-
Vidnyanvrutti(विज्ञानवृत्ती)
विज्ञानाचे कार्य कसे होते, वैज्ञानिक कशा प्रकारे कार्य करतात, विज्ञानवृत्तीमुळे समाजाच्या आर्थिक, सामाजिक व तांत्रिक विकासात कसा बदल घडून येतो, अशा प्रकारची वैज्ञानिक वृत्ती जोपासणे कसे आवश्यक आहे या सर्वांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक म्हणजे ‘विज्ञानवृत्ती’ होय. शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड, कुतूहल निर्माण व्हावे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. विज्ञानवृत्तीशिवाय समाजाचा विकास आणि मूलभूत परिवर्तन शक्य नाही. परिश्रम, जिद्द, प्रायोगिक वृत्ती, कल्पकता या गुणांचा विकास होण्यासाठी विज्ञानवृत्ती अतिशय आवश्यक असते. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे.
-
Bahirji Naik (बहिर्जी नाईक)
"योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, हा शिवरायांनी माझ्या गुप्तहेर पथकासाठी घालून दिलेला दंडक मी हयातभर कधीच मोडला नाही आणि आज हयात नसताना देखील तो मी मोडणार नाही. माझ्या राजांचा आदेश मानूनच मी बोलणार आहे; सर्व काही सांगणार आहे. स्वतःचे चरित्र स्वमुखाने सांगावे, असा मी कोणी महानायक किंवा युगपुरुष नाही. इतिहास कथन करू शकेल असा इतिहासकार तर मुळीच नाही; परंतु इतिहासाचे आणि जवळपास सर्वच दोस्त-दुश्मनांचे भेद जाणणारा आणि इतिहासाच्या पानांना माहीत नसलेला गूढ इतिहास डोळ्यांनी अनुभवलेला गुप्तहेर नक्कीच आहे. इतिहासाने या बहिर्जीची नोंद ठेवली नाही, ठेवू शकणारही नाही. कारण इतिहास कधीच गुप्तहेराचा साक्षीदार नसतो; परंतु हा गुप्तहेर बहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे."
-
Vithaichi Kanhaai(विठाईची कान्हाई)
सौ. आरती काळे यांची 'विठाईची कान्हाई' ही संत कान्होपात्रा यांच्या जीवनावरची कादंबरी आहे. संत कान्होपात्रा ही वारकरी संतांमधील सोनचाफ्याचे फूल आहे. ती शामा गणिकेची मुलगी असून अत्यंत सौंदर्यवती, नृत्यनिपुण व मधुर आवाज असणारी होती. तिच्या सौंदर्याची, नृत्याची, आवाजाची ख्याती दूरवर पसरली होती; पण ती मात्र विठ्ठलभक्तीत तल्लीन होती. पांडुरंगाशी तिची एकनिष्ठता, भक्ती इतकी श्रेष्ठ होती की, बिदरचा राजा तिच्या सौंदर्याने मोहित होऊन तिला पकडून आणण्यासाठी सरदार पाठवतो; पण ती शेवटचे दर्शन घ्यायला विठ्ठल मंदिरात जाते व आपला देह विठ्ठलचरणी समर्पित करते. मृत्यूलासुद्धा आपल्या इच्छेने, भक्तीने अधीन करून घेणारी कान्होपात्रा एक श्रेष्ठ भक्त आहे. ,P>सौ. आरती काळे यांच्या 'विठाईची कान्हाई' या कादंबरीत कान्होपात्रेच्या आयुष्यातील उत्कट भक्तीचा, विरक्तीचा प्रत्यय येतो. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील संघर्ष, गणिकेचे जीवन, तत्कालीन समाज व संस्कृती यांचे दर्शन घडते. कान्होपात्रा गणिका व सुंदर असल्याने तिच्या वाट्याला येणारे दुख, एक स्त्री म्हणून तिच्या वेदना, यातना आपल्याला जाणवतात; पण तिची भक्ती, एकनिष्ठता पाहून मन विस्मित होते, तिचा हा उत्कट प्रवास लेखिकेने आपल्या ओघवत्या शैलीत, अर्थपूर्ण संवादात व रसाळ भाषेत फार भावपूर्णरीत्या रेखाटला आहे. प्रा. डॉ. श्रुती श्री वगबाळकर
-
Jivachi Jan(जीवाची जाण)
आपले रोजचे जीवन सर्वतोपरी सुखाचे असावे असे प्रत्येकालाच वाटत असते; परंतु खरे सुख कोणते हे आपणास समजलेले नसते. आपल्या मन, बुद्धी, चित्ताच्या गुंतावळ्यात आपण भरकटत असतो. त्यासाठी जीवाने जाणिवेच्या स्तरावर यायला हवे. त्यासाठी करायच्या विचारांचे मंथन म्हणजे हे पुस्तक. जीवाच्या या जाणिवेतून अध्यात्माचा श्रीगणेशा सुरू होतो. अशा सर्व मुमुक्षूंना उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे हे निश्चित.
-
Marg Yashacha, Marg Sukhacha(मार्ग यशाचा, मार्ग सु
आपल्या सहवासात असलेले आपले मित्र, नातेवाईक किंवा शेजारी असे अनेक जण आपण पाहत असतो की, त्यांनी अनेक प्रकारे व प्रचंड प्रमाणात आर्थिक, सामाजिक यश मिळवले आहे; तरीही ते समाधानी असतातच असे नाही. माणसाची सर्वोच्च प्राथमिकता समाधान हीच असायला पाहिजे. आर्थिक, सामाजिक किंवा अन्य यश मिळवतानाच समाधान मिळवणे शक्य असते. त्यासाठी जगभरचे मानसशास्त्रज्ञ, व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ प्रचंड प्रयत्न करत आहेत. त्यावर शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत, शेकडो प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. अर्थात, यांतले बहुसंख्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि पुस्तके इंग्रजीत आहेत आणि ती पाश्चात्त्य मानसिकतेचा विचार करून लिहिलेली आहेत. मराठीत याची पोकळी जाणवत होती. ‘मार्ग यशाचा, मार्ग सुखाचा’ हे पुस्तक ही उणीव भरून काढते. जर तुम्ही तुमच्या स्वभावातल्या छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलते आणि यशासोबत समाधानही लाभते, हे सांगणारं अतिशय उपयुक्त, साध्या सरळ सोप्या भाषेतलं, मराठी वाचकांना थेट भिडणारं हे लिखाण. कोणताही बदल सहजी स्वीकारण्याची माणसाची तयारी नसते. ज्यांना कुणाला जाणवतंय की, मला आता बदलणं आवश्यक आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, मार्गदर्शक आहे आणि लगेच परिणाम दाखवणारं आहे.
-
Shunyatoon Suryakade(शून्यातून सूर्याकडे)
'शून्यातून 'सूर्या'कडे' ही मृत्यूशी झुंज देणाऱ्या फिनिक्सच्या उड्डाणाची वास्तव कहाणी आहे. जीवघेण्या, भीषण अपघाताच्या संकटानं खचून न जाता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर आशाबाद, कमालीची जिद्द व दुर्लभ सहनसिद्धी या भक्कम खांबांवर उभी असलेली ही यशोगाथा आहे. ही कहाणी म्हणजे, भावनांची उत्कट अभिव्यक्ती आहे. ही कहाणी केवळ वेदना, संकटं, दुःखं सांगणारी नाही; तर संकटांवर स्वार होऊन यशाच्या शिखराकडे झेपावणाऱ्या जिद्दीची कहाणी आहे. संकट म्हणजे भगवंताचं रूप. या रूपाच्या दर्शनानं जगण्याचं नवं, डोळस भान येतं. संकटरूपी आकाश कोसळलं, तर तेच पायाखाली घेऊन ताठ मानेनं जगायचं. प्रतिकूलतेचं प्रखर वास्तव मान्य करून अनुकूलतेचं स्वप्न रंगवायचं, ध्येयाकडे झेप घ्यायची व सत्यासाठी अपार कष्ट, अविरत प्रयत्न, गो बियाँड फेल्युअर या त्रिसूत्रीचा अवलंब करायचा. आपल्या प्रत्येकाचं जीवन म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. भूतकाळाची चक्रं आपण उलटी फिरवू शकत नाही; पण भविष्यकाळाला वळण लावणं आपल्या हातात असतं. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' म्हणजे वास्तव शांतपणे मान्य करून स्वत:ला स्वतःची झालेली खरी ओळख!
-
Jani Janardan- Vinchudanshavaril Lasiche Pravartak
देवमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेले विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक,माजी आमदार कै. डॉ. श्रीधर दत्तात्रय उपाख्य तात्यासाहेब नातू यांचा जीवनपट या चरित्रलेखनातून त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह सामोरा येत आहे. त्या काळी विंचवाच्या दंशामुळे होणारे आजार व मृत्यू यांवर योग्य उपचार होण्यासाठी तात्यासाहेबांनी प्रचंड परिश्रम घेतले. विविध भूमिकांमध्ये समाजासाठी काम करीत राहिलेल्या तात्यासाहेबांचे काम आता दंतकथा वाटावे, इतक्या विलक्षण घटनांनी भरलेले आहे. त्या साऱ्यांचे संकलन या चरित्राच्या निमित्ताने करण्यात या पुस्तकाचे लेखक श्री. धीरज वाटेकर यांना यश आले आहे. संदर्भांची रेलचेल असलेला हा अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज आहे. सर्वार्थाने सार्थक असलेले ध्येयवेड्या, निष्ठावेड्या लोकसेवकाचे जीवन कसे असते, याचा वस्तुपाठ या चरित्राच्या निमित्ताने असंख्य वाचकांच्या समोर जात आहे, याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. तात्यासाहेबांसारखी लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वे व्यक्ती, कुटुंबे आणि समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या अद्वितीय गुणांचा निःस्वार्थ वापर करतात. अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये केवळ इच्छा असून चालत नाही. त्यांच्यात सहानुभूती, करुणा, लवचीकता, समर्पण, संवाद-विश्लेषण व समस्या सोडवण्याची कौशल्ये असे सगळे असावे लागते. ते सारे तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात होते, याचा प्रत्ययकारी अनुभव जनी जनार्दन वाचताना येतो. – श्री. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)
-
Mahamaya Nilavanti (महामाया निळावंती)
४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. ह्या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो. अलीकडच्या काळात, १९९२ साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, 'महामाया निळावंती'त. अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी. ' महामाया निळावंती '
-
Videshi Guptaher Katha (विदेशी गुप्तहेर कथा)
पंकज कालुवाला यांचे नाव विदेशी गुप्तहेर व त्यांच्या कारवाया त्यांनी त्यांच्या देशासाठी केलेली कामे या सगळ्यांचे सविस्तर दस्तावेजीकरण म्हणता येईल अशी त्यांनी पुस्तके लिहिली आहेत आणि या पुस्तकांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्या या पाचही पुस्तकांतील कारवाया व त्यांची वर्णने ही पुराव्यानिशी यांनी केली आहेत या पुस्तकांच्या शेवटी मोठी संदर्भ सूची दिली आहे. आणि आता असे काही गुप्तहेर त्यांना आढळले की त्यांनी केलेल्या कारवायांचे पुरावे किंवा संदर्भ त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने काही गुप्तहेर कथा लिहिल्या आणि त्याच परममित्र पब्लिकेशन्स काल प्रकाशित केल्या ते पुस्तक म्हणजे पंकज कालुवाला लिखित विदेशी गुप्तहेर कथा. नावाप्रमाणेच वेगळ्यावेगळ्या विदेशी गुप्तहेर यांच्या या पुस्तकामध्ये दहा कथा आहेत त्यामध्ये वाचक गुंतून जातो.
-
Khisekapuchya Mishya Ani Anya Rahasyamayi Katha -
पंकज कालुवाला यांची दोन पुस्तके नव्याने आली आहे रहस्यमय कथा भाग एक आणि भाग दोन. पुस्तकाच्या प्रस्तावना मध्ये मनोगतामध्ये त्यांनी म्हटलंय की रहस्य कथा लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे वाचकाला वाचत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. खरोखरच आपण मी जेव्हा हे पुस्तक जेव्हा वाचतो त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं. रहस्य कथा मध्ये त्या कथेतील रहस्य कथेच्या शेवटी कुठेतरी उलगडतं . उदाहरणार्थ डुकरांचे खून या कथेमध्ये आपल्याला इतकं गुंतायला होतं की डुकरांचे खून कसं काय आणि आपण वाचत वाचत कथेच्या शेवटी येतो त्या वेळेला या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो. आम्ही आणि अशाच प्रकारच्या कथा या पहिल्या भागात व दुसऱ्या विभागात आहेत पंकज कालुवाला यांची लेखन शैली लेखक वाचकांना फिरवून ठेवते याचा अनुभव आला . पंकज कालवाल्यांचे जे चाहते आहेत त्यांनाही निश्चितच येईल असं निश्चित वाटतं.
-
Dukaranche Khun Ani Anya Rahasyamayi Katha (डुकरां
पंकज कालुवाला यांची दोन पुस्तके नव्याने आली आहे रहस्यमय कथा भाग एक आणि भाग दोन. पुस्तकाच्या प्रस्तावना मध्ये मनोगतामध्ये त्यांनी म्हटलंय की रहस्य कथा लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे वाचकाला वाचत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. खरोखरच आपण मी जेव्हा हे पुस्तक जेव्हा वाचतो त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं. रहस्य कथा मध्ये त्या कथेतील रहस्य कथेच्या शेवटी कुठेतरी उलगडतं . उदाहरणार्थ डुकरांचे खून या कथेमध्ये आपल्याला इतकं गुंतायला होतं की डुकरांचे खून कसं काय आणि आपण वाचत वाचत कथेच्या शेवटी येतो त्या वेळेला या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो. आम्ही आणि अशाच प्रकारच्या कथा या पहिल्या भागात व दुसऱ्या विभागात आहेत पंकज कालुवाला यांची लेखन शैली लेखक वाचकांना फिरवून ठेवते याचा अनुभव आला . पंकज कालवाल्यांचे जे चाहते आहेत त्यांनाही निश्चितच येईल असं निश्चित वाटतं.
-
Phoenix Bharari (फिनिक्स भरारी)
"प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृतीत ‘फिनिक्स’ या पौराणिक पक्षाला महत्त्वाचे स्थान आहे. अमरत्व प्राप्त असलेला हा तेजस्वी पक्षी अखेरीस जळून राख होतो. परंतु याच राखेतून पुनर्जन्म घेऊन तो नव्या आयुष्यास सुरुवात करतो. माणसाचे जीवनही असेच असते. आयुष्यात जेथे सर्व आशा, आकांक्षा लोप पावतात, तिथेच नव्या पर्वाची सुरुवात होते. जीवनातील कटू-सुखद अनुभवांतून नवीन भरारी घेण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध करत असतो. ‘फिनिक्स भरारी’ या आत्मकथनातील फायनान्स गुरु राम गायकवाड यांचा प्रवास असाच थक्क करणारा आणि वाचकांना नव-ऊर्जा देणारा आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रतिकूलतेच्या गर्तेतून गगनभरारी घेणाऱ्या राम गायकवाड यांची संघर्षमय चरित्र कहाणी वाचकांना आयुष्यातील आव्हानांशी सामना करण्याची प्रेरणा आणि सकारात्मकतेची अनुभूति देईल अशी खात्री वाटते."
-
Prabhavshali Arthshastradnya (प्रभावशाली अर्थशास्त
अर्थशास्त्र विषयात मूलभूत योगदान देणाऱ्या तसेच अर्थशास्त्रात भरीव कामगिरी करून नोबेल पुरस्कार हा सन्मान प्राप्त करणाऱ्या जगातील श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञांचा प्रेरणादायी जीवन प्रवास या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा व शोधनिबंध इत्यादी संदर्भ देण्यात आले आहेत. जेणेकरून अभ्यासक व विद्यार्थी यांना त्यांच्या संशोधनाचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) अर्थशास्त्र विषयाशी संबंधित संदर्भग्रंथ म्हणून तसेच श्रेयांक मानांकासाठी ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
-
Rudraprayagcha Narbhakshak Bibtya (रुद्रप्रयागचा न
"एका अवलिया शिकार्याच्या या अजब शिकारकथा आहेत. या थरारक आहेत, पण फक्त थराराचाच अनुभव देणार्या कथा नाहीत. माणूस आणि प्राणी यांच्यातला निसर्ग सांगणार्या, त्यांच्यातली पेचात टाकणारी समीकरणं दर्शवणार्या कथा आहेत. आजच्या गतिमान युगाला अपेक्षित टिपेच्या अनुभवाची कुठलीही कळ त्या दाबत नाहीत, पण पाऊलही न वाजवता निसर्गासोबतच्या दीर्घ प्रवासाची खुमारी आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांचे अमीट तरंग त्या मनावर उमटवल्याशिवाय राहत नाहीत. खड्ड्यात मरून पडलेला बिबट्या नरभक्षकच असल्याचं सिद्ध करण्यासाठीचा कोणताही पुरावा माझ्यासमोर नव्हता, पण तो नरभक्षक बिबट्याच असल्याचं समजायला मला एका सेकंदाचाही वेळ लागला नव्हता. मात्र तो त्या पंडितच्या भाषेतला कुणी सैतान नव्हता. मला रात्र रात्र जागायला लावून कुठूनतरी मला बघत असलेला, त्याला मारण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ चाललेले बघून विकट हसत असलेला, माझ्या बेसावध होण्याची जिभल्या चाटत वाट बघणारा, माझ्या गळ्यात आपले सुळे रोवायच्या संधीची वाट बघत असणारा कुणी दुष्ट प्राणी नव्हता. इथे तर एक साधा, वय झालेला बिबट्या मरून पडला होता. त्याचा गुन्हा एकच होता. तोही निसर्गाच्या कायद्याच्या विरुद्ध केलेला गुन्हा नव्हता, तर मानवतेच्या विरुद्ध केलेला गुन्हा होता. तो म्हणजे, त्याने माणसाचं रक्त सांडलं होतं. त्यातून त्याला माणसांमध्ये दहशत माजवायची होती, असंही नव्हतं. तर त्याला स्वत:ला जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सगळे उद्योग केले होते!
-
Marathi Sattecha Samrajyavistar (मराठी सत्तेचा साम
"सतराव्या शतकात महाराष्ट्रात मराठी सत्तेचा उदय झाला. त्या शतकाच्या उत्तरार्धातच येथे मराठ्यांचे राज्य निर्माण झाल्याचा पुकारा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेऊन केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या नवोदित स्वराज्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत बिकट परिस्थितीत कसोटीच्या काळात हे नवे राज्य सांभाळले. त्यांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही मोठ्या संकटांना तोंड देत राज्य राखावे लागले. तथापि त्यांची दृष्टी केवळ राज्य राखण्यावर नव्हती, तर त्याचा विस्तार करण्याच्या बाण्याची होती. राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराबाई यांनीही अविरत संघर्ष करून मराठ्यांचे राज्य टिकविले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या आणि त्या अगोदर राजाराम महाराजांच्या काळातही मराठी फौजा नर्मदा पार झाल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळाजी विश्वनाथाने मराठ्यांच्या साम्राज्य विस्तारास नवी क्षितिजे निर्माण करून दिली. पेशवा बाजीरावांच्या काळात तर मराठ्यांच्या स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले. शिवोत्तर कालखंड ते श्रीमंत पेशवा बाजीराव असा मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्या दृष्टीने बाजीराव पेशवेपूर्व काळातही मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नांची दखल घेऊन बाजीराव पेशव्यांच्या काळापर्यंतचा इतिहास मांडण्याचे इथे योजले आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना हे पुस्तक पसंत पडेल अशी खात्री वाटते.