-
-
Gas Chamber (गॅस चेंबर)
रत्नाकर मतकरी हे रुढार्थाने ललित लेखक असले तरी त्यांच्यामध्ये एक राजकीय निरीक्षक जागता असे. आपल्या भवतालातील गुंतागुंतींचा विचार करणं आणि तो विचार ललित कलाकृतींतून निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणं ही लेखक म्हणून आपली सामाजिक बांधिलकी आहे , असं ते मानत. ‘गॅस चेंबर' मधल्या कथा वाचताना ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवते.या संग्रहातील कथा अस्वस्थ वर्तमानाचं प्रतिबिंब टिपत भविष्यकाळाचं सूचन करणाऱ्या आहेत. या कथांना आजच्या काळाचा संदर्भ आहे. त्यापलीकडे या कथा एकुणात एकाधिकारशाही आणि तिच्या पकडीखाली दबल्या गेलेल्या समाजाबद्दलही बोलतात.
-
Arthshastracha Sankshipt Itihas (अर्थशास्त्राचा सं
हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप मोठी कहाणी सांगते. प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंत अर्थशास्त्राच्या लघुतम इतिहासाचे हे पुस्तक म्हणजे युद्धांच्या मागे प्रच्छन्न आर्थिक शक्ती कशी काम करत असते, नवनवीन शोध कसे लागत असतात आणि सामाजिक बदल कसे होत असतात या गोष्टी मुळापासून उकरून काढते. भांडवलशाही आणि मार्केटच्या पद्धती यांचा उगम कसा होतो आणि अर्थशास्त्राच्या या विद्याशाखेला महत्त्वाच्या कल्पना प्रदान करणारे लोक कसा आकार देतात याचा मागोवा हे पुस्तक घेतं. कृषिक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्य्रू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित होत राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैंगिक भेदाभेद कसे वाढले ते उलगडून दाखवतात. काही रोगांमुळे वसाहतवादाच्या काही प्रकारांना कसा आकार प्राप्त झाला तेही सांगतात. अमेरिकी शहरांमध्ये गगनचुंबी इमारती निर्माण होण्याची कारणे विशद करतात आणि बरेच काही सांगून जातात. या सगळ्या विचारमंथनाचा परिणाम म्हणजे आपल्या विवाला आकार देणारे असे अर्थशास्त्रीय कल्पनांवर आणि शक्तिस्त्रोतांवर प्रकाश टाकणारे हे रंजक पुस्तक.
-
Vihirichi Mulgi (विहिरीची मुलगी)
कादंबरी कशाबद्दल आहे ? तर एका बावीस तेवीस वर्षाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे. अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.
-
when my father...(व्हेन माय फादर...!)
नात्यांची झापडं डोळ्यावर ओढून बसलेल्या समाजाला नात्यांपलीकडे बघण्यासाठी भाग पाडणारी कादंबरी. माणूस विकारांसह जगत आला आहे आणि विकृत वागत आला आहे. बालकांचे लैंगिक शोषण ही सामाजिक समस्या तशी जुनीच आहे. वर्तमान काळ त्याला अपवाद नाही. आपण रोजच तशा बातम्या पाहत असतो, ऐकत असतो, वाचतो. मात्र; या विषयावर व्यक्त होणे टाळतो. बाललैंगिक शोषणाच्या बहुतांश घटनांमध्ये अपराधी ओळखीतला किंवा कुटुंबातलाच असतो. कधी अगदी जवळच्या नात्यातला तर कधी अगदी सख्खा बाप सुद्धा. अशावेळी प्रत्येक आईने कादंबरीतल्या नायिकेच्या आईप्रमाणे कणखर बनून आपल्या लहानग्यांना समजून घेणं अपेक्षित आहे.
-
Mossad...
Mossad Israeli Gupther Sansthela Baladhya Banvnarya Atyant Gupt Mahatvpurn Thararak Mohima ( Marathi Edition ) मोसाद इस्त्रायली गुप्तहेर संस्थेला बलाढ्य बनवणाऱ्या अत्यंत गुप्त, महत्त्वपूर्ण थरारक मोहिमा ! मोसाद या पुस्तकात मोसादने पार पाडलेल्या गोपनीय मोहिमांचे वर्णन केले आहे. या मोहिमा मोसादच्या विकासामध्ये त्याचे स्वरूप निश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना ठरल्या आहेत. १९७२च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली खेळाडूंची 'ब्लॅक सप्टेंबर' संघटनेच्या अतिरेक्यांनी हत्या केली. या अतिरेक्यांचा माग काढत त्यांना एकेक करून संपवण्याची मोहीम, इस्रायलच्या गुप्तपणे राबवण्यात येणाऱ्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी 'येलोकेक' युरेनियमचा साठा हस्तगत करण्याची मोहीम आणि नाझी युद्ध गुन्हेगार अॅडॉल्फ आईकमन याचे अपहरण करत त्याचा जाहीर न्यायनिवाडा घडवून आणण्याची मोहीम अशा महत्त्वपूर्ण मोहिमांचे वर्णन या पुस्तकात केले आहे. मोसादच्या काही मोहिमा वादग्रस्तही ठरल्या. यात इराकच्या अणुऊर्जा कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या एका शास्त्रज्ञाची हत्या घडवून आणण्याची मोहीम आणि एडवर्ड स्नोडेनप्रमाणे एक प्रमुख जागत्या (विसलब्लोअर) असलेला -इस्रायली नागरिक मोर्डेकाई वानुनु याचे अपहरण या मोहिमांचा समावेश होतो मोर्डेकाई वानुनु यांना इस्राईलने बेइमान, गद्दार ठरवले. या मोहिमांवर जगभरातून नैतिक प्रश्नचिन्हे उठली. एकूणच या पुस्तकात वर्णन केलेल्या मोसादच्या मोहिमा त्याची वैशिष्ट्ये, कल्पकता आणि धाडस यांचे अचूक वर्णन करतात. त्याच वेळी त्या मोहिमांमध्ये अंतर्भूत असलेल्या वादग्रस्त नैतिक पैलूंनाही वाचकांसमोर मांडतात.
-
Goat Days (गोट डेज)
आखाती देशांत जायचे, भरपूर पैसे कमवायचे आणि मायदेशातल्या कुटुंबियांना सुखात ठेवायचे या आकांक्षेने तिथे जाणाऱ्या लाखो लोकांपैकी एक म्हणजे केरळात मजुरी करणारा नजीब. त्याची आखाती आकांक्षा सफल झाली की स्वप्नरूपातच राहिली ? त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कधी निसर्गाने तर कधी मानवाने, प्राणच पणाला लावले. त्यातूनही तो निभावून गेला, कसा? कोणत्या श्रद्धांमुळे? जसा होता तसा राहिला की ? मानवी आयुष्याची संभवनीय परिवर्तने आणि मूलभूत मूल्ये, यांचे चित्तवेधक दर्शन या कादंबरीत घडते. ‘गोट डेज’ मल्ल्याळी भाषेत प्रकाशित झाली आणि अल्पावधीत बेस्ट सेलर या वर्गात मोडली जाऊ लागली. मल्ल्याळी साहित्यातील एक अत्यंत तेजस्वी असे व्यक्तिमत्व म्हणजे बेन्यामिन. त्यांची उपरोधीक आणि प्रसंगी हळुवार होणारी शैली नजीबच्या आयुष्याची वाळवंटी वंचना, बघता बघता, एकाकीपणा आणि परकेपणा, यांचे वैश्विक परिणाम कसे बनते ते समर्थ रीतीने उभे करते. या पुस्तकाच्या मल्याळम आवृत्तीच्या तीन लाखाहुन अधिक प्रतींची विक्री झालेली आहे.
-
Setu (सेतू)
प्रेमाचा 'सेतू'आता सर्वत्र उपलब्ध प्रेमाला नसतो भाषेचा बांध. प्रेमाला नसतं प्रांताचं बंधन. प्रेम मुक्त असतं, बेधूंद, स्वच्छंदी वाऱ्यासारखं पण, प्रत्येकाच्याच नशीबात नसतो आनंदाचा सहजसोपा रसाळ गोडवा. संघर्षाचा सेतू तुडवतच त्यांना पोहचावे लागते प्रेमाच्या तीरावर. हजारो किलोमीटर दूरवरून एक तरूण नाशिकमध्ये येतो काय आणि इथल्या एका गोड मुलीच्या प्रेमात पडतो काय... पण पुढे काय? एवढं सोपं असतं का प्रेम निभावणं? - प्रभू रामचंद्राचा अभ्यास करण्यासाठी आलेला केविन आणि नृत्याची साधना करणारी राधा यांच्या नात्याची प्रेमवेल्हाळ गोष्ट म्हणजेच 'सेतू'. - दुरावलेल्या मायेच्या नात्यांना नव्याने प्रेमाचं लिंपण करणारी गोष्ट म्हणजेच 'सेतू' - प्रत्येकाच्या मनातला हळुवार कोपरा म्हणजे सेतू - तुमच्या आणि माझ्या मनाला जोडणारी भावना म्हणजेच सेतू.
-
Money Power Shrimanticha Expressway (मनी पाँवर श्र
मनी पाँवर श्रीमंतीचा एक्स्प्रेस वे का विकत घ्यावे मी हे पुस्तक ? पैसे आहेत परंतु त्याचे नियोजन, बचत आणि गुंतवणूक नेमकी कशी करावी याचा मनात गोंधळ उडतो. या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी आणि योग्य मार्ग आणि दिशा देण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी. आपले उत्पन्न किती हे महत्वाचे नसून येणाऱ्या पैशांचे योग्य व्यवस्थापन नेमके कसे करावे हेच महत्वाचे ठरते. यासाठी वयोगट २० ते ५० मधील स्त्री आणि पुरुष जे नोकरी किव्वा छोटा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त. संयम आणि चिकाटीतून दीर्घलाकीन गुंतवणुकीतून उत्तम संपत्ती निर्माण करून आपले पैसे सुरक्षित ठेऊन करोडपती होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त. पैशांकडे आपण नेमके कसे पाहतो आणि त्याबाबत आपली मानसिकता कशी आहे आणि असावी हे ज्यांना जाणून घ्यावयाचे आहे त्यांच्या साठी... म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार जाणून घेऊन गुंतवणुकीचे विविध मार्ग आणि पर्याय याबाबत सखोल माहिती. यातून आर्थिक वृद्धी नेमकी कशी करावी याबाबत योग्य मार्गदर्शन देणारे पुस्तक
-
Vastragatha (वस्त्रगाथा)
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.
-
Sfoortivadi Neetishashtra (स्फूर्तिवादी नीतिशास्त्
आज परिवर्तनाच्या चळवळी कुंठित झाल्याचे चित्र दिसते. हे कशामुळे घडले, याची मीमांसा विविध अंगांनी केली जात आहे. अशाच शोधयात्रेत राजीव साने यांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याच नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्याने ही स्थिती ओढवली आहे. केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर स्वतंत्र नीतिशास्त्राच्या उभारणीची गरज त्यांनी ओळखली. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे अभिनव नीतिशास्त्राच्या उभारणीची पूर्वतयारीच ठरू शकेल. भविष्यातील आवश्यक अशा विचारमंथनाची एक नवी पायवाटच साने यांनी घालून दिली आहे. त्या दिशेने जाणाऱ्यांना त्यात अनेक नवी विचारक्षितिजे खुणावतील.
-
Ajaan Ani Chalisa (अजान आणि चालिसा)
करुणेला काट्यांत बांधणा-या कोंडवाड्याला धर्म कधी म्हणू नये मानवतेचा मुडदा पाडणा-या क्रौर्याला शौर्य कधी म्हणू नये माणसांना ‘व्होटबँक' बनवणा-या व्यवस्थेला लोकशाही म्हणू नये ‘ते आणि आपण' अशा भेदभिंतींना घर कधी म्हणू नये दुरावा मनाचा वाढवी, त्याला स्तोत्र कधी म्हणू नये अनिष्ट प्रथा, कर्मठता, शोषण, अज्ञान अन् दारिद्र्य यांत पिचत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी उमटलेला संवेदनशील सूर
-
1695 Smart Robot, AI aani Aurangzeb (१६९५ स्मार्ट
‘राजहंस’ने आयोजित केलेल्या, ‘कुमारवयीन वाचकांसाठी विज्ञानकादंबरी’ लिहिण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी ही कादंबरी केवळ कुमार वाचकांनाच नाही, तर प्रौढ वाचकांनाही रंजक वाटेल अशी आहे. कादंबरीचे कथासूत्र फार विलक्षण आहे. इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये औरंगजेबाच्या मालकीच्या एका जहाजावर पडलेल्या दरोड्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आज एक प्राध्यापक आणि त्याचा पंधरा वर्षांचा हुशार मुलगा करतात, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतात, ही कल्पनाच मुळी अफलातून आहे. विज्ञान कादंबरी असली, तरी लेखकाने तिच्यात तांत्रिक माहितीचा भडिमार केलेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव याबद्दलची माहिती कादंबरीत अधूनमधून येते, पण ती जरूर तेवढीच आणि निवेदनाच्या ओघात येते. वाचकाचे कुतूहल जागृत व्हावे पण त्याला अडखळायला होऊ नये, अशा बेताने. कादंबरीतील व्यक्तिरेखा ठसठशीत उतरल्या आहेत. संवाद सहजसुंदर आहेत. विज्ञान अचूक आहे आणि रहस्य वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतले, की संपूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवता येत नाही.सुबोध जावडेकर