-
Savalya Vitthalachya Deshat (सावळ्या विठ्ठलाच्या द
वर्षाताईंचा मुलगा धनंजय केनिया देशात नोकरीनिमित्त गेला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची पत्नी प्राची, त्यांचा छोटासा अहान आणि वर्षाताई असे सगळेच केनियाला गेले. एका संपूर्णपणे अनोळखी देशात, अनोळखी संस्कृतीत, मनातलं कुतूहल कायम जागतं ठेवणाऱ्या वर्षाताईंनी तिथलं संस्कृती विश्व, त्याची वैशिष्ट्यं टिपली नसती तरच नवल! त्या स्वतःही पुस्तकात अगदी सहज याचा उल्लेख करून जातात 'जेवढी म्हणून इथली माहिती मिळतेय ती जमवायला आवडतेय मला. वर्षाताई, तुमच्या शब्दांची, लेखनाची शक्ती अशी, की आम्ही तिथं न जाताही आम्हाला आता हा परिसर, प्रांत आपलासा वाटू लागलाय. सावळा विठ्ठल असाच आहे. 'पंढरीला न जाताही तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. तिथं जाऊन आलेली, उराउरी भेटून आलेली मंडळी भावभारित असं त्याचं जे वर्णन करतात त्यामुळे त्या सावळ्याबद्दलचं प्रेम अधिकच वाढतं.' तुम्ही त्या रंगाने काळ्या मंडळींत सावळा विठ्ठल पाहिलात. या तुमच्या कृष्णदृष्टीला मनोभावे वंदन ! --धनश्री लेले
-
Adhyatmik Bharatacha Rahasyamay Shodh (आध्यात्मिक
गहन साक्षात्कार प्रत्येक मानवी जीवनात दैवी स्वरूप स्वत:ला व्यक्त करीत असतं; पण मानवाने त्याच्याकडे काणाडोळा केला, तर असा साक्षात्कार म्हणजे खडकाळ जमिनीत पेरलेलं बीज ठरेल, जे कधीच रुजत नाही. या दैवी जाणिवेतून कोणालाही वगळले जात नाही. किंबहुना मानवच स्वत:ला त्यातून वगळून टाकतो. नेहमीच हिरव्या फांदीवर झुलणाऱ्या प्रत्येक पक्ष्याने, आपल्या मातेचा प्रेमळ हात धरून ठेवणाऱ्या मुलाने जीवनाचे गूढ कोडे केव्हाच सोडवलेले असते आणि त्याचं उत्तरही त्याच्या मुद्रेवर झळकत असतं. तिथे मानव मात्र जीवनाच्या अर्थाविषयी आणि रहस्यांविषयी केवळ औपचारिक आणि अहंमन्य चौकशी करीत असतो. मग जीवनाची गूढ रहस्यं त्याला उमजत नाहीत. ‘मी कोण आहे’, हा प्रश्न तुम्हाला या रहस्यांच्या तळापर्यंत घेऊन जाईल. त्यानंतर एका गहन साक्षात्काराच्या, जाणीवेच्या रुपात ते उत्तर आपोआप तुमच्यासमोर प्रकट होईल… अदृश्य पण अत्यंत समृद्ध, साधा परंतु संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारा असा आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं.
-
Majya Katha Tujya Katha (माझ्या कथा तुझ्या कथा)
जीवनातल्या साऱ्या व्यथा ! तगमगत्या शापित जशा. ! आयुष्याचे पंख पसरूनी ! उधळती चौरंगी दिशा ! सहज सोप्या, "माझ्या कथा तुझ्या कथा."
-
Shailendra Aani Saheer-Shabdchitanyache Kimayagar
हिंदी चित्रपटांतील गाणी आणि विशेषतः जुनी हिंदी गाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ मनोरंजनच नाही तर अनेकदा एखाद्या मूड मध्ये जाण्यासाठी किंवा एखाद्या मूड मधून बाहेर येण्यासाठी, लोकांच्या नकळत खुले आम एखाद्याला निरोप देण्यासाठी आणि इतकंच नाही तर जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ही गाणी कामी आली आहेत आणि येत राहतील. विलास देशमुख यांनी त्याही पुढे जाऊन काव्यामागील कवी आणि कवीमागील माणूस शोधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. मुळांत गाणी आणि गीतकार अशा पध्दतीने समजून घेण्याची आस जागी होणं ही गोष्टच त्यांना सामान्य श्रोत्यांपासून वेगळं करते आणि मग आपण त्यांनी दाखवलेल्या शक्यतांचा हात धरून पुढील प्रवास करतो. प्रत्येक घरात गोष्टी सांगणं, ऐकणं अप्रूपाचं असतंच पण या अशा पुस्तकांच्या रूपाने "गाणी सांगणारं" ही कुणीतरी आहे हे विशेष. अनेकानेक शुभेच्छा.
-
Nivadak Shi.K. (निवडक शि. क.)
'निवडक शि. क.' या संग्रहाची कल्पना वाचकांमुळेच सुचली. याचे श्रेय तमाम वाचकांचेच. अनेक पुस्तकांतून प्रसिद्ध झालेल्या लेखनातील निवडक लेख निवडणे तसे फारच जिकीरीचे. पण वाचकांना आनंद मिळेल आणि चित्रपट, क्रिकेट व ललित लेखन यांचा समतोल राहील याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तो वाचकांनाही नकीच आवडावा.