-
Te Chauda Tas (ते चौदा तास)
सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू... त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं... रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक, त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचारयांनी सुरु केलेला मदतीचा ओघ... मृत्युच्या सावटाखाली घालवलेल्या 'त्या' चौदा तासंचा जीवघेणा अनुभव सांगताहेत. 'ताज' चे कर्मचारी अंकुर चावला... ते चौदा तास
-
Operation X (ऑपरेशन एक्स)
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आरोपी अजमल कसाबला फासावरं लटकवल्या जाण्याचा घटनाक्रम 'ऑपरेशन एक्स' या पुस्तकात मांडला आहे.
-
Gargi Ajun Jeevant Ahe (गार्गी अजून जिवंत आहे)
सार्या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणार्या गार्गीचा काळ खूप मागे पडला. पण गार्गी अज[...]
-
Putra Chetkinicha (पुत्र चेटकिणीचा)
सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही… वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या.त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या. या दोन्ही शक्तिंमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या काटकारस्थानांमुळे अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा… केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून जिवंत जाळायचा कट आखला गेला. या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं, या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं, याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद… पुत्र चेटकिणीचा
-
Bharat 2020 (Navya Sahastrakacha Bhavishyavedh) (भ
इसवीसन २०२० पर्यंत किंवा जमल्यास त्याच्याही आधी प्रगत भारत उभा करणे हे हस्तिदंती मनोर्यात बसून चितारलेले मिथ्या स्वप्न नव्हे किंवा केवळ आशावादही नव्हे. खरे तर, ही अथक परिश्रमांची मागणी करणारी आणि अव्याहत चालणारी मोहीम आहे. आपण सारे त्यात मनापासून सहभागी होण्याचा अवकाश... मोहीम यशस्वी झालीच म्हणून समजा!
-
Khelta Khelta Aayushya-Girish Karnad (खेळता खेळता
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक गिरीष कर्नाड यांच्या ‘आडाडता आयुष्य’ या मूळ कन्नड भाषेतील आत्मचरित्राचा ‘खेळता खेळता आयुष्य’ या नावाने उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद.
-
Mahatma Gandhi Aani Bhartiya Rajyaghatna (महात्मा
महात्मा गांधीनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वतंत्रपूर्व काळात राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनामद्धे समंत झालेल्या अनेक ठरवांमध्ये गांधीजीच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वतंत्र मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरनिशी फारशी सुसंगत आहे. असे म्हणता येत नाही. असे का झाले. असावे? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मुलभुत मतभेद का असावे? महात्मा गांधी आणि वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्ये मुलभुत मतभेद का होते? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती? आशा विविध प्रश्नाची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या इतिहासही उलगडून दाखवणारे एका जेष्ट न्यायविदाचे हे पुस्तक.... गांधीजींच्या व्यक्तमत्वाचे एका आगळ्या पैलुवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच. पण काही मुलभुत राष्ट्रिय प्रश्नाची पुनर्विचार करण्यास वाचाकांना प्रवृतही करते.
-
Balnatika Ani Ekpatrika (बालनाटिका आणि एकपत्रिका)
"आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे.दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकापात्रिकांच्या पुस्तकाची.अगदी बालवयापासून अभिनयाचा,लेखनाचा 'छंद' जोपासला.म्हणूनच ते आज नामवंत कलाकार,लेखक होऊ शकले.छोट्या दोस्तांनो !तुम्हीही तुमच्यातील कलागुण वाढवा आणि खूप खूप मोठे व्हा.आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद ! "
-
Alfred Hitchcock-The Man Who Knew Too Much (आल्फ्र
आल्फ्रेड हिचकॉक म्हणजे संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट. अर्थात संदेहाशिवाय चित्रपटांतील इतरही अनेक तंत्रमंत्रांचाही तो ’मास्टर’ होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा खर्या अर्थाने चित्रपटसृष्टीतील अजोड असा ’द मॅन हू न्यू टू मच’ होता, याचा थक्क करणारा प्रत्यय येतो.
-
Nisargamitra ( निसर्गमित्र )
"ही सारी सृष्टि केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे, असं मानंण वेडगळपणाचं ठरेल. माणुस नसेल, तर हे विश्व जेवढे अपूर्ण आहे , तेवढेच एखादा कीटक नसेल, तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना इश्वरांन सर्वांसाठी केली आहे. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू दया, अशीच या विश्वाची धारणा आहे... आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगल आहेत, त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरदऱ्यां आणि कोसळते धबधबे यांनी आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरनं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती पुढच्या पिढ्यांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे...." असं समजावून सांगणार्या एका अमेरिकन निसर्गमित्राची ही चरित्रकथा... पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि कार्याची प्रेरणा देणारी ...
-
Kharicha Vata (खारीचा वाटा)
एक निसर्गरम्य खेड. तिथ वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानी पाळलेली खार. सम्रुध्द निसर्ग, पिकपाणी, रानमेवा, जानवर, करामाती मित्र यांत रमलेला, गुंगलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधनारे मशिनारिची घरघर , थोड्याच दिवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथेच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.