सांगत असलेल्या कथांपैकी सर्वांत जास्त हेलावून टाकणाऱ्या कथांमध्ये या रोजनिशीचा समावेश होतो:
-
Jyotish Shabdagrantha(ज्योतिष शब्दग्रंथ)
ज्योतिषशास्त्र या विषयावर अनेक प्रकारचे भरपूर लिखाण उपलब्ध आहे; परंतु आश्चर्य म्हणजे या शास्त्राचा परिपूर्ण व शास्त्रशुद्ध असा शब्दकोश मात्र निघालेला नव्हता. या शास्त्राची परिभाषा, त्यातील शब्दांचे शास्त्रीय अर्थ हे लोकांपुढे आणण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नव्हता. म्हणूनच ज्योतिषशास्त्राचा एखादा समृद्ध असा शब्दकोश असावा, या विचाराने शोभा प्रभु यांनी सुमारे साडेचार हजार शब्दांच्या समाविष्टांसह या ज्योतिष शब्दग्रंथाची निर्मिती केली आहे. या शब्दग्रंथाची पहिली आवृत्ती २६. फेब्रुवारी २००२ रोजी प्रकाशित झाली. ग्रंथाची उपयुक्तता जाणून ही दुसरी आवृत्ती आता २०२२मध्ये प्रकाशित करीत आहोत. ज्योतिषशास्त्रातील हा एकमेव शब्दग्रंथ वाचकांना नक्की आवडेल आणि उपयुक्त ठरेल, याची खात्री वाटते.
-
Eka Yogyachi Atmakatha (एका योग्याची आत्मकथा)
परमहंस योगानंद भारताचे प्रथम योग गुरु होते ज्यांचे उद्देश्य पश्चिमेस राहून योग शिक्षण देणे हे होते . १९२० च्या दशकात जेव्हा त्यांनी संपूर्ण अमेरिकेचा दौरा केला, ज्यास ते "आधात्मिक आंदोलन " म्हणत , उत्साही श्रोत्यांनी अमेरीकेची मोठ्यात मोठी सभागृहे भरली.त्यांचा प्रारंभिक प्रभाव शक्तिशाली होता; पण त्यांचा स्थायी प्रभाव आणखीनच शक्तिशाली आहे . सर्वप्रथम १९४६ मध्ये छापलेल्या या पुस्तकाने जगात एका आध्यात्मिक क्रांतीचा प्रारंभ करून त्यास सतत प्रेरित केले आहे . परमहंस योगानंदांच्या स्तराचे संत आपल्या जीवनातील अनुभवांचा प्रत्यक्ष खुलासा कचितच लिहितात . अनेक धार्मिक परंपरांच्या अनुयायांनी ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी ला आध्यात्मिक साहित्यातील एक उत्कृष्ट रचना असे मानले आहे. तरीही त्याच्या संपूर्ण गहनतेत , ते सौम्य हास्य , चैतन्यपूर्ण गोष्टी व व्यावहारिक सामान्य ज्ञानाने परिपूर्ण आहे १९४६ च्या मूल आवृतीचे हे प्रथम मराठी मुद्रण आहे जरी नंतरचे पुनर्मुद्रण , १९५२ मधील लेखकाच्या देहावसनानंतरचे सुधारित बदल दर्शवतात , त्यांच्या लाखोंहून अधिक प्रती विकल्या गेल्या , आणि १९ हुन अधिक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले , सुरुवातीच्या काही हजार मूळ प्रती संग्रहकर्त्यांच्या हातात गायब झाल्या .या पुनर्मुद्रणामुळे १९४६ ची प्रत आपल्या सर्वशक्तीनिशी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे .ज्या रुपात महान योग गुरूंनी त्याला प्रथम प्रस्तुत केले होते . "योगानंदांच्या जीवनात प्रकाशित मूळ , आवृत्तीमध्ये वाचक स्वत: योगानंदांच्या संपर्कात जास्त रहातो . जरी योगानंदांनी केंद्र आणि संस्था स्थापन केल्या तरी एका चर्चपेक्षा दुसऱ्या चर्चला महत्त्व देण्यापेक्षा व्यक्तीचा दिव्यत्वाशी संपर्क करून देण्यामध्ये त्यांना जास्त काळजी होती. या महान आध्यात्मिक व योगिक ग्रंथांच्या मूळ आवृत्तीमध्ये या भावनेला जास्त सहजपणे जाणता येते .