-
Raya (राया)
कृष्णदेवराय हा बहुजन पार्श्वभूमीतून पुढे आलेला राजपुत्र सन १५०९मध्ये विजयनगरच्या सिंहासनावर विराजमान झाला. एकीकडे कमकुवत झालेलं साम्राज्य आणि दुसरीकडे चोहो बाजूंनी शत्रू अशा, प्रसंगी खचवून टाकणार्या परिस्थितीला कृष्णदेवराय धैर्याने समोरा गेला आणि आणि आपल्या २० वर्षांच्या विलक्षण कार्यकाळात त्याने इतिहास घडवला! आपल्या कारकिर्दीतल्या सर्व लढाया तो जिंकला आणि त्याने दक्षिण भारताला एकअमली छत्राखाली आणलं. आज कृष्णदेवराय भारतीय इतिहासातल्या थोर राजांपैकी एक मानला जातो, ते केवळ रणांगणावर त्याने अतुलनीय यश मिळवलं म्हणून नाही, तर तो खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरचा पहिला भारतीय राजा होता म्हणून. जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता यांसारख्या आव्हानांना त्याला तोंड द्यावं लागलं होतं. या सांस्कृतिकदृष्ट्या गतिशील कालखंडाने कृष्णदेवरायाला भारतीय इतिहास आणि परंपरा यांचा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. एक ‘तत्त्वज्ञ-राजा’ असलेला कृष्णदेवराय स्वतः एक निष्णात कवी होता. या विलक्षण आणि उत्कंठावर्धक पुस्तकात अत्यंत सूक्ष्म संशोधनाची रंजक मांडणी करण्यात आली आहे. पोर्तुगीज आणि फारसी स्रोतांबरोबर अनेक दुर्लक्षित तेलुगू स्रोतांवर हे पुस्तक आधारित आहे. थोर सम्राट कृष्णदेवराय याचं हे मनोवेधक चरित्र इतिहासप्रेमींच्या व रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास वाटतो.
-
Zambal (झांबळ)
भेटलेली माणसे घनदाट होती ! थेट पोचायास कोठे वाट होती ? कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत. काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत भेटतील. ही माणसं अनेकार्थांनी घनदाट होती. त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता, त्यांची नाती अतूट मायेची होती आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं. याबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो तोवर ते निघून गेलेले असतात. मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या थेट वाटा उरत नाहीत, उरतो तो पश्चाताप! ही माणसं चराचरावर जीव लावतात आणि जीवावर उदार होऊन जगत काळाच्या ओघात लुप्त होतात. अशाच काही साध्यासुध्या पण घनदाट माणसांच्या गोष्टींचे हे पुस्तक.
-
Pashchimatya Samajshastradnya (पाश्चिमात्य समाजशास
समाजशास्त्रीय सिद्धांत व सिद्धांतकार यांच्या अभ्यासाला समाजशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यांनी मांडलेल्या संज्ञा, संकल्पना, सिद्धांत व दृष्टिकोन या सर्वांची अभ्यासकांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. समाजशास्त्रातील लहानात लहान संज्ञा असो वा वापरलेले शब्द असो ते यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. समाजशास्त्राच्या प्रारंभीच्या बांधणीत ज्या समाजशास्त्रज्ञांनी योगदान दिले त्या काहींचा येथे समावेश केला आहे. ज्यामध्ये ऑगस्त कॉम्त, कार्ल मार्क्स, हर्बर्ट स्पेन्सर, ए. आर. रॅडक्लिफ ब्राऊन, एमिल डर्कहेम, मॅक्स वेबर, टॉलकॉट पार्सन्स आणि रॉबर्ट मर्टन या विचारवंतांचा समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्यात मोलाचा वाटा आहे. अनेक अभ्यासक व शास्त्रज्ञांनी अनेक संज्ञा, संकल्पना, सिद्धांत व दृष्टिकोनांची मांडणी करून या विषयाला लोकप्रिय बनविले. समाजशास्त्र या विषयाची आवश्यकता लक्षात घेत आज जगभरातील लाखो अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ अध्ययन करीत आहेत ही एक महत्त्वाची बाब आहे. ‘पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ’ या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये जगभरातील काही महत्त्वाच्या समाजशास्त्रज्ञांच्या सिद्धांताचे विस्ताराने विश्लेषण करण्यात आले आहे, ज्याचा फायदा विद्यार्थी, अभ्यासक व प्राध्यापक या सर्वांना निश्चितच होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.
-
Ghost Writer Ani Itar Vidnyankatha (घोस्ट रायटर आण
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात. माणूस नव्या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक अधीन होत असताना क्षणभर थांबून त्याच्या योग्यायोग्यतेवर विचार करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या विज्ञानकथा.
-
Nandgaon Te London (नांदगाव ते लंडन)
भास्कर कदम पत्रकार, समाजकार्यकर्ता तसेच राजकारणातून समाजकारण करणारी एक विलक्षण वल्ली. नांदगावच्या या सुपुत्राने त्यांच्या कार्यामुळे कर्तृत्वाने नांदगावकरांच्या आयुष्यात स्वतःचे स्थान मिळवले आणि त्यांची नाळ नांदगावशी इतकी खोल रुजलेली आहे कि पुस्तकाचे शीर्षकदेखील ' नांदगाव ते लंडन हे दिले. एका सामान्य गावातील मुलगी लंडनला जाते, प्रथम क्रमांकाने पास होते, स्वतःचे प्राविण्य सिद्ध करते. तेही एका सामान्य बाबाची लेक ज्या बापाने हि कधी लंडन बघण्याचे स्वप्न पाहिलेले नसते. क्षितीजाच्या पदवीदान समारंभासाठी नॉटिंगहॅमला जायची संधी मिळाली. त्यानिमित्ताने पूर्ण युनायटेड
-
Pratiti (प्रतीती)
केवळ स्त्रियांच्या कथनात्मक साहित्यातच नव्हे, तर समग्र मराठी साहित्यपरंपरेमध्ये ज्यांचे स्थान लक्षणीय ठरते, अशा लेखकांमध्ये सानिया यांचा समावेश होतो. त्यांचे लेखन संयात्मक दृष्टीने मोजके असले, तरी ते निश्चितपणे गुणवान व कसदार आहे. आपल्याला भिडलेला, भावलेला अनुभव त्याच्या सूक्ष्म कडा - कंगोर्यांसह प्रतिकात्मक भाषेत सानिया आपल्या कथांमधून साकार करतात. बाह्यविश्वातील घटना - घडामोडीपेक्षा माणसांच्या अंतर्मनातील हेलकावे -हालचाली शब्दांकित करणार्या या कथांना एकाच वेळेस समकालीन व सार्वत्रिक परिमाणा प्राप्त होते. त्यामुळे आपली निजखूण शोधण्याच्या प्रवासात सानिया यांच्या निवडक कथांचे हे संपादन वाचकाला मोठेच सहाय्य करील, यात शंका नाही.
-
Aamacha Kay Gunha (आमचा काय गुन्हा)
संस्थेच्या गजाआड राहणार्या मुलांच्या अस्तित्वाच्या प्रश्नासारखी गंभीर समस्या हा या पुस्तकाचा गाभा ! पण तो गाभा हाताळतांना कुठे कंटाळवाणा नाही की अनावश्यक तात्विक चर्चा नाही. वाचकाच्या मनाला अंतर्मुख करण्याची शक्ती या सहज-सुंदर लेखनात आहे. "आप तो आ जाव" या मुलांच्या निमंत्रणातील आर्जवानं रेणू गावस्कर या गजाआडच्या मुलांपाशी गेल्या. त्यांचं पुस्तक प्रत्येक वाचकाच्या मनात जिवंतपणाचा झरा निर्माण करील यात काहीच शंका नाही.
-
Kinare Manache (किनारे मनाचे)
बाईंच्या दीर्घकालीन काव्य प्रवासाचा चिकित्सकपणे आणि सहृदयतेने घेतलेला वेध गेल्या अर्धशतकापासून शांताबाई काव्य लेखन करीत आहेत.इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी आतापर्यंत हाताळले असले तरी आत्मनिष्ठ कविता हीच त्यांची सर्वात आवडती निर्मिती राहिली आहे.`किनारे मनाचे` हा शांता बाईंच्या दीर्घकालीन काव्याप्रवासाचा चीकीत्सतपणे आणि सहृदयेने वेध घेणारा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे.सुप्रसिद्धी कवयित्री आणि नामवंत समीक्षिका डॉ.प्रभा गणोरकर यांनी शांत बाईंच्या कवितेचा विकासक्रम इथे मार्मिकपणे उलगडून दाखविला आहे.तिचा आशय,अविष्कार,भाषेचे पोत,तिच्या मर्यादा आणि तिची शक्ती,त्याबरोबर समकालीन कवितेच्या संदर्भात तिचे असलेले नेमके स्थान या सर्व गोष्टींचा अत्यंत अभ्यासपूर्ण,मुलभूत आणि स्वतंत्र विचार डॉ.गणोरकर यांनी आपल्या विस्तृत प्रास्ताविकात केलेला आढळेल.एका जेष्ठ कवयित्रींचा या निवडक कविता आणि तिच्या सर्व काव्यलेखनाच्या हि सर्वांगीण समीक्षा काव्यासारीकांना आणि विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उतबोधक वाटेल.
-
Maharashtra Darshan (महाराष्ट्र दर्शन)
अंग्रेजांना संपूर्ण भारत जिंकण्यापूर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युध्दश्री ती रग, तो आवेश, अजूनही मावळला नाही. कधी मावळेलसे दिसत नाही. हा गुण डोंगरावरून वाहात येणार्या भराट वार्याचा आहे. कृष्णा, कोयना,पवना, भीमेच्या पाण्याचा आहे. तेव्हा महाराष्ट्र श्रीमंत आहे. स्वाभिमानी तर आहेच आहे. कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही. मित्रांसाठी जीव देणारा आहे. भक्तिभावाने गहिवरणारा आहे. लढताना प्राण तळहाती घेणारा आहे. थोडासा भांडखोरही आहे. थोडीशी हिरवटपणाची झांक आहे. पण किती? चंद्रावरल्या डागाएव्हढी. ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला, त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाही आहे. आतिथ्यशील आहे. किंबहुना तो आहे गिरिशिखरांच्या दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा. संतापला तर त्रिभुवन पेटवील. संतुष्ट झाला तर कारूण्याची गंगा वाहवील. त्या महाराष्ट्राचे हे दर्शन
-
Shivarayanchi Yuddhaniti (शिवरायांची युद्धनीती)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची, युद्धशास्त्राची आजही आवश्यकता आहे. शिवरायांची युद्धनीती या नवचैतन्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि डॉ. सच्चिदानंद शेवडे व दुग्रेश परुळेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात दिलेली माहिती अभ्यासपूर्ण आहे. त्यांच्यासारख्या सावध राज्यकर्त्यांची आज या देशाला नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी आजही त्यांची युद्धनीती जाणून घेण्याची गरज आहे. शिवरायांनी त्या काळात सर्व शाहींना पायाखाली दाबून स्वराज्याची निर्मिती केली. या पुस्तकात अनेक विषय अभ्यासपूर्ण हाताळले असून, शिवरायांच्या विविध पैलूंवर, त्यांचे सनिकांवर असलेले प्रेम, काळजी आणि प्रसंगी कठोर निर्णय घेत असताना न डगमण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या मावळ्यांच्या हितासाठी त्यांनी सर्व गड-किल्ले तहात देण्याचे कबूल केले. दिलेला शब्द पाळण्यासाठी ते प्रसंगी कैद झाले, मात्र वचन पाळले.