-
Brainwaves (ब्रेनवेव्ह्ज)
एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे, जगातील दुरिताच्या नाशाचे.या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला - विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण -हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी.
-
Thaki Ani Maryadit Purushottam (ठकी आणि मर्यादित प
आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आईच नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणारया अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटत की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते चापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत? आपल्या आयुष्यात की दुसरयाच्या? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब? सत्य-असत्यामधली धूसर रेषा सारखी हलते का आहे? खरंच का... वास्तव असतं काल्पनिक?
-
Jawaharlal Nehruche Netrutva-Ek Sinhavalokan (जवाह
भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे पुरोगामी, संवेदनाक्षम आणि द्रष्टे नेतृत्व लाभले म्हणूनच संसदीय लोकशाहीची सुदृढ पायाभरणी होऊ शकली आणि धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था स्थिरावू शकली. या दोन्ही बाबतींतील नेहरूंचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. अर्थात काश्मीरचा रेंगाळलेला संघर्ष, चीनबरोबरचा चिघळलेला सीमावाद अशा अनेक समस्यांचे ओझेदेखील त्यांच्या चुकांमुळेच आपल्याला अजूनही वाहावे लागते आहे. तथापि जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला, तर नेहरूंनी दिलेल्या देणग्यांचे पारडे निश्चितच जड आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे सिंहावलोकन आहे.
-
Ishwar Dot Kom ( ईश्वर डॉट कॉम )
ही आहे एक धमाल कहाणी . ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती. आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव ,धर्म , संस्कृती अन परंपरेच्या व्यापारीकरणात हृदयातला ईश्वर हृदयात हरवतो. उतार आधुनिक काळात तरी आपण विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर आनं प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा हि त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन अण्णा अन विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात ?मुरवणार आहोत का ? गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारी हसत-हसवत,गुदगुल्या करत वाचकांना विचारप्रवण करणारी कादंबरी
-
Sur-Sangat (सूर-संगत)
गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपनाऱ्या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त साम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरु म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात ' घराणी हवीत कशाला '? असे सूर उमटत असतानाच्या काळात ' घराणी हवीतच ' असा बाणा जपनाऱ्या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणाऱ्या धोंडूताईनी त्यांच्या गुरुंविषयी आणि सांगीतिक कारकीर्दीविषायी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच - सूर-संगत