-
Devachya Navan (देवाच्या नावानं)
श्रद्धाळू माणूस मनातल्या आस्थेपोटी देवदर्शनाला जात असतो. कुठल्याश्या मंदिरात जावं, दोन-चार तास थांबावं, मनोमन प्रार्थना करावी, यथाशक्ती देणगी द्यावी आणि सुखासमाधानाच्या आशेने घरी परतावं, असा त्यांचा नित्यनेम असतो. मात्र त्याच्या या छोट्याशा कृतीमुळे देवस्थान नावाचा एक भला थोरला डोलारा उभा राहतो, याची त्याला कल्पनाही नसते. प्रत्यक्षात त्याच्यासारख्या हजारो भक्तांच्या प्रवाहामुळे देवस्थान प्रसिद्ध पावतं, कोटी-कोटीची उड्डाणं घेऊ लागतं, स्पर्धा-चढाओढ-ताबा मिळण्यासाठीची धडपड अशा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ तिथे सुरू होतो. देवाच्या नावाने बरंच काही घडू लागतं. या सार्याचे व्यापक, सामाजिक-राजकीय परिणामही घडू लागतात. हे सारं कसं होतं याचा महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचा अभ्यास करून घेतलेला शोध.
-
Dikkalayatri-Anya Mitimadhun Aaleli Manas (दिक्काल
अॅडव्होकेट सुशील अत्रे यांच्या कथा गेली दहा वर्षे सातत्याने धनंजय दिवाळी अंकात प्रसिद्ध होत आहेत. अत्यंत सरळ सोपी भाषा, वर्तमानातील घटनेची इतिहासाशी सांगड घालण्याचे कौशल्य यामुळे वाचक कथानकात गुंतत जातो. कथेतील पत्रकार असलेला नायक, त्याला येत असलेले अतिंद्रीय अनुभव, त्यानुसार तो घेत असलेला शोध आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांची तो आपल्या पद्धतीने घालत असलेली सांगड आपल्याला अधिकाधिक गुंतवून ठेवते. यातील कथा केवळ काल्पनिक असतील अशी शंका सुद्धा वाचकाला येत नाही इतके त्यांनी दिलेले संदर्भ कथेमध्ये चपखल बसलेले असतात. लेखन, वाचन, नाट्य, प्रवास, गिर्यारोहण यांची आवड असलेले सुशील अत्रे उत्तम वाचकही आहेत. त्यांच्याकडील पुस्तकांचा अफाट संग्रह आणि त्याबद्दलचा जिव्हाळा याची साक्ष देत असतात. वाचक नक्कीच ‘दिक्कालयात्री' या कथासंग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत करतील यात शंका नाही.
-
Tila, Tila Dar Ughad (तिळा,तिळा दार उघड)
आपले भविष्य आपल्या हाती आहे, याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, तर काहींना हे माहीतच नसते. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला शरण जाण्याचा मार्ग ते अवलंबतात. खरे तर प्रत्येक माणूस हुशारी, बुद्धिमत्ता घेऊनच जन्माला येतो; पण नंतर आपण परिस्थिती, इतर लोकं, अनुभवाचे ओझे बाळगत जीवन कंठतो. आपली अलौकिक बुद्धीमत्ता, कौशल्य सर्व अडगळीत पडते. आपल्यातील हा सुप्त खजिना बाहेर कसा काढावा, हे सायमन टी. बेली यांनी 'रिलीज युवर ब्रिलीयन्स'मधून सांगितले आहे. याचा मराठी अनुवाद तिळा तिळा दार उघड या नावाने प्रमोद शेजवलकर यांनी केला आहे. कार्बनच्या दगडतून तयार झालेल्या खड्ड्यातून हिरा घडविला जातो, त्याप्रमाणे मातीतील सुप्त गुण बाहेर येण्याची आपला विचारम् दृष्टिकोन बदलणे आवश्यक असते. आपल्या हुशारीला बुद्धिमत्तेची धार येण्यासाठी स्पष्टता, श्रद्धा, धाडसी योजना व अंतिम स्वप्न या टप्प्यातून जावे लागते. ते कसे जायचे व त्यासाठी काय करावे, याविषयी यात मार्गदर्शन केले आहे. आयुष्याचा कायापलट घडविणारी ही चारसूत्री अमलात आणणे आवश्यक आहे.
-
Shatkant Ekach Sachin (शतकांत एकच सचिन)
शतकांत एकच सचिन सचिन तेंडुलकरनं वयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. काही मोजक्या लोकांना सचिनच्या या प्रवासाचं अगदी जवळून साक्षीदारहोता आलं. क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी हे त्यापैकीच एक आहेत. खेळाबाहेरचा सचिन कसा आहे, याविषयी त्यांनी आपल्या ‘शतकात एकच...सचिन’ या आगामी पुस्तकात लिहलं आहे.
-
Mazi Pakistanatil Heragiri (माझी पाकिस्तानातील हेर
देशांमधील हेरगिरी हा तेथील गुप्त मिळवण्याचे एक माध्यम आहे. हेर असणारे लोक जीवावर उदार होऊनच दुसऱ्या देशात जातात. त्यात ते देश जर भारत पाकिस्तान असतील तर हेरगीरीला अनेक पदर असतात. मोहनलाल भास्कर यांनी पाकिस्तानात जाऊन तथील आण्विक योजनेची माहिती मिळविण्याचे जोखमीचे काम स्वीकारले. विवाह होऊन काही महिनेच झालेले मोहनलाल कुटुंबियांना सोडून पाकिस्तानला गेले. तेथे मुहम्मद असलम नावाने म्हशींचा व्यापारी बनून त्यांनी हेरीगिरीचे काम सुरु केले; पण एका सहकाऱ्याच्या फितुरीमुळे ते पकडले गेले. तुरुंगामधील यातनामय जीवनाचे चित्रण त्यांनी 'माझी पाकिस्तानातील हेरगिरी' मध्ये केली आहे. १९६५ मधील भारत - पाकिस्तान दरम्यानचे युद्ध, तेथील सामाजिक स्थिती, नागरिक, जनरल याह्याखान, पंतप्रधान भुट्टो, बांगलादेशचे शेख मुजीबुर्रहमान यांच्या विषयीचे अनुभव, तुरुंगातील डाकू, वेश्या, दलाल यांच्या आठवणी, राजा गुल अनार खान यांनी केलेली मदत असे १४ वर्षांतील 'वनवासा'तील वास्तव प्रसंग त्यांनी यात लिहिले आहेत. याचा मराठी अनुवाद संजीवनी शिंत्रे यांनी केला आहे.
-
Subodh sankhyashastra (सुबोध संख्याशास्त्र)
भविष्य कथनासाठी संख्याशास्त्राचाही वापर होतो. जन्मतारखेवरून एखाद्या व्यक्तीचे भविष्य, आरोग्य, होणारे आजार, आदीबाबतची महत्वाची माहिती यातून समजून घेता येते. तसेच दैनंदिन जीवनातील प्रश्नांबाबतही या पध्दतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. संख्याशास्त्रतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी लिहिलेल्या 'सुबोध संख्याशास्त्र' या पुस्तकाचे महत्त्व यासाठीच आहे.
-
Tumachi Mule-Pratibhasampann Bale (तुमची मुले-प्रत
हुशार, गुणी मुल हवे असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते, पण यासाठी पण यासाठी मुलांचे संगोपन योग्य पद्धतीने होते कि नाही, हे पाहणे आवश्यक ठरते. कारण स्वतःच पालनपोषण जसे झाले त्यानुसार मुलांना वाढवले जाते. यात मुलांच्या विकासाकडे दुर्लक्ष होते. असे होऊ नये व बौद्धिक, मानसिक विकास पुरेपूर होऊन तेजस्वी मुलांच्या निर्मितीसाठी काय करावे, याविषयी वनराज मालवी यांनी 'तुमची मुले प्रतिभासंपन्न बाळे' या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या प्रारंभिक काळातील शिक्षण हे त्याला आयुष्यभर पुरणारे असते. जन्मानंतर अठरा महिने, बाळाच्या जीवनाचे पहिले सहा महिने, एक ते दीड वर्ष या काळात त्याची ग्रहणशक्ती अफाट असते. त्याचा वापर करून वाचनक्षमता, अंक ओळख, दुसऱ्या भाषेचे शिक्षण, विज्ञानाची गोडी मुलांना लावणे, त्यांना पूरक, पोषक वातावरण उपलब्ध करून देणे पालकांच्या हातात आहे. त्या दृष्टीने मुलांना वाढविल्यास प्रत्येक मुल प्रतिभासंपन्न होईल, हे निश्चित.
-
Mahasamrat Rankhaindal Khand 2 (महासम्राट रणखैंदळ
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!
-
Aryanchi Dinacharya (आर्यांची दिनचर्या)
सामाजिक आरोग्याच्या सुदृढतेचा विचार करून श्री. दिलीप कस्तुरेकाकांनी या ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे संपादन केले आहे. बुवांचे मूळ पुस्तक आणि जिज्ञासूंसाठी नव्या परिशिष्टासह हे पुस्तक आपल्या भेटीस घेऊन येत आहोत. निरामय आरोग्य व समृद्ध चौफेर जीवनाच्या सर्वांना शुभेच्छा!
-
Kashmirchi 5000 Varshe (काश्मीरची ५००० वर्ष)
काश्मीरमधी जेष्ठ विचारवंत बलराज पुरी यांनी जी. एम. डी. सुफी , पी.एन.के. बमाजाई , वेदकुमार घई, प्रेमनाथ बजाज , पीर गीयास उद्दीन , माधवी यासीन , सैफुद्दीन सोझ यांच्यासारख्या नामवंत काश्मिरी लेखकांच्या भूतकाळाचा वेध घेणाऱ्या लेखांचे 5000 years of Kashmir हे पुस्तक प्रसिध्द केले. १९८९ सालच्या एका परिषदेतील लेखांचे हे पुस्तक काश्मीरमधील सर्व बदलाच मागोवा घेत असल्याने अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्वाचे झाले . मराठी वाचकांना काश्मीर प्रश्नाबद्दल माहिती व्हावी तसेच त्याच्या इतिहासातील घटनांपासून बोधही घेता यावा हा या पुस्तकाच्या अनुवाद करण्याचा हेतू आहे. हे पुस्तक म्हणजे काश्मीरमधील ५००० वर्षातील विविध परंपरांचा , बदलांच वाचनीय इतिहास आहे .
-
Shrisamarth Ramadas Vangmay Shabdarthasandarbhkosh
मनाचे श्लोक व दासबोधाबाहेर समर्थाची जवळजवळ २१००० ओव्यांची ग्रंथरचना उपलब्ध आहे, हे अनेकांना ठाऊकही नसते. या दासबोधेतर वाङ्मयाचा हा कोश आहे. या कोशात एकूण १८००० शब्दांच्या नोंदी आहेत. मूळ शब्द, त्याचे व्याकरण, त्या शब्दाचे ग्रंथात उपलब्ध असलेले अर्थ व त्यांचे संदर्भ, त्या शब्दापासून तयार झालेले वाक्प्रचार, त्यांचे अर्थ व त्यांचे पत्ते असे एकंदरीत नोंदीचे स्वरूप आहे. संपादक - डॉ. मु. श्री. कानडे आणि श्री. रा. शं. नगरकर
-
Devgandharv (देवगंधर्व)
भास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या प्रसिध्द घराण्यातील अनेक गवई उत्तरेकडून दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण होते यात संशय नाही. कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी, कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी, कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये तालाचा अजस्त्र खटाटोप दिसून येई. परंतु स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या उत्कर्षाला पोहोचलेले गुरूवर्य भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या अंगी दिसून येत असत. सबंध शतकात असा एकच पुरूष निर्माण होतो असे त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे एवढी त्यांची थोरवी होती. गोविंदराव टेंबे पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की, “ भास्करबुवांचं गाणं झालं की असं वाटायचं की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं.” हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं आहे.... त्यांनी रंगभूमीच्या माध्यामातून शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला. अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की हे ‘नाथ हा माझा’ सारखं आहे, हे त्यांना ओळखता येतं. पं.भीमसेन जोशी अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.
-
Sattechya Paareeghatatun (सत्तेच्या परिघातून)
'Through the Corridors of Power' या पी.सी.अलेक्झांडर यांच्या मुळ पुस्तकाचा अनुवाद ..