-
Doicha Padar Aala Khandyavari (डोईचा पदर आला खांद्
ही कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी अपघातानं ती एक चूक करते. पण त्यापायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या सार्या आकांक्षांना तिलांजली देत, ‘पापणीआडचा पाणपडदा' लपवत ती जगत राहते ! अंतरीचा पीळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते ! यातून सुटण्याचा मार्ग तिला गवसतो का ? परतीची वाट सापडते का ? ‘पाऊल वाकडं पडलं’, तर ‘तिचं’ ! ‘निसरड्या वाटेवर घसरली’, तर ‘ती’च चुकलेली ! ही ‘ती’च्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का ? स्त्रीला वेढणार्यार कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी.
-
Sandhiprakash (संधिप्रकाश)
अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात. अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो. सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार्याा प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी.
-
Aispais Gappa Neelamtainshi (ऐसपैस गप्पा नीलमताईंश
राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार्यार कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार्याा नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार्याा कुशल व्यवस्थापक. तिसर्यार जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार्या् अभ्यासक. उत्तम वक्त्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.
-
Hiravi Portrets (हिरवी पोर्ट्रेट्स)
`हिरवी पोर्ट्रेट्स' हा ललित लेखसंग्रह म्हणजे कोकणच्या अंत:स्पंदनांची रम्य स्मरणयात्रा. बेर्डेंमधला लेखक - दिग्दर्शक - चित्रकार - नेपथ्यकार - पार्श्वसंगीतकार - जाहिरात कलाकार - वाद्यवृंदकार कसा घडत गेला, नावारूपाला आला, याचीही प्रेरणादायक कहाणी या ललित गद्यामधून आपल्याला कळते. कोकणची भूमी अनेक कलावंतांची जन्मदात्री आहे. संगीत, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, चित्र, शिल्प अशा अनेकविध क्षेत्रांत कोकणपुत्रांनी व कोकणकन्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. स्वतंत्र प्रज्ञा, जिद्द, उद्यमशीलता, साहसीपणा, एखादं काम अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेण्याची आकांक्षा, श्रद्धाशीलता या गुणांमुळे आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा राष्ट्रीय स्तरावर उमटविणारे अनेक गुणीजन कोकणभूमीत निर्माण झाले. आपले भूमिसंस्कार घेऊन स्वत: वाढत राहिले. राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म, विविध कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कर्तृत्ववान माणसांनी जे योगदान दिले; त्याचे `हिरवी पोर्ट्रेट्स'मधून अंशत: दर्शन घडते. हे लेखन केवळ `कोकण प्रशंसापुराण' नाही. त्यातील आत्मचिकित्सा, समाजचिकित्सा, अंतर्मुखता, वास्तव निरीक्षणे आणि समकाळाशी जोडून घेण्याची सकारात्मकता लक्षणीय आहे. डॉ. महेश केळुसकर
-
Shivsena, Lokadhikar Ani Mi (शिवसेना, लोकाधिकार आण
मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही - ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार्या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार्या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. -- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
-
Lok Maze Sangati Bhag-1 Aani 2 (लोक माझे सांगाती भ
“ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.हा सर्वसामान्य भारतीय माणूसभारतातील सर्व राजकारण्यांपेक्षाखूपच शहाणा आणि समजूतदार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतजनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं.हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे.त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे.सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचामी आपल्या साडेपाच दशकांच्यासार्वजनिक जीवनात काम करतानावारंवार अनुभव घेतला आहे.या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला,यापेक्षा अधिक काय असू शकतं?”शरद पवारगेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीतमहत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेलाआपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
-
Miracle (मिरॅकल)
कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? कार्डीओ – ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? फायर फ्लाय अॅाक्शन मरणासन्न अवस्थेतील प्रियकर कोमामध्येही आपल्या प्रेयसीबरोबरचं जीवन जगतो. मात्र सत्य समजल्यानंतर तो धक्कादायक निर्णय घेतो. काय होतं ते सत्य ? कोणता होता त्याचा निर्णय ? मिरॅकल हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणारे यंत्रमानव माणसाची सर्व कामे चोख करत आहेत. माणसाला त्यांची सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा आहे येणारा भविष्यकाळ ! गुरूमहाराज विज्ञान-तंत्रज्ञान आज मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचं अविभाज्य अंग झालं आहे. आजच्या विज्ञानाच्या पायावर भविष्यातील विज्ञानकल्पनेचा महाल उभारणार्याय - मानवी भावभावनांचा, परस्परसंबंधांचा वेध घेणार्याा - उत्कंठावर्धक, चित्तथरारक अन् रंजक विज्ञानकथांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य !
-
Rag Darbaree (राग दरबारी)
तलत महमूद सुभाष दांडेकर प्रो. मधु दंडवते माधुरी आणि स्नेहलता दीक्षित प्रिया तेंडुलकर अनंत पै उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं : राग दरबारी
-
Olakh Aplya Vishvachi (ओळख आपल्या विश्वाची)
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यान्पिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार्याक आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार्यात या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -
-
Punha Ekada Stri Purush Tulana (पुन्हा एकदा स्त्री
मला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय़ पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय़ मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणार्याग तिच्या कणखरपणाविषयी!
-
Nikola Tesla (निकोला टेस्ला)
‘अग्नीवर मिळवलेले नियंत्रण’ हा मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण. आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे अनेक दरवाजे उघडले गेले, ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच! आज तर आपण ‘विजेशिवाय आयुष्य’ अशी कल्पनाही करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान विकसित करणार्याय वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक निकोला टेस्ला! विद्युतनिर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय जाते निकोला टेस्लाकडे. आपले अवघे आयुष्य विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणार्याण या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध.
-
Teen Hotya Pakshinee Tya (तीन होत्या पक्षिणी त्या)
डोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामथ्याने नेपायातले साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...
-
Mahajalache Muktayan (महाजालाचे मुक्तायन)
‘चित्तो जेथा भोयोशून्यो’ या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणार्याी या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय, सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
-
Asahi Ek Kimayagar (असाही एक किमयागार)
एका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे ‘आयकॉन' बनले आहेत. त्यांच्यावरील अंजली ठाकूर यांचं हे पुस्तक सर्व मराठी तरुणांना प्रेरणा देईल, याचा मला विश्वास वाटतो. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खाते हणमंतरावांचे मुख्य ध्येय आहे की, जितके शक्य आहे, तितके समाजाचे हित करण्याचा प्रयत्न करायचा. ते नेहमी म्हणतात की, त्यांना दहा कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे; आणि ते ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यातून लवकरच आपले ध्येय गाठतील. नुसते उपदेश देऊन नव्हे तर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या वागणुकीतून अनेकांना काम करण्याची प्रेरणा दिली आहे. अनेक तरुणांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत केली आहे.
-
Rakhetun Ugavatikade (राखेतून उगवतीकडे)
ही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही, तर पुनश्च ‘राखेतून उगवतीकडे’ निग्रहाने झेपावतो, त्याची होय.
-
Sattechya Padchhayet (सत्तेच्या पडछायेतून)
यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर. ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र.
-
Devgandharv (देवगंधर्व)
भास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या प्रसिध्द घराण्यातील अनेक गवई उत्तरेकडून दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण होते यात संशय नाही. कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी, कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी, कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये तालाचा अजस्त्र खटाटोप दिसून येई. परंतु स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या उत्कर्षाला पोहोचलेले गुरूवर्य भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या अंगी दिसून येत असत. सबंध शतकात असा एकच पुरूष निर्माण होतो असे त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे एवढी त्यांची थोरवी होती. गोविंदराव टेंबे पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की, “ भास्करबुवांचं गाणं झालं की असं वाटायचं की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं.” हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं आहे.... त्यांनी रंगभूमीच्या माध्यामातून शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला. अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की हे ‘नाथ हा माझा’ सारखं आहे, हे त्यांना ओळखता येतं. पं.भीमसेन जोशी अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.
-
Katta Model (कट्टा मॉडेल)
विज्ञानात कुणी छोटा-मोठा, खालचा-वरचा नाही. नवीन कल्पनांचा झरा कुठेही फुटू शकतो. न सुटणारी कोडी एखादा पोरच सोडवून जातो. विज्ञानाचा प्रवाह कुठूनही कुठेही वाहू शकतो. वैज्ञानिकांनी, प्राध्यापकांनी, विज्ञानलेखकांनी विज्ञानशिक्षण शिकवायचं, लोकांसमोर मांडायचं आणि विद्यार्थ्यांनी, सामान्य वाचकांनी त्यांच्यापासून फक्त शिकायचं – या समजुतीला जोरदार तडा देणा-या अनुभवांचं हे कथन. विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित माणूसही संशोधन करू शकतो, ज्ञान-विज्ञानात मोलाची भर टाकू शकतो. हे केवळ इतिहासातच घडलं आहे असं नाही; तर आजही नित्य नेमानी घडू शकतं, घडत आहे. मोठमोठ्या उपकरणांनी समृद्ध प्रयोगशाळा असतात विद्यापीठे अन् संशोधनसंस्थांमध्ये. सामान्य माणसाची प्रयोगशाळा आहे ‘कट्टा’. प्रत्येकाला सर्वकाळ आणि सर्वत्र उपलब्ध असलेली. अशा ‘कट्टा’ प्रयोगशाळेतून विज्ञानक्षेत्र अधिक निकोप आणि लोकाभिमुख करणारे